चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३

Submitted by केदार जाधव on 6 June, 2013 - 04:56

चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही Happy
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने Happy

वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm

June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm

June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm

June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm

June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm

June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm

June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm

June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm

June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm

June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm

June 23 Final, Edgbaston, 3 pm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या तरुण भारतीय संघाला तोड नाही. तथाकथीत गोड गुलाबी Uncertainty मुळे उद्याची फायनल हरले तरी ऑलरेडी ह्या स्पर्धेचे ते वादातीत जेते आहेत. ते जेते आहेत आणि जेत्याप्रमाणेच खेळतायत सुद्धा. पर्फेक्ट टीम. प्रत्येकाला स्वतःचा खेळ माहित आहे. त्याप्रमाणेच प्रत्येक जण खेळतो आहे. ते काय करतायत आणि खेळतायत ते प्रत्येक क्षणाला त्यांना माहित आहे. कुणी कितीही शिव्या घालो, IPL चा ह्यात मोठा वाटा आहे ह्यात शंका नाही. तंत्रशुद्धता न विसरता वेग, commitment आणि attaacking वृत्ती खेळात सगळ्यांनीच ज्या नैसर्गिक सहजपणे आणली आहे त्याला तोड नाही. शिखर धवन ज्या पद्धतीने दोन्ही बाजुला खेळतो ते नुस्तं बघत रहावं. आपल्या बर्याचश्या अति अनुभवी लेजेंड्स प्रमाणे, बाउन्सरला भेदरटासारखं फळकुट वर लोंबत ठेवुन डोकं खाली घालण्याचा भेकडपणा ( ह्यापायी ह्यांच्यावर खांद्यावर चेंडु लागुन पायचित होण्याची नामुष्की ओढवल्याचे अजुन आठवते आहे.) अजुन तरी त्याच्यात दिसला नाही. किंचित मागे झुकत डोळ्यासमोरुन चेंडु जाउ देण्याला एक आत्मविश्वास लगतो. जिव खाउन चेंडु आपटल्यावरही फलंदाजावर त्याचा ढिम्म परिणाम होउ नये, हे वेगवान गोलंदाजासाठी फारच खच्चीकरण करणारं असतं. अ‍ॅटॅक विथ पर्फेक्शन and minimum riskचं गणीत धवनला सुंदर जमलय. रोहित शर्मा भले फेल गेला असेल अधिच्या काही मॅचेस, पण त्याच्याकडे चिवटपणे उभं राहण्याची बंबैया जिद्द आहे ती संघाच्या आतोनात गरजेची आहे. विराट कोहलीची बेदरकार बॅटींग खुद्द सर व्हीवीयन रीचर्ड्सना स्वत:च्या बॅटींगची आठवण करुन देते तेव्हा त्याच्याबद्दल अधीक काही बोलायची गरजच उरत नाही. प्रत्येक फलंदाज स्वतःच्या विकेटसाठी, प्रत्येक गोलंदाज समोरच्या फलंदाजाला विकेटवर साधं टिकुन राहण्यासाठी आणि क्षेत्ररक्षक प्रत्येक धावेसाठी प्रतिस्पर्ध्याला झगडायला लावतो आहे! आणि हे चित्र भारतीय संघाचं आहे ह्यापरते दुसरे भाग्य नाही!

हा अ‍ॅटिट्युड आणि क्लास सहजासहजी आलेला नाही ह्याचेही स्मरण असुद्या. ह्याची सुरुवात तीस वर्शांपुर्वी करुन दिली ती श्री कपिलदेव निखंज यांनी. त्यानंतर अझ्झुभाय, दादाने जिंकण्याची जिगर जोपासली, वाढवली. आपला आपला छोटा-मोठा वाटा उचलुन गेलेले यशपाल शर्मा, श्रीकांत, कुंबळे, रॉबिन सिंग,कैफ, झालच तर रितेंदर सोढी. ही आणि अशी अनेक नावे या परंपरेत घ्यावी लागतील. आता तर अशी परिस्थीती आहे की आपल्याकडे कुठल्याही परिस्थितीत न हरण्याची नियत तयार झाली आहे. पुढची दोन तीन वर्षे तरी आपल्याला चिंता नसावी. पुढचं पुढे.

पण साला खंत एव्हडीच आहे, भले अनेक विक्रम असतील नावावर पण विजिगिषु वृती जोपासण्याच्या ह्या परंपरेत श्री रा रा तेंडुलकरांचे नांव डोळ्यासमोर कितीही आणायचं म्हटलं तरीही येत नाही.

