निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मित्रांनो

जागू अनंताचा फोटो मस्त. निगचा नवा मेंबर तयार होतोय तर...
लसूण पण छानच वाढल्ये.

माझ्याकडे एप्रील पासून अनंताला कळ्या येऊन गळून जात होत्या. अखेरीस आता फुलं येऊ लागली आहेत.
anant.jpg

फोटो शशांकदादांनी दिलेलाच पहा..मी जवळ जाणं टाळते घरट्याच्या. आणि चुकुन जरी जावं लागलं की लगेच ते निळं पात्र माझा जोरजोरात निषेध करतं अगदी जीव खाऊन... Happy

आर गॉर्ज तर भन्नाट प्रकरण आहे. मग एका ग्लेशियरच्या पोटात पण शिरलो होतो. काल हैदी लॅंड या परीकथेतील गावी गेलो होतो. आज युरपमधल्या सगळ्यात लांब ग्लेशियरला भेट देणार आहे. तिरप्या चढणार्‍या ( कॉग व्हील ) ट्रेनमधून.. Happy

दिनेशदा, मज्जा करून घ्या. आणि भरपूर फोटो काढून आम्हाला दाखवा. Happy

जागू, गुलाब मस्तच. Happy

आज माझ्या बसमधल्या मैत्रिणीने माझ्यासाठी, अनंताच छोटंस फुल आणलं. मी ते माळलय डोक्यात. मस्त सुगंध येतोय. Happy

Anil mothi karamal mhanan maaaybolit search kar
साधना,
करमळ सर्च करुन पाहिला,त्याबद्दलचा दिनेशदांचा,तुमचा लेख वाचला, आता छान माहिती झाली.

काल युरपमधल्या सर्वात उंच शिखरावर होतो आज सर्वात मोठ्या धबधब्यावर जातोय.
फोटो काढून काढून बोटं दुखताहेत Happy

मागच्या रविवारी गावी जाताना बसमधुन घेतलेले काही फोटो ..
DSCN0920.JPGDSCN0921.JPGDSCN0922.JPG
हे शेतावरचे काही फोटो..
DSCN0928.JPGDSCN0929.JPGDSCN0932.JPGDSCN0933.JPGDSCN0935.JPGDSCN0936.JPGDSCN0937.JPGDSCN0938.JPGDSCN0940.JPGDSCN0943.JPGDSCN0944.JPGDSCN0945.JPGDSCN0946.JPGDSCN0947.JPGDSCN0950.JPGDSCN0951.JPGDSCN0953.JPG
ही वनस्पती पावसाळ्यात सगळीकडे खुप वाढताना दिसते, याच नाव जाणकार सांगतीलच..
DSCN0954.JPGDSCN0955.JPG
हा धोतरा. याचे किती प्रकार आहेत ?
DSCN0957.JPGDSCN0958.JPGDSCN0959.JPG

हा देखील पांढरा धोतरा.याची अनेक फुले पाहिली तर सगळीकडे भुंगे दिसलेच, काय कारण असेल ?
DSCN0987.JPGDSCN0963.JPGDSCN0964.JPGDSCN0970.JPG
या करंज्या (कारंज्या), ओढ्याकाठी याची झाड्म खुप.अगदी पुण्यात देखील बघायला मिळ्तील.
DSCN0972.JPG
याच नाव मात्र माहित नाही.
DSCN0984.JPGDSCN0985.JPG

प्रज्ञाजी,
इकडच्या सिमेंट्च्या जंगलातुन तिकडे शेतात गेलं कि किती फोटो काढु अस होतं,हे फोटो मनात साठवायचे आणि पुन्हा इकडे परतायचं, जे सध्या तरी अपरिहार्य आहेच.

अनिल, सगळे फोटो लाजवाब!! हे सारं सोडून येताना मनाला किती त्रास होत असेल याची कल्पना येतेय.
बाय द वे ते शेवटचे दोन फोटो कोणत्या रोपाचे आहेत?

