"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या, डेनी आणि तिचे ड्रॅगन पोरं, थिऑन, ड्रॅगनग्लास सगळ्यांचाच निकाल लागला..
>>>>
दोनदा पाहिला लेटेस्ट एपिसोड, हे कधी झालेय?

मास्तरांचा बहुतेक जिओटीचा अभ्यास कमी पडतोय. व्हाइट वॉकर्सना मारायला वलेरियन स्टील पुरेसं आहे; त्यात ड्रॅगन्ग्लास फोर्ज करण्याची आवश्यकता नाहि... Proud

आर्या, डेनी आणि तिचे ड्रॅगन पोरं, थिऑन, ड्रॅगनग्लास सगळ्यांचाच निकाल लागला..
Submitted by टीना on 6 August, 2017 - 12:40
>>>>
दोनदा पाहिला लेटेस्ट एपिसोड, हे कधी झालेय?

आर सांगा ना राव... उगाच फेका मारून राहिले तुम्ही...आर्या जिवंत आहे की...

मास्तरांचा बहुतेक जिओटीचा अभ्यास कमी पडतोय. व्हाइट वॉकर्सना मारायला वलेरियन स्टील पुरेसं आहे; त्यात ड्रॅगन्ग्लास फोर्ज करण्याची आवश्यकता नाहि... Proud>> पण वलेरियन स्टिल अँपल अमाऊंट मधे नसल्यामुळे या दोन पैकी जे मिळेल ते घेऊन त्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हायच म्हणुन ड्रॅगनग्लास मिळवण्यासाठी तो धडपडतोय..

दोनदा पाहिला लेटेस्ट एपिसोड, हे कधी झालेय?
आर सांगा ना राव... उगाच फेका मारून राहिले तुम्ही...आर्या जिवंत आहे की...>> निकाल लागला म्हणजे मेले असं कुठं म्हटलय मी?
निकाल म्हणजे उगा ते कधी पोहचेल पुढे काय होईल हे सार्‍यांचच सार दाखवलय म्हटल..

>>IISER pune question paper.<<

टीना, प्रश्नपत्रिका नीट वाचली का तुम्ही? मास्तर म्हणतायंत कि जॉनला (चुकिचं स्पेलिंग) सोर्ड वलेरियन स्टील + ड्रॅगन्ग्लास फोर्ज करुन बनवायची आहे; नुसत्या ड्रॅगनग्लासची नव्हे...

जेमी मेला नसावा. ब्रॉन किंवा टिरियन ने त्याला वाचवण्याकरता पाण्यात ढकलले असे मला वाटले.
तो टिरियन असेल तर मोठाच कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो डॅनी बरोबर.
मला ड्रोगॉन किंवा तो जो कोणी ड्रॅगन होता त्याची चिंता पडली आहे! इतक्यात नका मारू ड्रॅगन्स ना.
सान्सा- ब्रॅन -आर्याचे मच अवेटेड रियुनियन तितके इमोशनल आणि एक्सायटिंग नाही वाटले समहाऊ!
लिटल फिंगर बघावे तेव्हा काहीही दृष्य पाहून ते छद्मी हास्य करतो ते जाम डोक्यात जाते. त्याने ब्रॅन ला तो डॅगर देणे , " इट वॉज मेन्ट फॉर मी " असे ब्रॅन ने पुन्हा म्हणणे , तो डॅगर आर्या ला देणे . ते "नथिंग मॅटर्स " की काय ते म्हणणे गूढ वाटले.

मला ड्रोगॉन किंवा तो जो कोणी ड्रॅगन होता त्याची चिंता पडली आहे! इतक्यात नका मारू ड्रॅगन्स ना. >>> आय मीन, मेबी कायबर्नने बाणाला विष लावलेले असेल ...

त्याने ब्रॅन ला तो डॅगर देणे , " इट वॉज मेन्ट फॉर मी " असे ब्रॅन ने पुन्हा म्हणणे , तो डॅगर आर्या ला देणे . >>> बहुधा ब्रॅनला आर्या त्या डॅगरने लिटलफिंगरला मारत असल्याची व्हिजन आली असेल.

