Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पौतै, भापो आणि मान्यही आहे.
पौतै, भापो आणि मान्यही आहे. पण वृत्तपत्रीय विकेंडी ललितांचे कारखाने पाहिले की असा शब्दप्रयोग रुढ होणे सहाजिक आहे.
'मिडनाईट्स चिल्डर्न' वाचतो आहे. अदभुत आणि अप्रतिम.
केवळ ६२ पानांची व्यंकटेश
केवळ ६२ पानांची व्यंकटेश माडगुळकरांची साहीत्य अकादमी पुरस्कारप्राप्त 'सत्तांतर' ही कादंबरी नुकतीच वाचून संपवली. प्रचंड आवडली.
दुसर्या आवृत्तीच्या निमित्ताने माडगुळकरांनी लिहलेली प्रस्तावना माहीतीपुर्ण आहे. कादंबरीतील वानरांच्या स्वभावाची निरीक्षणे अफलातून. वानरांच्या माध्यमातून माडगुळकर मनुष्यस्वभावावर वा सद्य परिस्थितीवर बोलू पाहतात.
सहज मिळते आहे बीसीएलची
सहज मिळते आहे बीसीएलची मेंबरशिप. आता जा, मेंबरशिप घ्या आणि बाहेर या, इतक्या सहजपणे, आणि अजुनही बर्यापैकी क्वलिटी आहे लायब्ररीला.
कोण कोण जातय आता मेंबरशिप घ्यायला?
अमित , सत्तान्तरचे 'रामायण
अमित , सत्तान्तरचे 'रामायण 'तुला माहीत नाही असे दिसते....
काय ते?
काय ते?
त्या पुस्तकावर वाङ्मयचौर्याचा
त्या पुस्तकावर वाङ्मयचौर्याचा (साधार) आरोप आहे. लंगूर्स ऑफ अबू नावाच्या पुस्तकावर बेतलेलं पुस्तक आहे ते.
लंगूर्स ऑफ अबू नावाच्या
लंगूर्स ऑफ अबू नावाच्या पुस्तकावर बेतलेलं पुस्तक आहे ते. << पण तसा त्यांनी प्रस्तावनेत उल्लेख केलेला आहे.
तो नंतर जोडलेला आहे. पहिल्या
तो नंतर जोडलेला आहे. पहिल्या आवृत्तीत (पुरस्कार मिळेपर्यंत) नव्हता.
या पुस्तकाला - सत्तान्तर-
या पुस्तकाला - सत्तान्तर- चक्क साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे.
व्यंकटेश माडगूळकर तसेही
व्यंकटेश माडगूळकर तसेही सिद्धहस्त लेखक होतेच. त्यामुळे शैली, वाचनीयता यांच्या दर्जाबद्दल प्रश्नच नव्हता. आशयाच्या बाबतीत खूपच आरोप झाले. व्यंकटेशांच्या (वादग्रस्त)जीवनावर आनन्द यादवानी एक आख्खी कादम्बरीच लिहिली आहे. तिचे नाव कोणाला आठवतेय का? मी वाचलीय पण नाव आठवेना....
गिरीश कुबेर यांनी लिहीलेले
गिरीश कुबेर यांनी लिहीलेले एका तेलीयाने पुस्तक वाचले आहे का कुणी...
फार सुंदर लिहीले आहे...
आखाती देशातल्या तेल राजकारणाचे पैलु या पुस्तकाने उलगडले आहेत. सौदी अरेबियाचे राजे फैजल, त्यांचे तेलमंत्री यामानी, तेलकंपन्यांची आणि अमेरिकेची दुटप्पी राजनिती, पश्चिम अशियात जम रोवता यावा यासाठी केलेले गलिच्छ राजकारण (त्यातूनच पुढे लादेनचा भस्मासूर निर्माण झाला आणि अमेरिकेवर उलटला), तेलामुळे आलेला पैशाचा पूर आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या, गडाफीचा आतातायीपणा, रोनाल्ड रेगन, जिमी कार्टर यांनी हा प्रश्न हाताळताना केलेल्या चुका या सगळ्याचा उहापोह या पुस्तकात केला आहे.
