चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३

Submitted by केदार जाधव on 6 June, 2013 - 04:56

चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही Happy
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने Happy

वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm

June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm

June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm

June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm

June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm

June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm

June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm

June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm

June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm

June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm

June 23 Final, Edgbaston, 3 pm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< Considering ODI is on the way out, >> मीं याबद्दल साशंक आहे. 'चँपिअन ट्रॉफी' बंद होतेय याचा अर्थ असा नाही काढतां येणार. बघा, विश्वचषक स्पर्धेला काय भरघोंस प्रतिसाद मिळेल तें !!

उद्या भारत विरुध पकिस्तान....चम्पिओन शीप जिंकली नहि तरी चालेल पण उद्या जिन्कलेच पहिजे...

अरे बापरे, आज कुणीहि जिंकले तरी त्यांना भारता इतकेच पॉइंट्स मिळणार! म्हणजे भारताला उद्या जिंकलेच पाहिजे.

मला वाटते पाकीस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हाकलून द्यायला पाहिजे. काय पण संघ आहे! त्यांच्या देशात गेले की घातपात, भारतात आले की हेरगिरी, एरवी स्पॉट फिक्सिन्ग. नि मैदानावर बाचा बाची तर असतेच. एव्हढे काही कौतुक करायला नको चांगले खेळतात म्हणून. इतरहि लोक त्यांच्यापेक्षा चांगले खेळतात नि वर सभ्य असतात!

<< आज कुणीहि जिंकले तरी त्यांना भारता इतकेच पॉइंट्स मिळणार >> झक्कीजी, पण प्रत्येक गटातून दोन संघ पुढच्या फेरीत जाणार असल्याने भारताच्या बाद फेरीतील प्रवेशाला त्यामुळे अडचण नाही होणार .

त्यांच्या देशात गेले की घातपात, भारतात आले की हेरगिरी, एरवी स्पॉट फिक्सिन्ग. नि मैदानावर बाचा बाची तर असतेच. एव्हढे काही कौतुक करायला नको चांगले खेळतात म्हणून. इतरहि लोक त्यांच्यापेक्षा चांगले खेळतात नि वर सभ्य असतात! >>. Lol Lol

पाऊस व डकवर्थ्-लुईस फॉर्म्युला वे.इंडीज वि. द. आफ्रिका सामन्याचा विचका करणार !!! Sad

मीडीयावाल्यांनी उद्याच्या मॅचला इंडिया पाकिस्तान युद्ध म्हणून बोंबलायला सुरूवात केलीये. आणि आपले भारतीय खेळाडू तिकडे इंग्लंडांत शॉपिंग करतायत निवांत. Happy

This is why Cricket is called a Great Leveller .
Twice SA were out of ICC tournaments because of rain .
Today , they go in Semis because of rain Happy

Today , they go in Semis because of rain >> Nope they went through because Pollard had brain freeze. Wink One ball changed the winner.

भाऊ, ODI बद्दल मी म्हणत नसून ICC (कि BCCI) चे मत आहे. जसे t20 वाढेल तसे ODI कमी होत जाणार. आणी नेमके हाच प्रकार आहे ज्यात आपण वरचढ आहोत Happy

असामी Happy
पण तुम्ही D/L साठी खेळू शकत नाही हेही तितकच खर आहे .
२४ चेडूत ४१ धावा पाहिजे असताना You have to play your shots .
Now that shot was bad is different thing Happy

<< भारतीय खेळाडू तिकडे इंग्लंडांत शॉपिंग करतायत निवांत >> आतां 'डकवर्थ्-लुईस'च्या भितीने सर्वच संघ 'पॉकेट कॅलक्यूलेटर्स' खरेदी करायला बाजारात उतरलेत ! Wink
<< Twice SA were out of ICC tournaments because of rain .>> द.आफ्रिकेवरील बॅन उठल्यानंतर त्यांच्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत निव्वळ पावसामुळे त्याना बाहेर व्हावं लागलं होतं, त्यावेळची हळहळ अजूनही जाणवते ! पण आतां 'डकवर्थ्-लुईस'ची दाट शक्यता असतानाही त्यानुसार खेळ न करणं/ न जमणं हा दुर्दैवाने वे.इंडीजचा दोषच मानला पाहिजे !
'अ' गट मात्र अजूनही सताड उघडा आहे आणि सध्यां टॉपला असलेली न्यूझीलंड टीमही बाहेर जावूं शकते !

आतां 'डकवर्थ्-लुईस'च्या भितीने सर्वच संघ 'पॉकेट कॅलक्यूलेटर्स' खरेदी करायला बाजारात उतरलेत ! <<< भाऊकाका Lol

२४ चेडूत ४१ धावा पाहिजे असताना You have to play your shots >> हो हेही बरोबर आहे फक्त पाऊस येता जाता असल्यामूळे D/L वर लक्ष न ठेवणे ही घोडचूक आहे, पोलार्डचीच नाही तर WI management ची. परत मॅच त्या बॉलनंतर बंद होणार आहे हेही आधीच कळवले होते.

