मला सृष्टीचा एक अदभुत चमत्कार पहायला मिळाला. कदंब वृक्षाचे वर्णन आपल्याला कृष्णलिला ऐकताना मिळते. अत्यंत प्राचीनतेचा असा वारसा असलेला हा वृक्ष. असे म्हणतात की कालीया मर्दनासाठी डोहात उडी मारताना कृष्णाने या वृक्षावरुन उडी डोहात मारली.
" इथे कदंबाखाली मजला छेडु नकोरे नंदलाला " हे गीत ऐकताना कदंब कसा असेल हा वृक्ष कसा असेल असा प्रश्न पडला होता.
दोन दिवसापुर्वी जेव्हा माझ्या स्नेह्याने जेव्हा मला कदंबाचे फुल दाखवले व त्याचे वैशिठ्य सांगीतले तेव्हा जाणवले की लोकांना सांगावे कारण हे किती जणांना माहित असेल ?
वर्षातुन एकदाच हा वृक्ष फुलतो. ही फुले तीन दिवस दिसतात. २०-३० फुट उंचीच्या संपुर्ण झाडावर एकावेळी साधारण एक दोन हजार फुले एका वेळी फुलतात. जेव्हा फुलतात तेव्हा त्या फुलांच्या सुगंधाने लाखो मधमाश्या या फुलांकडे आकर्षीत होतात. पहाटे ३-४ वाजल्या पासुन जेव्हा मधमाशांचे गुंजन सुरु होते. लांबवर याचा आवाज पसरतो. या मधमाश्या पहिल्याच दिवशी मध खाऊन पसार होतात. पुढे दोन दिवस मग आपण झाडाजवळ मधमाश्यांची भिती न ठेवता जाऊ शकतो.
तीन दिवसांनंतर ही फुले कोमेजतात व नंतर यात बी तयार होते.
सहसा जंगलात आठळ्णारा हा वृक्ष माझ्या स्नेह्याच्या वडिलांनी आणुन पुण्यातल्या आपल्या सोसायटीच्या आवारात लावला आहे.
ह्या फुलाचा सुगंध आपल्यापर्यत पोचवता येणार नाही पण फोटोद्वारे त्याच रुप आपल्यापर्यत पोचवतो आहे.
छान फोटो. कोकणात याची झाडे
छान फोटो. कोकणात याची झाडे जागोजागी आहेत. कणकवली एस टी स्टँडवर, सावंतवाडी स्टँडच्या जवळ, गोव्यातील पणजी मडगाव मार्गावर रस्त्याच्या कडेलाच खुप मोठे वाढलेले झाड आहे.
मुंबईला भायंदर स्टेशनजवळ ५ मोठी झाडे आहेत, दादरच्या राजा शिवाजी शाळेजवळ, के ई एम इस्पितळाजवळ, विधानभवन जवळ पण बरीच झाडे आहेत.
या फुलांचीच मग फळे होतात (निवं म्हणतात त्यांना) त्याचे लोणचे घालतात. दूर्गा भागवतांनी अनेक साहित्यीक संदर्भ देत मोठा ग्रंथ लिहिला आहे, या झाडाबद्दल.
कसलं गोडूलं फूल आहे हे!
कसलं गोडूलं फूल आहे हे! लोकरीच्या रंगीत गोंड्यासारखं! मस्त!
कदंबतरुला बांधुन झोला उंच खालती झोले...
नितिनजी छान फोटो. माझ्या
नितिनजी छान फोटो.
माझ्या माहितीप्रमाणे खालील फोटो कदंबचाच असावा (चुभुद्याघ्या). जर असेलच तर .......
हा युकेज रिसॉर्टच्या आवारात पूर्ण बहरलेला हा "कदंब" वृक्ष.
सुनिल परचुरे यांनी या झाडाबद्दल सांगितल्यावर लगेचच माझ्या कॅमेर्याने टिपलेला.
कदंबाची भरपुर झाडे मी थेऊरच्या चिंतामणी मंदिराच्या आवारात पाहिली आहे.
मला पण चार दिवसांपूर्वीच
मला पण चार दिवसांपूर्वीच फूललेला कदंब बघायच भाग्य मिळाल. अंबरनाथ मध्ये कदंबाचे झाड आहे हे मला माहितीच नव्हते, म्हणजे ते झाड मी नेहमी बघायची पण फूललेले न बघितल्यामूळे ओळखू शकले नव्ह्ते आधी. त्या दिवशी सहजच लक्श गेल तर पूर्ण फूललेल.
