"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.
ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html
हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.
वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.
जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.
हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.
करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!
"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei
मुलगा ज्यामुळे जायबंदी झाला
मुलगा ज्यामुळे जायबंदी झाला त्या लांडग्याला तिने मारलं.>> तो लांडगा दुसराच होता.
गॉट बघून संपवली. उद्यापन -
गॉट बघून संपवली.
सहाव्या आणि सातव्या सीझनपासून अचानक वेगवान झाल्यासारखी वाटली.
लॉर्ड बेलिशला त्याच्याच कुटील कारस्थानात अडकवून सान्सा आणि आर्या त्याला मृत्युदंडाची शिक्षा देतात. त्याच्याकडून पापाची कबूली वदवून घेतल्यानंतर वेल्सचे सैन्य सुद्धा बंडखोरी न करता नॉर्थशी एकनिष्ठ राहते. सान्सा राजकारणात निपुण झाली.
ब्रॅन्डन स्टार्क वॉर्गिंगच करत असतो, त्याला वाचवण्यासाठी होडोर - होल्ड द डोअर असा का झाला हे कळाले. ब्रॅन त्रिकालदर्शी झाल्याने लहान मुलाचे भाव जाऊन स्थितप्रज्ञ - निरस वाटायला लागला. डोळे पांढरे करून पडून राहणे अति झाले पण. अशाच काळप्रवासात जॉन स्नो बास्टर्ड नसून ऱ्हेगार टार्गेरियन व लियाना स्टार्क यांचे औरस अपत्य व सिंहासनाचा खरा वारस आहे हे बहुतेकांना कळले. डेनेरिस व त्याचे प्रेम जडले तर ती त्याची आत्याच निघाली पण जेथे सख्ख्या भावंडाची अपत्ये व प्रेम पाहिले तेव्हाच नजर मरून गेली. डेनेरिसला काही करून हे सत्य बाहेर येऊ द्यायचे नसते, थ्रोनचा ध्यास ! त्याप्रमाणे जॉन स्नो सुद्धा तूच माझी राणी म्हणून चरणापाशी समर्पित.
जॉन स्नो अत्यंत थोर पण सतत इतरांशी समर्पित. गोंडस चेहरा आहे फार. मितभाषी पण न्यायाने वागणारे कॅरेक्टर. किती लढला आणि किती माणसं जोडली, गणतीच नाही.
तिकडे सान्साला डेनेरिसवर विश्वास नाही.
द लॉन्ग नाईट - अनडेड लोकांशी युद्धाची तयारी सुरू. त्याकरिता ड्रॅगन ग्लासपासून हत्यार बनविली, आर्याचा मित्र गेन्ड्रिल (रॉबर्ट बराथिअनचा बास्टर्ड ) याची मदत. आर्याला प्रपोज केलं पण ती म्हणाली मी काही लेडी नाही.
लेडी मॉर्मॉन्ट - काय झाशीची राणी आहे ही चिमुरडी. तिचे आधीचे डायलॉग, तिचे लेडी म्हणून वागणं सगळं धडाडीचे. काय लढली ही, जबरदस्त ! अनडेड जायन्टने बरगड्या मोडल्या तरी त्याचा जीव घेऊनच मेली.
जेमी लॅनिस्टर सुद्धा आला या युद्धात, सर्सीचे काही न ऐकता एकटाच. हाऊन्डही जिवंतच निघाला, पण आगीचा ट्रॉमा. कधी नव्हे ते द रेड वुमन -मेलिसान्द्रेची मदत होऊन आग पेटली व अनडेडच्या सैन्याला काही काळ रोकता आले. एकदम डिल्युजनल आणि भंपक कॅरेक्टर, शेवटी नेकलेस काढले की म्हातारी होऊन मेली.
लेडी ओलेनाने जॉफ्रीला मारल्याची अगदी अभिमानाने कबूली दिली. सर्सीला आवर्जून सांग म्हणून विष पिऊन मेली. हिचे हाल करून मारायचे होते सर्सीला पण जेमीमुळे सौम्य शिक्षा झाली. हायगार्डन लॅनिस्टरांनी जिंकले. पण तोवर कॅस्टर्ली रॉक डेनेरिसच्या अनसलिडनी जिंकले. जेथे लहानाचे मोठे झालो तिथले सगळे भुयारी मार्ग "घर का भेदी, लंका ढाये" - उक्तीप्रमाणे टिरियन सांगितले.
हळूहळू बाकीचे लिहिते.
डॉर्नच्या ग्रूपची नौका बुडाली
डॉर्नच्या ग्रूपची नौका बुडाली व इंदिरा वर्मा व तिच्या मुली मेल्या. एकीचे विष देऊन हाल करण्याचा सर्सीचा प्लॅन. माऊंटन नावाचे नव्या राजवैद्य - मेस्टरच्या कृपेने फ्रॅंकेनस्टाईन टाईप काहीतरी झाले आहे. तो नरराक्षस आहे. हाऊन्डचा दुरावलेला भाऊ, करणं दादामुळे थोबाड जळाले. वेड्या भावाची वेडी ही माया.