भले अनेक विक्रम असतील नावावर पण विजिगिषु वृती जोपासण्याच्या ह्या परंपरेत श्री रा रा तेंडुलकरांचे नांव डोळ्यासमोर कितीही आणायचं म्हटलं तरीही येत नाही.>>>>>

नतद्राष्टा, पुर्णपणे असहमत!

पाकिस्तान विरुद्ध पदार्पणात नाकावर इम्रानचा बाऊंन्सर लागुन रक्त येत असुनही पॅव्हेलियन मध्ये न जाता निडरपणे वकार, इम्रान, अक्रम समोर उभा ठाकलेला सचिन आठव!

अम्ब्रोजच्या उसळत्या मार्‍यासमोर.. मॅग्रा सारख्या अचुक बोलरच्या गोलंदाजीवर सिडने अ‍ॅडलेड इथे सहज फटके मारणारा सचिन आठव..

अँडी कॅडिकच्या उसळत्या चेंडूला मैदाना बाहेर भिरकावणारा सचिन आठव

ग्वाल्हेरच्या द्विशतकावेळी आता ह्याला चेंडू कसा टाकावा ह्या विवंचनेत हवालदिल झालेला डेल स्टेन आठव..

जोहान्सबर्गच्या उसळत्या खेळपट्टीवर डोनाल्ड आणि कंपनीचे चेंडू टोलवणारा सचिन आठव...

एवढे प्रसंग आहेत की काय काय लक्षात ठेवावे ह्या विवंचनेत तू विसरलायेस बहुतेक! Light 1 Happy

रितेंदर सोढी .... पण साला खंत एव्हडीच आहे, भले अनेक विक्रम असतील नावावर पण विजिगिषु वृती जोपासण्याच्या ह्या परंपरेत श्री रा रा तेंडुलकरांचे नांव डोळ्यासमोर कितीही आणायचं म्हटलं तरीही येत नाही. >> Lol बरय तुमच्या समोर सचिनन्चे नाव आले नाही ते, तो नि आम्ही पण सुटलो. कालचे match fixing वाले परवडले असे म्हणायची वेळ आली.

कॅडिकला भिरकावला हे तुम्ही गार्नर आणि मार्शलला भिरकावल्याच्या थाटात सांगताय. Proud
ह्याच अ‍ॅम्ब्रोजने पुर्ण सीरीजमधे मामा केला होता ह्यांना. अ‍ॅम्बोजच्याच चार च्या चार बाहेर जाणार्‍या चेंडुना लोंबत पाचव्याला कट लावुन बाद झालेला पण हाच ना तो तुमचा ....
मॅक्ग्राने पन्नासवेळा नाचवल्यावर कधीतरी पुढे येउन मिडऑफवरुन चौकार खेचलेले न आठवायला काय झाल?
पकिस्तानच्या विरुद्ध १५-२० षटकात १७ धावा हव्या असताना विकेट फेकणारा हाच ना तो तुमचा... नंतर रांग लागली. १३ मधे ५ विकेट गेल्या. आपण हरलो ती टेस्ट.

तेंडुलकरांशी वैयक्तिक वाकडं नाही. तो थोरच आहे. त्यांचं खरोखरच सगळच उत्तम आहे. पण.......... Proud

आणि हो- मुळात लागतोच कसा हो चेंडु नाकावर? चांगल्या फलंदाजाचे लक्षण नव्हे ते. ( शेवटच वाक्य उगाच बरका फक्त. )

काय म्हणता काय असामी! मतितार्थ वेगळ आहे. तुम्ही बसा दळत एक नांव/शब्द उचलुन धरुन. असो.

१५-२० षटकात १७ धावा हव्या असताना विकेट फेकणारा हाच ना तो तुमचा... नंतर रांग लागली. १३ मधे ५ विकेट गेल्या. आपण हरलो ती टेस्ट. >>>>>

अच्छा म्हणजे नंतर १३ धावात ५ जणं जाणारे उत्तम! पण लढत उभा राहिलेला हा ऑट झाला म्हणून विकेट फेकली! वाह रे न्याय!

ह्याच अ‍ॅम्ब्रोजने पुर्ण सीरीजमधे मामा केला होता ह्यांना. अ‍ॅम्बोजच्याच चार च्या चार बाहेर जाणार्‍या चेंडुना लोंबत पाचव्याला कट लावुन बाद झालेला पण हाच ना तो तुमचा ....>>>

त्याच अम्ब्रोजला त्याने फटकावलेले नाही आठवत!

