चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने
वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm
June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm
June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm
June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm
June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm
June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm
June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm
June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm
June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm
June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm
June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm
June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm
June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm
June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm
June 23 Final, Edgbaston, 3 pm
उदयन.., १. >> अरे हा सल्ला
उदयन..,
१.
>> अरे हा सल्ला नाही आहे.... याला आदेश म्हणतात
मोदींची भाषणे ऐकत बसण्याचा आपला आदेश शिरसावंद्य! कारण की मोदी भ्रष्टाचारी नाहीत. आपण हाच आदेश बक्कीच्या भ्रष्ट नेत्यांनाही द्यावा ही विनंती.
२.
>> तुमचे अजुन काय आहे माहीत आहे सगळ्यांना
असणारंच! हे काही देवदुर्लभ रहस्य नाही. जगातल्या अर्ध्या लोकांचं आहे तेच माझंही आहे.
३.
>> ४ झेल सुटले हे काय तुम्हाला ___ नी सांगितले ? उगाच फाटे फोडुन लिहायचे म्हणुन बिनडोक लिहु नका...
जीवदानं म्हणजे केवळ झेल नव्हेत. आणि मी फाटे फोडले नाहीयेत. किंबहुना हा माझा मूळ मुद्दा आहे. असो. हा माझा संशय नाही. cricinfo या नामांकित संकेतस्थळावर व्यक्त झालेला आहे.
आ.न.,
-गा.पै.
अहो उदयन, तुम्ही नेहमी फार
अहो उदयन,
तुम्ही नेहमी फार पर्सनल होता बॉ. तुम्ही फार तर विरोध दर्शवून गप्प बसू शकला असता. जसे माझ्यासहीत इतरांनी केले. पण ही टिपन्नी गरज नसणारी आहे. उगाच भांडणं वाढवणारी. पण हे आपले माझे मत.
क्रिकेट बद्दल लिहा इथे.
कारण की मोदी भ्रष्टाचारी
कारण की मोदी भ्रष्टाचारी नाहीत >>>
विनोदी लिहितात राव... अदानीच्या घरी पाणी भरतो तुमचा मोदी 
असो...इथे क्रिकेट बद्दलच चर्चा करावी आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे फिक्स आहे तर तुमच्या सारख्या _______ या धाग्यावर स्थान नाही...(रिकाम्याजागी तुम्हाला हवा तो शब्द भरा)
केदार......असल्यांशी असेच
केदार......असल्यांशी असेच बोलावे लागते हो.. नाईलाज आहे.. तरी सुधारणा होत नाही यांच्यात...
तरी सुधारणा होत नाही
तरी सुधारणा होत नाही यांच्यात... >>
उदयन, मोदी, भाजपा ह्यांचा संबंध इथे क्रिकेटवर गा मांनी आणलेला दाखवला तर मी आपला उपकृत राहीन. पहिली पोस्ट तुमची आहे. त्यांनी संशंय व्यक्त केला जो कोणीही करू शकतो.
आय डोन्ट थिंक त्या संशयामुळे तुम्ही लगेच त्यांच्याशी तलवारी घेऊन भांडायला यायला पाहिजे. परत बायकी मन वगैरे वगैरे. ह्याची कोणती गरज आहे हे सांगा? अन्यथा विषय बंद करा.
जेंव्हा पाहाव तेंव्हा व जिकडे पाहावे तिकडे हे विषय आणायची गरज आहे असे मला वाटत नाही.
निट जिंकत असताना उगाच वाद
निट जिंकत असताना उगाच वाद संशय व्यक्त करणे चालु करणे या प्रकारालाच उत्तर आहे...
ते कधीच निट संशय व्यक्त करु शकत नाही.. हे पुर्वीपार आहे.(. उगाच नको त्या ठिकाणी संशय व्यक्त करणे याला "बायकी मन" म्हणतात .. )
मी फक्त त्याना समजेल अश्याच भाषेत लिहिले आहे....
. उगाच नको त्या ठिकाणी संशय
. उगाच नको त्या ठिकाणी संशय व्यक्त करणे याला "बायकी मन" म्हणतात >> लोल. रादर हे उदगार समस्त स्त्री समुहाविषयी अनुदार आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?
हा एक वाक्प्रचार आहे... असे
हा एक वाक्प्रचार आहे...
असे बरेच आहे ज्यात समस्त स्त्री काय पुरुष वर्ग सुध्दा येतो... ज्यात बरेच अनुदार आहेत...;)
असो... हे क्रिकेट संबधात नाही आहे.. हवे तर या वर तुम्ही विपुत बोलु शकतात ..;)
.
