निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
आंतरजालावरुन मिळालेला
आंतरजालावरुन मिळालेला ब्रह्मकमळाचा (निवडुंगाच्या फुलाचा) एक सुंदर फोटो -
सुदुपार
सुदुपार
ताजं,ताजं लोणचे, झकास.असे
ताजं,ताजं लोणचे, झकास.असे उचलून खावसं वाटतेय.
लोणचे झकास!
लोणचे झकास!
मुरत घातलेल्या कैर्या!! वा!!
मुरत घातलेल्या कैर्या!!
वा!! तोंपासू
शोभे..... प्ली>>>>>ज एक
शोभे..... प्ली>>>>>ज एक बाटलीठेवून दे माझ्याकरता.... बदल्यात तुला प्रॉन लोणचं बनवून देईन, बार्टर एक्स्चेंज!!!
साधना जागुलीला च्याव च्याव शिकवण्यारता मै उरण का रस्ता ढूँढ के रखी हूँ
शोभा, मी इमेल केलीय. अर्जंटली
शोभा, मी इमेल केलीय. अर्जंटली वाचून मला फोन करणार का ?
मी शशांकशी बोललोय.
आज मी पाहीलेली एक विलक्षण
आज मी पाहीलेली एक विलक्षण गंमत..
साळुंक्या ओरडत होत्या म्हणुन बागेत बघायला गेले तर त्या मांजरीच्या मागे लागुन तिला सळो की पळो करुन सोडत होत्या, मांजर त्यांना चुकविण्यासाठी घरात यायच्या प्रयत्नात होती तेव्हा मीही साळुंक्याच्या बरोबर मांजरीला हुसकावू लागले,
लगेच सोबतीला बुलबुल, शिंपी, होला, भांगपाडी मैना, आणि अजुन ४ जातीचे पक्षी जोडी जोडीनेच त्यांच्या मदतीला धावून आले
मांजरीची चांगलीच गोची केली सर्वांनी..
अर्धा तास हे सुरुच होते..
दिनेशदा, इमेल वाचली. ते काम
दिनेशदा, इमेल वाचली. ते काम झाल की फोन करते.
शोभा, स्लर्प !!
शोभा, स्लर्प !!
परवा मी पण एक गंमत बघीतली.
परवा मी पण एक गंमत बघीतली. खिडकीसमोर तारेवर एक कावळा बसला होता. आणि एक बुलबुल शेपटी फ़ुलवून त्या कावळ्याच्या अंगावर जात होता. नंतर लक्षात आलं, कावळ्याने त्याची अंडी पळवली असणार. म्हणून तो संतापला होता. इतका आक्रमक झाला होता.कावळ्याच्या भोवती फ़िरून त्याला चोच मारत होता. कावळा फ़क्त एकदा इकडे आणि एकदा तिकडे तोड लपवत होता. फ़ारच झाले की एकदाच त्या बुलबुलाच्या अंगावर गेला. पण जरा मागे होऊन, परत त्याने कावळ्यावर राग काढायला सुरुवात केली. आपल्यापेक्षा ४-५ पट मोठ्या कावळ्यावर तो आक्रमण करत होता. आपल्या पिल्लांवर किती प्रेम असते ना यांचे.
>ज एक बाटलीठेवून दे
>ज एक बाटलीठेवून दे माझ्याकरता.... बदल्यात तुला प्रॉन लोणचं बनवून देईन, बार्टर एक्स्चेंज!!! >>>>>>>>>>>>>वर्षू, मी शुद्ध शाकाहारी आहे. त्यामुळे जे देशील ते मला चालेल असेच दे.
हिने अन हिच्या एका बहिणीने मी
हिने अन हिच्या एका बहिणीने मी पेरलेल्या कोथिंबिरीचे ८०% कोंब खाऊन टाकलेत. कॅमेरा आणायला गेलो तोपर्यंत बहिणाबाई पळून गेल्या, ही एकटी होती, तिला कैद केली.
