मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण शकुनी ला कसं कळतं कि माधवाने सुर्यासमोर सुदर्शन धरले आहे म्हणून? त्याचा काही संदर्भ लागला नाही.

पण शकुनी ला कसं कळतं कि माधवाने सुर्यासमोर सुदर्शन धरले आहे म्हणून? त्याचा काही संदर्भ लागला नाही.>> हे असं दाखवले असेल तर पारच चुकीचं की हो.. प्रत्यक्षात त्या वेळेस सूर्यग्रहण होते..

सुर्यग्रहण होतं म्हणजे,ते फक्त कृष्णालाच माहित होतं का? कौरव पांडवांना माहीती हवं ना की सूर्यग्रहण आहे म्हणून.

परवा एक एपिसोड पाहिला याचा, कथा अंतिम युद्धापर्यंत पोहोचली एवढ्यात कमाल वाटली. पण अ‍ॅक्शन फुल्ल धमाल होती.

अभिमन्यूच्या हत्येनंतर अर्जुन संध्याकाळी कौरवांच्या तंबू एरीयात जाऊन जयद्रथची धुलाई करतो. पाठोपाठ इतर पांडव सुद्धा फिल्मी हिरोस्टाईल हाणामारी एंट्री मारतात. पैसा वसूल. नाहीतर जुन्या महाभारतात एक बाण इथून तर एक बाण तिथून, यामध्ये मात्र फुल्ल टू मिथून ..

जर बोटात फिरणारे आणि भिंगरीसारखे फिरत एखाद्याचे मुंडके उडवत वध करणारे चक्र हे आयुध मानले, तसेच कृष्णाने वेळोवेळी आपले विराट रूप दाखवले आहे यावरही विश्वास ठेवला तर त्याने सुर्याला चक्राने झाकले यावर विश्वास ठेऊ शकतो.
त्यासाठी त्याला चक्र सुर्याएवढे मोठे करायची गरज नाही, बस तेवढ्या युद्धभुमीच्या भागावर उजेड पोहोचणार नाही इतके बघितले की झाले.

घटोत्कच इंटरेस्टिंग पण मला एक प्रश्न पडलाय तो इतक्या इझिली सर्वांना मारू शकत होता आणि आग वगैरे फेकू शकत होता तर पहिल्यांदाचं दुर्योधनाला टार्गेट करून मारलं असतं तर पांडव जिंकले असतेना लगेच कारण युद्ध थांबलं असतं आणि इतर हानीपण थांबली असती.

माझा नवरा काल म्हणत होता - तो अर्जुन खरतर मूर्ख होता म्हणायच.ते जयद्रथाच मुंडक त्या दुर्योधनाचा हातातच पाडायच ना.तिथेच किस्सा खतम

अंजु, गांधारीने दुर्योधनाला दिलेल्या वरदानामुळे दुर्योधनाचा जांघेचा भाग सोडुन सर्व शरीर वज्रा प्रमाणे कठीण झालेले असते त्यामुळे त्याला मुष्टी युद्धातच मारले जाउ शकत होते म्हणुन भीम त्याच्याबरोबर लढतो पण त्यालाही हे माहीत नसते मग कृष्ण भीमाला सांगतो की त्याच्या जांघेवर प्रहार कर. तसे केल्यानंतर दुर्योधनाची हार होते व थोड्या वेळाने तो तडफडुन मरतो. आता सीरीयल मधे कसं दाखवतील हे माहीत नाही.

गांधारीने डोळ्याला प ट्टी बांधुन घेतलेली असते डोळस असुन आंध ळ्या नवर्‍यासाठी चा ति च्या त्यागामुळे तिला वरदान असतं की ती जेव्हा पट्टी उघ डेल तेव्हा जी कुणी व्य क्ती तिच्यासमोर येईल त्याचे जितके उघडे अंग तिल दिसेल तितके अंग वज्रासारखे होईल त्यामुळे दुर्योधनाला वाचवण्याकरता ति त्याला नीर्वस्त्र बोलावते , दुर्योधनाला ह्या वरदानाबद्द्ल काही माहीती नसते, रस्त्यात दुर्योधनाला कृष्ण भेटतो, कृष्णाला गांधारीच्या वरदानाबद्द्ल माहीत असतं म्हणुन तो दुर्योधनाला त्याच्या नागडेपणाबद्द्ल चिडवतो म्हणुन लाज वाटुन दुर्योधन रस्त्यातील केळीच्या झाडाची पाने कमरेला बांधुन जातो. गांधारी पट्टी सोडते तेव्हा दुर्योधनाचा कमरेच्या खालुन जांघेपर्यंतचा भाग सोडुन सर्व भाग व ज्रासारखा कठीण बनतो.

.

सुर्यग्रहण होतं म्हणजे,ते फक्त कृष्णालाच माहित होतं का? कौरव पांडवांना माहीती हवं ना की सूर्यग्रहण आहे म्हणून.>>
कौरवांची घड्याळे दुसर्‍या टाइम झोन मध्ये सेट केली होती त्यांना बरोबर टाइम कळाला नाही. Light 1

सुर्यग्रहण आहे हे फक्त श्रीकृष्णाला माहीत असते.. इतरांना नाही कारण त्यावेळेला सुर्यग्रहण कधी होणार याची मोजमापे नसावीत.. अन्यथा शकुनी सारखा विद्वानाचे दुर्लक्ष याकडे होणे शक्यच नाही....

