"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होऊन जाऊन द्या! मी सध्या सिजन १ ६व्या की ७व्या एपिसोड वर आहे. मजा येतेय बघायला. सुरवातीला जरा ग्राफिक गोष्टी बघून शंका आली की पुढे काय असेल पण आता मजा येतेय. बाकी, ग्राऊंडरुल्स काय? स्पॉयलर अलर्ट टाकून बोलायचे की बेधडक? अलर्ट टाकावा कारण मग मजा जाते बघायची. त्यात मी बराच मागे आहे अजून. Happy

नुसते आकडे नाही, नावं लिहा एपिसोडची. Proud ही पहिल्या सीझनची लिस्ट-

1 "Winter Is Coming"
2 "The Kingsroad"
3 "Lord Snow"
4 "Cripples, Bastards, and Broken Things"
5 "The Wolf and the Lion"
6 "A Golden Crown"
7 "You Win or You Die"
8 "The Pointy End"
9 "Baelor"
10 "Fire and Blood"

नंतर वर टाकीन.
कथानकातलं काही लिहायचं असेल तर साधारण आकडा-नाव टाका म्हणजे बाकीच्यांना वाचायचं की नाही ते कळेल.

कसं बघवतं रे तुम्हा लोकांना , काकडी कापावी तशी मुंडकी छाटतात ते लोक.
ह्या मालिकेचं नाव गेम ऑफ थ्रोन्स नाही तर गेम ऑफ मुंडकी असायला हवं. दिसलं मुंडक की काप असं करत असतात.

माणसा, तेवढं लिहायला आलास काय? Angry मुद्दाम माहिती लिहू नये कृपया..
पुस्तक नंतर वाचणार.

मामी, भारतात एचबीओ वर दिसते. भारतातले लोक बघतात, मला माहीत आहे. शोध..

तीनही सीझन्स पाहिलेयत. घराण्यां मधल्या सत्तासंघर्षाची मुख्य गोष्ट मस्त आहे. पण बाकी ग्राफिक कंटेंट चा अतिरेक झाला आहे.
इतका प्रचंड मोठा अवाका असणारी गोष्ट टी.व्ही. शो मधे इतक्या जबरदस्त परिणामकारक पद्धतीनी दाखवल्याबद्दल मात्र कौतुक करावच लागेल त्या मंडळींचं. इतकी वेगवेगळी लोकेशन्स, तर्‍हेतर्‍हेचे कपडे, दागिने, हत्यारं आणि माणसं जमवून त्यांची मोट बांधणं म्हणजे काही चेष्टा नाही..

अरे गौप्यस्फोट करणार असाल तर माझं येणं मुश्किल आहे इथे! माझे पुढच्या २ महिन्यांच्या विकेंडच्या एक्साईटमेंट ची सोय आहे गेम ऑफ थ्रोन्स! गौप्यस्फोट आजिबात खपायचे नाहीत मला!
Happy

पहिल सिझन पाहीला. मेकींग जबरदस्तच आहे. बोकवास हिंदी सिनेम्यांपेक्शा सरस टाईमपास!
पण मला रोम सेरीज जास्त आवडली होती. ती मजा यात नाही आली.

There's a beast in every man and it stirs when you put a sword in his hand
- Ser Jorah Mormont

There's a spoiler in every man and it stirs when you put a keyboard in his hand

नव्याने बघनार्‍यांसाठी काही tips

लेखक गेले कैक वर्ष हे पुस्तक लिहीतोय, सध्या पाच भाग आलेत व अजुन दोन बाकी आहेत.

ह्या जगात, ऋतु काही महीन्यांचे नसुन वर्षांचे आहेत. ८ वर्ष उन्हाळा, १० वर्ष बर्फ, असे.

पत्र, कावळे वाहुन नेत असतात. black bird, black news

जगात चार मुख्य भुखंड आहेत, पण पुस्तक सध्या दोनावर आधारीत आहे, Westeros & Essos

Westeros हे नियम पाळणार्‍या लोकांचे राज्य, तिथे मुख्य ७ देश आहेत, नी प्रत्येक देशातला राजा, पुर्ण westeros मिळवण्यासाठी लढत आहे, फक्त राजाच नाही, तर छोटे मोठे लोक सुद्धा.

काही वर्षांपुर्वी एक मोठी लढाई होते, नी त्यात तेव्हाचा सात देशांचा राजा व त्याचे संपुर्ण(?) कुटुंब नष्ट झालेले असते.

ह्या लढाईमधे जींकलेला राजा आता मेलाय, नी राज्य कोणाकडे जाईल हा प्रश्ण

Bible प्रमाणे इथेही, जुने देव, व नविन देव आहेत, काही लोक देव मानत नाहीत. काही जुने नवे सोडुन वेगळेच देव मानतात.

