मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या स्टार plus च्या महाभारतात अनेक गोष्टी गाळल्या आहेत . त्यामुळे लोकांचा गैरसमज होऊ शकतो .>>>>> हो अगदी बरोबर.

ज्यावेळेस द्रोपदीचे वस्त्र हरण होत असते त्यावेळी ती सर्वान्समोर आपले रक्षण करन्यासाठी विनवणी करत असते. ती ज्यावेळेस कर्णासमोर जाते, त्यावेळी ती त्याकडे रागाने बघुन म्हणते " तु सुत पुत्र आहेस, तुझ्याकडुन रक्षन प्राप्त करणेही पाप आहे.
म्हणुन तो बिन्डोक तिला वेश्या म्हणतो.

कदाचित, द्रोपदीने कर्णाच्या पायावर डोके ठेउन स्वतःसाठी भीक मागीतली असती तर पुढचे महाभारत घडलेच नसते.

कोणावर अन्याय झाला कि त्याने सगळ्या लोकांना त्रास देत सुटावं का ? आपल्याला सूतपुत्र म्हणून हिणवल जातंय . तेव्हा 'सूत' ह्या जमातीला लोकांच्या गैरसमजातून बाहेर काढण्यासाठी त्याने काय केलं? सूत्पुत्राच श्रेष्ठत्व सिद्ध करण हा कर्णाचा हेतू नव्हताच . स्वताला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण हा एकच हेतू होता त्याचा . पांडवांच कर्णाशी काय वैर होतं? दुर्योधनाची साथ दिल्यामुळे हे वैर निर्माण झालं होतं:: <<< सेम आमच्या कृष्णाचेच संवाद होते. Proud

पण पांडवांनी कर्णाचा सतत अपमान केलेला असतो हे विसरू नका.

महाभारतातल्या कुठल्याही कॅरेक्टरला बिन्डोक म्हणणं फार सोपं आहे, पण्त्या प्रत्येक पात्राची मनोवृत्ती तशी का झाली यामागे काहीतरी निश्छित कारण आहे, ते कारण समजून घेणं म्हणजे महाभारताची मजा समजते.

द्रौपदी कर्णाकडे वस्त्रहरणाच्यावेळी मदत मागत नाही, उलट त्याचाच अपमान करून पुढे जातो याने तो डिवचला जातो आणि ओढ तिचे वस्त्र म्हणून पुढे येतो. तोपर्यंत जे घडतंय ते चूक आहे हे त्यालाही मान्य नसतं.

ये वासुदेव भी तो दो माँ का बेटा है...>> हे वाक्य आणि त्यानंतर कर्णाने केलेली अॅक्टिंग जाम आवडली. ‘माहेरची साडी’लाही इतके अश्रू वाहिले नसतील.. फुल अलका कुबल फिलिंग...हाहा>>>>आगदि हेच लिहायला आहे होते मी

त्याचा पार अलका कुबर करून टाकला....ती कधी हि पट्कन नाहि मरत.जवळ जवळ वीस मिनिटे तरी नोन्स्टॉप बोलत राहिल.त्यापेक्षा अँब्युलंस बोलवा..

काल हि तेच वाटले,त्या पेक्षा त्या नकुल सहदेववांनी त्याला बरच करायच ना

हो...जरा जास्त फिल्मी झाले...सुरुवातीला रडू येत होते...नन्तर कधी एकदा सम्पेल असे झाले होते..

असे म्हणतात 5 पा.न्डवात मिळून जीतके गुण होते ते एकटे कर्णात होते

आणिक कर्ण हा द्रौपदी साठी निर्माण झाला होता . पण क्रूष्णाला पुढील सर्व (महाभारत ) ठाऊक असल्याने तो द्रौपदी जवळ अर्जूनाची तारीफ करून तिच्या मनात अर्जूना विषयी प्रेम उत्पन्न करतो . आणि द्रौपदी कर्णास नाकारते. त्यामूळे तिचे प्रारब्ध म्हणून तिला पाच पा.न्डवा.न्ची पत्नी म्हणून रहावे लागते

शकुनी आणि कृष्ण द्यूत खेळतात ही संकल्पना खरी असो की खोटी, पण आहे एकदम दमदार!
आणि सादारीकरण सुद्धा केले आहे जोमदार !!! हैटस ऑफ !!