उगाच अस का केले नाही तसे का केले नाही याचा विचार का करतय लोकहो. महाभारतात प्रत्येकाचे प्रारब्ध व कार्य ठरलेले आहे. जसे अभिमन्युचे चक्रवव्युह भेदणे, त्याला सर्वांनी मिळुन मारणे पण दोषी जयद्रथाला ठरवणे. भिमाचे लग्न व त्यातुन जन्माला आलेल्या घटोत्कचाचे युध्दातील कार्य हे कर्णाच्या इंद्रास्तापुरते होते. घटोत्कच शत्रुसेनेवर इतका तुटुन पडतो की अर्जुन मरेल वगैरे चिंता करण्यापुरतेही सैन्य उरणार नाही हे दुर्योधनाला माहीत होते. असो. असे अनेक लोक आहेत ज्यांचे प्रारब्ध आधीच ठरले होते.

हो कविता ती गांधारी स्टोरी माहितेय पण ती नंतर तो एकटाच उरल्यानंतर त्याचे शरीर वज्राचे करते असे आधीच्या महाभारतात दाखवले आहे म्हणजे घटोत्कच स्टोरीच्या वेळी ते वज्राचे नसते बहूतेक.

हो बरोबर आहे कांदापोहे, प्रत्येकाचं प्रारब्ध आधीच ठरलेलं असल्याने पडणारे प्रश्न तसे लॉजिकल असले तरी त्यांना काही अर्थ नाही.

आजचा भाग पाहीला.
घटोत्कच जमिनीवर पडल्यानंतर लहान होतो.त्याच्या आकाराइतके सैनिक मेलेले दाखवले आहेत.पाहून एवढं हसलो.अरे काय हे? Proud
दुसरं त्या शेण्या पेटवल्याविनच घटोत्कच,राख होतो...काय काहीतरी लॉजिक लावा की.
भिम घोड्यावरुन उडी मारतो.ब्रम्हास्त्र दुभंगतं आणि परत जोडलं जातं.कशासाठी कळलं,पण भिमाला ते अस्त्र टाळतं केव्हा?

खरच अत्यंत बिंडोकपणा दाखवतोय दिग्दर्शक!

<घटोत्कच जमिनीवर पडल्यानंतर लहान होतो.त्याच्या आकाराइतके सैनिक मेलेले दाखवले आहेत.पाहून एवढं हसलो.अरे काय हे? >>>

मला वाटतं त्याचा आकार मोठा असताना तो खाली आदळतो आणि खाली आलेले सैनिक मरतात मेल्यावर त्याचा आकार लहान होतो, राक्षस त्यांच्या मना प्रमाणे आकार बदलु शकत असत.

<<<<दुसरं त्या शेण्या पेटवल्याविनच घटोत्कच,राख होतो...काय काहीतरी लॉजिक लावा की.भिम घोड्यावरुन उडी मारतो.ब्रम्हास्त्र दुभंगतं आणि परत जोडलं जातं.कशासाठी कळलं,पण भिमाला ते अस्त्र टाळतं केव्हा?>>>>

अनुमोदन

त्याच्या आकाराइतके सैनिक मेलेले दाखवले आहेत >> तसेच आहे की कथेत .मरताना पण अंगाखाली सैनिक चिरडून मगच मरतो तो.
पण हा भाग जरा विनोदी दाखवला हे खरे. नुस्ते हसण्यात फार वेळ घालवत होता तो. आणि सैन्याचा संहार केलेला फारसा इफेक्टिव नाही वाटला. नुस्ताच दुर्योधनाला चिडवत होता असे वाटत होते!

ते दुर्योधनाचे ३० भाउ अगदि मामुली सैनिक वाटत होते शेवटी ते ही राजपुत्रच होते व त्यांनाही योग्य ते शिक्षण मिळाले होते, भीमाबरोबर थोडेतरी लढताना दाखवायला हवे होते.

घटोत्कच लहान् होतो ठिक आहे.मूळ संहितेत ही तसंच आहे,त्याच्या अंगाखाली अनेक जण चिरडले जातात.पण तो जो आकार वगैरे दाखवला किंवा टॉम-जेरीच्या कार्टूनमध्ये,भिंतीतून आरपार गेला की त्याच्या आकाराचा भसका तयार तसलं काहीतरी वाटतं होतं ते...

युधिष्ठीर चे हावभाव चांगले झाले आहेत तो आणि धृतराष्ट्र यांना पुढे रोल मिळतील अशी आशा करायला हरकत नाही

सहमत

नरो वा कुंजरो वा..
माणूस की हत्ती..
"अश्वत्थामा मेला.." असे मोट्ठ्याने म्हणेल युधिष्ठीर!
"पण तो हत्ती होता", असे हळूच म्हणेल युधिष्ठीर! आणि ते हळू म्हटलेले द्रोण ऐकू शकणार नाहीत.
युधिष्ठीर कशीच खोटे बोलत नाही.
मग ते खरे मानून शस्त्र त्यागतील द्रोण आणि आपला दृष्टदयुम्न वध करेल त्यांचा..!!

असे एका पुस्तकात आहे. आज रात्री कसे दाखवतील याची उत्सुकता आहे!

पण मला एका शंका आहे की द्रोण हे युधिष्ठीराच्या फक्त बोलण्यावर विश्वास ठेवतात?
प्रत्यक्ष अश्वत्थामाचे मृत शरीर न बघताच ते कसे काय शस्त्र त्यागतात?
दुर्योधानाकडून त्याचा खातरजमा न करताच ??

कदाचित आज रात्री लोजिकली त्याचे उत्तर मिळेलही !!!
बघुया!!!!

कारण युधिष्ठीर हा सत्यवादी व धर्माप्रमाणे वागणारा असतो तो संपुर्ण आयुष्यात केव्हा ही खोटे बोलत नाही म्ह णुन तर त्याला धर्मराज या विषेशणाने संबोधतात.

Pages