निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुगोल काय सुंदर अनुभव !
थोडा असाच अनुभव मला आला. मी इथे कुंडीत स्थानिक पुदीना, बेसिल वगैरे लावले होते. ते छानच वाढताहेत.
मुंबईतून सलादच्या बिया आणल्या होत्या, त्या उगवल्या होत्या खर्‍या पण अजिबात वाढत नव्हत्या. जायच्या दिवशी सहज त्या रोपाकडे बघून ( मनातल्या मनात ) रागावलो. भारताचे नाक कापलेस. त्याच मातीत हे बघ कसे वाढताहेत आणि हौसेने भारतीय बिया आणल्या तर...

३ आठवड्याने परत आलो तर त्याची रोपे मस्त तरारून आलीत. मेड्ने छान काळजी घेतली.

मी स्वित्झर्लंडहून भारतात आलो आणि २ दिवस होतो. तेवढ्यात अनिल आणि वर्षूला भेटलो. आता परत आलो अंगोलात.

दोन दिवसापासून ऑफिसमधून निघताना गाडीवर प्राजक्ताच्या फुलांचा शिडकावा झालेला असतो! मस्त वाटतं एकदम ! Happy

आता परत आलो अंगोलात.>>>>>>>>>>..आता आम्हाला भरपूर फोटो पहायला मिळतील. Happy

माझा एक प्रश्न : आमच्या सोसायटी समोर एक कुत्रा गेले तीन दिवस गोल गोल फिरतोय. असाच फिरत फिरत तो दुसरीकडे जातो पण परत थोड्यावेळाने दिसतो. प्रदक्षिंणा घातल्यासारखा फिरतोय. मला वाटल बहुतेक ही पिसाळण्याची पहिली पायरी असावी. म्हणून मी घरी फोन करून सगळ्यांना सांगून ठेवलं.
पुढीलपैकी काहीही कारण नाही.
१. शेपटीवर माशी बसली.
२. अंगावर जखम झाल्या.
३. काही खायची वस्तू दिसली.

असे का असेल? ते जरा जाणकारांनी सांगावे ही विनंती. Happy

शक्यतो शेपटीवर माशी बसली तर असे करतात. ( शेपटीला खाज आली कि.) अर्थात सतत असे करत असेल तर
शेपटीला दुखापत वा जखमही झालेली असेल.

मी वर्षूला वाढदिवसाला काय भेट दिली माहीत आहे ? चक्क मिरच्या दिल्या... पण त्या मिरच्या झोंबणार्‍या नव्हत्या तर चक्क गोड होत्या. स्विस मिरच्या होत्या त्या !

दिनेश दा चा हात लागून गोड झाल्या असतील मिर्च्या.... मस्त होत्या...सगळ्या संपल्या आणी चॉक्स पण ...स्लर्पी!!!!!

दिनेश धन्स!!!!!!!!!!!!

आणी अनिल सोडून इतर समस्त निग प्रेमीनो ....... टुक्टुक!!!!!!!!! Proud

वर्षूतै, भारतात सुस्वागतम!!
मस्त वाटत असेल ना? इथल्या हवेचा गंध, इथलं वातावरण तुला सुरुवातिचे काही दिवस जरा वेगळं वाटेल, पण हे नाविन्य आणि तिकडच्या आठवणी हे हळूहळू तुला सरावाचं होईल. शक्य आहे की काही बाबतीत तुला खूप जड जाईल. उदा. पब्लिक सेन्स,ट्रॅफिक सेन्स, छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप मनस्ताप होणे.... पण तरीही अनेक वर्ष बाहेर गेल्यानंतर इथल्या मातीची ओढ तुला नक्कीच सुखावह असेल.

ओके सहेली, धन्स गं. फक्त न्यायचे कसे करता येईल???...........अं...........मी तुला संपर्कातून मेल करते.

शांकली, तुला हजारी मोग-याचे झाड हवे आहे ना? रोप तयार आहे. >>>>एकच रोप आहे का? जास्त असतील तर मलाही हवयं.