त्या पेक्षा त्या नकुल सहदेववांनी त्याला बरच करायच ना>> गोपिका, घडलेलल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही ना. नाहीतर करण आणि अर्जुन दोघे मिळून दुर्योधनाविरूध्द (गाणे म्हणत म्हणत) लढले नसते का?

शकूनी आणि कृष्‍णामधील डायलॉगबाजी आवडली. ती जास्त रंगवायला हवी. शकुनी म्हणतो माझे पासे माझ्या शब्दावरहुकुम चालतात, तर कृष्‍ण म्हणतो पासे फेकणे हे माझे कर्म आहे, ते करायचे की नाही हे मी ठरवतो. मस्त.

हे लोक शल्याला सेनापती बनवायला विसरले कि काय? शल्य सेनापती बनतो, युधिष्टिर त्याचा वध करतो, सहदेव शकुनीला मारतो वगैरे गाळतात कि काय असे दिसतेय.डायरेक्ट भीम-दुर्योधन गदायुद्धाकडे वाटचाल चालली आहे!

शल्याला युधिष्ठीरच मारतो. युधिष्ठिराने शल्याव्यतिरिक्त दुसरा कुठला महारथी मारला कि नाही ते माहित नाही. बाकी उदयन यांनी म्हटल्या प्रमाणे या महाभारतात कृष्ण दुर्योधनच काय शल्य, शकुनीला पण मारून टाकतो असे दाखवतील!

ज्यादिवशी नकुल आणि सहदेव शल्याला कौरवांच्या बाजूने गेलेले बघतात त्यादिवशी नकुल शल्याला म्हणतो कि 'मामा मी तुमचा वध करणार' असे दाखवले होते आणि सहदेव म्हणतो शकुनीला की तो त्याला मारणार. ह्याच महाभारतात दाखवले म्हणून मी तसं वरती लिहिले.

कालचा भाग पाहून हॅ.पॉ.चा प्रिझनर ऑफ अ‍ॅझकबान मधली हर्मायनी आठवली.तिचं ते लॉकेट एकाच वेळी दोन ठिकाणी उपस्थित राहता येणारी जादूई टेक्नॉलॉजी,जेके ने महाभरतातूनच चोरली असणार. Wink
कृष्ण दोन ठिकाणी दिसतो,एकाच क्षणी.

मस्त होता आजचा भाग. कृष्णाच्या चेहर्‍यावरचे भाव फार मस्त असतात Happy
पण शकुनी, शल्य, यांना मारण्याचे प्रसंग असेच उरकणार की काय ! कथा दुर्योधन वधावरच फोकस करण्यात आली आहे आता . आणि अश्वत्थामाने पांडवांच्या ५ मुलांना मारणे, उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र, अमरत्वाचा शाप हे बरेच बाकी आहे की अजून. ४ की ५ च भाग उरले आता फक्त !!

त्या कृष्णाची हाईट काय आहे? शाहिर शेख पण चांगलाच उंच आहे तरी कृष्णासमोर बुटका वाटतो. शकुनी तर केवढासा दिसत होता.

विज्ञानदास, हॅरी पॉटरमध्ये भारतीयच काय जगभरातल्या मायथॉलॉजीचे रेफरन्सेस चिकार आहेत.

बरोबर,
जेके चं ज्ञान याबाबत अफाट आहे.तिच्याच साईटवरचा संदर्भ सांगतो.तिला एका पत्रकाराने ड्रॅगनच्या का कसल्या रक्ताचे प्रकार विचारले तर तिने एका क्षणात त्यांचे प्रकार्,कुठे मिळतात त्याचे उपयोग काय असं सगळं सांगितलं.तो बघतच बसला. त्या बाईचं तुम्ही म्हणालात तसं जगाचं मायथॉलॉजिकल ज्ञान अफाट आहे.

मैत्रेयी तुम्ही उल्लेखलेल्या सगळ्या गोष्टी दाखवतील तर काही मजा येईल.अश्वत्थामा आणि कृष्ण संवाद दाखवला जावा अशी अपेक्षा!