हे काय आहे? ओळखा पाहू :
गोगल गाय. (पोटात पाय) मला
गोगल गाय. (पोटात पाय)
मला ही खूप आवडते. कशी अगदी डौलात चालत असते. राणीसारखी.
शोभाताई, दुसर्या फोटोतले झाड
शोभाताई, दुसर्या फोटोतले झाड ओळखायचे आहे
दुसर्या फोटोतले झाड ओळखायचे
दुसर्या फोटोतले झाड ओळखायचे आहे फिदीफिदी>>>>>>>>>>>>नाव अगदी डोळ्यासमोर आहे पण सांगताच येत नाही.
दुसर्या फोटोतले झाड ओळखायचे
दुसर्या फोटोतले झाड ओळखायचे आहे >>>
आल्याचे आहे ना?
मला ही खूप आवडते. कशी अगदी डौलात चालत असते. राणीसारखी>>> एखाद दुसरी असेल तर ठीक पण जास्त असल्याकी वाट लावते झाडांची आणि त्यांची संख्याही अमाप वाढत असते की त्याना कसे घालवावे ते कळत नाही. परत त्या जो द्रव सोडत जातात त्याचा परीणाम काय होतो कोण जाणे. कारण त्या भाजी पाल्यावर पण फिरतात.
मध्यंतरी गोगलगाय़ीची एक जात पाहिली होती त्यांचा साईज तीन साडेतीत इंच होता आणि रूप किळसवाणं. पुण्याच्या जिपिपित असंख्य होत्यातशा.
आल्याचे आहे ना? >>>>>>>>>हो
आल्याचे आहे ना? >>>>>>>>>हो बहुतेक.
पुण्यात आषाढात श्रावणासारखा
पुण्यात आषाढात श्रावणासारखा पाऊस पडतो आहे.
ते बहउतेक शोभेचे झाड आहे क
ते बहउतेक शोभेचे झाड आहे क ????
खरच... पुण्यात श्रावणासारखा पाऊस पड्तोय......
त्यांचा साईज तीन साडेतीत इंच
त्यांचा साईज तीन साडेतीत इंच होता आणि रूप किळसवाणं. पुण्याच्या जिपिपित असंख्य होत्यातशा.
आफ्रिकन गोगलगाई. त्या दिसल्या की त्यांच्यावर सरळ पाय ठेवायचा. प्राण्यांवर दया वगैरे ठिक आहे पण यांच्यावर नको, एखाद्या बागेतल्या सगळ्या रोपांची पाने एका रात्रीत उडवण्याइतके सामर्थ्य आहे यांच्यात.
ते बहउतेक शोभेचे झाड आहे क
ते बहउतेक शोभेचे झाड आहे क ???? >>>>>>>>>>>>अग, माझं झाड कसं असेल?
पुण्यात आषाढात श्रावणासारखा पाऊस पडतो आहे.......>>>>>
खरच... पुण्यात श्रावणासारखा पाऊस पड्तोय......>>>>>>>>>>>..आज सकाळी ऑफिसला येताना माझ्या मनात अगदी हाच विचार आला होता.: "श्रावण सुरू झाल्यासारखंच वाटतय. "
इब्लिस फोटो दिसत नाहीये आता.
इब्लिस फोटो दिसत नाहीये आता.
कंटुलीची फुले.
कंटुलीची फुले.
इब्लिस, फोटो दिसत नाहीत.
इब्लिस,
फोटो दिसत नाहीत.
कैलास, छान फोटो.. निगच्या
कैलास,
छान फोटो..
निगच्या पानांवर तुम्ही टाकलेले फोटो नक्कीच आवडतील.
सुप्रभात निगकर्स!
सुप्रभात निगकर्स!
सुप्र निगकर्स! डॉक. कंटुली
सुप्र निगकर्स!
डॉक. कंटुली म्हणजेच कटुरले ना?
सुप्रभात. डॉ. बहुतेक ती फुले
सुप्रभात.
डॉ. बहुतेक ती फुले कंटोळीची आहेत. पण थोडी फिक्कट रंगाची वाटत आहेत.
सुप्रभात.
सुप्रभात.
Pages