मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्णाने कोणता धर्म केलं ते सांगा >>
सगळ राज्य मिळत असताना केवळ मित्रत्वाच्या नात्यापायी ते लाथाडण मला कुठल्याही सो कॉल्ड धर्मापेक्षा मला जास्त महत्वाच वाटत.
इंद्राला केलेल दान अन त्याहूनही कुंतीला दिलेल ४ पुत्रांच्या जीवनाच दान हे काय होत बर ?

आणि हो , दुष्ट , दुराचारी लोकांन्ना संपवण्यासाठी केलेल्या युक्त्या (मला माहित नव्हत द्रोण अन भीष्म तसे होते , पण तुम्हाला जास्त माहित असेल) या जर नियमाविरूद्द असतील तर त्या अधर्मच मग त्या कशासाठीही करा .

आणि प्लीज त्याला बिन्डोक म्हणण्याचे काही एक कारण नाही, >> प्लीज कृष्णाला बिन्डोक म्हणण्याचे काही एक कारण नाही, >>> कृष्णाला कोण बिन्डोक म्हणतयं इथे? मला तर तो सर्वात हुशार, बुद्धिमान पण तेवढाच चलाख वाटतो.. त्याला सगळंच माहीत होत की राव..

आणि द्रौपदीला नंतर कर्णाला नाकारल्याचा पश्चाताप झाला होता. ' कर्णाशी लग्न केलं असतं तर पाच भावंडांमध्ये २-२ महिने अस विभागलेलं जीवन तर जगावं लागलं नसतं, असं ती आपल्या सखी/ दासीला सांगते, असं वृषाली (कर्णाची पत्नी) स्वत: कर्णाला सांगते, असा उल्लेख आहे 'मृत्युंजय' मध्ये.

आणि 'अर्जुन जिंकावा म्हणून साक्षात इंद्र कवचकुंडले मागायला येणारा आहे' हे माहीत असतानाही त्याने ती दिली, ते काय होतं हो?
आणि युद्धभूमीवर पडलेला असताना, प्राण जात असतानाही एका ब्राह्मणाला त्याच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी तोंडातले सोन्याचे दात देणारा पण कर्णच होता... त्या पांडवापैकी कोणालही हे असं कधी जमलं असतं का?
इथे मुळात कर्ण चांगला की पांडव हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की त्याला नेहमीच वाईट, खालच्या थराची वागणूक दिली गेली, त्याचा राग येऊन त्याने स्वत:ला श्रेष्ठ आणि इतरांयोग्य सिद्ध करण्यासठी प्रयत्न केले तर त्यात त्याचं काय चुकलं?

तुम्ही एकदा 'मृत्युंजय' आणि 'युगंधर' दोन्ही वाचा आणि मग आपण त्यावर चर्चा करूया.. आणि मला अर्धवट ज्ञान आहे किंवा मी एकाचीच बाजू घेत्ये असं वाटत असेल तर मलाही तुम्ही वाचलेलं एखादं पुस्तक सांगा (रेफर करा), मीही ते वाचेन ाणि मग आपण चर्चा करूया.. पण उगाच नावं ठेवायचीच आहेत म्हणून कर्णाला नाव ठेवू नका आणि पांडवानांही श्रेष्ठ ठरवू नका... चूक सर्वांचीच होती, पण तरीही कर्ण त्यातला त्यात पटण्यासारखाचं वाटतो मला, पांडव पटत नाहीत... कधीही...

ते सगळे काहीही असो पण कालच्या (७ ऑगस्ट) एपिसोडमध्ये जाम मजा आली.

शकूनी च्या मागे सगळे पांडव हात धुऊन लागलेले पाहून आनंद वाटला.
प्रत्येक वेळेस दुर्योधन मामाश्री च्या मदतीला धावून येतो ते छान दाखवले आहे.
"सम्राट प्रसन्न हो", हा डायलौग युधिष्ठीर शी लढाई करत असतांना शकुनी म्हणतो तेव्हा युधिष्ठीर त्याला दोन गालावर लगावतो आणि म्हणतो, "सम्राट अब प्रसन्न हो गये" Happy

पण दुर्योधन रणभूमी वरून पळून जातो ना?
पण मग यात वेगळेच दाखवत आहेत ????

शेवटचा महा एपिसोड मी ऐकले आहे की १६ ऑगस्ट ला आहे, 10 ला नाही... खरे काय आहे?

