निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
सुप्रभात. अनिल टाकळ्याच्या
सुप्रभात.
अनिल टाकळ्याच्या भाजीला फुले येण्याआधीच भाजी करायची. फुले आली म्हणजे पाने जून झाली. उगवल्यावर काही दिवसांतच ह्याची भाजी केली तर कोवळी छान लागते. माझ्या लेखनात रानभाज्यांमध्ये टाकळ्याची भाजी सापडेल.
अनिल, ही भाजी विषारी नसते.
अनिल, ही भाजी विषारी नसते. आम्ही (मी व शोभा) लहानपणी ही भाजी खालेली आठवतेय. आम्ही अगदि ठणठणीत आहोत.
शांकली, 'विंचवी' बद्दल छान
शांकली,
'विंचवी' बद्दल छान महिती मिळाली.आघाड्याबद्दल मला खुप उशीरा समजलं, जे जुने लोक असले ऑषध पुर्वी द्यायचे ते ज्ञान नंतर इतरांना खुप कमी मिळालं.
जागु,
तुमचा लेख पाहिला, आता भाजी खाण्याच ठरवलं आहे.
प्रज्ञा,
ग्रामीण भागात असे गैरसमज खुप, कुणाला एखाद्याला एखादी भाजी चुकिच्या पध्दतीने खाल्याने बाधली तर तो गैरसमज होऊन जातो.
अगदी कहर म्हण्जे मला काहींनी पपई (जास्त) खाल्ली तर वात वाढते म्ह्णुन न खाणारेही, दुसर्यांना न खाण्याचा सल्ला देणारेही भेटले. पानमळ्यात ५० एक झाडे असायचेच, अगदी झाडावर पिकुन खराब व्हायचे पण तस ठरवुन खाणं कमीच, इकडे शहरात आल्यावर पपईची, इतर अशा अनेक भाज्यांची खरी किमत कळाली.
सुप्रभात!! काल रात्री पासून
सुप्रभात!!
काल रात्री पासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. छान गारठा आला आहे.
लोकसत्ता आणि मुंबई विद्यापीठाच्या रानवाटा सुरु झाल्या आहेत.... मुंबई नॅशनल पार्क परिसरात.... बघा जमले तर!
हाय निगकर्स.......... एक छान
हाय निगकर्स.......... एक छान माहिती वाचनात आली, ती इथे शेअर करतिये...
'वनस्पतींना भावना असतात, गंधाचे ज्ञान असते आणि हो, त्यांना चवही कळते. ही काही कोणा कवीने केलेली कल्पना नाही. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यासानंतर काढलेले रोमांचक निष्कर्ष आहेत. मानवाप्रमाणेच वनस्पतींना इंद्रीय ज्ञान असते, असा दावा डॉ. मोनिका गॅग्लियानो यांच्या टीमने केला आहे. वनस्पतींना ऐकू येते असे डॉ. मोनिका यांचे म्हणणे आहे. वनस्पती ऐकू शकतात, असा दावा संशोधकांमधे दोन शतके वादाचा मुद्दा ठरतोय. या वादाला डॉ. मोनिका यांच्या संशोधनाने नवे परिमाण दिले. न्यू सायंटिस्ट मधे त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले. ते पुढील प्रमाणे.....'
त्यांच्या टीमने मिरचीच्या बियांण्यांवर प्रयोग केले. त्यासाठी बडीशेपेच्या रोपाचा वापर केला. कारण, बडीशेप वनस्पती हवेत आणि जमिनीत रसायन सोडते. परिणामी इतर वनस्पतींच्या वाढीचा वेग मंदावतो.
पहिल्या प्रयोगात बडिशेपेच्या झुडुपाभोवती वर्तुळाकारात आठ डिशमधे मिरचीच्या बिया ठेवल्या.
ज्या प्रयोगात बडिशेपेचे रोप शेजारीच होते, तेथील मिरचीच्या रोपांची वाढ अपेक्षेप्रमाणे अगदी सावकाश झाली; तर जिथे बडिशेप नव्हती, तिथे वाढ झपाट्याने झाली.
ज्या प्रयोगात बडिशेपेचे बियाणे बंदिस्त बॉक्समधे होते त्या ठिकाणच्या मिरच्यांची वाढ सर्वाधिक वेगाने झाली.
मिरचीच्या २४०० बियांवर सातत्याने केलेल्या प्रयोगातून निघालेले निष्कर्ष अगदी सारखेच होते.