पुस्तक मुख्यत्वे करून सौदी अरेबियाचे तेलमंत्री यामानी यांच्याभोवती फिरते. या एका माणसाने जवळपास आख्ख्या जगाची तेलसमस्या एकाकी हाताळली. ती देखील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २५ वर्षे. अनेकदा जीवावर बेतूनही ते मागे हटले नाहीत.
पुस्तकाची भाषा अतिशय रंजक असल्याने कुठेही कंटाळवाणे होत नाही. राजकारणाचे डावपेच कसे कसे बदलत जातात यावरही सुरेख भाष्य केले आहे.
नक्कीच संग्राह्य पुस्तक
वाचलेय.
वाचलेय.
आशुचॅम्प, मी वाचलेय ते
आशुचॅम्प, मी वाचलेय ते पुस्तक. रंजक, उद्बोधक आणि माहितीपूर्ण आहे. हे पुस्तक वाचल्यावर जगातल्या बर्याच घटना, युद्धे, करार, आन्तरराष्ट्रीय संबंध हे तेलाच्या हितसंबंधाभोवती फिरत असावेत असे वाटू लागते. देशदेशांमधल्या तणावांची दृष्य कारणे काहीही असली तरी त्याच्या मुळाशी तेलाचे राजकारण, हितसंबंध हे एकमेव कारण आहे असे वाटू लागते.....
या निमित्तने मला असेही वाटू लागले आहे की भारतीय उपखन्डात विशेषतः उपखन्ड ते तुर्कस्तान, इराणचा प्रदेश यातील मागच्या घटना पाहता त्यामागे ब्रिटिशांची 'द ग्रेट गेम ' ही रशियाविरुद्धची काही शतके चालू असलेली स्ट्रॅटेजी हीच दिसते. त्या ग्रेट गेमचा भाग म्हणूनच इंग्रजांनी पाकिस्तानची निर्मिती केली . जिना -बिना ही नावापुरती प्यादी होती. बलुचिस्तानातील 'गदर'बन्दराला रशियाला सम्पर्क मिळू नये म्हणून शेकडो वर्षे ब्रिटन धडपडते आहे. डुरांड लाईन आखून पाक - अफगाणिस्तान (आणि भारतालाही) कायमची डोकेदुखी निर्माण करणे हा त्याच गेमचा भाग. हा अॅक्सेस चीनने मात्र काशगर ते गदर असा हायवे बांधूनच मिळवला आहे. त्यासाठी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधून (गिलगिट बाल्टिस्तान) हाय वे काढला.
हा इतिहास आपल्याकडे फारसा चर्चिला जात नाही. जीनाला शिव्या दिल्या, भारत सरकरच्या नावाने खडे फोडले की आपला पश्चिम आशियातला अभ्यास स.म्पतो.
या 'द ग्रेट गेम'बद्दल चांगली पुस्तके सुचवू शकेल का कोणी?
बर्दापूरकरांनी संपादित केलेलं
बर्दापूरकरांनी संपादित केलेलं ग्रेस नावाचं गारुड.
शर्मिलाने सुचवलेली खोपकरांची चित्रव्यूह आणि चलतचित्रव्यूह
बलराज कृष्णा लिखित सरदार पटेलांवरचं पुस्तक.
ग्रेस नावाचं गारुड वाचते आहे सद्ध्या.
विश लिस्टीतलं पुस्तक - प्रतिमा आणि प्रचिती.
विकी बाबा
विकी बाबा
http://en.wikipedia.org/wiki/The_Great_Game
शैलजा, ग्रेस नावाचे गारुड
शैलजा, ग्रेस नावाचे गारुड चांगले आहे. त्यातून ग्रेसच्या वैय्यक्तिक जीवनाची माहिती मिळते...