चालायचेच खेळतानाची फटकावलेले जास्त चेंडू लक्षात ठेवण्यापेक्षा आऊट झालेला एक चेंडू लक्षात ठेवणे खूप सोपे.. त्यामुळे नजरेसमोर तेच येणार ना! Proud

कृष्णा, खाली कोणी नव्हतं अहो खेळणारं. बॉलर उरले होते सगळे. तेव्हा जपुन खेळायला हव होतं. असो. तेंडुलकर थोरच आहे. थोरच राहिल. आणि ह्यासाठी माझ्या संमतीची गरज नाही. जे आहे ते माझं मत आहे. आणि ते बदलणं कठीण आहे. वाद कशाला उगाच. चालु स्पर्धेबद्दल बोलु. क्काय? उद्या आपण जिंकणार हे नक्की.

जे आहे ते माझं मत आहे. आणि ते बदलणं कठीण आहे. >>>>

तेही बदलू शकेल एकदा बसायला हवे निवान्त त्यासाठी चर्चेला! Wink

ज्जे ब्बात!! मत बदलो न बदलो... बसायचं कधी ते बोला. Proud भेटा उद्याच. डेक्कनवर पूनममधे. मोठ्या पडद्यावर मॅचपण बघु.

भेटा उद्याच. डेक्कनवर पूनममधे. मोठ्या पडद्यावर मॅचपण बघु.>>>

नाही रे! उद्या नाही शक्य मी पुण्यात नाही ना सध्या. आलो की नक्की हृदय परिवर्तन बैठक! Proud

काय म्हणता काय असामी! मतितार्थ वेगळ आहे. तुम्ही बसा दळत एक नांव/शब्द उचलुन धरुन. असो. >> काय आहे की तुमचे पोस्ट मस्त आहे असे लिहीणार होतो पण शेवटचे वाक्य वाचल्यावर त्या पूर्ण पोस्टचे प्रयोजन लक्षात उघड झाले. 'नतद्रष्ट' हा एक शब्द'च' पुरेसा होता. Lol

स्वतःच घेतला आहे तो शब्द. त्यात काय नविन? आणि प्रयोजन वगैरे सगळे तुमच्या मनाचे खेळ आणि सोय असावी. शेवटच्या वाक्यासाठी आधीचा प्रपंच वगैरे खुळचटपणा आहे. तेव्हडच लिहायच असतं तर ते तसच आणि तितकच लिहिलं असतं. मुळात ते लिहिता लिहिता मनांत आलं इतकच आहे. इतकं स्पष्टीकरण पुरेसं असावं. खरं तर त्याचीही गरज नव्हतीच.

तुमचे पोस्ट मस्त आहे असे लिहीणार होतो पण शेवटचे..... >>> Lol

हृदय परिवर्तन बैठक >>> Rofl

मी काही सचिनचा फॅन वगैरे अजिबात नाही.... वेळप्रसंगी त्याच्यावर टीकापण केलेली आहे पण तरीही अझ्झुभाय,कैफ आणि झालच तर रितेंदर सोढी यांच्या पंक्तीला त्याला नाही बसवलत हे बरेच केलत... १० रितेंदर सोढी एकत्र केले तरी एक सचिन बनू शकणार नाही Wink

<< ह्याची सुरुवात तीस वर्शांपुर्वी करुन दिली ती श्री कपिलदेव निखंज यांनी. >> मला वाटतं जिंकायची चटक लावण्यात वे.इंडीज व इंग्लंडच्या दौर्‍यातील वाडेकरचं धडाडीचं नेतृत्वही विसरून चालणार नाही.
सुनील व सचिन याना आत्ताच्या आपल्या संघासारख्या सर्वांगसुंदर संघातून खेळायला मिळालं नव्हतं हा मुद्दा त्यांच्या महानतेचं विश्लेषण करताना लक्षांत घेणं अत्यावश्यक आहे. मग ते दोघेही स्वतःच्या क्रमवारीत कुठे बसतात हे ठरवण्यासाठी इतर काय निकष लावायचे हा अर्थातच प्रत्येकाचा अधिकार आहे. माझ्याच पुरतं बोलायचं तर केवळ सचिनच्या शैलीदार, तडफदार खेळाने व असाधारण भरीव कामगिरीने दीर्घकाळ निखळ आनंद दिला आहे, या निकषावर तो खूपच वरच्या स्थानावर आहे.

असो. उद्याच्या सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा व वरुणराजाच्या कृपेसाठी प्रार्थना !