दुसर्या प्रयोगात बडीशेपेची रोपं बॉक्समधे बंद केली आणि त्याभोवती मिरचीच्या बियांच्या डिश ठेवल्या त्यामुळे त्यांच्यातून बाहेर पडणारी रसायने मिरचीच्या बियांपर्यंत पोचू शकत नव्हती.
तिसर्या प्रयोगात रिकाम्या बॉक्सभोवती मिरचीच्या बियांच्या डिश ठेवल्या.
हे सर्व प्रयोग आवाजविरहीत खोलीत झाले.
सुप्रभात. शांकली असाही
सुप्रभात.

शांकली असाही प्रयोग माझ्या वाचनात आहे की झाडांना संगितही ऐकू येत आणि ते आवडत. जी झाडे संगिताचा आस्वाद घेतात ती जोमाने वाढतात.
अनिल आमच्याइथे पपई म्हणजे एकदम फेव्हरेट. माझ्या दोन्ही मुलींना पण खुप आवडतो.
आमच्याइथेही खुप पाउस आहे आज.
सुगंधी शुभ्रता - http://www.maayboli.com/node/44250
शांकली, छान माहिती. माझ्याकडे
शांकली, छान माहिती. माझ्याकडे मधूमालती इतर झाडांपसून थोडी दूर, वेगळी ठेवलीय, झोपाळ्याजवळ. तर ती एकटी झाल्यापासून फुलत नाहीये, असेच काही कारण असावे का? कुंद, सोनटक्का, सदाफुली, सगळ्या अगदी चाफाही फुलतोय पण मधुमालती गप्पय, का बरे ?
aaj pahaaTech parat aalo.
aaj pahaaTech parat aalo. aalyaapaasson paavasaachaa jor aahe.
vinchavee baddal aajeedekheel saangat ase. tithe tee jhaaDe khup aahet.
पपईबद्दल भरपुर गैरसमज आहेत...
पपईबद्दल भरपुर गैरसमज आहेत...
अवल, मधुमालतीला एकटी
अवल, मधुमालतीला एकटी ठेवल्यामुळे ती फुलत नसण्याची शक्यता आहे हं. माझ्याकडे बहाव्याची ६ रोपं आली आहेत. ती कुंडी जोपर्यंत नागचाफ्याच्या कुंडीजवळ होती तोपर्यंत नागचाफ्याला नविन कोवळी पालवी येत होती. पण आता ते ६ बहावे वेगळ्या कुंड्यांमधून लावलेत आणि त्यांची जागा बदलली आहे तर नागचाफ्याला कोवळी पालवी फुटलेली नाही
त्यांच्यामधे ग्रूप सोल असतो आणि सर्व रोपं, वेली, वृक्ष एकमेकांचे भाऊबंद (सहोदर म्हणायला हरकत नाही कारण पृथ्वीच त्यांची आई असल्याने) असतात.
avatar chitrapaTaat paN asaa
avatar chitrapaTaat paN asaa kathaabhaag hotaa.
ईथे वाचून १५ दिवसांपूर्वी मी
ईथे वाचून १५ दिवसांपूर्वी मी मिरची, टोमॅटो, भेंडी, आणि लसुण लावला होता.

मिरचीचे रोप २-३ दिवसातच आले आणि आज सकाळी लसणाला पण पात आली आहे. त्यामुळे आज एकदम आनंदी !!!!!
पण टोमॅटो आणि भेंडी आले नाहीत..
आता ते ६ बहावे वेगळ्या
आता ते ६ बहावे वेगळ्या कुंड्यांमधून लावलेत आणि त्यांची जागा बदलली आहे तर नागचाफ्याला कोवळी पालवी फुटलेली नाही ......माझ्याकडची चमेलीच्या कुंडीची जागा बदलल्यावर ती वेल कोळपून गेली होती.
या मुनियाची जोडी मंगळवारी
या मुनियाची जोडी मंगळवारी सकाळीच घरी गॅलरीच्या ग्रीलवर येऊन बसली होती. त्यामुळे अगदी जवळून पाहाता आली. फोटो मात्र गुगलवरुन
'वविला नाव?'
'वविला नाव?' -नोंदवले.
'टीशर्ट नि बॅग?' - घेतले.
'वविचा बसमार्ग?' - लग्गेच पाहिलादेखील.