द लॉन्ग नाईटचे अनडेड सोबत युद्ध सुरू झाले आहे. सगळी मुले , स्त्रिया व लॉर्ड व्हॅलिस आणि टिरियन तळघरात. आर्या बाहेर. हा भाग मला जबरदस्त आवडला. जशी रात्र चढते तसा उत्तरेतला बर्फ - हिमवर्षाव सुरू होतो. सगळेच संधिप्रकाशात लढत असतात. एखादी लढाई जिंकण्याची खात्री असण्यापेक्षा हरण्याची शक्यताच जास्त असताना जितक्या निकराने लढू - तितकी लढली जाते. पहिल्यांदा सर्सीसोडून सगळे एकत्र. जेमीच्या मते आता सर्सीशी एकनिष्ठ राहण्याच्या शपथेपेक्षा सर्व्हायवल मोठं आहे म्हणून मी आलो.
हिमवर्षाव व संधिप्रकाशात लढत लढत सगळे हतबल वा मृत. एकेकाच्या अंगावर वीसवीस झॉम्बी चढत आहेत. आता काहीच होऊ शकत नाही असे वाटत राहते. डेनेरिसचा एक ड्रॅगन सुद्धा अनडेड होऊन यांच्यावर थंड आग ओकत आहे. नाईट किंग काही जळतच नाही. जॉन स्नोने किती जणांशी लढा दिला, अथक. थिऑनने ब्रॅनचे प्राण वाचवताना देह सोडला. जबरदस्त लढले सगळेच. शेवटच्या क्षणी आर्याने खंजीर खुपसून नाईटकिंगला गतप्राण केले. त्याचे सैन्यही धुळीस जमा. सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून मोठ्या चिता रचून अग्नी दिला.
आर्या इज द रिअल हिरो !
पार्टी सुरू. डेनेरिस उगाच अस्वस्थ, बहुतेक असूया कारण जॉनच्या नेतृत्वाखाली झाल्याने त्याचे कौतुक होत आहे.
सगळं विंटरफेल बेचिराख पण नवा आरंभ आणि सर्सीसोबतच्या युद्धाची सुरुवात.
हळूहळू बाकीचे लिहिते >>> अगं
हळूहळू बाकीचे लिहिते >>> अगं तसंही अशी कथा लिहित बसण्यात काहीच पॉइन्ट नाही. ( असं मला वाटतं) ज्यांना स्पॉयलर नको असतील ते वाचणार नाहीत आणि ज्यांनी सीरीज एकदा/ अनेकदा पाहिली आहे त्यांना काही फायदा नाही!
त्यापेक्षा काय काय कसं कसं वाटलं . काय एन्जॉय केलंस काय बेकार वाटलं ते लिही की. ते वाचायला मज्जा येते.
शेवटचा सीझन एकदाच पाहिला आहे
शेवटचा सीझन एकदाच पाहिला आहे पण हे वाचून बरेच आठवले. पुन्हा बघायला पाहिजे.
जॉन स्नो सुद्धा तूच माझी राणी म्हणून चरणापाशी समर्पित. >>>
"तूच माझी राणी" हे प्रत्यक्षात राणीला राणी म्हणायला वापरलेले पहिल्यांदाच बघितले
नाहीतर ममव पिक्चर्स, नाटके व पुस्तकांत हे वाक्य प्रेयसी/बायको करताच वापरलेले जास्त दिसले आहे.
सान्साला ८ व्या सीझनपर्यंत बीयर गाल आले आहेत. सुरूवातीला ती जितकी छान दिसते तितकी शेवटी वाटली नाही.
लेडी मॉर्मोण्ट भारी आहे. बॅटल ऑफ बास्टर्ड्स याच सीझनमधे आहे की आधी झाले लक्षात नाही.
मै, लक्षात आले. मी थोडं थोडं
मै, लक्षात आले. मी थोडं थोडं यातही काय आवडलं ते लिहिलं आहे तसं, पण प्रयत्न करून बघते.
मला सान्सा शेवटपर्यंत नाजूक, रेखीव चेहऱ्याची व उंच सडपातळ म्हणून आवडली. 'बॅटल ऑफ द बास्टर्ड्स' होऊन गेले, सगळेच संपले आहे आता. शेवटचे दोन एपिसोड राहिलेत, लिहायचे. 'तूच माझी राणी'- ती राणी आणि प्रेयसी दोन्ही आहे आणि तो दोन्ही "हैसियतींशी" एकनिष्ठ असल्याच्या आणाभाका घेतोय असं वाटलं.
सान्साला लोक रडकी वगैरे समजतात आणि आर्याला शूर. पण सान्साही मनाने धाडसी व धीराची आहे. फक्त ती फेमिनिन आहे, लेडी होण्याचे संस्कार व कल दोन्ही तिला मिळालेले आहे. आर्या मस्क्युलिन आहे, तिच्या हातात सदोदित तलवार असते. ती नॉर्थची सत्ता राणी म्हणून सांभाळू शकली नसती कदाचित, कारण माणसं जोडणं व ती आपल्याशी एकनिष्ठ राहावीत यासाठी प्रयत्न करणं तिच्या पिंडात नाही. ती योद्धा - सेनापती म्हणून पर्फेक्ट आहे. दोघींचे शौर्य वेगवेगळे आहे.
Pages