मला खर तर त्या पुस्तकात ग्रेस
मला खर तर त्या पुस्तकात ग्रेस ह्यांच्या लिखाणाबद्दल अधिक मजकूर अपेक्षित होता.
चीनने गदर बन्दरला प्रवेश
चीनने गदर बन्दरला प्रवेश मिळवला त्याला शह देण्यासाठी भारत व इराण चहबर (छबर) हे इराणमधले बन्दर भारतीय त.त्र्ज्ञांच्या मदतीने डेवलप करीत आहे. इराण व बलुचिस्तानमधल्या बलुचिंचे संबंध इराणातल्या बलुचींना स्वतंत्र देश देण्याच्या आन्दोलनामुळे तानलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानातल्या बलुचिंच्या फुटीर आंदोलनाला त्यानी जाहीररेत्या मागणी करूनही भारत पाठिम्बा/मदत देत नाही. वास्तविक पाकिस्तानला दुर्बल करायला ही एक चांगली खेळी असू शकते. पण इराणच्या दबावामुळे तसे आपण करत नाही. शिवाय इरानमधून येऊ घातलेल्या गॅस पाईपलाईनसाठी परवानगी देण्यासाठी पाकिस्तानची दाढी आपल्याला धरावीच लागणार आहे. पुन्हा तेल्/इंधन आलेच. (शिवाय पाकिस्तान दुर्बल होणे आपल्याला परवडणार नाही असे वाटते)
रॉहू वेगळा धागा उघडा ह्या
रॉहू वेगळा धागा उघडा ह्या चर्चेकरीता आणि तीत फक्त निमंत्रितांना प्रवेश ठेवा म्हणजे चर्चा करता येईल.
ब्रिटीश लायब्ररीबद्दलः
पुण्यातली बीसीएल मला खास आवडली नाही. मी २०१० मध्ये १-२ महिने गेलो पण मनाजोगती पुस्तके नाही मिळाली. संग्रह जुनाट वाटला. मी हैद्राबाद बीसीएलचा ३-४ वर्षे नियमित वाचक होतो व त्या लायब्रीचा शतशः ऋणी आहे. माझ्यासारख्या रासवट अडाण्याला त्या लायब्रीने बराच शहाणा केला. विशेष करून एव्हरेस्ट-के२ वर असलेली भरपूर महागडी भारी प्रिंटची पुस्तके. आख्खा 'ख्रिस बॉनिंग्टन' होता तिथे. आता किंडल जिंदाबाद!
एका तेलीयाने आणि तेल नावाचा
एका तेलीयाने आणि तेल नावाचा ईतिहास दोनहि पुस्तके छान आहेत.
अनघा आता मी नक्की कोणते
अनघा आता मी नक्की कोणते पुस्तक वाचले याबाबत गोंधळलो आहे
रॉहू वेगळा धागा उघडा ह्या
रॉहू वेगळा धागा उघडा ह्या चर्चेकरीता आणि तीत फक्त निमंत्रितांना प्रवेश ठेवा म्हणजे चर्चा करता येईल. >>>
अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा-
अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा- वारणेचा वाघ या कादंब-यांचा एक चाहता वर्ग आहे. फकिरा चं तर त्या काळी अनेक भाषांमधे भाषांतरही झालं. मात्र, काही वाचनवेड्या मित्रांना या कादंब-या माहीत नसाव्यात याचं नवल वाटतं.
तेल नावाचा इतिहास खूप आवडले
तेल नावाचा इतिहास खूप आवडले होते . नंतर अधर्मयुद्ध जरा बोअर झाले, एका तेलियाने तर फारच कंटाळवाणे झाले. मूळ थीम एका पुस्तकातून कळाली की बाकीची माहिती तीच तीच होते. त्यात एका तेलियाने तर मला प्रकाशकांनी दिलेल्या वेळेत फॅक्टरीतून काढल्यासारखे वाटले होते. बरीच वाक्ये भाषांतरित वाटली.