वाडेकरचं धडाडीचं नेतृत्व >> अगदी अगदी.

थोडं मागे जायचं म्हटलं तर पतौडी, मांकड, हजारें, सी के नायडुपर्यंतही जाता येइल. चंद्रा-बेदी-प्रसन्ना ची अजोड फिरकी आहे. फरुख इंजिनिअरची फलंदाजी आणी यष्टीमागची कारकिर्द आहे. किरमाणी वेंगसरकर आहेत. मोहिंदर अमर्नाथला तर विसरुन चलणारच नाही. फिटनेसच महत्व जाणलेला तो पहिला भारतीय क्रिकेटपटु. सुनिल गावस्करला समर्थपणे साथ देणारा पण एकही सेंचुरी न करु शकलेला चेतन चौहान आहे. किंवा पहिल्याच सीरीजमधे वेस्ट इंडीज विरुद्ध गावस्करच्या ९०० धावांच उदाहरण आहे. तरीही कुठेतरी त्यावेळचे भारतिय क्रिकेट सतत दबावाखाली, under estimated असावं असं वाटत राही. पण जागतिक स्तरावरचा पहिला महत्वाचा विजय म्हणुन ८३चा टप्पा ही सुरुवात महत्वाची वाटली.

तेंडुलकरचं स्थान वादातितपणे वरचच नव्हे तर पहिलं आहे. त्याला त्याचा स्वतःचा खेळ सुरुवातिचा काही काळ सोडला तर कधिच खेळता आला नाही. 'मी आउट झालो तर पुढे अंधार आहे' याचं सगळं ओझं खांद्यावर घेउन २३ वर्ष बिचारा खेळत राहिला. तेही कुठलीही तक्रार न करता. एक फटका मिसटाईम झाल्यावर १७ वर्षाच्या तेंडुलकरच्या खांद्यावर हात ठेउन मस्तवाल अब्दुल कादिरने सबुरीचा दिलेला सल्ला तेंडुलकरच्या इतका जिव्हारी लागला होता की त्याचा विखार त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसला होतां. कादिरच्या पुढच्याच षटकात साहेबांनी कादिरला पुढे येउन तीन वेळा ग्राउंडबाहेर भिरकावला होता. पुढे त्याला ह्या आक्रमकतेला संघाची गरज म्हणुन अपरिहार्यपणे लगाम घालावा लागला. त्याच्या कुवतीइतका खेळ करण्याचं स्वातंत्र्य त्याला कधीच मिळु शकलं नाही. म्हणुनच तर 'खंत' जास्त खोल आहे. असो.

आज पाऊस! Sad

काय घोळ घालतोय कोण जाणे!

नतद्रष्टा, Happy
सहमत! Happy

साहेबांचे असे विखारी उत्तरं आली तर डोळ्यापुढे... आणि रावळपिंडी एक्सप्रेसने बोलून डिवचल्यावर मारलेले फटके आणि मग अनुभवी अक्रमने शोएबला दिलेला सबुरीचा सल्ला! Happy

"Some Hope with Inspction at 3 pm" - 'क्रिकइन्फो'वरची आत्तांची खबर !

आत्ताच सुनंदन लेले न्यूज चॅनेलवर सांगत होते की पिरपिरा पाउस चालू आहे..... सगळीकडून भरुन आले आहे.... मॅच होण्याची शक्यता अतिशय कमी आहे Sad

इंग्लड वर बॅन आणायला हवा......... त्यांच्या देशात कोणतेही सामने खेळवु नये.......सगळ्या स्पर्धेचा विचका झाला आहे..त्याचा परिणाम सगळ्याच निकालावर झाला....

पाउसाचा मोसम आहे...स्पर्धा शेवटचीच आहे...चॅम्पिअन ट्रॉफी आहे...तर किमान सेमीफायनल आणि फायनल ला एक एक दिवस तरी राखीव असायला हवा....

मुर्ख लेकाचे

>>आजच माझ काम डकवर्थ्-लुइस फॉर्म्युला वापरुन कमी करणार ना?
हो ९२च्या विश्वचषकातल्या आफ्रिका टीमसारखे.... एका चेंडूत २२ धावा Wink

<< मॅच होण्याची शक्यता अतिशय कमी आहे >> कुणी तरी म्हटलंय, असं झालं तर इंग्लंडचा ऐतिहासिक विजय होईल व स्पर्धेत अजिंक्य रहाण्याचा भारताचा विक्रमही अबाधित राहील ! Wink

Pages