मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्योधन पाण्यात रडत बसलेला असताना (शकुनीच्या प्रेताजवळ) त्याच्या डोळ्यातल अश्रु पाण्यात विरघळत का नव्हते ?

@केदार जाधव . आपण ज्या मूळ महाभारताबद्दल बोलताय ते कुठे आणि कोणत्या नावाने मिळेल? तुम्ही ते वाचलंय कि विकी चा रेफेरांचे घेतलाय ? विकिवर इकडून तिकडून माहिती गोळा करून टाकलेली असते .
मित्र धर्म मित्र धर्म करता करता माणूस धर्म विसरला नं तो .
जावूदे. फोटो मस्त आहे

उदयन आज मारणार दुर्योधनाला.>>
उदयन कसा काय मारेल, भीम मारेल त्याला Light 1 Wink

मस्त अग्निपंख, मी पोस्ट केल्यान्ंतर लक्षात आलं माझ्या की आपण कॉमा दिला नाही मधे, पण कंटाळा केला एडीट करायचा, आता केला बदल.

दुर्योधनाची मांडी फोडली.

पांडव प्रताप व ईतर संदर्भ लेखात/ग्रंथात ( आजवर जे काही वाचले त्यात) मांडीवर गधा मारण्याचा ईशारा कृष्णानी केला असे वाचले होते.

ईथे मात्र चक्क अर्जून सांगतो की मांडीवर मार... हे माझ्यासाठी नवीनच होते.

मेला शेवटी दुर्योधन>>
मेला नाहिये अजुन, जखमी होउन पडला आहे. आता तो द्रोणपुत्राला सांगेन '' मुझे उन पांडु पुत्रोंका खून ला दोSSSSS!
धन्यवाद नंदिनी, बदल केला आहे Happy

उगाच आता फुकटचे उपपांडव मरणार. महाभारताने काय मिळवलं पांडवांना वाचवून, त्यांची सगळी मुले गेली नाहक.

आता तो व्यासपुत्राला सांगेन '' मुझे उन पांडु पुत्रोंका खून ला दोSSSSS!>>>> द्रोणपुत्राला.

टेक्निकली, पांडण आणि कौरव व्यासाचे नातू आहेत.

तुम मुझे खुन दो मे तुम्हे ब्रह्मास्त्र दुंगा.............. नशिब असे बोलु नये....... ( भरोसा नाही मालिकेत काहीही घडु शकते)

नंदिनी करेक्ट, द्रोणपुत्र. कौरव बायलॉजिकली पण व्यासांचे नातू आहेत, पांडव फक्त टेक्नीकली आहेत.

कौरव खरोखर सत्यवतीचे वंशज.

धन्य ते हिंदु . पृथ्वीवरच्या मानवाच्या वीर्याची उत्पत्ती उपरी ठरली आणि स्वर्गस्थ देवांच्या वीर्याची उत्पत्ती महान आणि पृथ्वीची हक्कदार ठरली !

दुर्योधन अजून मेल नाही तरी तो दिवा विझलेला दाखवलाय . आणि कुंती उगीच गांधारीसमोर एवढी लाचार झालेली दाखव्लीये .

बलराम अध्ये मध्ये पडल्यामुळे दुर्योधन ला पूर्ण मारता आले नाही.
त्याला पूर्ण मारता आले नाही म्हणून अश्वत्थामा दुर्योधनाशी बोलू शकला आणि पांडवाना मारण्याची विनंती करू शकला.त्यामुळेच पाच उप पांडवांचा मृत्यू झाला.
या सगळ्या गोंधळाला बलराम भाऊ जबाबदार आहेत, असे एकंदरीत वाटते.

अश्वत्थामा चिरंजीवी होता असं वाचलंय. त्याला मरण येऊ शकत नव्हतं. हे द्रोणांना ठाऊक नव्हतं कां?? मग त्याच्या मृत्युची वार्ता ऐकुन ते कां सैरभैर झाले??

मला ही हाच प्रश्न पडला आहे.....

पण मला वाटते हे अश्वत्थामाचे अमरात्त्वाचे सिक्रेट मुद्दाम द्रोणाचार्या पासून लपवले गेले असेल, कारण त्याना युद्धात अश्वत्थामाच्या संरक्षणाच्या कारणास्तव पांडवाना मारण्याकरता तयार होण्यासाठी ब्लैकमेल करता आले. मात्र दुर्योधनाला ते सिक्रेट माहित असेल . पण तसे असते तर मग पूर्ण कौरवांचा सेनापती अश्वत्थामाला करायला हवे होते. पण तसे केले असते तर संशयाला वाव झाला असता
(seniority डालवून अश्वत्थामाला का सेनापती केले ?)

नाहीतर मग असे असेल की:
गुरुपुत्र या नात्याने अश्वत्थामा अवध्य आहे. म्हणून तो पांडवांकडून मारला जात नसतो, असे असावे कदाचित!!
कुठेतरी याचे समाधानकारक उत्तर नक्की मिळेल. शोधूया आपण...!!

किंवा द्रोणाचार्यांचा युशीष्ठीराच्या सत्यवादीपणावर जास्त विश्वास असेल.... अश्वत्थामाच्या अमरात्त्वाच्या शक्तीपेक्षा!!!

अजून एक प्रश्न:

समजा एखादा माणूस खरोखर अमर आहे, जसे की अश्वत्थामा मग तो एकटा सगळ्या पांडव सेनेशी लढला असता तरी चालले असते...कारण तो कधी मेलाच नसता...

(पण थकला असता कदाचीत म्हणून ते शक्य नाही का??)

अजून एक प्रश्न:

समजा एखादा माणूस खरोखर अमर आहे, जसे की अश्वत्थामा मग तो एकटा सगळ्या पांडव सेनेशी लढला असता तरी चालले असते...कारण तो कधी मेलाच नसता...

(पण थकला असता कदाचीत म्हणून ते शक्य नाही का??)

त्याला कृष्णानेच शाप दिला होता असे समजत आहे गुगल वर!!

म्हणे तो आजही मध्यप्रदेशाच्या एका जंगलात असीरगढ किल्ल्यात रोज शिवपूजा करतो. श्रीकृष्णाच्या शापामुळे त्याला कोड झाले आहे. तो पूजे आधी आंघोळ करतो त्याच्या खाणा-खुणा रोज दिसतात असे गावकरी सांगतात.
पण प्रत्यक्ष अश्वत्थाम्याला ज्यानेही पाहिले त्याची मानसिक स्थिती नेहेमी साठी बिघडते असा त्यांना अनुभव आहे.

तो अमर होता का ??????>>> मग कालच्या भागात सहदेव त्याच्या पोटात तलवार खुपसतो तरी तो मरत नाही असं दाखवलय. (cinematic liberty??)

Pages