मला असे वाटते की १६ सप्टेंबर ला शेवटचा एपिसोड व्हावा, म्हणजे बरोब्बर एक वर्ष चालेल महाभारत!!
अगदी जनमेजयला आश्रमात ऋषिगण महाभारताची कथा सांगतात तिथपर्यंत दाखवायला हवे.

पूर्वी "महाराष्ट्र टाईम्स" मध्ये मला आठवते १९८८ च्या सुमारास रोज महाभारताची कार्टून स्ट्रीप छापून यायची. त्यात जनमेजय ला महाभारताची कथा सांगतात आणि त्यातून कथा उलगडत जाते असे दाखवले आहे.

मृत्यूंजय काल्पनिक कादंबरी आहे, त्यात दाखवलेले प्रसंग मूळ महाभरतात असतीलच असे नाही Happy

कालचा शकुनीला बडवतानाचा एपिसोड क्लास होता. काहीम्म्हणा, सर्वात उत्तम अभिनय शकुनी करणार्‍या पात्राने रंगवला आहे. Proud

शकुनी ग्रेट अभिनेता आहे यात वादच नाही.

अर्जुनाचा विनोदी डायलोग : " मामाश्री आपकी दोनो आंखे बाद करने का समय आ गया है " Happy

सगळ राज्य मिळत असताना केवळ मित्रत्वाच्या नात्यापायी ते लाथाडण मला कुठल्याही सो कॉल्ड धर्मापेक्षा मला जास्त महत्वाच वाटत.
कोणत्या राज्याबद्दल बोलता आहात ? कोणतं राज्य लाथाडल कर्णाने?

इंद्राला केलेल दान अन त्याहूनही कुंतीला दिलेल ४ पुत्रांच्या जीवनाच दान हे काय होत बर ?
कर्णाला मिळालेली कवच कुंडलं हि त्याला सुर्यादेवांकडून दानातच मिळालेली होती . ती त्याने स्वताच्या पराक्रमाने मिळवली नवती . कर्ण एवढं सामर्थ्यवान होतं तर त्या कवच कुंडलांचा आधार घ्यायची त्याला गरजच काय होती ? आणि जणू काही कर्णाने त्या ४ पुत्राचं दान दिलं नसता तर त्यांचा वधच झाला असता .

नियमाविरूद्द असतील तर त्या अधर्मच मग त्या कशासाठीही करा .

चुकीचे नियम हा धर्म होऊ शकेल का ? नियम पालन, वचनं पालन , दान देणं एवढाच धर्म आहे . त्यापलीकडे धर्मच नाहीये अशी समजूत सगळ्यांचीच झाली होती म्हणून तर महाभारत घडलं ना. नियमांच्या पलीकडचा खरा धर्म समजलं नाही म्हणून तर महाभारत घडलं ना. कौरवांनी आयुष्यभर सगळे नियम पायाखाली तुडवले . अगदी युद्धात सुधा नियम तोडण्याची सुरवात त्यांनीच केली . तेव्हा जशास तसं प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं.

@मीनाक्षी कुलकर्णी | .
मृत्युंजय' आणि 'युगंधर' दोन्ही पुस्तकं मी वाचलेली आहेत . ह्यात लेखकाने स्वताच्या दृष्टीकोनातून लेखन केलं आहे. कर्णाला उगीचच सहानुभूती मिळवून देण्याचं काम शिवाजी सावंतांनी केलं आहे. युगंधर तर तद्दन खोटी कादंबरी आहे. काय तर म्हणे व्यासांना बघून अंबिका मूर्च्छित झाली म्हणून तिला आंधळा पुत्र झाला आणि अंबालिका पांढरी फटक पडली म्हणून तिला पांढरा पांडू झाला . अजून हि बराच विनोदी लिखाण आहे त्यात . हि कादंबरी मी अर्धी वाचली . पण त्यातला कैच्या काही पणा सहन न झाल्याने देवून टाकली परत .त्यापेक्षा तुम्ही मूळ महाभारत वाचलं तर अनेक गैरसमज दूर होतील . मग आपण चर्चा करू शकतो. द्रौपदीला नंतर कर्णाला नाकारल्याचा पश्चाताप होणं वगेरे हे 'मृत्युंजय' मध्ये आहे . महाभारतात नाही

आणि युद्धभूमीवर पडलेला असताना, प्राण जात असतानाही एका ब्राह्मणाला त्याच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी तोंडातले सोन्याचे दात देणारा पण कर्णच होता.
कर्णाने आयुष्यभर सोन्याच दान दिल ते पण दुर्योधनाने घातलेल्या भिकेच्या जोरावरच. आणि दान देणं ह्या कार्याची तुलना पांडवांशी करायची काय गरज आहे ? पांडवांनी अनेक गोष्टी केल्यात त्या कर्णाला कधी जमल्यात का ?

