चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३

Submitted by केदार जाधव on 6 June, 2013 - 04:56

चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही Happy
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने Happy

वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm

June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm

June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm

June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm

June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm

June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm

June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm

June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm

June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm

June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm

June 23 Final, Edgbaston, 3 pm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

This is ridiculous, Why can't they have reserve day at least for the final. With continuous interruptions, batting will be hard.

.Well played India ! Now that's the stuff worth wating for 5 hours to Start !!!

टॉस हरून, प्रथम फलंदाजी करून, ढगाळ वातावरणाचा फायदा इंग्लंडला मिळाल्याने कमी धांवा होऊनही हा विजय मिळवणं ... हॅटस ऑफ या भारतीय संघासाठी !!!!

'बूकीपिडिया' च्या विश्वसनीय सूत्रांकडून असे कळ्ळेय की पाकिस्तान किंवा इंग्लंड जिंकणार. खरी स्पर्धा आहे ती दुबई आणि कराची मध्ये!!
>>> आता याच उत्तर द्यायला कुणी येणार आहे का ? Happy
चुकून आज इंग्लंड जिंकल असत तर बघा आम्हाला आधीच माहित होत , म्हणणार्यांची गर्दी झाली असती Happy

जिंकली रे! हुर्रे!!! Happy

आणि मागे नेटवेस्ट जिंकल्यावर दादाने शर्ट काढून फिरविला! त्यामुळे ह्यावेळी सगळ्या खेळाडूंना साहेबांनी कोट दिले!!! Proud

<< आणि मगे नेटवेस्ट जिंकल्यावर दादाने शर्ट काढून फिरविला >> तें त्याने आतां करूं नये म्हणून तर त्याच्याच हस्तें धवन व जडेजाला बक्षिसं देण्याचा डाव रचला सायबानी !! Wink
मला वाटतं अश्विनचे चेंडू वळताहेत हें पाहिल्यावरच इंग्लीश संघावर दडपण आलंच व धोनीने त्याचा पुरेपूर लाभ उठवला ! ग्रेट !!!
शुभ रात्री.

T-20 World Cup मधे जोगिंदर ची ओव्हर, ह्यावेळी Champions Trophy मधे इशांत शर्माला देणे. धोनीचे calls gutsy असतात नि Fortune favors brave.

मस्त मस्त. झाली कालची मॅच. बेलला लटकवला मात्र. benefit of doubt हा batsman ला द्यायला हवा होता. तिथे खरी मॅच फिरली.

इशांत शर्माला ओव्हर देऊन धोनीने जी जिगर दाखवली त्याला तोड नाही.

India!!! India!! Happy

भाऊ, डकवर्थ वाले कार्टुन धमाल आहे. Happy

T-20 World Cup मधे जोगिंदर ची ओव्हर, ह्यावेळी Champions Trophy मधे इशांत शर्माला देणे. धोनीचे calls gutsy असतात नि Fortune favors brave. > +१ अगदीच.. मलाही त्या वेळी जोगिंदर आठवला होता.

<< ह्यावेळी Champions Trophy मधे इशांत शर्माला देणे >> वास्तविक कुमार व यादव याना अग्रक्रम देणं स्वाभाविक असूनही इशांतला चेंडू देवून इंग्लंडला अनपेक्षित असं कांहीं करून बुचकळ्यात टाकण्याचा धोनीचा कावा यशस्वी झाला, असंच वाटतं. फिरकीचे चेंडू चांगलेच वळताहेत, हेंही इंग्लीश फलंदाजाना अनपेक्षितच असावं. व मुख्य म्हणजे अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दबाव भारतीय संघाने कायम ठेवला; धोनीचं यष्टीरक्षण तर काल 'इलेक्ट्रीफाईंग'च होतं व त्याची जाणीव इंग्लीश फलंदाजाना क्रीझमधेच रोखून ठेवत होती. मॉर्गन सोडला तर इतर कोणताही इंग्लीश फलंदाज धोकादायक वाटला नाही. [ वरुणदेवालाही इतर देवानी झापलं असावं म्हणून तोही मग शांतपणे लांबूनच सामना बघत बसला असावा ! ]
एकंदरीतच, ही स्पर्धा गुणवत्तेवरून भारताचीच होती व अंतिम निकाल न्याय्यच होता !

वरुणदेवालाही इतर देवानी झापलं असावं म्हणून तोही मग शांतपणे लांबूनच सामना बघत बसला असावा >>>>

