तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>chimacha Kadaklakshmee jhaalaa

Proud आय होप चिमांने शर्ट घालून हंटर चालवला असेल. अन्यथा सीन अनबघणेबल असेल. रच्याकने, त्यांच्या घरात हंटर कशासाठी आहे? Uhoh

स्वप्ना, अगं, हंटर का म्हणजे.. मांडलेकर लेखक आणि मांडलेकरच 'हिरो'.. मग शीरियलीत कोणी चूक केली तर अ‍ॅप्रोप्रिएट (साजेशी) शिक्षा नकोका? हंटर जीवनोपयोगी, नित्य वापरातील आवश्यक वगैरे वस्तू आहे मुधोळकरांच्यासाठी.

पण सीरियसली, हंटर मारून घेतला म्हणजे प्रगती म्हणायची, खरंतर मंजिरीला विचारलं असतं काय शिक्षा आहे तुझी, तर तिने कान धरून उठाबशा काढा किंवा हात वर करून खुर्चीवर उभे रहा असं कमी कटकटीचं काहीतरी सांगितलं असतं. Wink

नशीब कधी बायकोला मारताना नाही दाखवले>>>>> खरं आहे, मंजिरीला इतकी भयानक ट्रीटमेन्ट दिली गेली आहे आतापर्यंत की बास !
Sad

chimacha Kadaklakshmee jhaalaa>> असे कसे झाले...हा भाग मिसला वाट्ट माझा.

त्यांच्या घरात हंटर कशासाठी आहे?>> दादाकडून आणला असणार...

नशीब कधी बायकोला हंटरने मारताना नाही दाखवले ... >>>ते तर कितीदा दाखविले आहे...दादा त्याच्या बायकोला मारत असतो..."पनिशमेंट टायम"च्या वेळी.

>>>चिमाभौ हंटरने स्वतःलाच फोडुन काढताना दाखवले आहेत
अरे वा कधी असेल हा कडकलक्ष्मी एपिसोड Wink Proud

फार प्राचीन काळी थोडीफार बघितली होती ही सिरीयल, तीच ही आणि अजूनही चालू आहे! ही सिरीयल एक व्यक्ती असती व मला भेटली असती तर "काही फरक पडला नाही तुमच्यात" असे म्हंटलो असतो तिला. एक रॅण्डम एपिसोड बघितला.

"तू तिथे मी...." असे करूण आवाजात ऐकू आल्यावर बर्‍याच झांजा वाजल्या. चायनीज न्यू इयरच्या लायन डान्स मधे वाजतात तशा.मग एक सून व एक सासू समोरासमोरून जाताना एकमेकींकडे न बघता जाऊ लागल्या व एकदम स्लो मोशन होउन सासूने एक दरडावणीयुक्त हाक मारली. सून तिथल्या तिथे स्तब्ध. मग सुनेच्या पूर्ण नावाने सासू हाक मारते आहे म्हण्जे ड्रॅमॅटिक शॉट असावा (ते जुन्या पिक्चर मधे हिरविण हीरो नवर्‍याला ला "मिस्टर अमुक अमुक" असे रागाने म्हणते तसे). सासूच्या कपड्यांच्या बाह्या अर्ध्या ठेवाव्यात की पूर्ण हे नक्की न ठरवता आल्याने मधल्या कसल्यातरी लांबीच्या ठेवल्या आहेत.
काय तर म्हणे आउटहाउस मधे नोकरांना का राहू दिले. "तुम्ही चेन्नईला होतात म्हणून विचारता आले नाही..."!!! त्या शहराला चेन्नई म्हणू लागले त्याआधीपासून सेल फोन नावाचे गॅजेट भारतात आले आहे याची माहिती इन-हाउस मधे पोहोचलेली दिसत नाही. मग सासूने तो निर्णय फिरवला. आणि तो निर्णय काय फिरवलाय असा कॅमेरा फिरवलाय त्यावर दोघींवरही, जोरदार फ्लॅश मारत.
मग "मला एक प्रश्न विचारायचाय". यावर ते स्लो मोशन मधे पापणी बंद-उघड करतात ती रिएक्शन.

सगळ्यात खतरनाक म्हणजे "तू जे नाव लावतेस त्याला तू लायक नाहीस"! यावर पन्नास एक झूम इन-आउट, डावीकडून-उजवीकडून कॅमेरा हलतो, विविध रंगांचे फ्लॅश. तांडव नृत्याचे बॅकग्राउंड.

मग "मुधोळकर हे नाव लावायचा मान हवा आहे मला". या डॉयलॉगवर मी पाहणे थांबवले.

एकूण ती खानदानी ई. ड्रेसवाली तरूणी जेन्युइन बायको आहे व स्लीवलेस वाली तरूणी अशीच कोणीतरी आहे असे दिसते.

ही मी याच सिरीयल वर लिहीलेली प्राचीन कॉमेण्ट. अजूनही लागू आहे.

