चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३

Submitted by केदार जाधव on 6 June, 2013 - 04:56

चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही Happy
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने Happy

वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm

June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm

June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm

June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm

June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm

June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm

June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm

June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm

June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm

June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm

June 23 Final, Edgbaston, 3 pm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेव्हू.. विश्वास आहेच हो.. पण काय हे की शेवटी cricket is a game of glorious uncertainties. म्हणूनच थोडी भिती आहे...

इंग्लंड मध्येच विडींजची वाट लागली होती १७५ धावा करताना...

भारत ८७-१ [२० षटकं]
४-५ची सरासरी ठेवून छान खेळ करताहेत आपले फलंदाज. मॅथ्यूज स्वतः गोलंदाजी करतोय पण त्याने अजून मलिंगाला आणलं नाही.

भारत काय दादा सारखे खेळतोय अक्ख्या टूर्नामेंट मध्ये? मी आजपर्यंत एवढे मस्त खेळताना पाहिले नाही. अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट ची ऐशी की तैशी केलीय यांनी!!!!

बक्कीचा संघ पोचला अखेरीस अंतिम फेरीत. भारतात ज्या प्रकारे क्रिकेटची लाज निघते आहे, त्यावरून बक्कीला च्याम्पियन करंडक 'जिंकलाच' पाहिजे. Biggrin

-गा.पै.

<< बक्कीचा संघ पोचला अखेरीस अंतिम फेरीत >> अहो कसाबसा नाही, दिमाखात आलाय अंतिम फेरीत ! 'बक्की'ला बुक्के केंव्हांही मारतां येतील पण हीं प्रतिभावान तरूण मंडळी सध्यां इतका अप्रतिम खेळ करताहेत, त्यांच्या पाठीवर आतां दिलखुलासपणे शाबासकीची थाप तर मारूंया ! Wink

भाऊ,

>> आतां दिलखुलासपणे शाबासकीची थाप तर मारूंया !

हो, बक्कीला शाबासकी नक्की! पण शिखर धवनला चार जीवदाने मिळाली. उगीच आपली संशयाची पाल मनात चुकचुकते.

आ.न.,
-गा.पै.

उगीच आपली संशयाची पाल मनात चुकचुकते. >>>>> मग कशाला डोळे फाडुन बघत बसलात.. न्युज चॅनल वर मोडींची भाषणे ऐकत बसा..
बायकी मन असणार्यांच्या मनात पाल काय डायनॉसॉर सुध्दा चुकचुकतो....:खोखो:...

पण शिखर धवनला चार जीवदाने मिळाली. उगीच आपली संशयाची पाल मनात चुकचुकते.>>>
उद्या आपण जिंकलो तर, बीसीसीआयने इतर सर्व संघांना 'आमालाच जिंकू द्या' असे ब्लॅकमेल केले आहे असेही ह्या रडक्या पाली बोंबलतील

उद्या आपण जिंकलो तर, बीसीसीआयने इतर सर्व संघांना 'आमालाच जिंकू द्या' असे ब्लॅकमेल केले आहे असेही ह्या रडक्या पाली बोंबलतील >> अर्थातच रे ! Sad

उद्या आपण जिंकलो तर, बीसीसीआयने इतर सर्व संघांना 'आमालाच जिंकू द्या' असे ब्लॅकमेल केले आहे असेही ह्या रडक्या पाली बोंबलतील >>
आणी इंग्लंड जिंकली तर बघा आयपीएल मुळे हे हरले . आयपीएल मुळे भारतीय क्रिकेट्ची वाट लागली . इंग्लंड जिंकली कारण त्यांचे खेळाडू आयपीएल खेळत नाहीत . बीसीसीआयला पैशाची मस्ती आली आहे वगैरे Happy

परत एकदा फायनलचा २००२ सारखा वॉशाऔट नको. ट्रॉफी शेअर करायला मजा येत नाही. आपण नक्कीच त्यांना हारवणार आहोत. मॅच व्हायलाच हवी. निदान २०-२० Happy

गामा प्रत्येक गोष्टीत संशय आणला की मजा जाते.

भाऊ,

>> कुणाचा निखळ जल्लोष, तर कुणाचा संशयकल्लोळ ! हें तर चालायचंच !!

बघा इथे सुरुवात झाली (ctrl + F deja vu).

खखोदेजा, हो! अर्रर्र, मीही चुकून 'देजा' म्हणालो की काय! Wink

आ.न.,
-गा.पै.

अरे आम्हाला या गामावरच संशय आहे :खोखो:...
.
.
मॅच एक इनिंग तरी५० ओव्हर ची पुर्ण झाली पाहिजे... दुसरी भले २० ची असो... Wink

उदयन..,

१.
>> मग कशाला डोळे फाडुन बघत बसलात..

तुम्हाला काय माहीती की मी डोळे फाडून म्याच बघत बसलोय?

२.
>> न्युज चॅनल वर मोडींची भाषणे ऐकत बसा..

तुम्हाला सल्ला विचारला नाहीये, काय करू म्हणून! तरीपण आपल्या फुकट सल्ल्याबद्दल धन्यवाद!

३.
>> बायकी मन असणार्यांच्या मनात पाल काय डायनॉसॉर सुध्दा चुकचुकतो...

योग्य ठिकाणी संशय व्यक्त करणे म्हणजे बायकी मन होय! तर मग मला बायकी मन असलेलं चालेल.

असो.

तुम्ही जसे माझ्यावर बेछूट आरोप करीत सुटला आहात तसा मी आजून निकालनिश्चितीचा आरोप केला नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

केदार,

>> गामा प्रत्येक गोष्टीत संशय आणला की मजा जाते.

अगदी बरोबर. विशेषत: संसारात कधीही संशय आणू नये. मलाही निश्चित निकालाविना बक्की जिंकलेली बघायला आवडेल. पण शेवटी काय आहे की मारणार्‍याचा हात धरता येतो, पण बोलणार्‍याचं तोंड नाही धरता येत. लोक चक्क cricinfo स्थळावर खुलेआम संशय प्रदर्शित करतात.

dejavu.JPG

हा संशय खोटा ठरवा एव्हढीच मी इच्छा धरू शकतो या घडीला. अन्यथा कितीही संशय आला तरीही मजा मारण्याची कला साध्य करून घ्यावी लागेल! Wink

आ.न.,
-गा.पै.

तुम्हाला सल्ला विचारला नाहीये,>>> अरे हा सल्ला नाही आहे.... याला आदेश म्हणतात आता परत तोंड वर करुन लिहु नका "मी आदेश विचारला नाही म्हणुन Biggrin

.
तर मग मला बायकी मन असलेलं चालेल.<<>> तुमचे अजुन काय आहे माहीत आहे सगळ्यांना Wink
.
.
तुम्हाला काय माहीती की मी डोळे फाडून म्याच बघत बसलोय?>>> ४ झेल सुटले हे काय तुम्हाला ___ नी सांगितले ? उगाच फाटे फोडुन लिहायचे म्हणुन बिनडोक लिहु नका...

Pages