निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन चमचे तेल पिते.
माझ्या २३व्या वर्षी गुढघ्यातून करकर आवाज जोरात येऊन गुढघा खूप दुखायचा.तेव्हा डॉ.धुरंधर यांनी
मला २ चमचे खोबरेल तेल पिण्याचा सल्ला दिला होता.त्यामुळे गुढघा दुखायचा थांबला होता.

नारळ उतरवायला आमच्या येथील एकमेव पाडेल्याला दादा-पुता करावे लागते, त्याची वाट बघावी लागते..मोठी बागायत असणार्‍याला मशिन आणणे शक्य आहे. पण आपल्यापुरती २-३ झाडं असणार्‍यांचे हालच.. Sad

खोबरेल माझ्यासाठी तारणहार आहे. माझी त्वचा पुण्याच्या कोरड्या हवेत कोरडी होऊन तिला भेगा पडल्या होत्या. घरुन खोबरेल घेऊन गेले. आठवडाभरात पूर्ववत... Happy

नारळ उतरवायला आमच्या येथील एकमेव पाडेल्याला दादा-पुता करावे लागते, त्याची वाट बघावी लागते..मोठी बागायत असणार्‍याला मशिन आणणे शक्य आहे. पण आपल्यापुरती २-३ झाडं असणार्‍यांचे हालच.. >>>>>>
आणि हे लोक प्रत्येक नारळामागे पैसे आकारत असल्याने थोडे कोवळे नारळ पण काढून टाकतात.त्या नारळाना
बुरशी येते.त्यामुळे आता झाडावरून नारळ खाली पडला की गोळा करायचा असे ठरवल्याने आता नारळ पाडेल्याच्या कटकटीतून सुटका!

या डॉ मीना नेरुरकर म्हणजे " सुंदरा मनामधि भरली " या नाटकातल्या का ? त्यांचे धन्य ते गायनिक कळा, असे पुस्तक पण आहे. >>>> हो हो, त्याच त्या डॉ नेरुरकर
www.meenanerurkar.com या साईटवर त्यांची संपूर्ण माहिती आहे - खूपच बहुआयामी व्यक्तिमत्व दिसते आहे .....

शशांकजी,
धन्यवाद !
खोबरेल तेलाबद्दल माहिती खुप सगळ्यांना उपयुक्त आहे, माझे तर डोळे उघडणारीच आहे.आता दरवर्षी गावी गेलो कि नारळाच तेल स्वःत काढुन आणायच, इतरांना पटवुन द्यायच हे ठरवुन टाकलंय.
गावाकडे शेतात निघालेल्या नारळापासुन घाण्यातुन तेल (दसरा,दिवाळीच्या वेळी) काढत होते आणि त्यातुन जनावरांना पेंडही छान मिळायचे,हे मऊ,गरमागरम, सुगंध असलेले पेंड मी २-३ वेळा खाऊन पाहिले तर छान लागते, गेल्या ८-१० वर्षात मात्र नविन (सुनांची) शिकलेली पिढी आली आणि दुकानांतुन पैरैशुटची बाटली आणु लागली. तेल काढणारे घाणे हळुहळु बंद पडले.मात्र अजुनही जुने लोक शेजारच्या गावातुन का होईना पण तेल काढुन आणताना दिसतात.

गावाकडे शेतात निघालेल्या नारळापासुन घाण्यातुन तेल (दसरा,दिवाळीच्या वेळी) काढत होते>>>>>>>.आमची काकू काढायची आणि आम्ही कोणी तिकडे गेलो कि, वडीलांसाठी एक बाटली भरून हमखास पाठवायची. आता तिला जमणार नाही. बाकी काय होणार देव जाणे. Uhoh

मागे कुणीतरी शतावरीबद्दल विचारलं होतं.. ही बघा फोफावली आता..फोटो काही चांगला नाहीये, शोधून घ्या.. Happy

Rut5646.jpg

हीची पानं सितेच्या केसांसाराखी (कोकणात अशी वनस्पती पाहिलेय.आत्ता आठवली. )असतात का? Happy

ही शतावरी आहे का? माझ्याकडे एक असाच वेल दर पावसाळ्यात येतो आणि नंतर नाहीसा होतो. पानं अगदी अशीच आहेत. त्यांच्या शिरा देठापासून निघतात. मी विचारणारच होतो कसला वेल आहे म्हणून. काही पानं सुरवंटांनी खाल्लीसुध्दा.
शतावरीच्या वेलाचा कोणता भाग वापरतात?

