चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३

Submitted by केदार जाधव on 6 June, 2013 - 04:56

चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही Happy
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने Happy

वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm

June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm

June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm

June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm

June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm

June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm

June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm

June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm

June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm

June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm

June 23 Final, Edgbaston, 3 pm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुरलीला वन डे मध्ये कुठल्या बेस वर आणले ते कळत नाही. त्या आधी त्याने टेस्ट मध्ये चांगली कामगिरी केली ह्यात वादच नाही. पण IPL मध्ये तो फेलच म्हणावा लागेल.
मुरलीला घेऊन खेळण्यापेक्षा DK आणि RS नेहमीच हवेत. रोहितला मुरली एवढी संधी मिळावी. Happy

>>रोहितला मुरली एवढी संधी मिळावी
मग पुढच्या मोसमात त्याने चेन्नईकडून खेळावे किंवा किमानपक्षी रिती स्पोर्टशी तरी करारबद्ध व्हावे Proud

खरयं. आता RS, SD, आणि भज्जी ह्यांनी पण धोणीच्या कंपनीकडूनच "मॅनेज" व्हावे.

मग झक्की म्हणतील हा कुठला BCCI चा संघ हा तर धोणी ११ (रादर १६) Happy

बुमरंग काय नजर लावली...........बिचार्याचे शतक देखील झाले नाही Biggrin

पाक -१७१.
इर्फान उंचीचा पुरेपूर फायदा उठवत भेदक गोलंदाजी करतो. सईद आतां गेल व सॅम्यूअल्सला रोखून धरतोय. ६५-२, १४ षटकांत म्हणजे वे.इंडीजला लक्ष्य पार करायला फार कठीण जाऊं नये; पण वे.इंडीजच्या बाबतींत कांही आडाखे बांधणं कठीणच !

काय पण बॅट आणि बॉलचा संघर्ष चाललाय ! पोलार्ड एक संयमशील व औचित्यपूर्ण खेळी करून बाद .वे.इंडीज १४८-७. अजूनही सामना रंगतदार अवस्थेत !

<< बॅटींग करायला फक्त बॉलर्सच उरलेत!>> बॉलर्सनीच केली ना शेवटीं बॅटींग वे.इंडीजला जिंकून द्यायला ! पोलार्ड व शेवटचे फलंदाज ज्या तर्‍हेने खेळले त्यावरून वे. ईंडीज आतां पूर्वीची लहरी , बेभंरवशाची टिम राहिलेली नाही हें लक्षांत येतं.
तेज गोलंदाजीला अनुकूल असलेल्या विकेटवर पाकिस्तानी फिरकीने वे. इंडीजच्या फलंदाजाना जखडून ठेवलेलं पहाणं हाही एक आगळाच आनंद होता.

क्वालिटी स्पिनर्स कुठे ही चालतात...... काल नरेन ने एकाच ओव्हर मधे २ विकेट काढलेले...त्यातला अकमल चा विकेट भारी होता..... कॅरम बॉल अकमल ला कळलाच नाही ... Happy
वेस्ट इंडीज कडे अजुन एक स्पिनर्स असायला हवा होता.....

इंग्लंडनी आज फारच सावध खेळ केला; ३००चा टप्पा सहज शक्य वाटत असताना २६९-६ वर डाव संपवला. हरले तर त्यांचा स्वतःचाच दोष म्हणावा लागेल.
<< क्वालिटी स्पिनर्स कुठे ही चालतात......>> फक्त "टॉप" क्वालिटी स्पीनर्स !

सराव सामन्यात भारताने दिलेल्या धक्क्यातून ऑसीज अजून सांवरलेले दिसत नाहीत; १३६-६ !

श्रीलंका वि. न्यूझीलंड - What a match ! What a match !!
दोन्ही संघानी ढिसाळ फलंदाजी करूनही केवळ अप्रतिम गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाने त्याची भरपाई केल्याने
सामना इतका रंजक होऊं शकतो याचं दुर्मिळ उदाहरण !! श्रीलंका १३८: न्यूझीलंड १३९ -९ .

सगळ्या टीम्सचा एक सामना झाल्यानंतर ८ पैकी फक्त ३ टीम्सला २५० पेक्षा जास्त धावा काढता आलेल्या आहेत... त्या भारत, सा. आफ्रिका आणि इंग्लंड....

सिद्धार्थ मोंगा has said it:
It is a little surprising that these two sides, hugely popular among the expatriate population in England, haven't faced each other in an ODI in England in the last 30 years. When India last played West Indies in an ODI in England, ODI cricket and West Indies were the kings. India upset West Indies that afternoon, became the new kings of ODI cricket, and paved the way for a whole new commercial explosion in the format. Thirty years later, as they face off in England again, India are the world champions and the No. 1 ODI side, but the format itself is fighting for relevance, at least in popular discourse.

http://www.espncricinfo.com/icc-champions-trophy-2013/content/story/6404...

< but the format itself is fighting for relevance, at least in popular discourse. >> मला तरी वाटतं कीं टी-२० पेक्षां एकदिवसीय सामन्यानाच शेवटीं खरी दीर्घकालीन लोकप्रियता मिळेल. निदान तसं व्हावं !
या स्पर्धेत पाकिस्तानची भेदक गोलंदाजी कायम असली तरी त्यांची इतकी केविलवाणी फलंदाजी मात्र पहायला मिळेल असं वाटलं नव्हतं ! शिवाय, इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाज भल्या भल्या 'मारेकरी' फलंदाजाना जखडून ठेवताना पहाणं हाही एक आगळाच अनुभव !! द.आफ्रिकेचे काल चार खेळाडू धांवचीत होणं हेंही वैशिष्ठ्यपूर्ण.

<< चॅम्पिअन ट्रॉफी बाहेर जाणारी पाकिस्तान पहिली टीम बनली. >> पण कोणत्याही 'लीग' स्पर्धेत अशा संघांचं 'उपद्रव मूल्य" [ nuisance value] इतरांसाठीं प्रचंड असूं शकतं. गमावलेली प्रतिष्ठा कांहीशी तरी मिळवण्यासार्ठी पाकिस्तान आतां भारताशीं निकराची लढत देईलच व जिंकण्यासाठीं खरा दबाव भारतावरच असल्याचा त्याना अ‍ॅडव्हांटेजही असेल. त्यामुळें भारताला आजची मॅच जिंकणं खूप महत्वाचं.

मनीष कसल्या जरतरच्या शक्यता...

भारत, वेस्टइंडीज आणि सा. आफ्रिका तिघांचे दोन गुण झालेले आहेत. पाकिस्तानची आपल्या बरोबरची मॅच जरी पावसानी गेली तरी पाकिस्तानचा १च गुण होईल. जो इतर टीम्स पेक्षा कमीच असेल त्यामुळे ते बाहेरच आहे.. कुठल्याही जरतरच्या गोष्टी घडणे शक्यच नाही..

हिम्सकूल , अगदी नगण्य असली तरी शक्यता आहे
भारत विंडीजकरून हरला .
विंडीजने अफ्रिकेला हरवले .
पाक ने भारताला हरवले .
तर
विंडीज ६ , आणी बाकी तिघांचे २ गुण होतील . तरीही नेट रन रेट ने पाक बाहेर जाण्याचे चान्स ९९ % आहेत .
अर्थात जर तुम्ही पाक भारताला मारूच शकत नाही या अर्थाने म्हणत असाल तर ठीक आहे Happy पण पाकडे ते पाकडे , वाकडे राहणारच Happy

Pages