चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३

Submitted by केदार जाधव on 6 June, 2013 - 04:56

चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही Happy
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने Happy

वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm

June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm

June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm

June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm

June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm

June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm

June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm

June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm

June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm

June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm

June 23 Final, Edgbaston, 3 pm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या लोकांचा नशीब या गोष्टीवर विश्वास नाही त्यांच्यासाठी रोहित शर्मा हे उदाहरण ठराव . गेल्या ११ सामन्यात ९ वेळा तो Single digits मध्ये बाद झालाय , Still he is opening for India .
That's why he is captain of my fantasy Team Happy
कधीतरी फेल होऊन तोही कंटाळेलच ना .म्हणतात ना बंद पडलेल घड्याळही दिवसातून २दा बरोबर असत Wink

केदार, रोहित शर्माला खेळवायचं कारण दिनेश कार्तिकला बाहेर बसवता येणारच नाही हे आहे( तो जबरीच फॉर्म मध्ये आहे.. पण आज त्याचा भरवश्याच्या म्हशीला टोणगा होण्याची शक्यता फारच वाटते आहे.. ) आणि मग धवन पेक्षा विजयला बसवणं सोप्पं आहे... दोन - तीन तरी डावखुरे फलंदाज असायला हवेत ना टीम मध्ये.. त्यातलाच एक धवन आहे..

आकाश चोप्राचं ट्वीट एकदम अ‍ॅप्ट आहे..

Aakash Chopra ✔ @cricketaakash

If you have to open with a part-time opener in the first match of the tournament, you probably didn't pick the right team!

शतक मारलं की उपयोग केला म्हणायचं पराग.. त्याला आधीच भरपूर संधी दिलेल्या आहेत.. यंदा सुदैवानी त्यानी आयपीएल मध्ये चांगली बॅटींग केली आहे त्यामुळे फॉर्म जरा बरा आहे त्याचा..

खरं तर बॅटींगपेक्षा कॅप्टन्सी चांगली केली त्याने.. आणि बाकी लोकांपेक्षा म्हणजे कोहोली, गंभीर, युवराज, हरभजन ह्यांच्यापेक्शा खूपच मॅच्युरिटी दाखवली कॅप्टन्सीमध्ये.. उगीच आप्ल्या संघातील खेळांडूवर एखादा झेल सोडला, फोर घालवली म्हणून चिडचिड नाही की प्रतिस्पर्ध्याशी उकरून काढलेली भांडणं नाहीत.. भावनांचं अतिप्रदर्शन नाही.. मुंबईकर असल्याने (किंवा दिल्लीकर नसल्याने Wink ) अपोआपच एक प्रकारची डिसेन्सी आली असावी वागण्यात.. Happy
शिवाय आयपीएलमध्ये जेव्हा खेळला त्या इनिंग्ज खूपच बघण्यासारख्या होत्या.. अतिशय सहज, सुंदर बॅटींग ! डोळ्याचं पारणं बिरणं फिटणारी...
असो.. फार झालं रोहित पुराण.. Happy

शिवाय आयपीएलमध्ये जेव्हा खेळला त्या इनिंग्ज खूपच बघण्यासारख्या होत्या.. अतिशय सहज, सुंदर बॅटींग >> तो जेंव्हाही खेळतो तेंव्हा तशाच असतात त्याच्या खेळी. effortless. आयपीलच्या कामगिरीवर तो आत्ता आत आला हे खरय.

बाकीचे क्रिकेट प्रेमी कुठे हरवले????????????? >> भारतीय क्रिकेट ओळखणारे लोक अशा भविष्यवाणी न करता मॅच बघत बसतात - old jungle saying Lol

आफ्रिका जाम संकटात.. मोर्ने मॉर्केल पण जखमी होऊन बाहेर... त्यांची बॅटींग चालली तरच काही तरी होऊ शकेल.. अन्यथा बाद फेरीतच बाद होण्याची शक्यता वाढलेली आहे..

दिनेश कार्तिक खरच आज भरवश्याच्या म्हशीला टोणगा ठरला.... माझ्या फँटसी टीमचा कॅप्टन होता तो Sad
असो चांगला झालाय स्कोअर!

आज भारताने नुसती अप्रतिम नाही तर योजनाबद्ध फलंदाजी केलीय [कालच धोनी म्हणाली होता कीं या स्पर्धेत पहिल्या १० षटकांत ४० धांवा झाल्या तरीही चालेल पण विकेटस हातांत असायल्या हव्यात; नेमकं त्या धोरणानेच आज फलंदाजी झाली !].
आमला हाच आतां अडसर ठरूं शकतो भारताच्या वाटेतला .
धवन शिखरला सलाम !

espn3.com वर live मॅच दाखवत आहेत.
comcast/u-verse चे कनेक्शन असेल तर espn3.com वर सामने बघता येतात.