काय सूंदर अनूभूती असते फूललेला कदंब पहाण्यात.
मी पण फोटो टाकेन.
फूल गेंदवा ना मारो, लगत
फूल गेंदवा ना मारो, लगत करेजवा मे चोट,
या ठुमरीतले गेंदवा म्हणजे हेच असावेत.
आणखी विशेष म्हणजे याच्या पानात आयोडीन असते, पाने चुरगाळून वास घेतला, तर आयोडेक्स सारखा वास येतो.
फळांना पण मस्त वास येतो. चवीला ती चिंचे सारखी लागतात. कुठे मिळाल्यास अवश्य खा.
दिनेशदा नक्की खाणार
दिनेशदा नक्की खाणार आता.
दिनेशदा हे फूल पूर्ण फूलायच्या आधी बूंदिच्या लाडू सारख दिसत ना.
आणि पूर्ण फूललेल झाड झीरो साइजचे असंख्य दिवे लटकल्याप्रमाणे.
ठाण्याला काहि ठराविक
ठाण्याला काहि ठराविक रस्त्यावर रस्त्याच्या कडेला लावलेली कदंबाची झाड आहेत . श्रिजि आर्केड च्या रस्त्याव्र असलेली आठवतात मला.
कदंबाचे वैशिष्ट्य म्हणजे
कदंबाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे खोड सरळ वाढत जाते आणि त्याच्या फांद्या खोडाला आडव्या समांतर अशा वाढतात. त्यामुळे हे झाड नेहमी नीट कापलेल्या त्रिकोणासारखे दिसते. माझ्या अतिशय आवडत्या झाडांपैकी एक.
यमुनाकाठी कृष्ण कदंबाच्या झाडावर मुक्काम ठोकुन गोपींशी छेडछाड करायचा...
संस्कृत साहित्यात ब-याच ठिकाणी कदंब येतो. बहुतेक तो स्वतःच खुप सुरेख दिसत असल्याने येत असावा. समांतर फांद्यांमुळे झोका बांधण्यासाठीही एकदम आदर्श....
ह्याच ऋतुत हे झाड बहराला येते. मी या झाडाबद्दल वाचल्यावर मुंबईत खुप ठिकाणी शोधले, पण मुळात दिसते कसे तेच माहित नसल्याने कधी आढळले नाही. एकदा बहरलेला कदंब पाहिल्यावर मात्र आता हे झाड खुप ठिकाणी ओळखता येते. मुंबईत खुप ठिकाणी आहे. मागे एका लेखात ठाण्याला कदंब मार्ग म्हणुन एका मार्गावर दुतर्फा कदंब लावलेत असे वाचलेले. माझ्या ऑफिसातही खुप झाडे आहेत याची. घराशेजारी पारसिक हिलवरही आहेत. सगळी बहरलीत सध्या
पुर्ण झाड एका वेळी बहरते.
नितिन ती फुले तर अगदी सॉफ्ट
नितिन ती फुले तर अगदी सॉफ्ट बॉल सारखी दिसतायेत......सुंदरच.....
तरी म्हटलं योग्या२४ कडे या झाडाचे आण फुलाचे फोटो कसे नाहीत
सुंदर दिसतात फुले.
सुंदर दिसतात फुले.
अप्रतिम दिसतायेत फूले...
अप्रतिम दिसतायेत फूले...
नितीन चिंचवड आणि सर्वांचे
नितीन चिंचवड आणि सर्वांचे फोटो आणि माहितीसाठी धन्यवाद .मला खरच कदंबाच्या झाडाबद्दल
उत्सुकता होती .अनेक जणाना विचारल पण समाधानकारक उत्तर मिळाल नव्हत .बहरलेल्या कदंबाच्या
झाडाचा फोटो खूप आवडला .
कदंबाच्या फुलांचा चेंडूसारखा
कदंबाच्या फुलांचा चेंडूसारखा वापर करुन कृष्ण गोपगोपींसमवेत कंदुकक्रीडा करायचा....
इतके सुरेख, सुगंधी , सुवर्णमयी फूल.....
फोटो आणि माहिती छान!