कृष्णासोबतचा डाव अर्धवट सोडून मामाश्री कसे काय गेले? हा मामाश्रीचा पराजय नव्हे का?

त्यांच्यात अग्नीस्नानाची अट ठरली होती ना? कृष्णानी कसे काय जावू दिले?

सगळा गोंधळ चालू आहे!

दुर्योधन-भीम अंतिम गदायुद्धाच्या वेळी दुर्योधन एकटा असतो (कौरव सेनेचे फक्त ३ महारथी अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा वाचलेले असतात, ते दुरून युद्ध पाहत असतात). बाकी सैन्य, शल्य , शकुनी वगैरे मारून गेलेले असतात. दुर्योधन गांधारीकडे जातो तेव्हा पण शकुनी जिवंत नसतो.हे लोक मात्र वेगळेच दाखवत आहेत.

गोंधळ नाही.
कृष्ण द्यूत खेळलाच नाही.
आणि मामाश्री मध्येच सोडून गेले.
म्हणजे खेळ पूर्ण झालाच नाही.
मग हार-जीत चा प्रश्नच नाही आणि म्हणून अग्निस्नानाचा प्रश्नच नाही.
आणि --- कृष्णाच्या चमत्कारा विषयी बोलायचे झाल्यास --
तो शेवटी कृष्ण आहे. तो एकाच वेळेस दोन काय अनेक ठिकाणी असू शकतो. तो शेवटी देव आहे.
***
काल बलराम ने कृष्णाच्या "छळ कपट" विरोधात/संदर्भात उपस्थित केलेले मुद्दे छान होते. त्याला कृष्णाने दिलेली उत्तरे ही छान होती. कृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या मांडीवर मारण्याची आठवण करून द्यायची गरजच उरणार नाही (कृष्णा कडून बलरामाने अश्वत्थामामाच्या सांगण्यावरून तसे वाचन घेतले आहे. अश्वत्थामाने शकुनीच्या सांगण्यावरून तसे बलरामाला सांगितले आहे) कारण भीमाने द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेसच दुर्योधनाच्या मांडीवर मारण्याचा "प्रण" केला आहे. कारण दुर्योधन द्रौपदी ला "मेरी जंघा पे बैठो SSSS" असे म्हणाला होता....
पण दुर्योधन युद्धाभूमीतून पळून तळ्यात लपतो असे आहे ना?
आणि "कल देखिये" मध्ये तर युद्धा भूमीवरच भिमाशी लढताना तो दाखवला आहे???
***
आणि अनेक परदेशी fantasy कथांमध्ये आपल्याकडचे जुने पौराणिक संदर्भ वापरले आहेत.
उदाहरणे: (माझ्या अल्प ज्ञानाच्या कुवतीनुसार - चु भू द्या घ्या)

उडणारा हनुमान --- उडणारा सुपरमैन
नरसिंह भगवान --- अर्धे मानव अर्धा प्राणी असणारे characters, वेअरवूल्फ वगैरे
विष्णूचे दशावतार concept--- अवतार चित्रपट, नीळा रंग = कृष्ण, बेन-टेन कार्टून मालिका
महाभारतीय युद्धांचे व्यूहप्रकार = अनेक हॉलीवूड युद्ध पटात वापर झाला आहे.
दुर्योधनाचे शरीर पोलादी बनणे --- आयर्न मैन
हनुमान आकाराने लहान मोठा होणे --- हल्क लहान मोठा होणे

आणि अनेक परदेशी fantasy कथांमध्ये आपल्याकडचे जुने पौराणिक संदर्भ वापरले आहेत.<<<
फँटॅस्टीक फोर सगळ्यात बेस्ट उदाहरण.पंचमहाभूतावर निर्मित स्पायडरमॅनच्या बापाची F-4 ही निर्मिती.

आता १० तारखेला ही मालिका संपणार आहे तर उरलेली कथानकं गुंडाळणार का मग नको तिथे वेळ जास्त घालवला, अभिमन्यू वध, कर्णाचा शेवट.