भाग पाचच्या प्रिव्ह्यु मधे दाखवलाय ड्रोगोन..म्हणजे अजुनतरी वेळ असेल मरायला..जखमी वगैरे झाला असेल नो डाऊट पन मरणार नाही एवढ्यात..

S7E4 न पाहिलेल्यांनी पुढच्या वाक्यात दिलेली लिंक इग्नोर करावी. S7E4 बघितल्यावर प्रश्न पडलेल्ल्यांचं समाधान काहि प्रमाणात लेझ्ली जोन्सने तिच्या स्टाइलने या क्लिप मध्ये केलेलं आहे. एंजॉय...

बाबौ !! काल बरेच सुतळी बाँब फुटलेत !!
सर्सी ?!!! प्रेग्नन्ट ?? जॉन च्या जन्माचे रहस्य! डेली सोप मधे कसं एखादं पात्र महत्त्वाचं सीक्रेट किंवा कन्फेशन देताना मुख्य पात्र झोपून वगैरे जातं त्याच्या वरताण होता तो सीन - गिलीने ते वाचणे आणि सॅम चं लक्ष च नसणे वगैरे!!
त्या लिटल फिंगर ला कुणीतरी प्लीज लवकर संपवा !! Angry आर्या होपफुली इज नॉट प्लेयिंग हिज गेम Sad
मला ती व्हाइट वॉकर ला पुरावा म्हणून पकडून आणण्याची (आणि तेही सर्सी ला दाखवण्याकरता ?)आयडिया काही झेपली नाही पण! व्हॉट्स द पॉइन्ट?!! सर्सी म्हणेल बरं मग ? मारा त्यांना तुम्हीच Lol
जॉन, जोरा मोर्मॉन्ट, हाउंड, बेरिक्,गॅन्ड्री, दावोस, टार्मंड ही अनलाइअकली टीम जाम इन्टरेस्टींग वाटली पण!! Happy

मस्त होता कालचा एपिसोड. आर्या अशीकशी इझिली फसल्याचं दाखवत आहेत ?
खरतर लिटल फिंगरने काही न करताच दोघी बहिणींमध्ये अनबन तर होणारच आहे त्यांचे पूर्ण वेगवेगळे स्वभाव बघता, तो कशाला उगाच कष्ट घेतो आहे?
जेमी आपला मरेपरयंत सर्सीच्या बाजूने लढायच्या कामात अडकलेला आहे.

जॉन स्नो चा "त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक..." मोमेंट जवळ आलेला आहे. जॉन र्हेगार-लिएनाचा लव चाइल्ड नसुन लेजीट चाइल्ड आहे आणि त्यामुळेच लोखंडी गादीचा थेट दावेदार आहे हे कळ्ल्यावर डॅनीची रिअ‍ॅक्शन काय असेल ते बघणे रोचक असेल.

पुढच्या भागाच्या टिझरमध्ये जॉन सकट सातहि महारथी भूत (लिटरली/फिगरेटिवली) मागे लागल्यासारखे ऊर फुटेस्तोवर धावताना दाखवलेले आहेत. या सातजणांपैकि १-२ जणांची विकेट बहुतेक पडणार आहे. कोण असतील ते? हाउंड जोरात धावु शकेल असं वाटत नाहि... Proud

हाउंड चे माहित नाही पण टार्मंड हा एक मरण्याला लाउक उमेदवार असू शकतो Happy
हाऊंड ही आहे तसा कँडिडेट पण काहीतरी सॉलिड करून दाखवण्यासाठी त्याचे अवतार कार्य आहे असा इतक्यात च त्याला साक्षात्कार झाल्यामुळे तो लगेच मरेल असे वाटत नाही समहाऊ. अजून कोण ? दावोस? तो कोण थोरोस पण एक आहे. बेरिक, जॉन आणि गॅन्ड्री हे मात्र अनलाइकली Happy

