साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,
वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.
वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.
टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.
मी शुक्रवारी जाम्भळाचे केले
मी शुक्रवारी जाम्भळाचे केले आणि काल सफरचन्द चे केले दोन्हि छान झाले ... मोबाईल मध्ये प्रति आहेत पण
टाकता येत नाही.
(No subject)
हुश्श्ष्श्श्श्श्श्श.......
हुश्श्ष्श्श्श्श्श्श....... आल्या दोन्हि प्रति आल्या ....
मुग्धे गेलेल्या वीकेन्डला मी
मुग्धे गेलेल्या वीकेन्डला मी पुन्हा एकदा आक्री केलं. यावेळी ताजा हापूस वापरला
हे बॅटर
आणी हे फायनल प्रॉडक्ट
आईस्क्रिम बरंच घट्ट झालं कारण मी दूध अगदी नावाला घातलं होतं. नेक्स्ट टाईम अजून थोडं अॅड करीन.
हे मी केलेले किवी आणि
हे मी केलेले किवी आणि आंब्याचे आक्री!
धन्यवाद मुग्धटली!
हा आक्री काय आहे शॉर्टफॉर्म
हा आक्री काय आहे शॉर्टफॉर्म एकदम आक्रित वगैरे सारखं वाटतं. तसंही खूप खाल्लं तर आक्रितच आहे म्हणा.
पण आईसक्रीम एक शब्द आहे म्हणुन ह्या शॉर्टफॉर्मचा उगम काय आहे ही शंका
राखी + १ आक्रि नकोच. सरळ
राखी + १
आक्रि नकोच. सरळ आईसक्रिम म्हणावं.
कुलू.. वाह..तू पण केलास तर
कुलू.. वाह..तू पण केलास तर प्रयोग... तुझं आंब्याचं आ क्री जांभळं का दिस्तंय रे?? किवी चं ते ग्रीनीश आहे ना??
मुग्धटले... क्या रेसिपी दी रे तूने... माझ्या आवडत्या दहात तर आहेच.. अप्रतिम बनलेय आईसक्रीम.. आंब्याचे... सुपर!!!
रे, दक्षिणा, कुलु मस्त फोटो!
रे, दक्षिणा, कुलु मस्त फोटो!
वर्षु जांभळ दिसतय ते
वर्षु जांभळ दिसतय ते Blueberry yogurt आहे मी वरुन घातलं. ग्रीनीश दिसतय ते किवि + आंबा!
"आईसक्रिम" ला शॉर्टफॉर्म शोधा! आईसक्रिम लिहायला अवघड शब्द आहे
धन्यवाद जाई .पण मला हा
धन्यवाद जाई .पण मला हा प्रतिसाद नाहि दिसत .आता 16 May, 2014 - 06:44 चा दिसला .गावाला गेल्यामुळे एक आठवडा नेट नाहि म्हणुन उशिरा प्रतिसाद .आणिखुप खुप धन्यवाद मुग्धटली. आईस्क्रिम चे यमी फोटो टाकणारयांसाठि धन्यवाद.मी उद्या करणार आहे पिस्ता आईस्क्रिम, कसे झाले ते लिहेनच.
मस्त आहे रेसिपी.
मस्त आहे रेसिपी.
मी पण ह्या लाँग विकेंडला ३
मी पण ह्या लाँग विकेंडला ३ वेगळे फ्लेवर ट्राय केले. सगळे मस्त झाले.
कॉफी-आमंड ह्यांत थोडा व्हॅनिला एक्सट्रॅक्ट पण घातला. बदामाचे स्लाइसेस घातले होते
फिग-वॉलनट : सुकी अंजीरं मी अदल्या रात्री दुधात भिजवली होती.
गुलकंदः ह्यात साखर अजिबात घातली नाही. थोडे बर्फाचे क्रिस्टल्स लागत होते. कदाचित गुलकंदात पाण्याचा अंश असतोच म्हणून का?
मस्त सोपी रेसिपी. धन्यवाद!