हो ना अगदी क्षितिजावर दबा धरून बसला होता! Happy

आनंदाचा बहर ओसरल्यावर कांहीं क्षुल्लक वाटणार्‍या पण नोंद घेतलीच पाहिजे अशा गोष्टी लक्षांत आल्या -
१. ईशांत शर्माने नेमकं नको त्यावेळीं वाईट व मग वाईड चेंडू टाकला; शिवाय, सामन्यातील बहुधा एकमेव ' मिसफिल्डींग' केली . पण धोनीने चेहर्‍यावर उद्वेग तर सोडाच ,साधी नाराजीही दर्शवली नाही. परिणामीं, ईशांतनेच सामन्याला कलाटणी देणारं दोन महत्वाचे बळी घेणारं षटक टाकलं !;
२. बक्षिस समारंभात नाझीर हुसेनने धोनीच्या आतांपर्यंतच्या विजयमालिकेचं कौतुक करत ' पुढे काय विचार आहे ' विचारलं, तर हुरळून न जातां हा पठ्ठ्या म्हणतो ' झालं तें झालं, आतां वे. इंडीजच्या दौर्‍यावर लक्ष केंद्रीत करायचंय !'. जिंकल्यानंतरच नाहीं तर हल्लींच लागोपाठ दोन मालिका हरल्यानंतरही त्याची हीच जाहीर भुमिका होती, हें खरंच कौतुकास्पद !;
३. हुसेनने भारताच्या आतां सुधारलेल्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करतांच, भारतातील मैदानांचा दर्जा खूपच सुधारला असल्याने आतांचे खेळाडू 'डायव्हींग ', 'स्लायडींग' करायला कचरत नाहीत असं म्हणून पूर्वीच्या खेळाडूना संभाळून घेत बीसीसीआयला देखील धोनीने याचं योग्य श्रेय दिलं ;
४. स्पर्धेत अजिंक्य राहून, सर्वोत्तम गोलंदाजी व फलंदाजीचा किताब मिळवून भारत जिंकला. इंग्लंड घरच्या मैदानावर हरल्याने त्यानी दु:खी असणं स्वाभाविक असलं तरीही त्यांच्या कर्णधाराने बक्षिस समारंभात ही गोष्ट खिलाडूवृत्तीने मान्य करणं औचित्यपूर्ण ठरलं असतं. याबाबतीत सर्वच भारतीय कर्णधार खूपच उजवे ठरतात

५] पावसाने निर्माण केलेल्या कंटाळवाण्या अनिश्चिततेतही तासन तास ताटकळत आशेने थांबलेल्या भारतीय पाठीराख्या क्रिकेटप्रेमींना खरंच सलाम [ अर्थात, त्याचं पुरेपुर माप त्यांच्या पदरांत पडलं, हें आहेच !]

ईशांतची बॉलिंग बेकार पडत असतानाही धोनीने त्यालाच ती ओव्हर दिली त्याचं नक्की कारण समजलं नाही. त्याच्या बॉलिंगमधे काही तरी वेगळं आहे हे त्याला जाणवलं जे मला तरी समजलं नाही. शिवाय शेवटच्या दोन पॉवर प्लेच्या ओव्हरी स्पिनर्सना देण्याचं तसेच मागच्या एका मॅचमधे बॉलिंग करण्याचं ऑउट ऑफ द बॉक्स थिकिंग केवळ धोनीच करू जाणे! हॅट्स ऑफ टू धोनी!

यापुढे टेस्ट मॅच वाहून जाणार असेल तर तिचा निकाल पण २०/२० चा सामना खेळवून ठरवणार असं म्हणताहेत सगळे! Proud

याच्या बॉलिंगमधे काही तरी वेगळं आहे हे त्याला जाणवलं जे मला तरी समजलं नाही. >> कारण इंग्लिश बॅटर्सनी इशांतला आधीच्या तीन ओव्हर्स मध्ये टारगेट केले होते. त्याने विचार केला की जर विकेट पडल्या तर इशांतच्या ओव्हर मध्ये कारण ते लोकं परत त्याला टारगेट करतील आणि तसेच झाले. अर्थात धोणीला दोन विकेट पडतील असे अजिबात वाटले नसेल पण बॉलिंग देताना एक तरी पडेल हे वाटले त्यामुळेच त्याला दिली. इशांतला चांगल्या बॉलवर विकेट मिळण्यापेक्षा त्यांच्या खराब फटक्यामुळे विकेट मिळाल्या असे एक वेळ म्हणताही येईल पण इशांतचा स्लो बॉल मॉर्गनला ओळखता आला नाही हे ही तितकेच खरे.

आपल्या विकेट पण रवी बोपाराला पडल्या जो इतरांच्या मानाने खूपच स्लो आहे. त्यामुळे अर्थातच स्पिनर्सला शेवटच्या दोन देणे ऑलमोस्ट अपरिहार्यच होते. इशांतच्या ओव्हर नंतर ते खूप प्रेशर मध्ये खेळले. अर्थात आज आपणही हाराकिरी केली. केवळ मॅच जिंकल्यामुळे ती आत्ता जाणवत नाहीये. पण जो जिता वही सिंकदर. Happy

धोणीची कॅप्टन्सी, आपल्या लोकांचे जीगर /प्रेशर हॅन्डल करणे आणि चांगली बॉलिंग ह्यामूले मॅच जिंकली. हे प्रेशर कदाचित IPL मुळे पण नीट हॅन्डल करता येत असावे.

<< काही तरी वेगळं आहे हे त्याला जाणवलं जे मला तरी समजलं नाही.>> 'अनपेक्षित' घटक आणून इंग्लीश फलंदाजाना कांहींसं चकवण्यापलिकडे दुसरं कारण असेल असं मलाही वाटत नाहीं. पण ज्या तर्‍हेने चेंडू वळत होता व वरचे फलंदाजही चकत होते तें पाहून <<शेवटच्या दोन पॉवर प्लेच्या ओव्हरी स्पिनर्सना देण्याच >> मात्र काल तरी योग्यच वाटलं.
<<...तिचा निकाल पण २०/२० चा सामना खेळवून ठरवणार असं म्हणताहेत सगळे! >> प्रत्येक दौर्‍यावर कसोटी संघाबरोबर एक टी-२० संघ व एक हवामान तज्ञ 'बॅक अप' म्हणून न्यायचंही घाटतंय ! Wink
उदयनजी, नवीन लोगो very creative !

Pages