"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीरीजच्या लेखकांच्या (मार्टिनकाका नव्हे) मते चांगल्या सीरीजचा वाइट्/रडका एंडिंग होणं चांगलं नाहि, म्हणजे हॅपि एंडिंग इज गिवन. आता हॅपि एंडिंगला ट्विस्ट/तडका दिला तर फायनल वॉरमध्ये डॅनी, जॉनसकट सगळे मारले जातात (वेट, जॉन इज वाय्ट म्हणजे वॉकिंग डेड) आणि आयर्न थ्रोनला आइस थ्रोन मध्ये कन्वर्ट करुन सुखाने राज्य करतात आणि जिओटीची कथा सुफळ संपन्न होते... Proud

राज Lol
नंतर 'समर इज कमिंग' म्हणून सीक्वलही काढता येईल. Lol

एम्टी, टिरियन टार्गेरियन असल्याची थिअरी खरी निघाली तर सर्सीला जेमीच मारेल. Proud

शिवाय ब्रॅन = नाइट किंग थिअरी खरी निघाली तर आर्याच्या डॅगर ने तो मरणार असे माझे बॉलिवुडी मन सांगते आहे Happy
पहिल्याच सीझन च्या (पहिल्याच ?) भागात तो डॅगर 'ब्रॅन च्या नावे' येणे, "इट वॉज मेड फॉर मी" असे म्हणून तो डॅगर गेल्याच सीझन मधे ब्रॅन नेच आर्या ला देणे ... सगळे कसे पोएटिक.

>>शिवाय ब्रॅन = नाइट किंग थिअरी खरी निघाली तर आर्याच्या डॅगर ने तो मरणार<<
ब्रॅन मधे वलेरियन स्टिलची इम्युनिटी डेवलप झालेली आहे (संदर्भः पहिल्या सिजनमधला त्याच्यावर झालेला हल्ला), यावरुन तो आर्याच्या डॅगरने मरणार नाहि अशी शक्यता वर्तवायला जागा आहे... Wink

सिझन 8 एपिसोड 1 आला की लगेच पहावा की सिझन संपेपर्यंत तळमळत रहावं हे ठरवू शकत नाहीए. एकेक एपिसोड पहायचा म्हटलं तरी जीवाचे हाल होतात.

मी पाहिलेल्या थिअरी प्रमाणे डॅनीरिअस मरणार आणि जॉन स्नो / टॅरगॅरीअन आयर्न थ्रोनवर बसणार आहे.

सर्सीला त्या विच ने सांगितल्याप्रमाणे भावाच्या हातून अंत होणार तिचा. माझे पैसे जेमीवर. >>> माझे पण जेमी वर, कारण आता पर्यंतच प्रेम आणि जवळीक असल्यामुळे टेरियन पेक्षा जेमीने मारणे हा ट्विस्ट जबरदस्त असेल. अर्थात आपल्यासारख्या बॉलिवूड मुव्हीज पाहणाऱ्यांना असले ट्विस्टस चिल्लर.

सर्सीला त्या विच ने सांगितल्याप्रमाणे भावाच्या हातून अंत होणार तिचा. माझे पैसे जेमीवर. >>> माझे पण पैसे जेमीवर. त्यने तिला मारणच पोएटिक होइल.
डॅनी मरण्यावर पण माझे पैसे.
कोणीच आयर्न थ्रोन वर बसणार नाही. राज्याची डेमोक्रॅटिक शकले पडतील.

GOT surv.JPG

थ्रोनवर डेनेरिस बसेल आणि टिरियन तिचा हॅन्ड, सॅम मेस्टर होईल.
ब्रॅन वॉल रीबिल्ड करेल आणि जॉन ती राखायला जाईल.
आर्या बहुधा आर्मी लीड करेल आणि गेन्ड्री क्वीन्सगार्ड होईल.

सान्साचं नाव सर्व्हायवर्समध्ये लिहिलंय, पण त्या बाबतीत मी डाउटफुल आहे. त्या डायरवुल्व्ज आणि स्टार्क चिल्ड्रनचं कनेक्शन आहे - ज्यांचे डायरवुल्व्ज जिवंत आहेत तीच स्टार्क मुलंही जगलीत, राइट? सान्साची लेडी कधीच मेली.

