दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मॅक्स वॉकरचे कॅन्सरने ६८ व्या वर्षी निधन!

लिली - थॉमसन - गिल्मोर यांच्याबरोबर १९७५ चा वर्ल्डकप आणि अ‍ॅशेस आणि नंतरची वेस्ट इंडीजबरोबरची सिरीज गाजवली होती त्याने.

संगीत दाते- अरेरे!!! वाईट वाटले बातमी वाचून. ईश्वर मृताच्या आत्म्यास शांती देवो.

ऑस्ट्रेलियाचा 'मिस्ट्री स्पिनर' जॉनी ग्लिसन कालवश!

जॅक आयव्हर्सनप्रमाणेच मधल्या बोटाचा वापर करुन बॉल वळवण्यात उस्ताद असलेल्या ग्लीसनला ग्रॅहॅम पोलॉक पासून ते जेफ बॉयकॉटपर्यत रथी-महारथींना खेळणं जड जात असे.

अरेरे! परमेश्वर गोदरेज यांना मी एकदा फार जवळून पाहिलं होतं, जेव्हा त्या गोदरेज हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाकरिता आल्या होत्या. अंगाने बारीक शिडशिडीत आणि रुबाबदार दिसत होत्या.

अतिशय अविश्वसनीय आहे अश्विनी एकबोटेंची बातमी !!!! काय लिहावे सुचत नाही. कधीही कुणाचे काहीही होऊ शकते.
तडफदार अभिनेत्री...श्रद्धांजली !

अश्विनी एकबोटे यांचं भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरू असताना निधन.
वय वर्षे ४४...कधी इमॅजिनही केले नसते असे वृत्त..
श्रद्धांजली..

अरेरे!! वाईट झाले. ईश्वर अश्विनी एकबोटें यांच्या आत्म्यास शांती देवो.

अन्नपूर्णा' या पाकशास्त्रावरील लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला अच्युत बर्वे (८९) यांचे काल रात्री मुंबईतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

<<अन्नपूर्णा' या पाकशास्त्रावरील लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला अच्युत बर्वे (८९) यांचे काल रात्री मुंबईतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले<<

विनम्र श्रद्धान्जली!

अगदी कालच त्यान्च्या पुस्तकाबद्दल माझी बहिणीशी चर्चा झाली होती.

Pages