"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रॅन आणि नाइट किंगबद्दल ची थेअरी वाचली >> हो पण दोघेही ह्या टाईम लाईनमधे एकाच वेळी असणे कसे शक्य होईल मग ते कळत नाही. परत Night King 13th commander of Night Watch होता असे पुस्तक म्हणतेय. पुस्तकाच्या सुरूवातीला Night King नि Bran healthy असणे एकत्र लिहिलेले आहे. जर हि थियरी खरी असेल तर बराच झोल घालावा लागेल कोणाला तरी.

Happy लिटल फिंगर च्या म्हणण्याला रेफरन्स इतकाच की लहान असताना ब्रॅन ला मारण्यासाठी (त्या प्रयत्नात) त्याच्या अटॅकर ने खरोखरच वापरलेला असतो तो डॅगर. लिटल फिंगर चा तो ब्रॅन ला देण्यात काय हेतू असतो ते नाही कळले पण.

Night King 13th commander of Night Watch होता असे पुस्तक म्हणतेय. >> हो का. हे नव्हते माहित. जॉन कितवा होता ?

पुस्तकाच्या सुरूवातीला Night King नि Bran healthy असणे एकत्र लिहिलेले आहे.>> म्हणजे?
जर हि थियरी खरी असेल तर बराच झोल घालावा लागेल कोणाला तरी.>> म्हणजे?

हं..
तो अटॅकर सेर्सी/जेमी ने पाठवलेला असतो ना?

मलापन प्रश्न पडला कि जॉन कितवा कमांडर असतो..

बर मध्यंतरी त्या नाईट किंग आणि व्हाईट वॉकरची गँग एका लेकराला घेऊन जातात अन त्याचे डोळे निळे करतात.. ते लेकरु गिलीच्या बहिणींचे असते ना? ते लेकरं मोठे कसे होतात?

जॉन ९९८वा लॉर्ड कमांडर.

मला तरी ती थिअरी वरच्या सगळ्या इश्युजमुळे फारशी टेनेबल वाटली नाही.

>>मला वाटल तोंड फक्त मेलेल्या माणसाचीच लावत असतात म्हणुन आर्या सान्साचा चेहरा कसा लावेल?<<
दॅट्स करेक्ट. सांसाला मरावं लागेल, आर्याला तिचं रुप घेण्याआधी...

>>ते लेकरु गिलीच्या बहिणींचे असते ना? ते लेकरं मोठे कसे होतात?<<
गिलिच्या वडिलांमध्ये (नांव विसरलो) आणि नाईट किंगमध्ये अंडरस्टँडिंग असते कि त्याने मुलगे सप्लाय करायचे (व्हाइट वॉकर होण्याकरता) आणि त्या बदल्यात नाईट किंग त्यांना त्रास देणार नाहि...

Jon Snow, 998th Lord Commander, elected in 300 AC by one tile.>> मीपन हेच लिहायला आली होती..

गिलिच्या वडिलांमध्ये (नांव विसरलो) आणि नाईट किंगमध्ये अंडरस्टँडिंग असते कि त्याने मुलगे सप्लाय करायचे (व्हाइट वॉकर होण्याकरता) आणि त्या बदल्यात नाईट किंग त्यांना त्रास देणार नाहि...>> हे मला माहित आहे.मी विचारतेय कि आर्मी मधे लेकर कुणी दिसले नाही तर त्यांची ग्रोथ कशी होते? कारण बाकीचे झाँबी समजु शकते पण हे तर जिवंत बाळ असतात ना.. त्यांची वाढ कशी होते किवा ते नाईट किंग सारखे पावरफुल बनतात कि झाँबी सारखे 'होय महाराजा' करत चालणारे हरकामे होतात?

Night King आणि Night's King हे दोन्ही वेगवेगळे आहे ना.. पहिले मी नावं मिक्स करायची

पुस्तकाच्या सुरूवातीला Night King नि Bran healthy असणे एकत्र लिहिलेले आहे.>> म्हणजे? >> पुस्तकाच्या सुरूवातीला बहुधा एड स्टार्कचा भाऊ वॉलच्या पलीकडे जातो नि त्याची Night King शी भेट होते असा प्रसंग आहे. नंतर जनरल Ed च्या विंटरफेल मधले प्रसंग आहेत त्यात Bran पांगळा व्हायचा आहे. तर हे दोघे एकच असतील तर एकाच वेळी दोन्ही कडे कसे असतील ते लक्षात येत नाही. हे सगळे त्याचा Three Eyed Raven व्हायच्या आधीचे सगळे आहे. हे दोघे त्या थियरी प्रमाणे एकत्र बांधलेले असू शकतील तर एकच असतील असे जमवणे कठीण वाटते.