व्हाइटवॉकर कोणीच होत असल्याचं इमॅजिन करता येत नाहीये मला.

वरच्या लिस्टमध्ये स्टार्क, लॅनिस्टर, टार्ली, मोर्मॉन्ट, बराथियन यांचे वंशज आले.
हाउस टायरेल बिचारा संपला.
एड्म्युअर वाचला तर टलीजचाही राहील.

thronebracket.jpg
हो ते डायर्वुल्फ आणि स्टार्क्स चिल्ड्रेन चे कनेक्शन हाही व्हॅलिड पॉइन्ट आहे .

>>आर्या बहुधा आर्मी लीड करेल आणि गेन्ड्री क्वीन्सगार्ड होईल<<
सध्याची आर्या हि आर्या स्टार्क आहे कि "नो वन"?

>>> सध्याची आर्या हि आर्या स्टार्क आहे कि "नो वन"?
हम्म... मला आर्या आहे असा विश्वास वाटतो कारण तिने घेतलेला रेड वेडिंगचा सूड आणि नंतर विंटरफेलमध्ये सान्साशी बोलताना जुन्या आठवणी काढणं. ब्रॅननेही ती आर्या असल्याचं क्वेश्चन केलेलं नाही - त्याला कळलं असतं ना?

ती थिअरी मला नाही पटत. ती आर्या नसून नो वन असेल तर तिला काय इंटरेस्ट वाल्डर फ्रे, बेलिश वगैरे आर्याच्या एनिमीज चा सूड घेण्यात? शिवाय सान्सा, ब्रॅन सोबत बाँडिंग, विंटरफेल ला आल्यावर आधी तळघरात आई वडिलांच्या पुतळ्यापुढे जाऊन उभी राहणे वगैरे . ऑल दॅट विल नॉट मेक सेन्स.

आठवा, जॅकिन म्हणाला होता - फायनली, ए गर्ल इज नोवन.

याचा अर्थ आर्या इज फेसलेस, ऑर शि कॅन टेक एनी फेस टु एक्झिक्युट "मेनी फेस गॉड्स" काँट्रॅक्ट्स. यापुढच्या शेंगा (बीन्स) इतक्यात सांडत नाहि...

हे पा, कुणालाही काहीही मिळुदे, आमच्या bronn ला त्याचा त्याचा किल्ला मिळायलाच पाहिजे, आणि हो सर जोरा ला Danny च्या मिठीत प्राण सोडू द्या!!

त्या ब्रॉन चं शोले मधल्या जय सारखं होणार आहे. ( मेल्यामुळे) ते न झालेल्या मुलांना गोष्टी सांगायचं राहून जातं तसं न मिळालेला किल्ला उधार राहिला असं तो मरताना जेमीला सांगणार Happy
मागच्या सीझन मधे ड्रॅगन च्या हल्ल्यात त्याची पैशाची पिशवी सांडते तेव्हाच आता मरतो की काय असं मनात आलं होतं .

सर जोरा ला Danny च्या मिठीत प्राण सोडू द्या!! >>>>>. हो ना, माझे फेवरीट आहेत सर जोरा. सुरुवातीपासून बरोबर असून तिच्या प्रेमाला पारखेच राहिले आहेत. आता मरताना तरी तिच्या मिठीत मृत्यू येऊ देत.

झिरी इक्सॉस त्राशस ........... >>>>>> भाडीपाचा सगळ्यात उच्च व्हिडिओ आहे हा. फार मस्त लिहिला आहे. तुफान हसलो आम्ही.

स्पॉयलर अलर्ट -> अन्दाज अहेत तरिहि ..