'गप्पांच्या पानांवर गप्पा?' - त्या तर नेहमीच्याच.
'निबंधस्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवली की नाही?' - ...
विसरलात की काय? निबंधस्पर्धा २०१३साठी तुमच्या प्रवेशिकांची आम्ही वाट पाहत आहोत.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख आहे १५ ऑगस्ट २०१३.
मग लिहिताय ना?
काही वर्षांपूर्वी माझ्या
काही वर्षांपूर्वी माझ्या ऑफिसमधे मला या स्पॉटेड मुनियाचे फोटो टिपता आले होते - फारच देखणा असतो हा पक्षी व गवताची लांब लांब पाती घेऊन अतिशय सुबक गोलाकार घरटे तयार करतो हा -
http://www.maayboli.com/node/23490
लकी शशांक मला फोटो काढायची
लकी शशांक
मला फोटो काढायची इच्छा असुनही ते शक्य नव्हतं कारण सकाळची घाईची वेळ होती. बघु पुन्हा कधीतरी.
सुप्रभात. परवा आमच्या
सुप्रभात.

परवा आमच्या नारळाच्या झाडाखाली एक कुत्रा खारीला मारत होता. माझ्या पुतण्याने ते पाहील आणि धावत गेला. त्या कुत्र्याला हकलवले. त्या खारूताईला घरात आणले. तिला धुवून, पुसुन काढली. त्याच्या रुम मध्ये नेऊन त्याने तिला ब्लँकेटवर ठेवले. मग बदाम, पेर असा खाऊ तिला दिला. सुरुवातीला खुप घाबरली होती ती. तिला त्याने एका मोठ्या बॉक्समध्ये गुंडाळून उब लागण्यासाठी ठेवली. पण तिच्या पायाला दुखापत झाली होती. आम्ही डॉक्टरांनाही फोन केला होता. दुसर्यादिवशी डॉ. येणार होते कारण त्या दिवशी ते गेले होते. दुसर्यादिवशी सकाळी खारू ताई अगदी तरतरीत झाली. पण संध्याकाळी ती गेलेली दिसली. सगळे हळहळले.
सगळे हळहळले नुसते हळहळले??
सगळे हळहळले
नुसते हळहळले?? आमच्या घरात तर रडारड झाली असती...
पण कितीही रडारड झाली असती तरी मी मात्र खारुला घरात ठेवले नसतेच. आमच्या घरात नेहमी 'पोपट आणुया, वाघ आणुया, सिंह पाळुया' अशी स्वप्ने पाहिली जातात. मी यावर नेहमी एकच प्रश्न विचारते. कोणीतरी तुम्हाला तुमच्या नेहमीच्या वातावरणातुन उचलुन कुठेतरी दुर नेऊन असे पाळले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल?
संध्याकाळी ती गेलेली
संध्याकाळी ती गेलेली दिसली
>>
गेलेली म्हणजे मृत की घरातून गेलेली ?
चला, आज रात्री निघतोय मी.
चला, आज रात्री निघतोय मी. यावेळेस अनेकजणांची भेट होता होता राहिली पण जिवलग सखा पाऊस मात्र मनसोक्त भेटला.
काल वर्षूचा आणि आज उजूचा वाढदिवस होता. ( मी शुभेच्छा दिल्याच आहेत, तुम्ही पण द्या )
अंगोलाला गेल्यावर सोमवार पासून येतो इथे. विचारपूशींना पण उत्तरे द्यायची राहिलीत.
मंगळवारी दिनेशदांना मुंबईत
मंगळवारी दिनेशदांना मुंबईत भेटलो, switzerland भेटीचे फोटो पाहिले,सगळे फोटो सुंदर आणि अप्रतिम ! तिथला तो निसर्ग,नद्या ,शेती पाहुन छान वाटलं (हेवा देखील वाटला), त्यामुळं मुंबईला जाऊन switzerland ची वारी केल्याचा आनंद मिळाला.
भर पावसात भटकंती देखील. निवांत गप्पा झाल्या.