यांची वाढ कशी होते किवा ते नाईट किंग सारखे पावरफुल बनतात >> ते बेसिकली wight न होता white walkers होतात.

भा अरे ड्रोगॉन blue eyed झाला तर आग ओकू शकणार नाही कारण, तो स्वतःच मरेल ना मग ?

लिटल फिंगर चा तो ब्रॅन ला देण्यात काय हेतू असतो ते नाही कळले पण. >> इथे चार पाच पोस्टी पडाव्यात ह्यापेक्षा वेगळा नसावा Happy मला लिटील फिंगरचा कंटाळा आलाय.

ते बेसिकली wight न होता white walkers होतात. >> नाईट किंगकडे स्पर्शाने infantsना व्हाईट वॉकर बनवायची ताकद असावी. सगळ्या व्हा.वॉ.कडे ती आहे का, हे कळत नाही.

असामी, नाईट'स किंग आणि नाईट किंग वेगळे आहेत. १३वा लॉर्ड कमांडर असणारा नाईट'स किंग, पण जो आपण बघतो आहोत तो नाईट किंग. चिल्ड्रन ऑफ मेन यांनी बनवलेला नाईट किंग हा फर्स्ट मेनपैकी. लॉर्ड कमांडर ही संकल्पनाच खूप नंतर आली. (लाँग नाईट नंतर)

भा अरे ड्रोगॉन blue eyed झाला तर आग ओकू शकणार नाही कारण, तो स्वतःच मरेल ना मग ? >> जर तो wight झाला, तर बरोबर. व्हा.वॉ. टाईप झाला, तर माहीत नाही. व्हाईट वॉकर्सना आग मारते का अजून क्लीअर नाहीये आय गेस.

हो बरोबर भा, माझा गोंधळ झाला खर. माझा तसाही पुस्तकात जे झालय नि सिरीयल्स मधे जे होतेय नि झालय ह्यात भयानक गोंधळ होत असतो. सहावा भाग आल्यावर मी wight सारखाच वाचेन असे वाटतेय Wink

व्हाईट वॉकर्सना आग मारते का अजून क्लीअर नाहीये आय गेस. >> होडॉरच्या फाईटच्या वेळी त्या explosion मधे white walkers पण होते ना ?

एड स्टार्कचा भाऊ वॉलच्या पलीकडे जातो नि त्याची Night King शी भेट होते असा प्रसंग आहे. >>म्हणजे बेंजेन स्टार्क ना..
हो पण त्याची भेट नाईट किंगसोबत न होता white walkers सोबत त्याची फाईट होते ज्यात तो जखमी होतो आणि white walkersचा त्याला तसाच मरायला सोडून निघुन जातात. त्यावेळी लिफ आणि इतर चिल्ड्रेन ऑफ फॉरेस्ट त्याच्या आत ड्रॅगनग्लास टाकून त्याला वाचवतात ज्यामुळे तो नॉरमल माणुस तर राहत नाही पण त्याचा wight (याचा उच्चार सांगा रे कोणतरी) सुद्धा होत नाही आणि तो पुर्ण शुद्धीत राहतो.

यांची वाढ कशी होते किवा ते नाईट किंग सारखे पावरफुल बनतात >> ते बेसिकली wight न होता white walkers होतात.>>फँडम म्हणते कि नाईट'स किंग ला त्याची ताकद मेंटेन करण्यासाठी ह्युमन(चाइल्ड्)सॅक्रिफाइज ची आवश्यकता असते म्हणुन तो क्रॅस्टर कडुन बच्चे घेतो आणि त्याला त्याबदल्यात कोणताही त्रास न देण्याच डिल करतो.

नाईट किंगकडे स्पर्शाने infantsना व्हाईट वॉकर बनवायची ताकद असावी. सगळ्या व्हा.वॉ.कडे ती आहे का, हे कळत नाही.>>
हि ताकद नाईट किंगकडे नसुन नाईट'स किंग कडे आहे अस दाखवल आहे.
नाईट'स किंग हा नाईट किंग पेक्षा पावरफुल दाखवला आहे. तो तोच जो लढाईमधे सगळे मुडदे चुटकिसरशी खडे करतो. डोक्यावर बर्फाचा क्राउन्/शिंग्/हॉर्न्स असणारा..
नाईट किंग म्हणजे तो आजोब्बा घोड्यावर बसलेला जो लिफने स्वरक्षणासाठी तयार केलेला फर्स्ट मॅन पासुन..तर
नाईट'स किंग म्हणजे नाईट किंग सोबत लढाई झाल्यानंतर भिंत बांधल्यानंतर जो १३वा लॉर्ड कमांडर असतो तो.. तो जास्त पावरफुल याकरता कारण तो सॉसरर दाखवला आहे. तो एका बाईच्या प्रेमात पडतो जी पूर्ण्पणे पांढरी आणि व्हाईट वॉकर सारखी थंड असते. तो तिला जवळ करतो आणि मग त्याचं जादूटोण्याच सत्र सुरु होते. पुढे जाऊन तो ब्लॅक कॅसल ताब्यात घेऊन स्वत:ला किंग घोषित करतो. पूढे त्याला हरवल्यानंतर तो आणि त्याचे यांना वॉलपल्याड हकलुन ठार केल्या जाते. असे अ‍ॅट्लिस्ट सर्वांना वाटते पण तो पलिकडे जाऊन स्वतःच्या शक्तीने नाईट किंग आणि व्हाईट वॉकर्सला समन करुन त्यांची आर्मी बनवतो.

