"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळी रथी महारथी विंटरफेलात जमलेत. या सगळ्यांना खायला कसे अन काय घालयचे असा सान्सा चा प्रश्न मलाही पडला :))

डॅनी - जॉनचे लवी डवी होणे आणि आर्याचे गॅन्ड्रीसोबत फ्लर्टिंग अगदीच बळंच आहे. दोन्ही जोड्यांत शून्य केमिस्ट्री आहे. > १००% सहमत

**स्पॉयलर अलर्ट**
जॉनने 'मी पण फॅमिली आहे' म्हणल्यावर आर्याने त्याला 'Don't forget that' का म्हणले कळाले नाही. या बहिणींना नक्की काय वाटतंय जॉनबद्दल?
इतर नॉर्थ लॉर्डस पण उगाचच उखडल्यागत वाटले जॉनवर, का तर म्हणे गुडघे का टेकले? Uhoh अरे लेको जीव वाचवणं महत्वाचं आहे की बळंच त्याला राजा बनवून डोक्यावर बसवायचंय?

एम्टी+१ सगळ्याच पोस्टसाठी.
सान्सा डॅनीपेक्षा चांगली रूलर आहे! तिच्या कन्सर्न्स व्हॅलिड आहेत आणि क्वीन म्हणून रिस्पेक्ट हवा असेल तर त्या डॅनीने अ‍ॅड्रेस करायला हव्या होत्या - त्याऐवजी तिने हिंदी साँस-बहू सीरियलींसारखं फणकार्‍याने 'ड्रॅगन्स आवडेल ते खातात' वगैरे म्हणणं येडपट होतं!

>>> अरे लेको जीव वाचवणं महत्वाचं आहे की बळंच त्याला राजा बनवून डोक्यावर बसवायचंय?
त्यांचा सदर्नर्सवर विश्वास नाही आणि जॉनने गुडघे टेकण्याआधी त्यांच्यापैकी सान्सासकट कोणालाही कन्सल्ट किंवा इन्फॉर्म केलं नाही हा राग आहे.

मला बरोबर वाटले नॉर्थर्न लॉर्ड्स चे कन्सर्न्स. त्यांच्यासाठी ती आउटसाइडर आहे. त्यांनी जॉन ला निवडलं होतं किंग म्हणून तर हा जाऊन तिच्या पुढे गुडघा टेकवून आला सो त्यांना बिट्रेड वाटणे साहजिक आहे ! सान्साने आणि छोट्या लेडी मॉर्मॉन्ट ने कान उपटले त्याचे ते आवडले मला.
एकूण बरीच साइड कॅरेक्टर्स का जिवंत असावीत, त्यांचे "अवतार कार्य" काय असावे, मुख्य स्टोरी ला ती कसे अफेक्ट करू शकतात हे हळू हळू समोर येते आहे Happy

अरे हो ते लिहायचं राहिलंच. ब्रॉन चा सीन इंटरेस्टिंग होता! ब्रॉन मरता मरता हीरो होणार असेच वाटतेय माझ्या बॉलिवुडी मनाला. Happy

त्यांचा सदर्नर्सवर विश्वास नाही आणि जॉनने गुडघे टेकण्याआधी त्यांच्यापैकी सान्सासकट कोणालाही कन्सल्ट किंवा इन्फॉर्म केलं नाही हा राग आहे.>>> राग वरवर पहता व्हॅलीड आहे पण जॉनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्याच्यापुढे इतर काही पर्याय नव्हते. तसंही त्याने सुरवातीला ड्रॅगनस्टोनला असताना गुडघे टेकायला नाहीच म्हटलं होतं. आता त्याच्यापुढे डेनेरीस आहे जिचा या नॉर्थवर होणार्या नाईट किंगच्या हल्ल्याशी तसा दूरान्वयेही संबंध नसताना तिने एक ड्रॅगन घालवला (फुकटच), एवढया मेहेनतीने कमावलेली अनसलीड व डोथराकी फौज नॉर्थच्या बाजूने उभी केली. तर जॉनला इन रिटर्न काहीतरी करणं नक्कीच क्रमप्राप्त होतं.
बाकी सान्साचा आता या सगळ्यांना खायची सोय कुठुन करायची हा प्रश्न नक्कीच बरोबर आहे पण याला सगळ्यांचाच नाईलाज आहे. ते लोक्स तिथं तुमच्यासाठी लढायला अन मरायला आलेत पिकनिकला नव्हे. बाकी त्या डेनेरीस आत्यापण वन्संसमोर जास्तच मिजास मारतात हे ही तितकंच खरं Wink एकूणच कालचे त्यांचे सीन्स म्हणजे नणंद-भावजयांची धूसफूस वाटली.

ब्रॅन वर बरेच फनी मीम्स येतायत.
Bran is like that villain in a horror movie who appears behind you in the mirror when you're washing your face, or shows up in your rear view mirror when you're about to back out of the driveway. You weren't expecting to see him and you have no idea where he came from, but he's there now, looking at you blankly.
Lol

>>> but he's there now, looking at you blankly.
Lol

राजा होण्याच्या प्रॉस्पेक्टपुढे ते लक्षात आलेलं नसावं. Proud
जॉन आणि डॅनी दोघेही इम्पल्सिव्ह आणि 'रिअ‍ॅक्टिव' वाटतात - आलंय त्याला तोंड देतात, धोरण ठरवून ते कार्यवाहीत आणून तडीला नेतात असं अजून दिसलेलं नाही. ते लढवैये आहेत, प्रशासक नाहीत.