मी वर्षूला वाढदिवसाला काय भेट दिली माहीत आहे ? चक्क मिरच्या दिल्या... पण त्या मिरच्या झोंबणार्‍या नव्हत्या तर चक्क गोड होत्या. स्विस मिरच्या होत्या त्या !
मी तर लगेच लगेच खाऊन संपवली..
अशाच पण लांब मिरचीची एक वाण भारतात बंगलोरच्या काही शास्त्रज्ञांनी तयार केला होता अस ऐकलं होतं.
अशा गोड मिरची बद्दल दुसरा लेख ..
http://www.indiaprwire.com/pressrelease/food/20120131110641.htm

वर्षु,
त्या दिवशी मुंबईतला पाऊस पाहुन, अनुभवल्यावर कधी एकदा पुण्यात पोहोचतोय असं झालं होतं..
त्यामुळे तिथे जास्त वेळ थांबता आलं नाही.

सुदुपार.

मला हवी असलेली रोपे खाली लिस्ट देते. कुणाकडे असल्यास मला कळवा. Lol

१) पिवळा सोनटक्का
२) हजारी मोगरा
३) गुलाबी गावठी गुलाब (ज्याला भरपूर सुगंध असतो तो.)
४) लाल कृष्णकमळ
५) पॅशन फ्रुट
अजुन लिस्ट देईन नंतर.

शांकली, तुला हजारी मोग-याचे झाड हवे आहे ना? रोप तयार आहे. >>>>एकच रोप आहे का? जास्त असतील तर मलाही हवयं.>>>>>>>>>>>.मला पण हवय. Happy

१) पिवळा सोनटक्का
२) हजारी मोगरा
३) गुलाबी गावठी गुलाब (ज्याला भरपूर सुगंध असतो तो.)
४) लाल कृष्णकमळ
५) पॅशन फ्रुट
अजुन लिस्ट देईन नंतर.>>>>>>>>>>.+ १ Happy

भारतात पावसात भिजलो आणि इथे कडाक्याची थंडी आहे !
स्विसचे फोटो कधी एकदा इथे टाकतोय असे झालेय. पण ते एडीट करायला वेळ लागणार आहे.

शांकली, अगदी बरोब्बर बोललीस!!!
अजूनही विश्वास बसत नाहीये... पण समोरच्या देवळातला घंटानाद, मागच्या घरातला शंखनाद आणी घंट्यांचा किणकिणाट ऐकला कि आपण भारतात असल्याची जाणीव होतेय!!!
या व्यतिरिक्त रस्त्यावरचे एकूणएक बोर्ड्स वाचता येणे, आजूबाजूचे आवाज अनोळखी असले तरी सर्व संभाषण (आपण इन्वॉल्व नसलो तरीही...) समजणे,ओळखीच्या सर्वच भाषांचे तुकडे कानावर पडल्याने बरं वाटणे अश्या अनेक गोष्टींमुळे ही अब हम अपनी जमीन पर हैं ही भावना मनात येऊन छान वाटतंय!!!

यंदा फुटपाथ नसलेले रस्ते,,किंवा खडबडीत ,वर खाली असलेले ,फुटलेले, तुटलेले फुटपाथ, रस्त्यांवरचे खड्डे, त्यात साचलेलं पाणी,चिखल काहीच कसं बरं डोळ्यांना त्रास देत नाहीयेत ते??????????????? Happy

यंदा फुटपाथ नसलेले रस्ते,,किंवा खडबडीत ,वर खाली असलेले ,फुटलेले, तुटलेले फुटपाथ, रस्त्यांवरचे खड्डे, त्यात साचलेलं पाणी,चिखल काहीच कसं बरं डोळ्यांना त्रास देत नाहीयेत ते???????? >>>>>
वर्षू ------
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी - जन्मभूमी स्वर्गापेक्षा जास्त प्रिय असं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणाले होते (म्हणे.. Happy ) तिथे आपल्यासारख्यांनी जर म्हटले की - अब हम अपनी जमीन पर हैं - तर त्यात वावगे ते काय ?
आता लवकरच प्रत्यक्ष भेटही व्हावी ही अपेक्षा....

