मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीपर बाय डझन वाचले.
अर्थात मराठी अनुवादीत.

आवडलं.
काही ठिकाणी जोरदार हसलो.

तो काळ इमॅजिन करणं सुरवातीला कठीण जात होतं.
काहि काही ठीकाणी कथानायक विक्षीप्त* आहे का असं वाटलं (मुलांचे टॉन्सिल्स काढणे प्रकरण)
पण तेव्हा / त्या काळात टोन्सील्स काढतच असत सर्रास असं पुढे वाचुन वाटलं.
मग परत तो पुर्वग्रह मनातुन काढुन सुरु वाचन.

* अगदी हाच शब्द नव्हे पण एककल्ली असं काहिसं.

आताच्या काळात त्यानी केलेलं काम खुप नॉर्मल वाटेल पण त्यांच योगदान भरपुर असावं असं पुस्तक वाचुन वाटल.

मी खुप दिवसानी एक अख्खं पुस्तक फक्त दोन वाचनात संपवल्याने मला फार भारी वाटलं.

महाराष्ट्रातील दृश्यकला या विषयावरचा कोष. शिल्पकार-चित्रकार कोष.

दृश्यकलेच्या चाहत्यांनी, ज्यांना महाराष्ट्रातील चित्रकला-शिल्पकला-उपयोजित कलेच्या दस्तवेजीकरणाबद्दल आस्था असेल त्यांनी हा कोष अगदी आवर्जून संग्रही ठेवावा. सुहास बहुळकरांनी खरोखर ग्रेट काम केले आहे शिल्पकार-चरित्रकार कोषाचे काम करुन. त्यांची आणि दीपक घारेंची मेहनत प्रशंसनीय आहे.

महाराष्ट्रातील आजवरच्या बहुतेक सर्व प्रसिद्ध, अप्रसिद्ध, गुणवान कलाकारांची माहिती, त्यांची कारकीर्द, महत्वाच्या चित्रांच्या छायाचित्रांसकट (कृष्णधवल ८५० आणि रंगित २००) यात एकत्रित वाचायला मिळते.

काही कलावंत यातून वगळले गेले आहेत, काही माहिती खूप त्रोटक, वरवरची वाटते, परंतु या त्रुटी फार महत्वाच्या नाहीत. अशा प्रचंड कोषाचे काम पार पाडत असताना इतरांचे जे सहकार्य आवश्यक असते, जे योगदान गरजेचे असते ते अनेकदा मनासारखे मिळत नाही. त्यातून अशा त्रुटी राहून जातात. बहुळकरांनी संपादकियात त्याचा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्राच्या दृश्यकलापरंपरेची सर्वांगीण माहिती उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात हा खंड म्हणजे एक महत्वाचे पाऊल आहे यात शंकाच नाही.

हिंदुस्थान प्रकाशन संस्थेनी (साप्ताहिक विवेक) हा प्रकाशित केला आहे.
संपादन सुहास बहुळकर, दीपक घारे, वसंत सरवटे.
मूल्य रुपये-१२००/-
पाने तब्बल साडेसातशे.

"चांदण्याचा रस्ता" हे प्रकाश संत यांचे छोटेखानी पुस्तक नुकतेच वाचून संपवले. हे यावर्षीच प्रसिद्ध झालेय. लघुनिबंधाचा संग्रह आहे हा शिवाय यात लेखकाची काही जलरंगातली चित्रेही आहेत.

हे लघुनिबंध थोडेसे अनोखे आहेत. ( अगदी लंपनच्या मॅड शैलीतले ) पण या पुस्तकातले शेवटचे ३ निबंध इंदिरा संत यांच्याविषयी आहेत आणि त्यांचे अत्यंत लोभसवाणे चित्र त्यात उतरलेय.

अगदी आवर्जून वाचावेत असे हे निबंध आहेत.

नाझी भस्मासुराचा उदयास्त :- (Rise and fall of third reitch मूळ लेखक शिरर) ... हिटलरने जर्मनीला कसे उभे केले आणि नंतर युद्धाच्या खाईत कसे ढकलले... उत्तम पुस्तक.

इन्फर्नो वाचले. तसे बरेय. पण सरखा त्याच्या आधिच्या पुस्तकान्सोबत तुलना होते आपोआप मनात. जरासा अपेक्षाभंग होतो त्यमुळे. नाही केली तुलना तर मस्त आहे.

मी नाझी वाचून इतका प्रभावित झालो होतो की मूळ पुस्तक मिळवून ते पण वाचले...पण निवडक भाग मराठीत अनुवाद केल्यामुळे वाचायला कंटाळवाणे होत नाही...मूळ पुस्तक १२०० पानांचा मोठा ठोकळा आहे...आणि फॉँट बारीक आहे...त्यामुळे पेशन्स ठेऊन वाचणे काय जमले नाही.