काल कृष्णच अप्रतिम. ते दुर्योधन आणि शकुनी पार डोक्यात जातात. तो अश्वत्थामा हल्ली जरा बरा वाटला नाहीतरी आधी तोपण जरा अतीच करायचा.

काल बलराम-कृष्ण सीन चांगलाच गंडला होता. एकदा तो म्हणतो मी तुमचा दास आहे आणि एकदा म्हणतो मी तुला ज्येष्ठ म्हणून आदेश देतो की पांडवांना सहाय्य करायचे नाही! एकपे रहो भैय्या! Proud

असो. लवकर संपूदे आता. युद्ध सुरू झाल्यापासून सिरियल जामच गंडली.

केले शल्याला सरसेनापती शेवटी...!!
मद्रराज, आक्रमण का आदेश दो..SSSS!!!
ठन्न ... हा हा हा
ठन्न ... हा हा हा
ये मेरे निन्यान्वे भाईयो की शक्ती है जो वे मरते मरते मुझे दे गये.....

पण त्याने कर्णाला अंग देशाचा राजा बनवून त्याच्या अपमानाने पोळलेल्या मनावर फुंकर घातली.>>
कर्णाला सुधा आपल्या पोळलेल्या मनावर फुंकर घातली जातीये असंच वाटलं. दुर्योधन करणाच्या मनात अर्जुनाविषयी असलेल्या मत्सराचा उपयोग करून घेत होतां हे त्याला समजल नाही . अर्जुनाच्या विरोधात कर्ण आपल्याला चांगलाच उपयोगी पडेल हे दुर्योधन ला माहित होतं म्हणून हे अंग देशाचा राजा बनवण्याचं नाटक . अनेक लोकांच्या समोर एका स्त्रीला विवस्त्र करणारा दुष्ट दुर्योधन अनोळखी कर्णाच्या मनावर फुंकर बिनकर कशाला घालेल ?
अन जर कर्ण अधर्मी म्हणत असाल तर ते नियम लावले ना तर अगदी कृष्णापासून सगळे अधर्मी आहेत .>>
कर्णाने कोणता धर्म केलं ते सांगा . दुष्ट , दुराचारी लोकांन्ना संपवण्यासाठी केलेल्या युक्त्या तुम्हाला अधर्म वाटत असतील तर काही बोलायलाच नको. >>
तेही वेळोवेळी त्याला डिवचत होते, त्याने कधीच स्वत:हून पांडवांची खोड काढली नाही.. त्याने फक्त मित्रधर्म निभावत दुर्योधनाची साथ दिली..>>
अर्जुन त्याच्या पेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी आहे हे त्याला कधीच रुचलं नाही. अगदी लहानपणापासून त्याने स्वताला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी अर्जुनाशी वैर केलं होतं . मित्रधर्म निभाव्ण्यापेक्षा त्याने दास्यत्व निभावलं असंच म्हणावं लागेल . सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून . आपण हि आयुष्यात मित्र धर्म निभाव्तोच कि . पण मित्र जर वाईट गोष्टी करायला सांगत असेल तर आपण करतो का ?
आणि प्लीज त्याला बिन्डोक म्हणण्याचे काही एक कारण नाही, >>
प्लीज कृष्णाला बिन्डोक म्हणण्याचे काही एक कारण नाही,
द्रौपदीने पण त्याला स्वयंवराच्या वेळी हिणवले होतेच ना, नाहीतर द्रौपदीला त्याने सहज जिंकले असते.>>
सहमत . पण द्रोपदी ला त्याच्याशी लग्न करायचं नवतं. तिला तो सहचारी म्हणून नको असतानाही तिने त्याला जबरदस्तीने का म्हणून स्वीकाराव ?

अनेक लोकांच्या समोर एका स्त्रीला विवस्त्र करणारा दुष्ट दुर्योधन अनोळखी कर्णाच्या मनावर फुंकर बिनकर कशाला घालेल

......

ज्या धृतराष्ट्राने पांडावाना मोठं केलं त्याच्या मुलाला अंधे का पुत्र अंधा असं म्हणणार्‍या निर्लज्ज बाईला दुर्योधनाने योग्य धडा शिकवला.

Pages