Official बायको कितीही आवडत नसली, तरी ती नी तीच्या मुलांना पहीला मान, Unofficial मुलांचा मान, जर पहीले कोणीच रहीले नाही तर.

Unofficial चे आडनाव देशानुसार ठरते, बर्फाळ प्रदेशात असेल तर Snow, डोंगराळ मधे असेल तर Stone, वैगेरे, वैगेरे

नवरा गेल्यावर बायको दुसरे लग्न करु शकते, mostly to save the estate

Westeros च्या उत्तरेल एक मोठी भिन्त आहे, जी पलिकडील भुतांना अडवुन ठेवते.

बाकी नंतर

उत्तम धागा............ कृपया इथे कोणी स्पॉयलर्स टाकू नका रे........... तिन्ही सीझनमध्ये सणसणीत आहेत काही घटना........ Wink Happy

टिरियन लॅनिस्टर माझा सगळ्यात आवडता.......

तिन्ही सिझन्स पाहून संपवलेत.. आणि पुढच्या मार्चपर्यंत राहवलं जाणार नाही म्हणून आता पुस्तकं वाचतोय... पहिलं, संपलं. दुसरं संपायला शंभर पानं बाकी. पुढची सगळी (म्हणजे पहिली पाच) आहेत मोबाईलमध्ये. सगळ्यात आवडतं कॅरॅक्टर जॉन स्नो आणि डिनेरीस स्टॉर्मबॉर्न Happy

अख्ख्या पोस्टीला +१ निशदे! टिरियन एक नंबर आहे! Happy ड्वार्फ असून सुद्धा मोठा शॅडो प्रोजेक्ट करतो तो.

वैद्यबुवा............... पुस्तक घ्या वाचायला सीझन संपले की....... त्यात तर टिरीयन अफाट आहे.

मस्त सिरीयल आहे पण वर श्री म्हणतात तसे काकडी चिरावी तसे येता जाता मुंडकी चिरतात. म्हणा तशी ती स्पार्ककाटस पण होती.

हो हो! हॅरी पॉटर नंतर आता पहिल्यांदाच आधी सिनेमा अन नंतर पुस्तक असं वाचायची संधी उपलब्ध झालीये. नक्की वाचणार! Happy

सॉल्लीड मालिका आहे ही.. पंधरा दिवसांच्या सुटीत सगळे भाग अधाशासारखे पाहून घेतले. सध्या पहिलं पुस्तक वाचायला घेतलंय. मालिकेत एका सीझनमध्ये आख्खं पुस्तक संपवायचं असल्यानं पुस्तकातले सगळेच तपशील नाही घेता आले आहेत्;त्याची मजा पुस्तकात घेता येतेय.

पुढचं न पाहिलेलंही वाचलंय, त्यामुळं पुढे काय घडणार याबद्दल थोडं माहित आहे. मला सर्वात जास्त आर्या, टिरियन लॅनिस्टर आणि आजकाल डनेरिस पण आवडायला लागलीय.

a-lannister-always-pays-his-debts.jpg

फॅन्स जमले वाटतं.. छान.

मामी, विचारुन सांगते. दोन सीझन्स डिव्हीडीवर आहेत.

माणसा, छान. मी हेडरमध्ये एका मॅपची लिंक दिली आहे ती पहा.
चिंगी, हर्षल, निशदे पुस्तक नंतर नक्की वाचणार. मालिकेत कथेमध्ये थोडे बदल केलेत असं ऐकलं.

माझी आवडती पात्रं-

पुरुष- (कारण काहीही असू शकते..अ‍ॅक्टर, अ‍ॅक्टिन्ग, कॅरॅक्टर..)
टिरियन लॅनिस्टर
खाल ड्रोगो Proud
हाऊंड
जॉन स्नो
रॉब स्टार्क
ब्रॅन
सॅम टार्ली
व्हॅसिरिस
लिटलफिन्गर

बाया-
खलीसी (डॅनिरिस)
आर्या
सर्सी
टलिसा
रॉस
इग्रिट
मार्जोरी

सान्सा आणि केटलिन या मठ्ठ बाया आहेत..

जेमी लॅनिस्टर राहिलाच त्यात.. Proud शे पण राहिली.

काकडी कापतात तशी मुंडकी.. Lol
मग तेव्हा तलवारीच होत्या तर काय करतील? टॉर्चर न करता ठार करायचं तर..
गोळ्या घालतात ते बघवतं वाटतं!

काकडी कापतात तशी मुंडकी.. >>>>>>>
मग नकोच. मला वाटलं विनोदी आहे की काय. असो. कोरियात कित्येक English चॅनेल्स दिसत नाही. असो. Sad

Pages