बापू

Submitted by मी अभिजीत on 10 December, 2008 - 01:25

तुमच्या देशी श्वासही आता दुष्कर बापू.
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

काट्यांतुनही गुलाब वेचा, तुम्ही म्हणता
व्यक्ती नाही, वृत्ती ठेचा, तुम्ही म्हणता
पण ते नाहीत मानव केवळ फत्तर बापू..!

तुम्हास केवळ नोटेवरती स्मरती सारे.
तुमची नावे घेऊन राडे करती सारे.
नाही तुम्ही, नशीब हे बलवत्तर बापू..!
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

नव्या युगी या कसे चालतील जुने दाखले.
अहिंसक आम्ही आहो दुर्बल जगा वाटले.
मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..!
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

अस्तित्वाचे अग्नीकुंड आहुती मागते.
क्रांती आणि स्वातंत्र्यास्तव रक्त लागते.
कुठवर पुरेल गांधीगिरीचे अत्तर बापू ?
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?

प्राणही गेला तरी अता बेहत्तर बापू.
आम्हीच आता शोधू आमचे उत्तर बापू.

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 

भले बहाद्दर, एकदम मान्य..!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

अगदी ऊत्तम.
-हरीश

शेवटच्या कडव्यातली जाग कौतुकास्पद... Happy

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभिजित,

किती सुंदर लिहिता तुम्ही. हे सर्व प्रत्येकाच्या रक्तात भिनायला हवं. खूप जणांनी वाचून आपल्या संग्रही ठेवायला हवं.