"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.
ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html
हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.
वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.
जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.
हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.
करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!
"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei
एक वाइल्ड गेस : आर्या,
एक वाइल्ड गेस : आर्या, गेंड्रीला ड्रॅगन्ग्लासचे अॅरोहेड बनवायला सांगेल. पहिल्या सिझनमध्ये दाखवल्याप्रमाणे ती धनुर्विद्या शिकलेली आहेच. नाइट किंग चा शेवट आर्याच्याच बाणाने केला जाईल का?..
यार्रा शेवटी थिऑन ग्रेजॉयला
यार्रा शेवटी थिऑन ग्रेजॉयला काहीतरी सांगते. "बास्टर्ड्स आर किल्ड एनिवेज" या अर्थाचं काहीतरी. त्याचा काही संदर्भ लागेना मला.... जॉन स्नो ला उद्देशुन आहे का ते? कारण थिऑन स्टार्क्स साठी लढायला जात अस्तो.
यार्रा शेवटी थिऑन ग्रेजॉयला
यार्रा शेवटी थिऑन ग्रेजॉयला काहीतरी सांगते. "बास्टर्ड्स आर किल्ड एनिवेज" >> नाही. जॉनचा काही संबंध नाही. ग्रेजॉय लोकांचं वाक्य आहे what is dead may never die. थिऑन लढायला जाणार आहे ते लोक (ना किं आर्मी) ऑलरेडी डेड आहेत तरीपण किल दोज बास्टर्ड्स असं सांगते ती.
ओह ओके, धन्यवाद मॅगी.
ओह ओके, धन्यवाद मॅगी.
>>तरीपण किल दोज बास्टर्ड्स
>>तरीपण किल दोज बास्टर्ड्स असं सांगते ती.<<
जिओटी या सिरिजची अजुन एक खासीयत म्हणजे त्यातले संवाद. कंप्लीट फिक्शन असुन देखील त्यातल्या कॅरेक्टर्सचे संवाद कंटेंपररी आहेत (हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ दि रिंग्ज इ. सारखे नाहित); चटकन रिलेट होतात. वरच्या प्रसंगात, यारा थिऑनला त्वेशाने हेडबट करुन खाली पाडते, आणि त्यानंतर वर उठायला हात देते. त्यावेळेस तिच्या तोंडी कुठलंहि वाक्य नाहि पण आपल्यालाच वाटतं कि आता ती म्हणेल - व्हॉट टूक यु सो लाँग...
थिऑन चं अवतार कार्य संपलं
थिऑन चं अवतार कार्य संपलं असावं का आता? की अजून काही बाकी असेल? ते पात्र कशासाठी जिवंत ठेवलंय असं वाटता वाटता त्याने आधी सान्सा आणि मग याराला रेस्क्यू करण्याचे काम केले.
मस्त काम केलंय या माणसाने(ही).
थिऑन चं अवतार कार्य संपलं
डबल पोस्ट.
डिअर गॉट, इनफ विथ द कॅटफाइट्स
डिअर गॉट, इनफ विथ द कॅटफाइट्स!
>> थिऑन चं अवतार कार्य संपलं
>> थिऑन चं अवतार कार्य संपलं असावं का आता?
हो, सान्सा आणि यारा दोघींना रेस्क्यू केलं त्याने तेव्हा ते karmic debt फिटलं. आता विंटरफेल वाचवताना जीव गेला की तेही फिटेल.
नाईट किंगची आर्मी विंटरफेलवर
नाईट किंगची आर्मी विंटरफेलवर अॅटॅक करेल तेव्हा नाईट किंग त्या कन्व्हर्टेड ड्रॅगनवर बसून किंग्ज लँडिंगला जाईल. तिथे त्याला नवी मिलियन लोकांची आर्मी तयार आहे.
इकडची आर्मी दोन ड्रॅगन्स मिळून सफाचट होईल. तोवर तिकडे साऊथमधून नवी आर्मी वर येऊ लागेल.
-होराभूषण आरारा.
आरारांना एकदोन एपिसोड्समध्ये
आरारांना एकदोन एपिसोड्समध्ये उरका पाडायचा आहे वाटतं! अजून पाच आहेत म्हटलं!
शिवाय ते छुपे नाइट किंग भक्त दिसतात.शिवाय ते छुपे नाइट किंग भक्त
शिवाय ते छुपे नाइट किंग भक्त दिसतात. >>
"भक्त" अजिब्बात म्हणायचं नाय
"भक्त" अजिब्बात म्हणायचं नाय बर्का! :रागः
>>छुपे नाइट किंग भक्त दिसतात.
>>छुपे नाइट किंग भक्त दिसतात. >>
>>"भक्त" अजिब्बात म्हणायचं नाय बर्का! :>>
मी काल पहिला सीझन संपवला. नेड स्टार्कला जेफ्री मारणार हे वाटतंच होतं, पण कॅट जेमीला पकडून आणते पण मारत का नाही? एकदा त्या इंपला पण सोडून दिलंय.
ड्रॅगन पण दिसले एकदाचे!
