दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बाप रे! दोन्ही बातम्या भयंकर धक्कादायक आहेत!
मुंडेंचं निधन अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मनःपुर्वक श्रद्धांजली..
आताशी कुठे काम करण्याचे दिवस येऊ घातले होते ख-या अर्थाने, त्यांच्यातल्या गुणांना आणखी वाव मिळण्याची संधी अगदी तळव्यात पडली होती.. तोवरच! वाईट घडलंय. त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याचे देव बळ देवो Sad

राम पटवर्धनांना विनम्र श्रद्धांजली!
पटवर्धनकाका, तुमच्या पाडसाने आम्हा सगळ्यांना अपार आनंद दिलाय, आता आमच्या पाडसांनाही मिळतो आहे, तो कायम मिळतच राहील इतका आनंदाचा ठेवा कायमचा आम्हाला देऊन गेलायत तुम्ही.. त्याबद्दल तुमचे जितके मानू तितके ऋण कमी आहेत.. पडद्यामागे राहून केलेल्या तुमच्या आयुष्यभराच्या निरलस साहित्यसेवेला मनापासून प्रणाम..

अतिशय शॉकिंग बातमी....
रच्याकने, ते कुठे चालले होते, ते काही कळु शकले नाही.

गोपीनाथ मुंडे गेले. फार वाईट बातमी. महाराष्ट्रातला नाव घ्याव असा लोकनेता गेला. अरे आत्ता तर नव्या उभारीने कामं करायचा काळ सुरु झाला अन...

ते कुठे चालले होते, ते काही कळु शकले नाही<<< बीडमध्ये आज त्यांची विजयी सभा होती. त्यासाठी ते एअरपोर्टला निघाले होते.

धोंडूताई कुलकर्णी, राम पटवर्धन, गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली Sad
वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले हे तिघेजण कधीही एकच ओळीत येतील असे वाटले नव्हते.

अत्यंत वाईट बातमी. नेत्यांच्या मृत्यूने खरोखर हळहळ वाटावी असे दिवस आता कुठे येऊ घातले होते. त्याचा प्रत्यय अश्याप्रकारे आणि इतक्या लवकर यावा हे अत्यंत दुर्दैवी!!!
देव मुंडेंच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची ताकद देवो.. माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

शॉकिंग बातमी..

मंत्रीपद मिळालेल्या व्यक्तीच्या गाडीला साइड एअरबॅग्ज असू नये??? Sad

कुणीतरी मिडीयाला सारखं सारखं त्यांच्या कुटूंबीयांना शोक करतानाचा विडियो दाखवताना लावू नका म्हणून सांगा रे.. Sad

माननीय केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातले राजकीय क्षेत्रातले मोठे व्यक्तिमत्व श्री. गोपीनाथजी मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! Sad

माननीय केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातले राजकीय क्षेत्रातले मोठे व्यक्तिमत्व श्री. गोपीनाथजी मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली !

फार वाईट आणि धक्कादायक घटना! Sad
गोपिनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. Sad
निखिल वागळे, मुलाखत घेताना त्यांना म्हणाले होते " तुम्ही मुख्यमंत्री व्हाल आणि मीच तुमची मुलाखत घेईन. " पण दुर्दैव! Sad

वाईट बातमी.:( Sad Sad

महाराष्ट्राच्या राजकारणातील उमदे व्यक्तिमत्व आणि झुंजार नेते माननीय गोपीनाथ मुंडे यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

सक्काळीच वाईट बातमी
Sad Sad Sad
गोपीनाथ मुंडेंना भावपूर्ण श्रद्धांजली

अरेरे! गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली.

बाळासाहेबांची एक आठवण आहे. जेव्हा गोपीनाथ तरुण होते तेव्हाची गोष्ट आहे. मुंडे भाजप सोडून दुसरा घरोबा करायच्या विचारात होते. मातोश्रीवर कसलासा सत्यनारायण होता. तीर्थप्रसादाला गोपीनाथ गेले तेव्हा बाळासाहेबांनी टिळा लावून म्हंटलं की काही झालं तरी भगव्याची संगत सोडायची नाही.

गोपीनाथ यांनी शेवटपर्यंत हा शब्द पाळला. त्यांना परत विनम्र श्रद्धांजली.

-गा.पै.

गोपीनाथ मुंडेचे निधन ??? ::( Sad Sad खरच विश्वासच बसत नाहीये.

भावपूर्ण श्रद्धांजली Sad

कदाचित यामुळे कन्वॉयचे महत्त्व परत अधोरेखित होईल.
पुढे मागे दोन चार गाड्या असल्या तर कुणी ट्रॅफिक सिग्नल तोडून असे घुसणार नाही.
महत्त्वाची माणसे परत परत मिळत नसतात त्यामुळे आहेत त्यांच्या जीवाची शक्यती काळजी घेणे जरूरीचे ठरते.

श्री. गोपीनाथजी मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली !
महजन मुंडे हि महाराष्ट्र भाजप ची मनी आणि मास पॉवर होते .
मनी पॉवर आधिच गेली आणि आता मास पॉवरल मोठाच धक्का बसला.
व्यक्ती आणि राजकारणी म्हणुन आणि लोकमानसाचा नेता अशी प्रतिमा असलेली मुंडे गेले म्हणजे विदर्भ मराठ्वाड्याच मोठं नुकसान हा अनुशेष भरण्यासाठी बराच वेळ लागणार

Pages