या पुस्तकात हिटलरला बर्यापैकी ग्लोरीफाय केल्यासारखे वाटले

शर्मिला फडकेंनी दिलेली यादी

ग्रेसचं 'बाई!जोगिया पुरुष',
श्रीराम लागूंचं 'रुपवेध'
ध्रूव भटांचं तत्वमसि (अनु. अंजली नरवणे),
निवडक अबकडई (संपादन्-सतीश काळसेकर्,अरुण शेवते- लोकवांग्मय गृह),
विस्तारणारी क्षितिजे- सुधीर पटवर्धन,
झरोका- नरेंद्र डेंगळे,
बंद खिडकीबाहेर- सुलभा ब्रह्मनाळकर (मौज),
तांडव- महाबळेश्वर सैल,
टेल्स ऑफ द ओपन रोड- रस्किन बॉन्ड,
इथे नांदतो दुष्काळ- रमाकांत (बापू) कुलकर्णी,
अमलताश- डॉ. सुप्रिया दीक्षित,
देवडी- गुलजार यांच्या कथांचा अनुवाद अंबरिश मिश्र
द स्ट्रीम विदिन (समकालिन बंगाली लेखिकांच्या लघूकथा)-अनु. मीना वैशंपायन,
किरण नगरकरचं द एक्स्ट्राज (रावण आणि एडीचा सिक्वेल),
मनू जोसेफचं द इल्लिसिट हॅपिनेस ऑफ अदर पिपल,
एक इंच मुस्कान- राजेन्द्र यादव+मनू भंडारी (हिंदी),
एक कहानी यह भी- मनू भंडारी,
मुंबई फेबल्स- ग्यानप्रकाश.

'चीपर बाय द डझन' इंग्लिशमधून वाचते आहे. खूप वर्षांपूर्वी एका मराठी मासिकातून याचा मराठी अनुवाद क्रमशः प्रसिद्ध होत असे, तेव्हा तो वाचला होता. त्याची आठवण झाल्यापासून काही महिन्यांपासून हे पुस्तक शोधत होते, ते आता फ्लिपकार्टवर मिळालं. निखळ आनंद देणारं पुस्तक आहे. लेकंही वाचतेय, तिला बरेच शब्द डोक्यावरून जातायत तरी तशीच नेटानं वाचतेय. Happy

वरची झकासरावांची याच पुस्तकाबद्दलची पोस्ट आत्ता वाचली. गंमतच वाटली. मराठीतही आलंय का हे पुस्तक?

वरच्या प्रकाश संतांच्या, "चांदण्याचा रस्ता" मधे "लहान भावंडांचा अभ्यास घेणे म्हणजे अवघड गुणिले दहा" असा एक मस्त शब्दप्रयोग आलाय. त्यातला शिक्षकांनी देऊ केलेल्या चपलांचा प्रसंग तर प्रत्येक लहान मुलाने वाचावा असा आहे.

००००००००००००

अतुल धामनकरांचे "ताडोबा" वाचून संपवले. ताडोबातील जागांचे, निसर्गाचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे सुंदर शब्दचित्र आहे. पण मराठी पुस्तकाची नेहमीची रड म्हणजे त्यात एखाद दुसराच फोटो आहे.
चितमपल्लींच्या लेखनाशी तुलना करता हे वर्णन जरा कोरडे वाटते. ( काही ठिकाणी किंचीत आत्मप्रौढी पण जाणवते. ) रेखाचित्रे पण तितकिशी खास नाहीत. कदाचित माझ्या मनात माडगूळकरांची रेखाचित्रे ठसलेली असतील.
पण असे पूर्वग्रह ठेवले नाहीत तर पुस्तक वाचनीय आहे. त्यांचीच आणखी २ पुस्तके वाचायची आहेत.

सध्या 'एका साळीयाने' - लक्ष्मीनारायण बोल्ली, वाचत आहे. सोलापूर येथील तेलगु पद्मशाली समाजाची ओळख होते ह्या पुस्तकातून, त्यांच्या चालीरीती, सण ह्यांची माहिती मिळते. हे बोल्ली ह्यांचे आत्मचरित्र आहे, आवडले मला.

इन्फ़र्नो वाचून संपवले. डॆन ब्राऊन त्याच्या प्रेडिक्टेबल प्लॊटपासून जरादेखील हटत नाही. पण हा प्लॊट दा विंचीपेक्षा पण सॊलिड होता, नेहमीसारखे ट्विस्ट टर्न्स द्यायच्या नादात खूप लूजली लिहिल्यासारखा वाटतो. यामधला व्हिलन मात्र एकदम खतरनाक आहे. मधेमधे पुस्तक बॊलीवूड इन्स्पायर्ड वाटले चक्क. हिरवीण आणि लॆन्ग्डन यांचा वेषांतराचा सीन वाचताना मला अनेको हिंदी सिनेमा आठवत होते.