हो या त्याच डॉ. मीना. मला वाटतं आताशा प्रॅक्टीस बंद केलीञ आणि कलेला महत्व देताहेत. सामनाच्या रविवार पुरवणीत लेख येतात त्यांचे.
खोबरेल तेलाच्या लेखाबद्दल आभार्स Happy

अखेर मिरचीच्या झाडाला २ वर्षांनी का होईना पण बाळमिरची लागली! ३-४ महिन्यांपूर्वी लावलेल्या दुसर्‍या
मिरचीच्या झाडाला मिरच्या लागल्यावर मनात आशा होती की आता जुन्या झाडाला मिरच्या लागतील.
ते झाड लेकुरवाळे झाल्यावर खूपच मस्त वाटले.

जो_एस,

शतावरीच्या पानांची भाजी करतात पण औषधासाठी मूळे वापरतात. ही मूळे जाडसर पांढरी असतात. मधे एक चिवट तंतू असतो.

मी गेल्या २ दिवसात कसला भन्नाट प्रवास केला म्हणून सांगू !

शुक्रवारी दुपारी शिवनेरीने पुण्याला गेलो. शांकलीच्या बागेच्या सोबतीने चहा झाला. मग संध्याकाळी पुण्यातल्या मित्रमंडळींसोबत गप्पा, रात्रीचे मसाला दूध गिरीराजच्या घरी, मग रात्री निघून पहाटे कोल्हापूरला. तिथे मायबोलीकर कुलु च्या घरी ( मोरांच्या केका ऐकत ) चहा. मग फोंडा घाट आणि दाजीपूर अभयारण्यातला थरार अनुभवत मालवणला आत्याच्या घरी.. तिच्या मोठ्या बागेत फेरफटका मारत जेवण, पहाटे उठून रिक्षाने भर पावसात कुडाळला, तिथून नेत्रावतीच्या दारात, पावसाचा मारा झेलत रत्नागिरीला मावशीकडे, तिच्या हातचे सुग्रास जेवण जेवून, संध्याकाळी बावनदी, निवळीचा धबधबा, आंबव असे करत देवरुखला, दुसर्‍या मावशीच्या हातची भाकरी भरीत, मलकापूरहून खास मामीने आणलेल्या सांज्याच्या पोळ्या, यावर ताव मारून रात्री संगमेश्वर रेल्वे स्टेशनला.. तिथून कोकणकन्यामधून दादरला..... आणि आता चाललोय झुरीक ला !

खोबरेल तेलाच्या लेखाबद्दल आभार....खूप जणांबरोबर शेअर करावा लागणार आहे.

दिनेशदा, परत गेलात की काय ? त्यांना भेटणे कधीच होत नाही Sad

दिनेशदा तुमचा हा प्रवास वाचून आता काही वाटत नाही. तुम्हाला जितका तो भारतात आल्यावर नित्याचा झालाय तितकाच आम्हाला तो वाचण्याचा Happy ग्रेट.

http://marathivishwakosh.in/khandas/khand17/index.php?option=com_content... >>>> येथून साभार..

शतावरी : [ हि. सतावर, सतावरी, सतमुली, सरनोई; गु. शतावरी; क. सतावरी, सिप्रिमुली; सं. शतावरी, नारायणी, अतिरसा, वरी, श्वेतमुळी, स्वादुरस; इं. वाइल्ड अँस्परॅगस; लॅ. अँस्परॅगस रॅसिमोसस, प्रकार जॅवॅनिका; कुल-लिलिएसी]. फुलझाडांपैकी काटेरी, बहुवर्षायू झाळकट वेल. आशियातील व आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, जावा, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका येथे व भारतात हिमालयात १,२०० मी. उंचीपर्यंत, काश्मीरपासून पूर्वेकडे तसेच सह्याद्री, सातपुडा पर्वतरांगांत, कोकणात खडकाळ जमिनीवर, डोंगर उतारावर व जंगलात शतावरी आढळते. जमिनीवरील खोडावर हिला अनेक कोनयुक्त फांद्या असतात. या फांद्यांना पर्णकांडे म्हणतात. शिवाय जाडजूड मूलक्षोड (जमिनीत वाढणारे खोड) असते. त्यावर काही मांसल मुळे असतात. पाने लहान, रेषाकृती किंवा खवल्यावरती व त्यांच्या तळाशी सरळ किंवा वाकडे लहान काटे असतात आणि बगलेत काटेरी टोकाच्या पानासारख्या खोडांचे त्रिकोनी हिरवी बारीक झुबके येतात. फुले पांढरी, लहान, सुवासिक १-२ मंजिऱ्यावर नोव्हेंबर ते जानेवारीत येतात. संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨लिलिएसी कुलात (किंवा पलांडू कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ मृदू, गोलसर, लहान, रसाळ व लाल तांबडे असते. बिया लहान, बुळबुळीत व काळ्या असतात. जून ते ऑगस्ट महिन्यात फुले, फळे येतात.

