"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असू देत. तसेही 'मंगोल लाईट कॅव्हॅलरी च्या टॅक्टिक्स' किंवा तत्सम प्रकरण मी बघण्याची शक्यता कमीच Happy

सगळीकडेच या मालिकेचा बोभाटा झालाय. न राहवून काल शेवटी हॉटस्टारची प्राईम मेम्बरशिप घेतली आणि पहिला भाग पाहिला. इंटरेस्टिंग वाटला. मराठीत अनुवादित करून लिहायचा मानस आहे. काही हरकत नाही घेणार ना कोणी मराठीत थोडक्यात प्रत्येक भाग लिहिला तर?

<<मराठीत अनुवादित करून लिहायचा मानस आहे. >> म्हणजे नक्की काय? प्रत्येक सिझनच्या प्रत्येक भागाचे परीक्षण लिहीणार आहात का?

परिक्षणाला हरकत नसेल. ट्रान्सलेट करून लिहिणार असाल तर प्रताधिकाराचा प्रश्न येऊ शकतो.

परिक्षणाला हरकत नसेल. ट्रान्सलेट करून लिहिणार असाल तर प्रताधिकाराचा प्रश्न येऊ शकतो.>> अनुमोदन.

मराठी नावे वापरून लिवा की राव... कोणाला काय कळतंय...तरी पण एकदा वेमा ला विचारून घ्या...
बादवे.. शीर्षक काय ठेवणार होता तुम्ही..

शीर्षक खेळ सिंहासनाचा. पुस्तके वगैरे नाही वाचली पण हॉटस्टारचे एपिसोड पाहून लिहू शकतो. थोडक्यात महत्वाचं आहे ते लिहायचं प्रत्येक एपिसोडप्रमाणे. जास्त फाफटपसारा नाही मांडायचा जेणेकरून लेख वाचून जे कोणी हि मालिका पाहतील त्यांना अडचण नाही येणार. आणि अतिरिक्त माहिती मित्रांकडून मिळत असतेच.जेथे गरज वाटेल तेथे ती माहिती टाकत जायची.

विंटरफेल मध्ये विंटर आला एकदाचा, आणि स्टार्क बंधु-भगिनींचा पुतळा आधीच कसा काय त्यांच्या पूर्वजांसाठीच्या तळघरात??? उत्कंठा वाढलीच आहे...

अरे ट्रेलर आला. पाहिलात का?
सगळे रथी- महारथी विंटरफेलमध्ये जमलेत. मजा येणारेय. >>> केव्हाच पाहिला. आता प्रचंड उत्सुकतेने वाट पाहणं चालू आहे.

अरे त्या लॉर्ड वेरसला (स्पायडर) डॅनी ने हाकलला होता ना तिच्या इनर सर्कल मधुन? (आय इवन थॉट हि इज प्रिझ्युम्ड डेड) तो दिसतोय, टीझरमध्ये. डिड आय मिस एनिथिंग?

इट हॅज बीन ए व्हाइल... Proud

भारीये ट्रेलर ... गारठा वाढलाय... कधी बघतोय अस झालय
त्या आधी आधीच्या एपिसोडची रिविजन मारावी लागेल एकदा

Varys ला डॅनीने हाकलून नव्हते लावले. पण तिला वॅरिसच्या निष्ठेवर शंका आलेली. वॅरीसने सांगितले की त्याच्या निष्ठा शोषीत, तळागाळातल्या लोकांशी आहेत. जर डॅनी चुकत असेल तर तो त्यांच्याशी प्रतारणा करून डॅनीला साथ देणार नाही. वॅरीसचा बाणेदारपणा बघून डॅनीने त्याला सांगितले की जर ती कुठे चुकत असेल तर थेट तिला सांगायचे, मागून खलबतं करायची नाहीत. वॅरीसने ते मान्य केले.
वॅरीस हे माझे सर्वात आवडत्या कॅरेक्टर्सपैकी आहे. खुप जबरदस्त लिहिले आहे ते. त्याचे तत्वज्ञान, त्याची रणनिती, डिप्लोमसी यांचा फायदा डॅनीला होणार आहे.

टुकार ओव्हररेटेड सिरीज, फॅड नुसता. सगळे बघतात चर्चा करतात म्हणून बघते पब्लिक.
अर्धे तर हॉट सीन्स साठी बघतात.

बरं, मग आता कोण कोणाच्या हातून मारलं जाईल आणि फायनली आयर्न थ्रोनवर कोण बसेल याबद्दल मतं सांगा.

मला सर्सी आर्याच्या हातून मारली गेलेली पाहायची आहे.
वॅरिस आणि मलिसान्ड्रा मरणार आहेत - बहुधा डेव्हॉसही.

डॅनी बसेल थ्रोनवर असं मला वाटतंय - आणि टिरियन तिचा हॅन्ड!

सर्सीला त्या विच ने सांगितल्याप्रमाणे भावाच्या हातून अंत होणार तिचा. माझे पैसे जेमीवर.
वॅरिस आणि मलिसान्ड्रा मरणार आहेत >>+११
दावोस, हाउंड, थिऑन, ब्रिएन ही मंडळी इथपर्यन्त आली आहेत हे नवल आहे. काहीतरी हेतू असावा त्यांना जिवंत ठेवण्यात अशी आशा आहे.
डॅनी मरणर असे मला ९८% वाटतेय.

>>> सर्सीला त्या विच ने सांगितल्याप्रमाणे भावाच्या हातून अंत होणार तिचा. माझे पैसे जेमीवर.
ओह असं आहे का? मग माझे टिरियनवर! Proud

ब्रिअ‍ॅनकडे वॅलेरियन स्वोर्ड आहे - ती महत्त्वाची आहे महायुद्धासाठी. हाउंड बहुधा भावाला मारणार.

उनाडटप्पू, नाही, नेटफ्लिक्सवर नाहीये.

हो "क्लीगेनबोल" साठी लोक कधीचे वाट बघताहेत म्हणे Happy
मी एक थिअरी वाचली त्यात डॅनीचे तिन्ही ड्रॅगन मरतील आणि आइस ड्रॅगन होतील आणि त्यांच्यासाठी म्हणून तीही "अदर साईड" ला जाईल सर्व सोडून . Uhoh

Pages