.
असो... हे क्रिकेट संबधात नाही
असो... हे क्रिकेट संबधात नाही आहे >>. चला आता कसं बरं वाटलं. मी तेंव्हापासून हेच सांगत आहे. (माझ्या पोस्ट वाचा, पण दरवेळी प्रत्युत्तर आणि कारणं होतीच. )
चला तर मग आता मोदी, स्त्री मन भाजपा वगैरे सोडून. क्रिकेटवरच बोलू.
बरोबर....... अंतिम सामन्यात
बरोबर.......
अंतिम सामन्यात भुवनेश्वर ने कुक ची विकेट काढायला हवी..
कारण त्याचे बळी ठरले ते असे
द आफ्रिका- इंग्राम (डावखुरा)
वेस्ट इंडीज- ख्रिस गेल (डावखुरा)
पाकिस्तान- नासिर जमशेद (डावखुरा)
श्रीलंका- परेरा (डावखुरा)
आता
इंग्लंड - कॅप्टन कुक (डावखुरा) .............:)
उदयन, तुमची भाषा सांभाळा आणि
उदयन,
तुमची भाषा सांभाळा आणि वैयक्तिक न होता प्रतिसाद द्या.
हीं प्रतिभावान तरूण मंडळी
हीं प्रतिभावान तरूण मंडळी सध्यां इतका अप्रतिम खेळ करताहेत, त्यांच्या पाठीवर आतां दिलखुलासपणे शाबासकीची थाप तर मारूंया !
अत्यंत अभिमानाने नि आनंदाने +१०००.
जे फुकट 'फिक्सिंग' वगैरे म्हणतात किंवा भारत फायनल हरल्यास काय शिव्या द्यायच्या याची चर्चा करतात त्यांना कळत नाही की खरे काय बघायचे सामन्यात.
आता मायबोली आहे तेंव्हा जिथे तिथे काँग्रेस, भाजपा, हिंदू धर्माला शिव्या, कोण परदेशात राहून लिहीतो, गांधी वि. सावरकर, वैयक्तिक कुचाळक्या हे सगळे येईलच. कारण मायबोलीवरल्या बर्याच लोकांना मुद्देसूद चर्चा म्हणजे काय ते माहितच नाही. नि कुजकी मने! चांगले काही डोक्यात येतच नाही!!
(No subject)
Mastach bhau ! Let's focus on
Mastach bhau !
Let's focus on cricket .
By the way , just to clarify , whatever highlighted on cricinfo was a light hearted comment comparing it with sachin being dropped In world cup semi . I have also written many comments there like I am better keeper than akmal . Dont take that seriously or as basis of any theory .
केदारजी, मी पूर्णपणे सहमत
केदारजी, मी पूर्णपणे सहमत आहे. किंबहुना, माझं तर म्हणणं आहे क्रिकेट समजून घेण्यासाठीं लेख, माहिती, कॉमेंटस जरूर वाचावेत पण क्रिकेटमधलं आपल्याला खरंच काय आवडतं,भावतं हें स्वतःशीं प्रामाणिक राहूनच ठरवावं व वाटलंच तर तें बिनदिक्कत सांगावं. शेवटीं, क्रिकेट हा खेळ आहे व तो आपल्यासाठीं आहे ,आपण क्रिकेटसाठीं नाही !
Anderson हा भारताच्या विजया
Anderson हा भारताच्या विजया आड येऊ शकतो
उद्या पुन्हा टी शर्ट काढून
उद्या पुन्हा टी शर्ट काढून फिरवायला दादा नाही टीम मध्ये!
कॉमेंटेटर बॉक्स मध्ये बसून फिरवावा त्याने!
<< Anderson हा भारताच्या
<< Anderson हा भारताच्या विजया आड येऊ शकतो >> वातावरण ढगाळ असेल तर एकंदरीतच इंग्लीश तेज गोलंदाजी भारताच्या मजबूत फलंदाजीचीही खरी कसोटी ठरूं शकते. अर्थात, त्याच परिस्थितीचा लाभ उठवण्याइतपत आतां आपली 'सीम' गोलंदाजीही भेदक आहे [भु.कुमार तर खतरनाक ठरूं शकतो],
याची एव्हाना सर्वच संघांना जाणीव झाली आहे !
शिवाय, मोक्याच्या वेळीं हमखास टॉस जिंकायची धोनीला मिळालेली दैवी देणगी तर सोबतीला आहेच !!