आता कुठेही दिसला तर कदंब मी
आता कुठेही दिसला तर कदंब मी नक्की ओळखेन!:स्मित:
मस्तच!
मस्तच!
अकु, ही कंदुकक्रिडा काय
अकु, ही कंदुकक्रिडा काय प्रकार आहे ?
काय सुंदर फुल आहे मस्तच
काय सुंदर फुल आहे मस्तच दिसतय बघायला.
युकेज जवळ मी का नाही पाहिले ?
हो गं जुई सांगायला हवं होतं
हो गं जुई सांगायला हवं होतं आम्ही सगळ्यांना. लक्षातच नाही आलं. यु केजच्या बाहेरच होतं आणि अगदी लगडलं होतं फुलांनी. मला आणि स्वातीला दोघींना माहीत नव्हतं की हा कदंब आहे आम्ही आपल्या 'किती छान' वगैरे म्हणलो. फोटो पण नाही काढला
नितिन मस्तच फोटो आणि माहीती
नितिन मस्तच फोटो आणि माहीती सुद्धा
नितिन, भारी माहिती योग्या,
नितिन, भारी माहिती

योग्या, हो रे हो, मी पण बघितले ते पण अनुत्सुकतेमुळे लक्ष नाही दिले गेले
लिम्बीच्या रानात लावायला पाहिजे हे देखिल
काय लिहीता तुम्ही कधी क्धी
काय लिहीता तुम्ही कधी क्धी काही कळत नाही. लिंबु कोण ते कळला ववीला. आता लिंबी कोण ? लिंबीच रान कोठे आहे ?
नितिन, येवढ साध कसं कळत नाही?
नितिन, येवढ साध कसं कळत नाही? लिम्ब्याची बायको लिम्बी, आली होती एका वविला! अन तिच्या माहेरच्या गावात मी तिला घेऊन दिलेले डोन्गरी रान आहे!
ह्या कदंबाच्या झाडाबाबत
ह्या कदंबाच्या झाडाबाबत लोकसत्ताच्या पुरवणीत लेख आला होता. आमच्याकडे नाही दिसत हे झाड. खुप सुंदर आहेत वरचे फोटो.
योगेश आणि नितिन, मन प्रसन्न
योगेश आणि नितिन, मन प्रसन्न झाले कदंब पाहून. हा फार प्राचीन वृक्ष आहे. यमुनेच्या तटावर म्हणे कदंबाच्या रांगा होत्या पुर्वी. आता आहेत का माहिती नाही. दुर्गा भागवतांच्या एका पुस्तकाचे नाव कदंब असे आहे. कवितेतून देखील कदंब खूपदा भेटतो. जुहु आगाराच्या मागिल बाजूस कदंब आहे असे कुणीतरी इथेचं मला सांगितले आहे. बहुतेक हवाहवाईने.
धन्यवाद.
कुंड्यातला झाडांपेक्षा मला हे
कुंड्यातला झाडांपेक्षा मला हे नैसर्गिकरित्या फुललेले वृक्ष फार आवडतात जसे की ब़कुळ, सोनचाफा, चाफा, सुगंधी नसला तरी गुलमोहर ......
सुगंधी नसला तरी गुलमोहर
सुगंधी नसला तरी गुलमोहर ......>>> येस्स, आमच्या सोलापूरातला भीषण उन्हाळा याच झाडाच्या फुलोर्याने सुसह्य होतो.
योग्या, हो रे हो, मी पण
योग्या, हो रे हो, मी पण बघितले ते पण अनुत्सुकतेमुळे लक्ष नाही दिले गेले>>> खरंतर युकेजमध्ये सुनिल परचुरेंनी सांगितले कि एक झाड बघ विशिष्ट फळांनी लगडले आहेत. मी झाड पाहिल्या पाहिल्याच म्हणालो हे बहुतेक "कदंबाचे" झाड आहे. बाकी माबोकर जेंव्हा "खजिन्याचा शोध" याच झाडाच्या जवळपास घेत होते तेंव्हा मी मात्र याचा फोटो काढण्यात मग्न होतो ;-).
मस्त फोटो !
मस्त फोटो !
सुंदर फोटो आणि माहीती !
सुंदर फोटो आणि माहीती !
छान फोटो. कुणी बकुळीच्या
छान फोटो.
कुणी बकुळीच्या फुलाचा, झाडाचा फोटो टाकेल का?