रोहित शर्मा एक आळशी माणुस आहे. त्याच्या चेहेर्यावरचे ते "आता कुठे डोळा लागत होता, तर बॅटींग ला पाठवायलेत" हे भाव, वाढलेली दाढी (आणी क्वचित प्रसंगी जाडी सुद्धा) नेहेमीच एक 'आजारी' feel देतात. त्यामुळे वरच्या "उगीच आप्ल्या संघातील खेळांडूवर एखादा झेल सोडला, फोर घालवली म्हणून चिडचिड नाही की प्रतिस्पर्ध्याशी उकरून काढलेली भांडणं नाहीत.. भावनांचं अतिप्रदर्शन नाही." ह्या कमेंट कडे सुद्धा मी त्याचा एक आळशी पणा म्हणुनच बघतो. उगाच कुठे चिडायचे कष्ट घ्यायचे!!

अर्थात, जर रोहित शर्मा चांगला खेळला तर ते नक्कीच चांगलं आहे, कारण आत्तापर्यंत सगळ्यांनी कौतुक (उदो-उदो?) केलेलं टॅलेंट त्याच्याकडे निर्विवाद पणे आहे ... अडचण अ‍ॅटिट्यूड आणि अ‍ॅप्लिकेशन ची आहे.

द. आ. २५०-८ ! आतां मॅच हातात आली म्हणयला हरकत नसावी. आज भारताचं अप्रतिम क्षेत्ररक्षण.

<< ... मी त्याचा एक आळशी पणा म्हणुनच बघतो. >> मीं देखील तो झोपेत असल्यासारखा मैदानावर वाटतो, असं एकदां रागाने म्हटलं होतं. पण कांही प्रतिभावान खेळाडू बाह्यतः असे वाटत असले तरी त्यांची 'इंटेन्सीटी' मात्र इतरांहून कमी नसते. सध्याच्या गोलंदाजांत सुनील नरैन ह्या वर्गात मोडतो. पूर्वीच्या जमान्यातला डेव्हीड गॉवरही [इंग्लंड] असाच कलात्मक खेळाडू होताच. रोहित शर्माला त्या वर्गात बसवणं अधिक योग्य होईल.
[ वरतीं मीं घाईत 'शिखर धवन' ऐवजीं 'धवन शिखर' लिहीलं; त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल धन्यवाद.]

अभिनंदन.
द.आफ्रिकेने पण ३००चा टप्पा ओलांडला हेंही कौतुकास्पद. स्टेनची गैरहजेरी चांगलीच जाणवली असावी द.आफ्रिकेला.

'बूकीपिडिया' च्या विश्वसनीय सूत्रांकडून असे कळ्ळेय की पाकिस्तान किंवा इंग्लंड जिंकणार. खरी स्पर्धा आहे ती दुबई आणि कराची मध्ये!!

आतां मॅच हातात आली म्हणयला हरकत नसावी. आज भारताचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. >> जाडेजा, रैना, रोहित, कार्थिक, कोहली, धवन असे सहा सहा लागल्यावर तसे नसते तर नवलच Happy NFL मधे जसे specialty teams असतात तसे fielding साठी पण specialty team allow करायला हवी. नुसती fielding बघायला सुद्धा लोक येतील Happy

सुलुजी ,
आपल्या मताचा आदर आहेच . आपण म्हणता तसे पाकिस्तान किंवा इंग्लंड जिंकणार .
पण आम्हा अजाण बालकाना ते कसे जिंकणार ते तरी बघू द्या . उगाच सस्पेन्स का फोडताय ? Happy

रच्याकने ,
आज विंडीज ला चांगली संधी आहे . बर्याच दिवसानी त्यांचा संघ कागदावर समोरच्या संघापेक्षा भारी दिसतोय

त्याचा एक आळशी पणा >> लेझी एलेगन्स अस एक डेविड गोवरच्या बाबतीत म्हणायचे. रोहीतला ते एकदम फ़िट बसते. ज़ोडी जमेल त्याची धवन बरोबर. Happy

>> Aakash Chopra ✔ @cricketaakash

आकाश चोप्राच्या ट्वीट आणि ओपनिंग पार्टनरशिप किती रनची झाली त्यावरून त्याची डेप्थ समजते. एखादी कॉमेंट बरी असते त्याची पण जास्त करून अगदी इरिटेटिंग आहे.

मला तर आकाश चोप्राचे अ‍ॅनालिसिस आवडते.... सेन्सिबल लिहतो तो.....आत्ता कुठे एक मॅच झालीय!
संघात जागा टिकवण्यासाठी रोहित शर्माला खेळण्याशिवाय पर्यायच नव्हता.... नाहीतर मुरली बसलाच आहे कुठल्याही क्षणी स्पेशालिस्ट म्हणून आत यायला!

Pages