निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झुरिक मधून नमस्कार.. आज आर गॉर्ज बघायला जातोय.. Aar Gorge या नावाने सर्च करुन बघा .
फुले तर ठेचेठेचेला फुलली आहेत Happy

Aar Gorge या नावाने सर्च करुन बघा .
फुले तर ठेचेठेचेला फुलली आहेत >> भारी दिसतय, दा हा सांदण दरी सारखा प्रकार आहे का ?

दिनेशदा,
Aar Gorge या नावाने सर्च करुन बघा .
बघाव ते नवलच ..खास आहे!
आता त्या दरीतले, कठड्यावरच्या-गैलरीतले फोटो येऊ देत..

Aar Gorge या नावाने सर्च करुन बघा .>>>>>>>>>>बघीतल.फारच सुंदर आहे ते. दिनेशदा मजा करा आणि आम्हाला फोटो दाखवा. (वर्णनासहित) Happy

नमस्कार निगकर Happy हे झाड कुठले आहे ते सांगू शकाल का ? आमच्या सोसायटीत छान झाडे आहेत आणि त्यातली बरीचशी मला ओळखता येत नाहीत :शरमलेली बाहुली: एकेक करुन इथे फोटो टाकेन. मुलाला ओळख करुन देता आली पाहिजे सगळ्या झाडांची.
हे फूल आहे की फळ तेही लांबून नीट कळत नव्हते. खाली पडलेले एक उचलून पाहिले तर झेंडू टाईप फूल आहे ते.

Tree.jpg

अरे वा, धन्यवाद ईनमीन तीन, जिप्सी आणि अवनी Happy

कदंब-तरूला बांधुन दोला उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले
गेले, ते दिन गेले ! >>> ह्या ओळी खर्‍या अर्थाने डोळ्यांसमोर आल्या आज.

मायबोलीवरच हा अजून एक लेख मिळाला कदंबावरचा.

>>>>वर्षातुन एकदाच हा वृक्ष फुलतो. ही फुले तीन दिवस दिसतात. २०-३० फुट उंचीच्या संपुर्ण झाडावर एकावेळी साधारण एक दोन हजार फुले एका वेळी फुलतात.<<< हे वाचून ही फुलं बघता आली ह्याबद्दल खूप मस्त वाटतेय.

झाड ओळखता न आलेल्या माझ्या नॉन-मराठी मैत्रिणींपर्यंत सगळी माहिती पोचवते उद्या. मायबोलीच्या नावाने कॉलर ताठही करुन घेते. Happy

अगो,
छान फोटो !

अगो, कदंबाचेच झाड आहे हे.
हे कदंबाचे झाड आहे तर मी पाहिलेले पुण्यातल्या बागुल उद्यानात फुललेल ते झाड कशाच? हिरवी गोल झाकुन उघडलेली आत पांढर नक्षीकाम असलेली ती फुले कशाची ? करमाळा अस काही झाडाच नाव आहे का ?
जाणकार नक्कीच सांगतील ...!

माझ्या घरामागे टिकल्स ब्लू फ्लायकॅचर ने घरटं बांधलंय.. आज त्यात ४ पिल्लंपण दिसली.. पिल्लांच्या चिमुकल्या आई-बाबांची जोरदार लगबग सुरु आहे.. Lol

जागू, मस्त आहे हा गुलाब.( तुझ्याकडची सगळीच फुले छान असतात. :फिदी:)
माझ्या घरामागे टिकल्स ब्लू फ्लायकॅचर ने घरटं बांधलंय.. आज त्यात ४ पिल्लंपण दिसली.. पिल्लांच्या चिमुकल्या आई-बाबांची जोरदार लगबग सुरु आहे.. >>>>>>>>>>.फोटो?????????????????????? Happy

जागु,,, मस्तच फुल आहे..... छान...

खारुताई पण गोड गोड आहे..... >>>> +१०० ...

आणि हा तो टिकल्स ब्ल्यू फ्लायकॅचर - (आंतरजालावरुन साभार ...)

220px-Cyornis_tickelliae_male_1_-_Kaeng_Krachan.jpgimages_1.jpg

पुढच घरी आल्यावर सांगेन म्हणाली. :स्मि:

मागे मेथी लावलेली ती काढून झाल्यावर आता लसुण लावला आहे. छान पात्या आल्या आहेत वर लसूणच्या.

व्वा व्वा! अगदी आईच्या वळणावर गेलीये राधा. Happy
रच्याकने, फोटोत मागे बाटली कशावर उपडी टाकलीये?

आणि हे काय जागु...तुझाकडे चक्क ऊन पडलय? Uhoh

३-४ दिवसांपूर्वी होत ना उन तेव्हाचा आहे फोटो आर्या.

ती बाटली आमच्या गड्याने अशीच टांगली आहे. पण ती आरा आल्यावर फिरते आणि आम्ही राधाला ती बाटली फिरवून दाखवली की ती खुष होते. Happy

Pages