मला ती व्हाइट वॉकर ला पुरावा म्हणून पकडून आणण्याची (आणि तेही सर्सी ला दाखवण्याकरता ?)आयडिया काही झेपली नाही पण! व्हॉट्स द पॉइन्ट?!! सर्सी म्हणेल बरं मग ? मारा त्यांना तुम्हीच >> Happy हो डॅनी एव्हढे तीन तीन ड्रॅगन्स असताना एक चक्कप beyond the wall मारून बघून का येत नाही ? Happy

पुढच्या भागात डॅनी जॉनला वाचवायला येईल नि एखादा ड्रॅगन "दुसर्‍या" बाजूला जाईल नि blue eyed होईल असे वाटते. टॅगॅरिअन्स चे दोनच जिवंत वंशज आता वेस्टेरूस मधे उभे आहेत त्यामूळे दोन ड्रॅगन्स इथे नि एक पलीकडे असे करतील.

ड्रॅगन्स ची झटापट आवडत असेल तर The Princess and The Queen or The Greens and the blacks aka Dance of the Dragons हि Dangerous Women मधली टॅगॅरिअन्स मधल्या ग्रुहकलहाची गोष्ट नक्कीच वाचा.

व्हाईट वॉकर नाही, त्या झॉम्बिला आणायचंय. व्हाईट वॉकरला बंदी बनवणे अशक्य आहे असे वाटते.

पुढच्या भागात डॅनी जॉनला वाचवायला येईल नि एखादा ड्रॅगन "दुसर्‍या" बाजूला जाईल नि blue eyed होईल असे वाटते. टॅगॅरिअन्स चे दोनच जिवंत वंशज आता वेस्टेरूस मधे उभे आहेत त्यामूळे दोन ड्रॅगन्स इथे नि एक पलीकडे असे करतील. >> मलाही हेच वाटते. पण ब्लू आईड ड्रॅगन आगच ओकेल की बर्फ, हे पाहणे इंटरेस्टींग असेल.

त्या लिटल फिंगर ला कुणीतरी प्लीज लवकर संपवा !! Angry आर्या होपफुली इज नॉट प्लेयिंग हिज गेम Sad >> मला असे वाटते आहे, की आर्याच ह्या खेळात वरचढ ठरेल व लिटलफिंगरला मात देईल. स्पेशली कारण ती स्वतःच सान्सा बनून लिटलफिंगरकडे जाऊ शकते. शी हॅज प्लेड द गेम ऑफ फेसेस. तिला बहुधा कळेल काय लोच्या आहे ते.

सर्सी ?!!! प्रेग्नन्ट ?? जॉन च्या जन्माचे रहस्य! डेली सोप मधे कसं एखादं पात्र महत्त्वाचं सीक्रेट किंवा कन्फेशन देताना मुख्य पात्र झोपून वगैरे जातं त्याच्या वरताण होता तो सीन - गिलीने ते वाचणे आणि सॅम चं लक्ष च नसणे वगैरे!! >> सर्सेईच्या प्रॉफेसीमध्ये तिला ३ मुले होतील, व तिन्ही मरतील इ. इ. भाग आहे, त्यामुळे ती चौथ्या वेळी गर्भवती असणे, ही तिच्या त्याच्या जन्माआधीच मरणाची चाहूल आहे, असा माझा अंदाज. पण प्रॉफेसीशी पुस्तक फेथफुल असले, तरी शो आहे का, हे माहीत नाही, त्यामुळे कदाचित नसेलही.