इंग्लंड वि. न्यूझीलंड हा महत्वाचा सामनाही पावसाच्या लहरीचा बळी ठरतोय ! 'क्रिकइन्फो' वरचा विनोद -

Lee: "I wonder why England never won the ODI world cup. Simple reason :- English players are not used to play full 50 overs odi matches as in England its only Mr. Duck Lewis play cricket with rain and umbrella." Wink

इंग्लंडचा बाद फेरीतील प्रवेश नक्की झाला. इंग्लंडच्या फलंदाजानी बर्‍यापैकी धांवा करून व स्वान संघात नसूनही तेज गोलंदाजानी अप्रतिम गोलंदाजी करत बाजी मारली ! आतां आजच्या श्रीलंका वि. ऑसीज सामन्यात 'अ'गटातल्या उरलेल्या तिन्ही संघांचं भवितव्य ठरणार !

श्रीलंका बाद फेरीत हजर ! खूप मोठ्या फरकाने जिंकणं आवश्यक असल्याने ऑसीज दबावाखाली असूनही जिद्दीने खेळले.
आतां बाद फेरीत -द.आफ्रिका वि. इंग्लंड व भारत वि. श्रीलंका !

काय हे भाउ नमसकर? अख्खी सिरिज गेली, एकहि व्यंगचित्र नाही? मग कशाला यायचे इथे?

आणि काय हो, तुमचा सचिन गेला की काय? या सिरिजमधे नाही, वेस्ट इंडिजला जाणार्‍या संघातहि नाही!
नंतर कुठली सिरीज? भारतात की कुठे परदेशी? कधी?
बाकी बरे आहे. आता शिखर धवन, विजय नि शर्मा यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, बघू काय काय पराक्रम करतात.

श्रीलंका आणि भारत

दक्षिण आफ्रीका आणि इंग्लंड...

-----------------------------------------------

इंग्लंड मधे सामने ठेवताच कशाला हेच कळत नाही......ठेवले तर ठेवले २० - २० ठेवा.......एकही मॅच धड होत नाही... सगळा मॅच चा मुड गायब होतो..बॅट्स्मन चा फोकस सुध्दा निघुन जातो.. ज्या मोसमात पाउस चालु नसेल अश्या मोसमातच मॅच खेळण्यात यावी.. अथवा.. बंद स्टेडीअम चा वापर करावा.. जसा ऑस्ट्रेलियात चालु केला आहे...

आणि काय हो, तुमचा सचिन गेला की काय? या सिरिजमधे नाही, वेस्ट इंडिजला जाणार्‍या संघातहि नाही! >>>>>>

झक्कीसाहेब... कोणत्या काळात वावरत आहेत...........?????

सचिन ने वनडे मधुन निवृत्ती घेतली....कधीचीच.......विसरलात की काय ? तो फक्त कसोटी सामने खेळतो आता...वेस्टैंडीज मधे आपण कसोटी नाही तर त्रिकोनी सामने आहेत........ते ही वनडे..... मग तिथे सचिन काय करणार जाउन ??????

झक्कीजी, साहेब ओडीआय मधून निवृत्त झाले आहेत, त्याचे पेढे पण वाटून झाले तुमचे; तरी विचारताय ,
'तुमचा सचिन गेला की काय'' ! Wink
घ्या तुमची फर्माईश -

anumati_0.JPG

इंग्लंड मधे सामने ठेवताच कशाला हेच कळत नाही >> खर तर champions trophy चे सामने जास्त रंगतदार झाले असे मला वाटले.

भारत श्रीलंका मॅच चा कंटाळा आलाय . आता परत ट्राय सिरीज . शेजारच्या गल्लीच्या टीमशी सुद्धा एवढ्या Frequently खेळत नसेल कुणी .

आजची मॅच अफ्रिका जिंकायला हवी . On paper We should beat Srilanka easily . They have only one genuine bowler Malinga and we play him the best .

<< On paper We should beat Srilanka easily .>> खरंय. फक्त, तुम्हीच म्हटल्याप्रमाणे 'अति परिचयात अवज्ञा' होऊं नये इतकीच प्रार्थना ! Wink
<< आजची मॅच अफ्रिका जिंकायला हवी .>> हा सामना अटीतटीचा होणार असं वाटतय. स्वान खेळला तर इंग्लंडचं पारडं किंचित जड होण्याची शक्यता. सामन्याआधीं वरुणराजाने व्हिजीटींग कार्ड पाठवलं, तर मात्र टॉस निर्णायक ठरूं शकतो [अर्थात, पावसाच्या शक्यतेमुळे ऑसीजनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेऊनही जयवर्धनेने त्यांची गोची केलीच; पण तिथं खूप मोठ्या 'मार्जीन'ने जिंकण्याचा अतिरिक्त दबाव ऑसीजवर होता व क्लार्क संघात नव्हता, हेंही खरं]. द. आफ्रिकेसाठी जयवर्धनेची भूमिका हशीम आमला साकार करण्याची खूपच शक्यता दिसते. बघूंच म्हणा.
[ " अहो, घरांत स्वतःचा चहाचा कप नाही उचलून ठेवत; आणि क्रिकेटचे मोठमोठे 'कप' घेवून नाचायचं हें नाटक मात्र बरं जमतं तुम्हाला ! ", हा मला मिळालेला घरचा अहेर ! Wink ]

आज पाऊस पडण्याची चिन्ह नाहीयेत. पडलाच तर हलका पडेल. माझा घोडा द. आफ्रिका कारण स्वान खेळण्याची शक्यता नाहीये, बाकी अँडरसन शिवाय फारसं कुणी प्रभावी नाहीये सध्या!

साउथ अफ्रीक और इंग्लैंड के बीच आज के मैच से ये तय होगा कि दोनों में से कौनसी टीम फाइनल में भारत के हाथों हारेगी।

... खबरबाजी. Proud

Pages