टीना नाईट'स किंग बद्दल तू जे लिहिलेयस ते पुस्तकात आहे पण पुस्तकात नाईट किंगचा सरळ सरळ उल्लेख अजून आलेला नाही. पुस्तकात व्हाईट वॉकरपर्यंत गाडी थांबलेली आहे (असे मला आठवतय त्याप्रमाणे). Children of the Forrest नी पुस्तकात व्हाईट वॉकर वॉर नंतर तयार केले आहे त किंवा त्यांचा वापर वॉर नंतर केला आहे असे दिलय तेंव्हा पुस्तक नि सिरीयल ह्यात बरीच फारकत होत चालली आहे असे दिसतय. दोन्ही फॉलो करणार्‍यांची सॉलीड गोच करून ठेवलेली आहे. 6th book is coming असे म्हणायची वेळ आली आहे Lol

{>>मला वाटल तोंड फक्त मेलेल्या माणसाचीच लावत असतात म्हणुन आर्या सान्साचा चेहरा कसा लावेल?<<
दॅट्स करेक्ट. सांसाला मरावं लागेल, आर्याला तिचं रुप घेण्याआधी...}

सिझन ६ मध्ये आर्या जेव्हा चुकीच्या माणसाला मारते तेव्हा नो वन स्वतः विष पिऊन मरतो. पण पुन्हा बाजूला उभा असलेला दिसतो. आर्या मेलेल्या माणसाचे चेहरे काढत जाते तर एक चेहरा तिला स्वतःचा दिसतो. मग ती आंधळी होते. यावरून असं वाटतं की चेहरा बदलायला माणूस मेलेला असणं गरजेचं नाही.
https://m.youtube.com/watch?v=KgT8CMJSTTw

पण बाकीचे रेफेरन्स सगळे मेलेल्या माणसांचे चेहरेच आहेत

मला वाटल तोंड फक्त मेलेल्या माणसाचीच लावत असतात म्हणुन आर्या सान्साचा चेहरा कसा लावेल?
दॅट्स करेक्ट. सांसाला मरावं लागेल, आर्याला तिचं रुप घेण्याआधी..>>>>हा सीन बघा, त्यात आर्या जिवन्त असताना तिचा चेहरा दुसर्या प्रेतावर असतो.
https://www.youtube.com/watch?v=6k-RDnmv0Sk
म्हणजे सान्सा चा चेहरा ति जिवंत असताना आर्या लावु शकते.

>>त्यात आर्या जिवन्त असताना तिचा चेहरा दुसर्या प्रेतावर असतो.<<

यावरुन डिड्युस करता येइल कि ओरिजिनल आर्या इज डेड ऑल्रेडी; हुएवर इज देर नाव इज नो वन... Wink

'खेळ शिंव्हासनाचा : थंडी यायल्या' मधुन साभार

ओळखला का युअर ग्रेस मला, बर्फ़ातून आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहुन
बोल्टन्स आली होती, गेली विंटरफ़ेलात राहुन

माहेरवाशीण पोरी सारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जातील कशी, बहीण मात्र वाचली

व्हाइट वॉकर आली, माणसे मेली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणुन पापण्या मध्ये पाणी थोडे ठेवले

वाइल्डलिंग्सना संगे घेउन आता लढतो आहे,
कॅसल ब्लॅक जपतो आहे , ड्रॅगनग्लास शोधतो आहे

गुडघ्याकडे हात जाताच हासत हासत उठला,
सत्ता नको ग्रेस जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला विंटरफ़ेल तरी मोडला नाही कणा,
आत्या तुम्ही ड्रॅगन वर बसुन, फक्त ड्रकारीअस म्हणा!

-साभार कायप्पा!

लोल

Pages