ही वनस्पती लागवडीसाठी सोपी आहे. हिची लागवड बियांपासून व जमिनीतील खोडाच्या फुटव्यापासून करता येते. लागवड खर्च तसा कमी आहे. रोग व किडी यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. कमी पाण्यात ती येऊ शकते. लागवड पावसाळ्यात किंवा पाणी उपलब्ध असल्यास केव्हाही करतात. मध्यम ते हलकी, रेताड, गाळाची, उताराची, चांगल्या निचऱ्याची जमीन चालते. नवीन बियांची उगवणक्षमता चांगली असते. हिची लागवड फायदेशीर असून व्यापारी तत्त्वावर ती अनेक ठिकाणी केली जात आहे.

साधारणत: सव्वा वर्षानंतर शतावरीच्या मुळ्यांची पूर्ण वाढ झालेली दिसते. शतावरीची मांसल मुळे गोड, शामक, प्रशीतकर (थंडावा देणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी), वाजीकर (कामोत्तेजक), डोळ्यांना हितकारक, आकडी बंद करणारी, दुग्धवर्धक, अतिसार व आमांशावर गुणकारी असतात. सौंदर्यप्रसाधनातही त्यांचा वापर करतात. शतावरीच्या तेलास नारायण तेल म्हणतात. हे तेल सर्व प्रकारच्या वातांवर गुणकारी आहे.
शतावरीच्या सु. २० जाती भारतात आढळतात. त्यांपैकी अँ. गोनोक्लॅडस ही जाती कोकण, उ. कारवार, सह्याद्री, तमिळनाडू, श्रीलंका इ. ठिकाणी सापडते.

सफेद मुसळी : (गु. धोळी-उजली-मुसली, अँ. अँडसेन्डेन्स). ही शतावरीच्या प्रजातीतील जाती असून मूलत: ही द. युरोपातील आहे. भारतात ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब व हिमालयात (१,६४२ मी. उंचीपर्यंत) आढळते. श्रीलंकेत व अफगाणिस्तानातही ती सापडते. पावसाळ्यात रानावनात किंवा खाऱ्या दलदलीत ही उगवते. शतावरीच्या इतर जातींप्रमाणे हिचे मूलक्षोड असते. जमिनीवरचे खोड आरोही व अनेक फांद्यांचे असते. पर्णक्षोडे गोल, पांढरट व बारीक असतात.

अँ. ऑफिसिनॅलिस ही शतावरीची एक खाद्य जाती बहुवर्षायू ओषधी आहे. ही मूळची युरोपीय व प. आशियायी असून सु. २,००० वर्षे विशेषत: भाजीसाठी लागवडीत आहे. मुळे व बियांपासून तिची नवीन लागवड करतात; त्यामुळे वारंवार लागवड करावी लागत नाही.

अँ. प्लूमोसस ही दक्षिण आफ्रिकेत आढळणारी जाती फक्त शोभेकरिताच लावतात. हिला अँस्परॅगस फन असेही म्हणतात.

पुण्यामधील आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी) येथे शतावरीवर संशोधन चालू असून, राज्यातील शतावरीच्या रानटी, लागवडीतील, तसेच शोभेच्या जातींचे संकलन व अभ्यास करून त्यांतून सुधारित वाण विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संकलक - परांडेकर, शं. आ.; कुलकर्णी, सतिश वि.

शशांक,
अस्पॅरॅगसची एक पांढरी जातही असते. ती अंधारात वाढवतात ( म्हणून पांढरी असते. ) आपल्याकडे औषधासाठी
मूळेच वापरतात. आयुर्वेदात या ( किंवा कुठल्याच ) पालेभाजीची भलावण केलेली नाही असे वाचले. पण या पानांची ( किंवा पानासारखे जे असते ते ) तूपावर परतून भाजी करतात. मसाले वगैरे घालायचे नाहीत फक्त मीठ आणि हवी तर थोडी मिरपूड घालायची. ( जागू वाचतेस ना ? आता भाजी करुन पोस्ट करायची जबाबदारी तुझी. )

आता मी बॅग भरुन तयार आहे. संध्याकाळी भाचेसुनबाईंनी जेवायला बोलावले आहे, ( सी.एस. + भरतनाट्यम नर्तिका + रांगोळी कलाकार असलं भन्नाट रसायन आहे ते. ) मग थेट विमानतळावर.

अंबोली आणि मिरजही राहिले. संपूर्ण प्रवासात पावसाची अखंड साथ होती. पावसाळ्यात कोकण रेल्वेच्या दारात ऊभे राहून प्रवास करण्यासारखे सुख नाही.

जागू,
तूझ्या ओळखीच्या जंगलात नक्कीच असणार ती. मी घाटात खुप बघितली.
बाजारात मिळणार नाही. पण ओळखायला जाणकार माणूस हवा. नर्सरीतही मिळेल.

Pages