दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच वाईट बातमी मिळाली आज ही सकाळीच.. शॉकींग
अच्छे दिन आने वाले है म्हणताना अच्छे लोग जाताना बघणे खरेच दुर्दैवी आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली !

गा.पै. +१ ..
युतिचे शिल्पकार असे जर महाजन असतील तर मग मुंडे हे संकट्मोचन होते .. नेहेमी युतिच्या पड्झडीच्या बातम्यांना पहीला नकार त्यांचाच असायचा.
कितीही खिंडार पाड्ण्याचा प्रयत्न झाला तरी मुंडे कायम युति बाबत ठाम होते.

विद्यमान केंद्रीय मंत्री , एक उत्तम संघटक , झुंजार
व्यक्तीमत्व , महाराष्ट्राचे माजी उप
मुख्यमंत्री ...
कै .श्री. गोपीनाथजी मुंडे
साहेबाना भावपुर्ण श्रद्धांजली ...

कॉन्व्हॉयचे महत्व >> +१ @ साती.

बॅकसीट-सीटबेल्टस + हेड रिस्ट्रेंटचे देखिल.
पाठीमागून धडक आहे. व्हिपलॅश इंज्यूरी असावी.. कारण फक्त नाकावर एक सीएलडब्ल्यू होती म्हणे.

गोपीनाथ मुंडेंना भावपूर्ण श्रद्धांजली!

दिपु. , प्रमोद महाजन यांचे ३ मे २००६ रोजी आणि विलासराव देशमुख यांचे १४ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले ( साभार - वीकीपिडिया )

तळागाळातल्या सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा आणि सर्वमान्य उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल आणि डोळे पाणावले. आता कुठे नवी इनिंग सुरु झाली होती आणि काळाने घात केला.
भावपूर्ण श्रद्धांजली!

खुप वाईट बातमी...गोपीनाथ मुंडेंच निधन खुप दुर्दैवी आहे..राज्याच्,देशाच खुप नुकसान झाल आहे...चांगली काम करणारी, लोकांच्या प्रश्नांची जाण असणारी, लोकहिताशी , जन मानसाशी नाळ जोडलेली ही माणस अशी अकाली का जातात? प्रमोद महाजनांच्या निधना नंतर पण असच हताश वाटत होत!

Sad

गोपीनाथ मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली !!!

हे कुठे लिहावे कळत नाहीये म्हणुन इथे लिहितेय. :

बातम्यांमध्ये दाखवत आहेत कि ते अपघातात गेले. पण त्यांचा सुरक्षारक्षक सांगतो कि ते अपघातानंतर शुद्धित होते. त्यांनी स्वतः पाणी मागितले आणि स्वतःला हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितले. हॉस्पीटल प्रशासन सांगते कि त्यांना आणले तेव्हाच त्यांचे हृदय बंद पडलेले होते. एका न्युज चॅनलवर सांगितले कि उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले. सगळेच धक्कादायक. Sad

राजकारणाचा इतिहास असेल किंवा 'सरकारनामा', 'सरकार' यासारख्या चित्रपटांच्या प्रभावामुळे असेल, पण मला घातपाताचीच शक्यता वाटते कोणी मंत्री वारला कि. अर्थात तो या धाग्याचा विषय नाही पण राहावले नाही. सीबीआय चौकशीची मागणी झाली आहेच. बघुया काय निकाल येतो ते.

पियू, थोडावेळ द्या, आपल्याला जी शंका आली तीच त्यांच्या घरच्यांना पण आली असेल आणि ते योग्य ती कारवाई करतील. पोस्टमार्टेमदेखील होणार आहे. त्यांना ज्या हॉस्पीटलमध्ये नेले तिथे योग्य ते उपचार मिळालेच असतील.

न्युज चॅनलवाले काय बडाबडतात ते त्यांचं त्यांनाच कळत नसतं त्यामुळे त्यांना इग्नोर मारत जा. अपघातानंतर हृदयविकाराचा झटका असे एम्सच्या डॉक्टरांनी जाहीर केलंय तूर्तास तेच प्रमाण मानू या.

कृपया पूर्ण खात्री असल्याखेरीज अशा गोष्टी लिहू नका, ज्यायोगे समाजामधे ताण वाढीला लागतील. आधीच दिवस नाजुक आहेत, अशावेळी आपल्याकडून काही वावगं लिहिलं जात नाही ना ते नक्की पहा. कुठे लिहावं ते कळत नसेल तर लिहू नका. धन्यवाद.

कृपया पूर्ण खात्री असल्याखेरीज अशा गोष्टी लिहू नका, ज्यायोगे समाजामधे ताण वाढीला लागतील. आधीच दिवस नाजुक आहेत, अशावेळी आपल्याकडून काही वावगं लिहिलं जात नाही ना ते नक्की पहा. कुठे लिहावं ते कळत नसेल तर लिहू नका. धन्यवाद.
----- सहमत...

कृपया पूर्ण खात्री असल्याखेरीज अशा गोष्टी लिहू नका, ज्यायोगे समाजामधे ताण वाढीला लागतील. आधीच दिवस नाजुक आहेत, अशावेळी आपल्याकडून काही वावगं लिहिलं जात नाही ना ते नक्की पहा. कुठे लिहावं ते कळत नसेल तर लिहू नका. धन्यवाद.>>> नंदिनी + १००

नंदीनी,

१०००००००००००%

प्रसारमाध्यमांना ताळतंत्र नाही, अनुमोदन

भाजपने सीबीआय चौकशी करण्याची जाहीर मागणी केलेली आहे. त्यामुळे मी काहीही जगावेगळे खळबळजनक विधान केलेले नाही.

"हे कुठे लिहावे कळत नाहीये म्हणुन इथे लिहितेय" याचा एवढाच अर्थ होतो की बाकी कुठे असा बाफ निघालेला नाही म्हणून इथे लिहित आहे.

जाहीर बाफवर काय लिहावे आणि काय लिहू नये हे समजण्याइतपत मलाही जाण आहे, मी माध्यमात काम करत नसले तरी..

बाकी खवचटपणा करत शब्द बोल्ड करणार्‍यांनी लगेच लचके तोडायला, निदान या दु:खद बातमीच्या धाग्यावर तरी धावू नका. धन्यवाद.

आत्ताच आजतक वर दाखवत होते,

ईंडीका वहानाच्या चालकाने लाल सिग्नल तोडला आणि तो येऊन मुंडेजीच्या गाडीला धडकला,
त्यामुळे हा अपघात घडला.

ईंडीका गाडीचा चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.

च्च. च्च..
मुंडेंना श्रद्धांजली.

प्रमोद महाजन्,विलासराव आणि आता गोपिनाथ.. Sad Sad Sad

मुंडेजीना श्रद्धांजली..
It was just his time Sad

साहिरचे शब्द आठवतातः
वक्त के दिन और रात, वक्त के कल और आज
वक्त की हर शह गुलाम, वक्त का हर शह पे राज
आदमी को चाहिए..वक्त से डरकर रहे
कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाझ..

Pages