१. डॅनी चाइल्ड बर्थ मध्ये मरणार आहे. मेल्यावरहि तिचे हाल दाखवणार आहेत.
२. ब्रॅन हा नाइट किंग बरोबर जाइल किंवा स्वतः सॅक्रिफाइज करेल. पण व्हाईट वॉकर्स पूर्ण सम्पणार नहीत.
३. जॉन स्नो कायमस्वरुपी वॉल वर जाणार आहे
४. थ्रोन वर डॅनी ची मुलगि बसणार आहे . टिरीयन आणि मिसान्ड्रे तिचे सल्लागार बनणार अहेत
५. तीनहि ड्रॅगन मरणार हे नक्कि !
६. सरसी मरेल ( आर्या किंवा टिरियन )
७. सर जोरा मॉर्मॉन्त , टकलू व इतर चिल्लर , खुर्दा सगळा संपणार आहे .

झिरी इक्सॉस त्राशस ........... >>>>>> भाडीपाचा सगळ्यात उच्च व्हिडिओ आहे हा. फार मस्त लिहिला आहे. तुफान हसलो आम्ही....> आम्ही पण...

झिरी इक्सॉस त्राशस >>> जबरी आहे ती क्लिप. धमाल एकदम.

मला तो "डॉन कन्सेप्ट" आवडला. ये तुळशीबाग की ५ रू. की सुरी है ये तुम जानती हो, ये मै जानती हूँ, लेकिन वो व्हाइटवॉकर नही जानती Happy

लोक्स , टिरीयन हा लॅनिस्टर नाही , टारगेरीयन आहे असं मला वाटते, त्याशिवाय त्याला ड्रॅगन न हात लावू दिला नसता.
जबरी आहे ती क्लिप. धमाल एकदम. >> अगदी अगदी. ! ( बाकी .. ते *&^ धुण्याची गोष्ट त्यांच्या प्रत्येक क्लिप मध्ये असतेच का ? हॅरी पॉटर च्या क्लिप मध्ये पण होती )

सीझन सुरु झालेला आहे! येस्स!
स्पॉयलर वॉर्निंग****

पहिल्या भागात कोणी महत्वाच्या विकेट्स पडलेल्या नाहीत Happy
कालच्या भागात माझी फेवेरीट सान्सा !! द वे शी हॅज इमर्ज्ड अ‍ॅज अ श्र्यूड, स्मार्ट लीडर!! अमेझिंग! सीझन ६ पासून तिचे झालेले ट्रान्स्फॉर्मेशन अप्रतिम!! सी ६ मधे राम्सीच्या डोळ्याला डोळा भिडवून "स्लीप वेल. यू आर गोईंग टू डाय टुमारो" ते सी ७ फिनाले मधे लिटल फिंगर ला त्याचाच डायलॉग वापरून थंड पणे कन्फ्रन्ट करणे ते कालच्या भागातला डायलॉग "आय थॉट यू वेअर वन ऑफ द स्मार्टेस्ट" हा टिरियन ला आहेर !! गो सान्सा!!
सगळी रथी महारथी विंटरफेलात जमलेत. या सगळ्यांना खायला कसे अन काय घालयचे असा सान्सा चा प्रश्न मलाही पडला Happy
डॅनी सातव्या सीझन पासून अरोगंट आणि अनॉयिंग वाटत आहे मला. काल पण सेम.
यारा वाचली ते आवडलं. युरॉन आणि सर्सी! Uhoh तरी काही टिएमाय सीन्स न दाखवल्याबद्दल धन्यवादच प्रोड्यूसर्स ना.
आर्याला काल फार एक्सपोजर दिले नाही. पण जॉन ला भेटल्यावर 'नीडल' वापर्लीस का असे त्याने विचारणे आणि तिचे हो असेल एक दोन वेळा हे उत्तर फनी होते,
डॅनी - जॉनचे लवी डवी होणे आणि आर्याचे गॅन्ड्रीसोबत फ्लर्टिंग अगदीच बळंच आहे. दोन्ही जोड्यांत शून्य केमिस्ट्री आहे.
सॅम - जॉन चा तो डायलॉग जबरी वाटला. ज्या प्रकारे सॅम ने ट्विस्ट दिलेला आहे!! विल बी व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग टु वॉच दॅट थ्रेड!!

Pages