इतके सुंदर फोटो बघूनच तृप्त व्हायला झालं... आणि धोतरा, करंज्या वगैरे नवीन नावंही कळली... Happy

आणि २१ नं. ची वनस्पती टाकळा आहे ना?

Anil ti pavsalyat vadhnari vsnadpati takla ranbhaji aahe.

शशांक पुरंदरे धन्यवाद , तुम्ही शेअर केलेला 'कोकोनट ऑईल' लेख वाचुन मला फायदा झाल्यासारखं वाटतयं.
मी नियमीत रनिंग करायचो अध्येमध्ये ट्रेकिंगपण करतो , मागच्या महिन्यात नक्की कशामुळे माहीत नाही पण माझे दोन्ही गुढघे प्रचंड दुखायला लागले , सगळा औषधोपचार केला , माझं रनिंग पण बंद होतं की काय अशी भीती वाटायला लागली होती.
पण 'कोकोनट ऑईल' लेख वाचुन दोन दिवसांपासुन गुडघ्यांना नारळाचं तेल लावायला सुरुवात केलीय आणि प्रचंड फरक पडलायं.
शशांक , डॉ. मीना नेरुरकर आणि सगळ्या निसर्ग गप्पाकरांचे आभार.

टाकळ्याची भाजी जागुने लिहिली होती. वर्षातून एकदा तरी खावीच पण कोवळी असतानाच खातात याच्या बियांची "कॉफी" पण करतात.

काल जर्मनीला पण जाऊन आलो Happy

शांकली,
खरं आहे.
त्या करंज्याच्या शेंगा (कारंज्या), ओढ्याकाठी याची झाड खुप.अगदी पुण्यात देखील बघायला मिळतात.
शेवटचा फोटो- याच नाव मात्र माहित नाही.

जागु,
इतकी वर्षे ती पाहतोय त्याची भाजी करु शकतो हे आज समजलं,त्याचा वास मात्र उग्र असतो, इतकी वाढलेली असते पण कुणी हात लावलेला देखील पाहिलं नाही.याच कारण एक तर अज्ञान दुसरं म्हणजे बाकीच्या नेहमीच्या भाज्यांची मुबलक उपलब्धता हे देखील असाव.
बहुतेक जण हि विषारी असल्याच सांगणारे जास्त भेटले.

निगमुळे आता एक नविन रानभाजी सापडली.याच्या बियांची कॉफी देखील करुच.

दिनेशदा,
मस्त पैकी फिरा आणि आता इतके सारे फोटो इथे टाकणं शक्य नसेल तर एक त्या फोटोंचा अल्बमच इकडे पाठवा.
तुम्ही केलेली जगभराची छान भ्रमंती,त्याची थोडक्यात माहिती यावर एक भलमोठं पुस्तक काढता येईल, एक डीव्हीडी देखील काढता येईल.(याच्या पब्लिसिटीचे हक्क मात्र निगकर घेतील
Happy

<<त्याचा वास मात्र उग्र असतो>>
तिच्यात गूळ टाकावा लागतो थोडा जास्त. उग्र वासाचा जास्त त्रास होत नाही.

अनिल. ते शेवटचे २ फोटो; 'विंचवी' नावाच्या वनस्पतीचे आहेत. सर्पदंशावर याच्या मुळांचा रस उपयुक्त आहे असं गूगलवर कळालं. अर्थातच ते बरोबर असणार. कारण शेतात पावसाळ्याच्या दिवसात साप अगदी सर्रास दिसतात. त्यामुळे त्यावर (त्यांच्या दंशावर) उतारा म्हणून असणार्‍या वनस्पतीही त्याचवेळी उगवणार!! निसर्गाची तशी योजनाच असते. पण तरीही आघाडा, ही विंचवी ह्या उपायांबरोबर आधी सर्वात महत्वाचं म्हणजे साप चावलेल्या माणसाला अँटिव्हेनम इंजेक्शन देणं.

Pages