परवा तो "तू तिथे मी" (ही सिरीयल ना? चिन्मय मांडलेकर अँग्री यंग मॅन आहे ती?) थोडीशी पाहिली. फायनली त्या दीन पतित अन्यायी हीरॉईनने त्याला बरेच ऐकवले - सिरीयल्समधे इतकी प्रोग्रेस होत आहे हे पाहून बरे वाटले. पण तेवढ्यात भरपूर खड्डे असलेल्या रस्त्यावर चालत्या बस मधे व्हिडीओ शूटिंग केल्यासारखे ती स्क्रीन सारखी थरथरत असलेली दाखवली आहे तिच्या प्रत्येक वादळी वाक्याला. पूर्वी फक्त अडकलेल्या झूम सारखे एकदम क्लोज अप व एकदम लाँग शॉट असायचे. आता हे नवीन दिसते.

ऐकणारे लोक हादरले - लेव्हल १: अनईव्हन झूम शॉट्स
ऐकणारे लोक हादरले - लेव्हल २: वरून, खालून, उजवीकडून, डावीकडून एकाच्याच चेहर्‍यावर कॅमेरा आणणे व बाजूला वादळी पार्श्वसंगीत.
ऐकणारे लोक हादरले - लेव्हल ३: टी-रेक्स येत असल्याप्रमाणे थरथरणारे स्क्रीन.

ही टेक्नॉलॉजी पुढे किती अ‍ॅडव्हान्स होते बघू Happy
--------------------------------------------------

टेक्नॉलॉजी फारशी अ‍ॅडव्हान्स झालेली दिसत नाही. फक्त आता फालतू प्रश्नांवरही लोकांना जोरदार धक्के बसल्याचे दाखवू लागलेत.

फारएण्ड Biggrin
खूप दिवसांनी या धाग्यावर चक्कर मारली. फारएण्ड, तुमच्या कमेंट्समुळे इथे येण्याचे चीज झाले. Happy

मंजिरीच्या सहनशीलतेचा कडेलोट झाल्याने सत्यशीला आजी पण हादरल्या. कालचा भाग धमाल होता. आजच्या भागाची झलकः देखण्या ताई उर्फ डुचकी उर्फ नेत्रा आई बनणार असल्याचे गौरांगला सांगते.

हाले हा सत्याघरी पाळणा.

पुढच्या भागात बहुतेक प्रियाबाई नवर्‍याशी भांडुन हनीमुन्न अर्धवट सोडुन माहेरी येतील, त्यांना तिथे मंजिरी नसल्याचे पाहुन लय म्हंजी लयच आनंद वाटेल, पण सत्याने त्यांना हाणलं बिणलं तर जाम मजा येईल. किमान पुढच्या भागात तरी प्रियाबायने साडीवर ब्लाऊज घालावा अशी माझी रास्त अपेक्षा आहे.:खोखो:

>>>>>>>"अहो पण.." हेहेह्ह्हहहह्हह्ह्ह्ह्ह्हाआअहाआ.... लोळण घालणेचा वाक्यात उपयोग..

रश्मी खास तुमच्या आग्रहावरुन तुतिमीचा कथाविस्तार खालील प्रमाणे. चिमा शिक्षा म्हणुन स्वतःला हंटरने फटके देत आहे.
डायलॉग: मंजिरी: "अहो..... अहो काय करताय? थांबा बघु आधी" तरी पण चिमा थांबणार नाही चिमा: "नाही मंजिरी नाही, आज मला थांबवु नकोस. मला माझ्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे" मग ही जाउन त्याच्या हातातला हंटर घेउन फेकुन देइल. हट्टी चिमा परत हंटर घेउन स्वतःला मारायला सुरुवात करेल तेव्हा मंजिरी: "अहो पण!!!! का शिक्षा देताय अशी स्वतःला? आई तुम्ही तरी सांगा यांना, आजी तुम्ही तरी सांगा ना (इकडे चिमाची फटकेबाजी सुरुच आहे.) अहो! थांबवा आधी ते स्वतःला मारणं" (तरीपण चिमाची फटकेबाजी सुरुच) आणि मंजिरीच निर्वाणीच वाक्य "आधी तुम्ही स्वतःला मारण थांबवा, तुम्हाला आपल्या बाळाची शुभ्राची, आपल्या प्रेमाची शपथ आहे" झाल इथे चिमा थांबेल आणि एपिसोड संपला.
या सगळ्या प्रकारात घरातील झाडुन सगळी माणस तिथे हजर असतील, पण कोणीही मध्ये पडणार नाही. चिमाच्या प्रत्येक फटक्याला उपस्थित सगळ्यांचे चेहरे झिप झॅप झुम करुन दाखवले जातील.....

आई तुम्ही तरी सांगा यांना>>>>>>हे खास आहे..शेवटी तामडे बाबा तुम्ही तरी सांगा ना यांना.. मी रोज दूधाचा ग्लास वाढवेन..

झिप झॅप झूम ....आईगं....मुग्धा...हहपुवा...

Pages