या रेसिपीने आंब्याचं
या रेसिपीने आंब्याचं आइस्क्रीम करून पाहिलं. छान झालं. मात्र थोडे क्रिस्टल्स होतात. अर्धवट सेट झाल्यावर एकदा पुन्हा घुसळून काढावं लागेल. या वेळी कंटाळा केला, पुढल्या वेळी करेन.
पण चव मस्तच. धन्यवाद.
दुध अमुल गोल्ड जरा आटवुन १
दुध अमुल गोल्ड जरा आटवुन १ कप घातले नंतर १० मिनिटं मिक्सर वर फिर्वुन लगेच एयर टाइट डब्यात सेट करायला ठेवले .क्रिस्टल्स न होता छान पिस्ता आइस्क्रीम झाले .thanku या आइस्क्रीम lover कडुन .
मी आज चिकु चे केले छान झालय
मी आज चिकु चे केले
छान झालय
बरं
बरं
मझ्या मैत्रिणिंना हि रेसिपि
मझ्या मैत्रिणिंना हि रेसिपि दिली
आता वेड्या झाल्या आहेत त्या. सही आहे एकदम
धागा वर आणला
धागा वर आणला
धन्यवाद प्राजक्ता एक-दोन
धन्यवाद प्राजक्ता
एक-दोन दिवसांपसून बेत घोळतच होता मनात .
मी पण केलय कालच हापूस
मी पण केलय कालच हापूस आंब्याचं, पण फोटो नाही काढला.
का नाही काढला? यम्म यम्म लागल
का नाही काढला? यम्म यम्म लागल म्हणून सगळ सम्पवल वाट्ट.:दिवा:
उन्हाळा आला की हटकून या
उन्हाळा आला की हटकून या धाग्याची आठवण होतेच!! लवकरच ठरवते बेत!!
एभाप्र : डायबेटीक पेशंटसाठी शुगरफ्री आईसक्रीम करण्यासाठी काही टिप्स आहेत का?
का नाही काढला? यम्म यम्म लागल
का नाही काढला? यम्म यम्म लागल म्हणून सगळ सम्पवल वाट्ट>>> हो बरोबर ओळखलस रश्मी
https://in.pinterest.com/roll
https://in.pinterest.com/rollinskj/recipes-ice-cream-sugar-free/
इथे दिसल्या शुगरफ्री पाकृ. ड्रिमगर्ल, मला वाटत मुग्धाच्या रेसेपीत त्यावेळी साखर घालुच नये, कारण फळान्चा गोडवा ओके असेल डायबेटीक लोकान्करता.
धन्यवाद रश्मी! ट्राय करून
धन्यवाद रश्मी! ट्राय करून बघते...
मी हीच रेसिपी वापरुन चॉकलेट
मी हीच रेसिपी वापरुन चॉकलेट आइसक्रीम केले.
चॉकलेट बार डबल बॉयलर मेथड वापरुन वितळवून घेतले अणि बाकी सारे या पा. कृ. नुसार घातले.
मी आज हे आइस्क्रिम केले. घरची
मी आज हे आइस्क्रिम केले. घरची मंडळी बेहद्द खूश. खूप छान झाले होते. आज सिझनमुळे आंब्याचे केले, पण आता कधी एकदा वेगवेगळे फ्लेवर ट्राय करते असे झाले आहे. अगदी सोप्या नो कटकट रेसिपीबद्दल मुग्धटली तुम्हाला मनापासुन खूप खूप धन्यवाद.
हामच्या कडे आम्बा आणि अंजीर
हामच्या कडे आम्बा आणि अंजीर असे ट्राय झाले . एक्दम यशस्वी. फोटो काढेपर्यन्त सम्पलेही . पुन्हा इथे फोटो टाकायला ते १५० केबी का काय त्याची अडचण.....
आशिका , आइसक्रीम बार डबल
आशिका ,
आइसक्रीम बार डबल बॉयलर मेथड वापरुन वितळवून घेतले अणि बाकी सारे या पा. कृ. नुसार घातले. >>> चॉकलेट ना
Pages