अमित तू पहिलाच सीझन पाहिलास
अमित तू पहिलाच सीझन पाहिलास ना फक्त? मग सध्या 'जेमीला मारत का नाही' हा प्रश्न अप्रस्तुत आहे
बायदवे, जपून हो, इथे वाचलंस तर मेजर स्पॉयलर्स मिळतील.
नाही नाही वाचत नाहीये फार.
नाही नाही वाचत नाहीये फार.
पहिल्या सिझनच्या ज्ञानावर आधारित जे मनात प्रश्न आले ते लिहिले. पुढे काही तरी दाखवायचं म्हणून केवळ मारलं नाही असं काही आहे का न मारण्याचं इमोशनल/ लॉजिकल ठोस कारण आहे ते कळेलच.
नाही नाही वाचत नाहीये फार.
नाही नाही वाचत नाहीये फार.
पहिल्या सिझनच्या ज्ञानावर आधारित जे मनात प्रश्न आले ते लिहिले. पुढे काही तरी दाखवायचं म्हणून केवळ मारलं नाही असं काही आहे का न मारण्याचं इमोशनल/ लॉजिकल ठोस कारण आहे ते कळेलच.
इंप ला सोडून देण्यावाचून
इंप ला सोडून देण्यावाचून इलाजच नसतो. ट्रायल बाय कॉम्बॅट जिंकतो ना तो.
अमित, तुझा वरातीमागून ड्रॅगन
अमित, तुझा वरातीमागून ड्रॅगन आलाय.
वटवाघूळाचा ड्रॅगन झाला हे काय
वटवाघूळाचा ड्रॅगन झाला हे काय कमी आहे!
हो इम्प ला सोडण्यावाचून पर्याय नसतो आणि तेव्हा नेड मुळे हात दगडाखाली असतात. आणि इम्प मला आवडला सो त्याला मारलं नाही त्यात वावगं वाटलं नाही.
पण त्यातून शिकून काही करायला नको का? आता पोरी किंग्ज लँडिंग ला आहेत म्हणून हात दगडा खाली हे एक लॉजिक दिसतंय.
गेम ऑफ थ्रोन्स हे या युगातले
गेम ऑफ थ्रोन्स हे या युगातले महाभारत/इलियड आहे. अचाट ब्याप्ती आहे पुस्तकांची.
पीटर डींकलेज म्हणाला की त्याने काम केलेल्यातली सगळ्यात 'रिआलिस्टिक' मालिका आहे ही!
सान्सा ही आयर्नथ्रोनवर बसायला
सान्सा ही आयर्नथ्रोनवर बसायला सर्वात लायक आहे, सर्वात सुपर्ब ट्रन्स्फॉरमेशन !
या आधी मला सर्वात जास्तं जेमीचं ट्रान्स्फॉरमेशन, त्याच्या विविध छटा सर्वात आवडल्या होत्या पण सध्याच्या सान्साने जेमीलाही मागे टाकलय.
निटींग करत बसणारी बार्बी सारखी डंब गर्ली गर्ल, जॉफरीची राणी बनून सोनेरी केसांचे राजपुत्र्/राजकुमार्या जन्माला घालणे एवढाच उद्देश अस्स्णारी पोरगी ते सरव्हायवल साठी झटत असताना अत्यंय कणखर झालेली सध्याची लेडी ऑफ विंटरफेल, तुफान आहे तिची जर्नी !
सध्याच्या सान्साकडे सर्सी लिट्ल्फिंगर सारख्या पोचलेल्या लोकांबरोबर राहिल्याने आलेली कोल्डब्ल्डेड राजनिती आणि रॅमजी सारख्या क्रुर योध्याबरोबर राहिल्याने त्या लेव्हलच्या सैतानाला हँडल करायची रणनिती आहे , शिवाय नॉर्थ बद्दल भरभरून लॉयल्टी, बेस्ट कॅरॅक्टर सध्याचे !
आर्या
आर्या स्टार्क उत्तम योध्दा आहे,थ्रोन मधे इंटरेस्ट नसावा, ती लढणार आणि सूड घेणार.
तिचं आणि सान्साचं काँबो सर्वात भारी आहे.
आर्या सर्सीला मारेल जेमीचा मास्क घालून, म्हणजे दोन्ही थिअरीज बरोबर येतील.
अर्थात त्यासाठी आधी आर्या जेमीलाही मारेल, त्याने ब्रॅनला ढ्कलून दिले समज्ल्यावर.
टिरियन क्विन्स हँड, सॅम उत्तम सलागार बनतील.
दिनेरियस :
दिनेरियस सहाव्या सिझनपासून निगेटिव आणि गर्विष्ठ होत आहे, ती माझ्यासाठी बाद.
ती नक्की मरणार आणि खाल द्रोगो कडेच जाणार, मेल्यावर तिच्या जगात सूर्य पश्चिमेला उगवणार.
ती चेटकिण काय म्हंटली लक्षात आहे का ?
When the sun rises in the west and sets in the east. When the seas go dry and mountains blow in the wind like leaves. When your womb quickens again, and you bear a living child. Then he will return, and not before.”