शशांकजी,
आता लवकरच प्रत्यक्ष भेटही व्हावी ही अपेक्षा....
अगदी मनातलं बोललात ..संदर्भ देखील छान.

वर्षु,
फक्त इथल्या रस्त्यांकडे, वीज, पाणी या सोयींकडे दुर्लक्ष करण्याची 'आताच' सवय लावुन घ्या,नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही.

३ इडियट मधला तो सुप्रसिद्ध डॉयलॉग नेहमी आठवा..
इग्नोर कर...इग्नोर कर

स्निग्धा, शोभा१२३, जागू - आत्ता एकच आहे रोप, तयार होतील तसतशी देईन. इतरही काही असेल ते पाहून सांगते, मग ज्यांना हवे ते नेतील.

मला कोणीतरी सांगा, बेसील घरी लावता येईल? बिया कुठे मिळतील?

छान गरे देणार्‍या फणसाची आठळी माझ्या आईने पेरली होती.बरीच वर्षे झाली. झाड बरेच वाढून त्याला फणसही
भरपूर लागतात.पण एकही गरा नसतो.फक्त भाजीच्याच उपयोगाचा आहे.ज्या फणसाची आठळी लावली ,तो
फणस मात्र खूप गरे देतोय! असे का बरे? कोणी सांगू शकेल का?

सुप्र निगकर्स! कसे आहात?
मोसंबी विकणार्‍या बाईकडचा पाळलेला ससा. तो एक बनपाव खात आरामात त्या बाईच्या साडीत गुरफटून बसला होता. पण मला काही समोरून पोझ देईना. घाबरला होता.

स्निग्धा, शोभा१२३, जागू - आत्ता एकच आहे रोप, तयार होतील तसतशी देईन. इतरही काही असेल ते पाहून सांगते, मग ज्यांना हवे ते नेतील. >>> पुढच्या रोपा करता माझा पहीला क्लेम Happy

ससुला एकदम गोड आहे Happy

मला एक सांगा, निशिगंधाला एका उंच दांड्याला कळ्या आणि फुलं आली. ती सगळी फुलं फुलून गेली की तो दांडा तसाच ठेवायचा कि छाटायचा?

वर्षू, तुझे वाचुन वाटायला लागले की आपल्या आजुबाजुला आपल्यासारखीच माणसे, वातावरण असणे काय प्रकारची सिक्युरीटी देते हे आपण जेव्हा आपल्या माणसात नसतो तेव्हाच कळते. भले हे आपले वातावरण कितीही गुड बॅड अग्ली असो, शेवटी ते आपले असते, एक प्रकारची सुरक्षितता वाटते आपल्या वातावरणात.

मी कॉलेजात असताना, एकदा ट्रेनमधुन प्रवास करताना चुकून चार स्टेशन्स पुढे गेले. लक्षात आल्यावर एकदम बावरुन गेले, लगेच दुसरी ट्रेन पकडुन परत आले. माझ्या नेहमीच्या स्टेशनात जेव्हा उतरले तेव्हा इतका जीवात जीव आलेला... खरेतर बावरुन जायचे काहीच कारण नव्हते, पण ओळखीच्या जागी जी सुरक्षितता वाटते ती अनोळखी जागी नाही वाटत.

साधना अगदी बरोबर म्हणालीस. एकदा आमची लोणावळ्याला कॉलेज मध्ये असताना पिकनीक गेली होती. आम्ही दोन-तिन मैत्रीणी हळू हळू गप्पा मारत चालत होतो. सगळे कधी पुढे गेले कळलेच नाही. तेंव्हा मात्र कोणी दिसत नाही म्हणून आम्ही खुप घाबरलो. पण अचानक २ आमच्याच कॉलेजची सिनियर मुले दिसली आणि धिर आला. त्यापुर्वी आम्ही कधी त्यांच्याशी बोललोही नव्हतो तरीही.

मानुषी,
ससा खुप छान आहे. मुळचा अतिशय चपळ प्राणी एका जागी बसुन कसा राहिला? कुठेतरी टुणकन उडी मारुन पळून नाही जात? नवलच वाटतंय. Happy

Pages