एखादा ड्रॅगन "दुसर्‍या" बाजूला जाईल नि blue eyed होईल >> Uhoh ही जरा अवघड वाटतेय कॉन्सेप्ट Happy शिवाय अजून एक पॉसिबिलिटी आहेच- ड्रोगॉन खाल ड्रोगो प्रमाणे त्यच्या त्या इन्जुरीमधे सेप्टिक झाल्याने मरेल.
टाइम फ्रेम्स काही कळत नाहीयेत या सीझन मधे. जॉन ड्रॅगन स्टोन वरून निघाला ते त्याच भागात इस्ट वॉच ला पोहोचला पण. विंटरफेल आणि बॅनरमन्स ना दिले की वार्‍यावर सोडून. आर्या आणि ब्रॅन ला भेटून मग जायचे की तिकडे. जोरा मोर्मॉन्ट पण अचानक उपटला आणि लगेच निघालाच इस्ट वॉच वर.
ती स्वतःच सान्सा बनून लिटलफिंगरकडे जाऊ शकते. >>> तेच ना मी तोच विचार करत होते, ही ते स्किल का नाही वापरत आहे आणि स्वतःच्याच गेट अप मधे लिटल फिंगर च्या खोलीत कशाला घुसली!
ही तिच्या त्याच्या जन्माआधीच मरणाची चाहूल आहे, >>>> किंवा फक्त मिस्कॅरेज होऊ शकते!

व्हाईट वॉकर नाही, त्या झॉम्बिला आणायचंय. व्हाईट वॉकरला बंदी बनवणे अशक्य आहे असे वाटते. >> बरोबर भा, wight पकडून आणायचा आहे.

ब्लू आईड ड्रॅगन आगच ओकेल की बर्फ >> बर्फच असणार ना ? Fire and Ice !

मला वाटल तोंड फक्त मेलेल्या माणसाचीच लावत असतात म्हणुन आर्या सान्साचा चेहरा कसा लावेल?

अरे सातच लोक गेले ना भिताडापलिकडे.. कांदावीर डेवोस थांबलाय भिंतीतच..
बेरिक मरणार नाही कशावरुन?
हाउंड माउंटेन ला मारेल का?
मलातर जेंड्रीचा बळी देईल अस वाट्टय..
मॉरमाँट ज्यु आत्ताच दुरुस्त झालाय त्याला जगु देईल अजुन..आणि तसपन पुढमागं आत्याचा भाच्यावर जीव आलाच तर लव्ह ट्रँगल, फ्रेंडझोन गडी, सपोर्टींग लव्हर पायजेलच ना...

बर्फच असणार ना ? Fire and Ice ! >> मला वाटते तरी तसेच, पण इज अ रीसरेक्टेड फायर ड्रॅगन ऑटोमॅटिकली अ‍ॅन आईस ड्रॅगन? मला थोडीशी नॉन-झीरो शक्यता आगच असण्याची वाटते, कारण त्यांना वॉल पाडायची असेल, तर बर्फाने कशी पाडणार?

किंवा फक्त मिस्कॅरेज होऊ शकते! >> बरोबर. माझा फक्त अंदाज आहे गट फीलींग्जवरून. चुकीचाही असेल.

हो वाचली ना..
लिफ म्हणते कि ‘We were at war. We were being slaughtered. Our sacred trees cut down. We needed to defend ourselves.’
त्यात फॅन म्हणतात कि ब्रॅन जेव्हा विचारतो तेव्हा ती उत्तर देते ''फ्रॉम यू, फ्रॉम मेन."
आता हे लोक्स म्हणतात कि फ्रॉम यू अ‍ॅज इन नाईट किंग..
याला काय अर्थ आहे?
नाईट किंग पासुन डिफेंड करायला नाईट किंग बनवला अस होईल न ते.. मला नाही पटल..

ते कसं होईल ते मलाही नाही नीट झेपलं पण ते खरं धरलं तर मग ब्रॅन ने आर्या ला मुद्दाम तो डॅगर देणे - विच वॉज "मेन्ट फॉर हिम" मेक्स सेन्स - आर्या विल फिनिश द नाइट किंग विथ दॅट डॅगर ?

विच वॉज "मेन्ट फॉर हिम" >> असं आपला लिटलफिंगर बाबु म्हणतो न त्याला..
आता हे म्हणू नको कि लिटलफिंगरलापन माहित असते कि ब्रॅनबाबाच नाईट किंग आहे म्हणुन..

Pages