The Boy in the Striped Pyjamas नावाचं एक सुंदर पुस्तक वाचलं. खरं तर काय उपमा द्यावी कळत नाही आहे. फार छान अनुभव होता. ब्रुनो नावाच्या एका ९ वर्षाच्या मुलाच्या नजरेतून होलोकॉस्टचं वास्तव एका वेगळ्याच प्रकारे समोर येतं. पुस्तक वाचताना डोळ्यासमोर एक निष्पाप निरागस मुलाचं चित्र उभं राहिलं आणि नंतर दोन दिवस ते माझ्या डोक्यातून जातचं नव्हतं. ह्या पुस्तकावर चित्रपटही निघाला आहे आणि त्यालाही बरेच चांगले रिव्ह्यु मिळाले होते हे नंतर कळले. आता चित्रपटही बघायचा आहे.

इथेच रैनाने ह्या पुस्तकावर परिक्षण लिहिले आहे. ते मी वाचले होते. आता लिंक सापडत नाही. इतक्या छान पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल रैनाला धन्यवाद. माझ्या मते वाचायलाच हवे असे पुस्तक आहे Happy

हिरवीण आणि लॆन्ग्डन यांचा वेषांतराचा सीन वाचताना मला अनेको हिंदी सिनेमा आठवत होते.>>>>>>>
बरोब्बर एकदम!

डॉ.भवान महाजन,औरंगाबाद यांचे,'मैत्र जिवाचे' हे पुस्तक नुकतेच वाचले. त्यांना विविध रुग्णांच्या आजारात जे अनुभव आले त्याचे छोटे छोटे लेख आहेत, त्यांनी ते चांगल्याप्रकारे मांडले आहेत, पुस्तक तसे लहान आहे, वाचनीय आहे.

ब्रेव्हहार्ट पुस्तका विषयी इथेच लिहिलं होतं का कुणी? लेखकाचं नाव, प्रकाशक माहिती असतील तर सांगा कृपया. हे एका असाध्य व्याधी झालेल्या तरुणाने की त्याच्या वडलांनी लिहिलेलं पुस्तक आहे. दोघं बापलेक सगळीकडे ट्रेकिंग करायचे.

भैरप्पांचे 'वंशवृक्ष' वाचले. एकदा वाचण्यासारखे नक्कीच आहे. [ 'आवरण' आधी वाचल्याने हे तितके नाही आवडले.] श्रीनिवास श्रोत्रींची व्यक्तीरेखा आवडली. आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा वाटला.

सगळ्या बाजुने पोळलेली आयुष्य वाचायला आजकाल नकोच वाटते. जी.एं च्या पात्रांसाराखीच यातील व्यक्तॉरेखा पण पुढचे काही दिवस विचारांत ठाण मांडुन होत्या.

'तत्वमसि' प्रचंड आवडले. नर्मदे बद्दलचे प्रेम आणि निसर्गाची ओढ, यामुळेही असेल. Happy
ध्रुव भट्टांचे मी वाचलेले हे पहिलेच पुस्तक. त्यांची अत्यंत संयमी लेखन शैली आवडली.

पुस्तक सुचवल्याबद्दल शर्मिलाचे आभार ... Happy

आभार शैलजाचे. तिने सुचवलं मला. अकूपारही आवडलं.

प्रभाकर बरवेंच्या 'कोरा कॅन्व्हास'ची मौजेने नवी आवृत्ती काढली आहे. आधी पेक्षा खूप देखणी. बराच काळ आउट ऑफ प्रिन्ट असलेलं हे पुस्तक आहे. ज्यांनी वाचलं नाहीये पुस्तक त्यांनी जरुर वाचावे.

Gulu Ezekiel लिखित गांगुलीची बायोग्राफी (?) वाचली.... "सौरव"
मला न आवडणारा हा खेळाडू जरा जवळून समजेल अशी अपेक्षा होती... कदाचित थोडेसे मतपरीवर्तन होईल वगैरे! Wink
पण एकामागून एकेका सामन्यांचे नुसते उल्लेख, नीरस आकडेवारी आणि फार वरवरचे वाटले हे लिखाण.... बायोग्राफीपेक्षा कारकीर्दीचा धावता आढावा वाटला Sad

Stolen: A Letter to My Captor
by Lucy Christopher

सहज चाळलं तर वेगळं वाटलं पुस्तक म्हणून वाचायला हातात घेतलं नि पूर्ण करूनच संपवलं. एका सोळा वर्षाच्या मुलीचे विमानतळावरून अपहरण होते. तिला तो दूर वाळवंटात घेऊन जातो. त्याला काय हवं असतं तर तिला शहरांपासून वाचवणं आणि तिने त्याच्यावर प्रेम करणं...
छाण उत्कंठावर्धक काही वाचायचे असेल तर खूप छान पुस्तक !
अजून लिहीन वेळ मिळाला की..

Pages