समुद्र ड्राय होणारच आहेत जेंव्हा व्हाइट वॉकर्स आयर्न आयलंडवर जाण्यासाठी समुद्र ड्राय करणार आणि युरॉनला मारणार !
माउंटन्स ब्रेक होऊन हवेत ऑलरेडी उडून गेल्य्सत जमा आहेत, तिच्याच व्हाइटवॉकरड्रॅगनने जर वॉल पाडली , तर बर्फाचे डोंगर पाडेलच.
पुन्हा प्रेग्नंट होणार आहेच जॉनपासून, हे नुकतच आलय बोलण्यात.
आता फक्त सूर्य पश्चिमेला कसा मावळेल विचार करतेय मी , बहुदा ड्रॅगन हे मुन पासून आले ही थिअरी तिथे कामी येईल.
जॉन शूर असला तरी इमोशनल फुल आहे, मला त्याच्या बहिणीं आर्या आणि सान्सा जास्तं आवडतात.
त्या ब्रॉन चं शोले मधल्या जय सारखं होणार आहे. ( मेल्यामुळे) ते न झालेल्या मुलांना गोष्टी सांगायचं राहून जातं तसं न मिळालेला किल्ला उधार राहिला असं तो मरताना जेमीला सांगणार
<<
सातव्या सिझन फिनालेला तो जेमीला पाण्यातून बाहेर काढल्यावर तो काय म्हंटला लक्षात आहे ना ?
Till I get what I’m owed, a dragon doesn’t get to kill you, you don’t get to kill you, only I get to kill you !
आता हे खरं ठरणार कि मित्राला मारायच्या ऐवजी स्वतः मरणार माहित नाही !
When the sun rises in the
When the sun rises in the west and sets in the east.When the seas go dry >>>> गिलीची थिअरी आठवली - See - sea, sun - son या शब्दांचे अर्थ वेगळे असले तरी उच्चार तेच होतात असे एकदा ती सॅम ला रँडमली म्हटली होती सिटाडेल मधली पुस्तके वाचताना.
आता फक्त सूर्य पश्चिमेला कसा
आता फक्त सूर्य पश्चिमेला कसा मावळेल विचार करतेय मी >>> तुला पूर्वेला म्हणायचंय का?
सान्सा चे ट्रान्स्फॉर्मेशन जबरी आहे. डीजेशी सहमत. या सीझन मधली तिची बॉडी लँग्वेज एकदम वेगळी आहे.
हो फा ,पश्चिमेला उगवून
हो फा ,पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळणारा
बाकी ब्रॅन नाइटकिंग थिअरी अजुन काही झेपत नाहीये मला, पण काहीतरी सबंध आहे, नाइटकिंगला मारायला तो मह्त्त्वाचा आहे फॅक्टर नक्की.
लहानपणी गोष्ट ऐकतानाही त्याला स्केअरी गोष्टी ऐकायला आवडते.
Thousands of years ago, there came a night that lasted a generation. Kings froze to death in their castles, same as the shepherds in their huts; and women smothered their babies rather than see them starve, and wept, and felt the tears freeze on their cheeks... In that darkness the White Walkers came for the first time. They swept through cities and kingdoms, riding their dead horses, hunting with their packs of pale spiders big as hounds.
या शिवाय थ्री आय रेवन म्हणतो ना, यु कॅन नेव्हर वॉक अगेन बट यु विल फ्लाय, याचा अर्थ ड्रॅगनवर सवार होणार नाइटकिंगशी फाइट द्यायला.
बाकी तो दारिओ नहारीस थ्रेड सोडून देणार कि आता दिनेरोयस जॉनची झाली म्हंटल्यावर तो सर्सीला जाऊन मिळेल ?
>>> ड्रॅगनवर सवार होणार
>>> ड्रॅगनवर सवार होणार नाइटकिंगशी फाइट द्यायला.
किंवा वॉर्ग असल्यामुळे परकाया प्रवेश करणार ड्रॅगनच्या शरीरात.
सन रायजिंग इन द वेस्ट म्हणजे वेस्टरोसमध्ये डॅनीला होणारा मुलगा?
सन रायजिंग इन द वेस्ट म्हणजे
सन रायजिंग इन द वेस्ट म्हणजे वेस्टरोसमध्ये डॅनीला होणारा मुलगा? >>> म्हणजे "सन" शब्द वेगळ्या अर्थाने? होप वेस्ट शब्दही वेगळ्या अर्थाने नाही
LOL
LOL
किंवा वॉर्ग असल्यामुळे परकाया
किंवा वॉर्ग असल्यामुळे परकाया प्रवेश करणार ड्रॅगनच्या शरीरात. Happy
सन रायजिंग इन द वेस्ट म्हणजे वेस्टरोसमध्ये डॅनीला होणारा मुलगा?
<<
हो मस्तं ! शक्य आहे हे शब्दांच्या खेळांचं सिंबॉलिझम
सगळ्यात शेवटी जॉन आणि डॅनी चा
सगळ्यात शेवटी जॉन आणि डॅनी चा मुलगा राहील आणि टिरिअन हँड ऑफ किंग!
Pages