वातावरण ढगाळ असेल तर एकंदरीतच
वातावरण ढगाळ असेल तर एकंदरीतच इंग्लीश तेज गोलंदाजी भारताच्या फलंदाजीची खरी कसोटी ठरूं शकते. >>>
ह्या कसोटीला आमची आघाडीची जोडी उतरली तर मग बाकी इंग्रज गोलंदाजांवर दडपण आणू शकतील!
थोपुवरची एक कॉमेंट: लंकेच्या
थोपुवरची एक कॉमेंट:
लंकेच्या या संघापेक्षा १९९० मधला रामानंद सागरांचा लंका संघ पण भारी खेळला असता
आजचा सामना तुल्यबळ होण्याची शक्यता आहे... दोन्ही संघाचे पहीले ३-४ फलंदाज चांगल्याच फॉर्मात आहेत... पहीली काही षटके संथ खेळून नंतर हल्ला चढवायचा ही इंग्लंडची स्टॅटेजी बर्यापैकी काम करतीय... इंग्लंडची बॉलींग चांगलीच आहे पण भारताचे मध्यमगती-तेज गोलंदाज पण चांगली कामगिरी करतायत.... यादव बिचारा चांगली बॉलींग करुन पण वि़केट घेण्याच्या बाबतीत कमनशिबी ठरतोय
फक्त आता तिकडे पाउस पडायला नको.... नाहीतर चांगल्या मॅचचा विचका व्हायचा!
क्रिकेटवरच बोलू.>>> सल्ला
क्रिकेटवरच बोलू.>>> सल्ला चांगला आहे केदार, पण उत्तम चाललेल्या चर्चेत उगाच कोथिंबिर किड्यासारखा वास सोडणार्या पोस्ट आल्या आणि वर तसल्याच कोणत्यातरी किड्याचे कॉमेंट स्क्रीनशॉट्स टाकायचे, की त्रागा होणारच. त्यांनाही जरा आवरा.
कॉमेंटेटर बॉक्स मध्ये बसून
कॉमेंटेटर बॉक्स मध्ये बसून फिरवावा त्याने!<<< इंडिया पाकिस्तान मॅचला अयाझ मेमन गांगुलीला विचारत होता, तू यंदापण शर्ट काढणार का?
दादा म्हणे, व्हाय नॉट.
दादा म्हणे, व्हाय नॉट. >>>>
दादा म्हणे, व्हाय नॉट. >>>> अगदी!
तो कदाचित करून दाखवेल पण! दादा तेवढा जिगरबाज नक्की आहे!
देवा उद्या मॅचची सुरुवातीची
देवा उद्या मॅचची सुरुवातीची किमान ३५ ओव्हर तरी झाली पाहीजे.............
का रे .... तुझ्या फँटसी
का रे .... तुझ्या फँटसी टीममध्ये सगळे बॅट्समन आहेत का?
नाही रे..............बॉलर्स
नाही रे..............बॉलर्स आहेत...

.
.
पहिल्यांदा ४ बॅट्स्मन आणि ६ बॉलर्स घेउन खेळतोय... इतका धोका तर स्टीव वॉने देखील पत्करला नसेल
माझे या टुर्नामेंटमधले सगळेच
माझे या टुर्नामेंटमधले सगळेच अंदाज चुकतायत..... मी खेळत असलेल्या दोन्ही-तीन्ही लीगमध्ये तळाशी आहे .... आता उद्या बाकीच्यांच्या टीम बघून त्यांनी न घेतलेल्या खेळाडूंना घेउन खेळणार... या लीगमध्ये आता नथिंग टू लूझ या मोडमधे आलोय मी
४ मॅचेस न खेळल्या मुळे मी
४ मॅचेस न खेळल्या मुळे मी देखील तळाला आहे... माझे बरोबर बसलेत..काही सम्मानिय अपवाद सोडुन ..;)
चार मॅचेस नाही खेळलास्? मग
चार मॅचेस नाही खेळलास्? मग भरपूर ट्रान्स्फर उरल्या असतील की.... आमच्या ऑफिसमधल्या एकाने निम्म्या टुर्नामेंटनंतर सुरुवात केली... दर मॅचला ७-८ जणांना खेळवून भरपूर पॉइंट्स लुटले...पण त्यात काही मजा नाही म्हणा!
हो सुट्टीवर होतो... मग घरी
हो सुट्टीवर होतो... मग घरी गेल्यावर कुठे इंटरनेट ? कंम्पुटर वर बसायला नकोसे होते..
.
.
.
माझे अजुन ५-६ उरले असतील ....... ६ इंग्लंड चे आणि ६ भारताचे घेउन सुध्दा...
Pages