सान्साच सर्वात धोरणी आहे हे मी पुन्हा नमूद करू इच्छिते. Proud

शेवटच्या सीनला शिट्ट्या मारल्या!! मोस्ट अवेटेड रियुनियन!!>> ब्रॅन आणि जेमीचा ना? भारी होता...ब्रॅन म्हणतो I am waiting for an old friend, सहीच!
बाकी कालचा एपिसोड पाहून काही प्रश्न पडले. ब्रॉनला सुपारी कोणत्या Queen's Brother ची दिली? जेमी की टिरीयन? सर्सी खरंच प्रेग्नंट असेल का? आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जॉन हा रेगारचा मुलगा आहे कळल्यावर डॅनीची काय रिअ‍ॅक्शन असेल?

मला नाइट किंगच्या क्रिएशनची भानगड अजूनही नीटशी कळलेली नाही. फर्स्ट मेन फॉरेस्ट डिस्ट्रॉय करत होते तर त्याच्यावर उपाय त्यांच्यातल्या एकाला नाइट किंग करणं हा कसा काय असू शकतो? त्याने नक्की काय साध्य झालं?

मला नाइट किंगच्या क्रिएशनची भानगड अजूनही नीटशी कळलेली नाही. फर्स्ट मेन फॉरेस्ट डिस्ट्रॉय करत होते तर त्याच्यावर उपाय त्यांच्यातल्या एकाला नाइट किंग करणं हा कसा काय असू शकतो? त्याने नक्की काय साध्य झालं?>>> अगदी अगदी! पुस्तकात कदाचित क्लिअर केलं असेल. वाचलेले सांगू शकतील. आणि त्या अंकल बेन्जिनचा जीव पण त्या चिल्ड्रेन्सने तसाच वाचवलेला असतो ना? तो ब्रॅअनला म्हणतोसुद्धा एकदा की मी वॉल क्रॉस करु शकत नाही, a dead cannot cross the wall असं काहीसं. मग तो कसा नाही बनला नाईट किंग? (बरंय म्हणा, नाहीतर त्यांची थ्रोनसाठी गेम चालू व्हायची Wink ).

काल सगळ्यात वाईट त्या छोट्या लॉर्ड अंबरचं वाटलं. Uhoh तो विंटरफेलमधून निघाला तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली. रावसाहेब असते तर नक्कीच त्यांनी लेखकाला शिव्यांची लाखोली वाहिली असती!

>>तर त्याच्यावर उपाय त्यांच्यातल्या एकाला नाइट किंग करणं हा कसा काय असू शकतो?<<
मार्टिनकाका कोकणातले असावे अशी शंका येतेय. कोकणात असे प्रकार (चाळे?) केले जातात अशी वदंता आहे. काळ्या जादुने भुताटकिला वश करुन त्याचा वापर आपल्या फायद्या/संरक्षणाकरता केला जातो. पण त्यात काहि चूक झाली कि तीच भुताटकि तुमच्या वर उलटते आणि सर्वनाश करते - साधारण नाइट किंग सारखी... Proud

त्यांच्यातल्या एकाला नाइट किंग करणं >> त्यांचा प्लान त्या नाइट किंग ने फर्स्ट मेन ना तिथून हाकलून लावणे (आणि वेस्टरोस चिल्ड्रन्स ना ठेवणे) असा असतो बहुतेक पण तो आणि त्याचे व्व्हा. वॉ. चिल्ड्रन ना पण मारायला सुरुवात करतात. मी पुस्तक नाही वाचलेले.

>>त्याला 'Don't forget that' का म्हणले कळाले नाही. <<
माझा अंदाज - जॉनची डॅनीशी वाढलेली घसट बघुन असेल. वर कोणितरी नणंद्/भावजयांचा त्रिकालाबाधित मुद्दा आणलेला आहेच. Wink

>>इतर नॉर्थ लॉर्डस पण उगाचच उखडल्यागत वाटले जॉनवर, का तर म्हणे गुडघे का टेकले?<<
मॅड किंगचा राग अजुन असावा. नाहि म्हटलं तरी डॅनी त्याचीच लेक आहे ज्याने नेडच्या बापाला आणि भावाला कपटाने मारलं...

पुढच्या एपिसोडला ब्रॅन आणी जेमीचा वार्तालाप कसा असेल याची भारी उत्सुकता वाटते आहे. शिवाय जेमी आणी ब्रिअ‍ॅन पण भेट व्हायची आहे.

जेमी- ब्रिएन भेटलेत की, आत्ता गेल्या सीझन ला सर्सी शी बोलणी करायला जातात आणि सुरुवातीला सर्सी ट्रुस ला नकार देते तेव्हा ब्रिएन सांगते जेमीला, तुझ्या क्वीन शी बोल म्हणून.

चिडली आहे असे वाटले नाही. मेबी काहीतरी मिक्सड फीलिंग्ज असतील . "नो वन" च्या एपिसोड मधे जॅकेन हॅगार ला ती अ‍ॅक्चुअली म्हणते पण, की तिने हाउंड ला किलिंग लिस्ट वरून काढले आहे.

ओह हे नाही आठवत मला. पण काल तो स्माइल करून गेला, ती चिडूनच बघत होती. Proud
गेन्ड्री अगदीच टिनपाट दिसतो बाकी! कुठल्याच अ‍ॅन्गलने तिचा मॅच नाही. Proud

गेन्ड्री आणि आर्या हा रॉबर्टला लिआना न मिळाल्याबद्दलचा पोएटिक जस्टिस की काय! Happy

Pages