त्याचा राग येऊन त्याने स्वत:ला श्रेष्ठ आणि इतरांयोग्य सिद्ध करण्यासठी प्रयत्न केले तर त्यात त्याचं काय चुकलं?
प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही. वाईट, खालच्या थराची वागणूक देण हा अधर्मच आहे . पण त्याने दुसर्यांना विनाकारण त्रास द्यायचं समर्थन होत नाही . हाच प्रश्न कर्णाने श्री क्रीष्णांना विचारला होता. त्तेव्हा त्यांनी त्याला परशुरामांच उदाहरण दिलं . एका क्षत्रियाने त्यांच्या वडिलांना मारला म्हणून ते सरसकट सगळ्याच क्षत्रियांना मारत नाही सुटले . माजलेल्या , अहंकारी क्षत्रीयांचाच त्यांनी नाश केला .

चूक सर्वांचीच होती, पण तरीही कर्ण त्यातला त्यात पटण्यासारखाचं वाटतो मला, पांडव पटत नाहीत... कधीही...
कलियुगाचा हा प्रभावाच आहे कि लोकांना चुकीच्या गोष्टी बरोबर वाटतात आणि बरोबर त्या चुकीच्या .मी असं नाही म्हणत आहे कि पांडव फार सज्जन होते वगेरे . पण तुलनेने कौरव आणि कर्ण त्यांच्यापेक्षा हजार पटीने दुष्ट होते

सर्वात उत्तम अभिनय शकुनी करणार्‍या पात्राने रंगवला आहे
Agreed . स्टार प्लस च्या महाभारतात फक्त शकुनीच काय तो चांगली अक्टिंग करतोय . दुसरा नंबर श्री कृष्णाचा. त्यानंतर द्रोपदी आणि भीम . बाकीचे सगळे overacting करतात .

सगळ राज्य मिळत असताना केवळ मित्रत्वाच्या नात्यापायी ते लाथाडण मला कुठल्याही सो कॉल्ड धर्मापेक्षा मला जास्त महत्वाच वाटत.
कोणत्या राज्याबद्दल बोलता आहात ? कोणतं राज्य लाथाडल कर्णाने?

इंद्राला केलेल दान अन त्याहूनही कुंतीला दिलेल ४ पुत्रांच्या जीवनाच दान हे काय होत बर ?
कर्णाला मिळालेली कवच कुंडलं हि त्याला सुर्यादेवांकडून दानातच मिळालेली होती . ती त्याने स्वताच्या पराक्रमाने मिळवली नवती . कर्ण एवढं सामर्थ्यवान होतं तर त्या कवच कुंडलांचा आधार घ्यायची त्याला गरजच काय होती ? आणि जणू काही कर्णाने त्या ४ पुत्राचं दान दिलं नसता तर त्यांचा वधच झाला असता .

>> मोहिनी , सिरियसली , तुम्ही महाभारत कधी वाचलय का ?
म्हणजे तुमच काही वेगळ असल तर माहित नाही , पण बहुधा व्यासानी लिहिलेल्या महाभारतात कृष्ण कर्णाला जन्मरहस्य सांगताना (तेही त्याला सोयीस्कर वेळी) सगळे राज्य ऑफर करतो .
आणि हो त्यांच्याच महाभारतात कर्ण बाकी ४ भावाना पराजित करतो पण सोडून देतो

उगाच काहीही लिहायच का ?

विकिबाबा

Karna Parva

Karna Parva, the eighth book of the Mahābhārata, describes sixteenth and seventeenth days of the Kurukshetra war where post Dronachary’s death Karna took over as the commander-in-chief. Anticipating a likely battle to the death between Karna and Arjura, Krishna warned Arjuna calling Karna to be the foremost of the heroes.[7]
“ Hear in brief, O son of Pandu! I regard the mighty Karna as thy equal, or perhaps, thy superior! In energy he is equal to fire. As regards speed, he is equal to the impetuosity of the wind. In wrath, he resembles the Destroyer himself. Endued with might, he resembles a lion in the formation of his body. He is eight ratnis in stature. His arms are large. His chest is broad. He is invincible. He is sensitive. He is a hero. He is, again, the foremost of heroes. He is exceedingly handsome. Possessed of every accomplishment of a warrior, he is a dispeller of the fears of friends. No one, not even the Gods with Vasava at their head, can slay the son of Radha, save thee, as I think. No one possessed of flesh and blood, not even the Gods fighting with great care, not all the warriors (of the three worlds) fighting together can vanquish the son of the chariot-rider.