'वनस्पतींना भावना असतात,
'वनस्पतींना भावना असतात, गंधाचे ज्ञान असते आणि हो, त्यांना चवही कळते >> हे नक्कीच खरे असणार.ह्या बरोबरच वनस्पती आपल्याशी बोलत असतात, त्यांच्या कृतीतून काही सांगत असतात असंही वाटतं. फक्त त्यांची सांगण्याची पद्धत आपल्याला समजून घेता आली पाहिजे. नुकताच मला याचा अनुभव आला. झालं असं-- सुमारे ४ वर्षांपूर्वी मी अंजीराचं झाड लावलं. झाड लागलं. सुरवातीला असलेली पानं योग्य वेळी गळून गेली. नंतर चार नवी पाने आली. फक्त चारच, पाचवं देखील नाही. पुढच्या सीझनला पुन्हा तीच कथा. दोन वर्ष झाड उभे, जिवंत, पण पाने फक्त चारच. झाड मरतही नाहीये आणि पानं / फळंही देत नाहीये हे पाहून मलाच अशी शंका आली की हे मला काही तरी सांगायचा प्रयत्न तर करत नाहीये? मग मी माझ्या दोन मैत्रिणींकडे जाऊन त्यांच्या झाडांची लोकेशन( सावली किती वगैरे) बघून आले. आणि लक्षात आलं की माझ्या झाडाला सावलीच मिळत नव्हती. मग मी ते तिथून काढून पार्शल शेड मिळेल अशा जागी लावले आणि अहो आश्चर्यम्! मागच्या वर्षी ते सरासर वाढले आणि आत्ता त्याला अंजीरं पण लागली आहेत.
मंगळवारी दिनेशदांना मुंबईत
मंगळवारी दिनेशदांना मुंबईत भेटलो, > दिनेश्दा तुम्ही गेलेलात ना परत अंगोलाला की मुंबईतच होतात ??? काय हे .... अनिल तुम्हाला कुठे भेटले दिनेशदा?
जागू, गुलाब छानच. मागच्या
जागू, गुलाब छानच.

मागच्या वर्षी ते सरासर वाढले आणि आत्ता त्याला अंजीरं पण लागली आहेत.>>>>>>>>>>.अभिनंदन!
दिनेश्दा तुम्ही गेलेलात ना परत अंगोलाला की मुंबईतच होतात ??? >>>>>>>>>>>>>>+१ . मला पण वाटल हे परत गेले. पण आता वाटतय, हे भटकंती करायला गेले होते. मुंबईत येऊन आता परत सासरी चाललेत. बरोबर ना दिनेशदा?
आज एक नवीन माहिती वाचली.
आज एक नवीन माहिती वाचली. चिमेरा/किमेरा (chimera) ह्या दुर्लभ लक्षणाविषयी. हे म्हणजे एखाद्या व्यक्ती/प्राण्या/पक्ष्या मधे २ प्रजातींचे गूणधर्म (DNA) असणे. म्हणजे कुत्रा आणि मांजर ह्यांचा संयोग होणे असं नाही. २ वेगळ्या जातीच्या कुत्र्यांच्या संकरातून जन्माला आलेल्या पिल्लामधे त्या दोघांचे DNA असणे. ह्यामुळे ते पिल्लू सर्वसाधारण पिल्लापेक्षा वेगळं दिसतं. खाली वीनस नावच्या मांजराचा फोटो आहे त्यावरून कळेल काय म्हणायचय मला ते
इतकं सोप्पं नाहिये खरं तर हे प्रकरण. chimera चं आणिक एक उदाहरण म्हणजे अशा काही व्यक्ती आहेत जगात ज्यांच्या शरीरात २ ब्लड ग्रूप्स चं रक्त आढळून येतं :). असे चित्र विचित्र प्रकार आहेत ह्यात. विकि वर च वाचा प्लीज
https://en.wikipedia.org/wiki/Chimera_(genetics)
ह्या विकि लिंक वर असलेली
ह्या विकि लिंक वर असलेली 'reproduction in anglerfish' बद्दल ची माहिती पण फार भारी आहे. वाचाच.
सॉरी हापिसात जाम काम आहे
सॉरी हापिसात जाम काम आहे त्यामुळे इथले फोटो अन् माहिती वाचले नाहिये अजून. त्यामुळे तुम्हाला 'वा वा' म्हणत नाहिये. वाचीन सावकाश.
बाप्रे मस्त फोटो आहे... असले
बाप्रे मस्त फोटो आहे... असले पुर्ण काळे मांजर आम्हाला हवेय..
<<असले पुर्ण काळे मांजर
<<असले पुर्ण काळे मांजर आम्हाला हवेय..>>
असले म्हणजे ? पूर्ण काळा रंग आणि डोळे वेगवेगळ्या रंगाचे असतील तर चालतील का ?

Pages