दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रा. चिं. ढेरे, मुबारक बेगम, महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

आत्ताच कविता महाजन यांनी लिहिलेली आठवण वाचली..
महाश्वेतादेवींना श्रद्धांजली _/\_ Sad

महाश्वेतादेवींना श्रद्धांजली _/\_

रणथंबोर अभयारण्यामधील "मछली‘ या जगप्रसिद्ध वाघिणीचा मृत्यु. ती १९ वर्षांची होती.
"जगामधील सर्वाधिक छायाचित्रे घेण्यात आलेली वाघीण‘ अशीही तिची ख्याती होती.

Sad

मछलीचा मृत्यू वाचून वाईट वाटलं. दर वर्षी मार्चमध्ये 'व्हेअर टायगर्स रुल'मधे न चुकता तिची भेट व्हायची. थँक्स टू अ‍ॅनिमल प्लॅनेट! एरवीही तिच्यावरच्या डॉक्युमेंटरीज बघून भारावायला होतं. तिचा देखणा रुबाब, दमदार चाल आणि हुकुमत जबरदस्त, ती खरोखर रणथंबोरची अनभिषिक्त महाराणी होती. वाल्मिक थापर, बिट्टू सेहगल मंडळींचं तिच्या छब्या पकडण्यासाठी जीवाचं रान करणं, तिच्यासाठी ताटकळणं बघून आ वासतो. रणथंबोरला जाणं झालं नाही अजून, पण नशीबानं तंत्रज्ञानानं ह्या सगळ्यांना आपल्यापर्यंत पुरेपूर पोचवलं.
हे समाधान आहे, की ती तिचा जीवनकाल पूर्ण करून नैसर्गिक मृत्यूनं गेली. हेच भाग्य तमाम वाघ वाघिणींच्या वाट्याला येऊ देत _/\_
[ह्यात आपलाही स्वार्थ आहे, ते राहिले, तर आपण रहाणार!]

हे समाधान आहे, की ती तिचा जीवनकाल पूर्ण करून नैसर्गिक मृत्यूनं गेली. हेच भाग्य तमाम वाघ वाघिणींच्या वाट्याला येऊ देत _/\_ >> +१

श्रद्धांजली _/\_

विली वॉन्का.. Sad
इतका काही म्हातारा नव्हता ना तो... असं म्हटलं मी आणि माझ्या लेकानं

कामगार नेते शरद राव यांचे आज त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

भावपूर्ण श्रद्धांजली!

कामगार नेते शरद राव ,कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेले पोलिस शिंदे यांना श्रद्धांजली.

खुप गुणी कवी गेला. कलावंत माणूस.
नलेश पाटील वयानं जाण्याइतके मोठे नव्हतेच, पण त्यांच्या कविता इतक्या तरुण आहेत की त्यांच्या इतक्यासुद्धा वयाचा कधी अंदाजच आला नाही Sad

कधी कधी इतका जोराचा झटका बसतो, की तोवर आपण गाफील असतो हे लक्षातच येत नाही!

पुर्वी एक विचित्र विचार डोक्यात यायचा...की भोळ खुळं झाड कविता लिहु लागलं तर ती कविता कशी उमटेल...नक्कीच नलेश पाटलांनी लिहलेल्या कवितेसारखीच . कवी नलेश पाटील यांना आदरांजली .

विरमरण आलेल्या २० जवानांना
तसेच नंदू होनप ह्यांना श्रद्धांजली !

Pages