As promised to Kunti, Karna aimed on only killing Arjuna. On the sixteenth day, he fought with all the Pandava brother but Arjuna and spared each one of them. After defeating them, he ordered his charioteer Shalya to get towards Arjuna. He used Nagastra to kill Arjuna, which Krishna saved him by lowering his chariot in the earth. Karna and Arjun waged a rough war against each other. Karna had a chance to kill Arjuna but spared him as the sun was about to set.

शकुनी ओवरacting करतो. स्वतःच्या मृत्यूला किती घाबरतो, मजा आली बघायला. युधिष्ठिरने सुंदर काम केले, तो चांगला अभिनेता आहे.

साकल्य, तुम्ही बरोबर होतात, शल्याला युधिष्ठिरनेच मारलं.

१० ऑगस्टला महाभारत संपणार आणि महाएपिसोड आहे अशी बातमी म.टा.मध्ये होती.

दुर्योधनानं फार वैताग दिलाय. त्याचं हस्णं ऐकवत नाही...

युधिष्ठीर, भीम, कर्ण, शकुनी, भीष्म, द्रोण, द्रौपदी या सर्वांचा अभिनय आवडला.

माझी पोरं आणी त्यांच्या देशी मित्र मैत्रिणींना शकुनी फार आवडतो, म्हणाजे आपल्यात जसे गब्बर, मोगॅम्बो ला ग्लॅमर असतं तसं त्यांना शकुनी ! Happy माझी लेक तर तिच्या हॅम्स्टर ला "मेरे बच्चे!" म्हणत असते कायम.
एक तर या मुलांना हिंदी समज्त नाही, त्यामुळे कॅरेक्टर कितपत नेगेटिव्ह आहे ते लक्षात येत नाही ! अ‍ॅक्टिंग, स्टाइल, डायलॉग्ज वर खूष होतात !

भीमाला मार खाताना पाहून कसंसंच होतंय. तो दुर्योधन केवढा, भीम केवढा? पूर्वीच्या महाभारतात कृष्‍णाने मांडीकडे इशारा करून दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करायला सांगितले होते. यात काय दाखवतात हे पाहण्याची उत्सुकता आहे.

दुर्योधनानं फार वैताग दिलाय. त्याचं हस्णं ऐकवत नाही...

त्याचे हसणे, ओरडणे (रेकणे) ऐकवत नाही. नकोसा झाला आहे तो.

आणि अनेक परदेशी fantasy कथांमध्ये आपल्याकडचे जुने पौराणिक संदर्भ वापरले आहेत.
व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं!

फायनली काय झालं दुर्योधनाचं? कालचा भाग नाही पाहता आला मला.. पांडवांनी काय शक्कल लढवली त्याला मारण्यासाठी?

काही झालं नाही काल शकुनी मेला. आज कदाचित दुर्योधन मरेल. पण दुर्योधन नदीत की तळयात लपला होता असे काही तरी वाचले होते, भीमाने शकुनीचा मृतदेह सुद्धा नदीमधे उडवताना दाखवला काल पण दुर्योधनाबरोबरचे शेवटचे युद्ध इथे समुद्र कीनारीच दाखवत आहेत.

काल खेळ चालला होता पासी.न्ग द शकुनी Happy

दुर्योधान बिचारा आउट होत होत त्या मधे

१०० कौरवा.नी हाच खेळ खेळला असता तर मुश्कील होत बुवा पा.न्डवा.न्च

हो ना कविता मस्तपैकी समुद्र दाखवतात जिथे संपूर्ण महाभारत झाले तिथे मुळात समुद्र नाहीच आहे. पण काल शकुनीला मस्त पिडतात ते बघायला मजा आली.

सगळे कौरव आणि पाच पांडव यांचे एकाच वेळेस द्वंद्व (!) समजा झाले असते तर matrix मुव्ही सारखे, सेम कलर चे चिलखत घातलेले शंभर कौरव हवेत उडाले असते. एकदम. एकाच वेळेस!!

Pages