ग्रेट गेम वरच्या माझ्या जुन्या एका लेखाची व त्यावरच्या आत्तापर्यंत तरी बर्यापैकी मुद्द्यांवर झालेल्या चर्चेची रिक्षा
http://www.maayboli.com/node/30185
हे पुस्तक (ग्रेट गेम वरचे) वाचल्यावर त्यातील एकेक संदर्भ घेऊन बर्याच इतर संबंधित गोष्टी वाचल्या, पाहिल्या, त्यातून या पुस्तकाची थीम बरोबर आहे असेच आत्तापर्यंत वाटले आहे. रॉहू चे 'जीना-बिना प्यादी' कॉमेंट एकदम चपखल आहे.
ग्रेट गेम बद्दल मी फारसं सखोल
ग्रेट गेम बद्दल मी फारसं सखोल वाचलेलं नाही, पण जे काही वाचलंय त्यावरून रॉहू आणि फारेण्डाला अनुमोदन
गिरीश कुबेर अजून वाचलेले नाहीत - म्हणजे त्यांची पुस्तकं. पण त्यांच्या वृत्तपत्रीय लेखांचा कधीच कंटाळा आला आहे. नेटवरून माहिती घेऊ, परदेशी मीडियातले लेख वगैरेतून मिळणार्या माहिती, दृष्टीकोनांचं संकलन असंच त्यांचं स्वरूप असतं. तळवलकर वगैरेंची जशी स्वतःची विश्लेषणात्मक मतं असायची तसं फारसं नसतं. या सगळ्या माहितीस्रोतांबद्दल अनभिज्ञ असणारा किंवा त्याला अॅक्सेस नसलेला असा वाचकवर्गापर्यंत सर्व माहिती पोचवणं असा त्या लेखनाचा उद्देश असावा आणि तो एका मर्यादेपर्यंत ठीकही आहे. पण काही वेळाने फार कंटाळवाणं होतं ते. त्यापेक्षा मूळ पुस्तकं/लेख इ. मिळवूनच वाचू असं वाटायला लागतं... पुस्तकं तशीच असतील असा माझा आपला एक बिनबुडाचा पूर्वग्रह आहे. वाचायची आहेत, वाचेनही, पण प्रायॉरिटी लिस्टमधे नाहीत
वरदा पोष्टीला अनुमोदन. तसेच
वरदा पोष्टीला अनुमोदन. तसेच त्यांच्या पुस्तकात तपशीलांच्या काही ढोबळ चुकापण असतात ज्या वाचताना डोळ्याखाली खड्यासारख्या येतात. अधर्मयुद्ध बरेच बोअर झाले
आमच्या कंपनीने 'क्वेंच' ची
आमच्या कंपनीने 'क्वेंच' ची मेंबरशीप अॅव्हेलेबल करुन दिलीय सगळ्या एम्प्लॉइजना... भरपुर पुस्तके आहेत.... मस्त सर्वीस आहे!
तेल नावाचा इतिहास खूप आवडले
तेल नावाचा इतिहास खूप आवडले होते . नंतर अधर्मयुद्ध जरा बोअर झाले, एका तेलियाने तर फारच कंटाळवाणे झाले. मूळ थीम एका पुस्तकातून कळाली की बाकीची माहिती तीच तीच होते. त्यात एका तेलियाने तर मला प्रकाशकांनी दिलेल्या वेळेत फॅक्टरीतून काढल्यासारखे वाटले होते. >> +१
ब्रिटीश लायब्ररीच्या
ब्रिटीश लायब्ररीच्या सदस्यात्वासाठी नम्बर लावावे लागतात या आदरयुक्त भीतीदायक दंतकथेमुळे>>
हेहे , ही दंतकथाच आहे. प्रत्यक्षात लगेच मिळते मेम्बरशिप. काहीही कष्ट पडत नहीत.
हे मी १९८०च्या दशकातले सांगतो
हे मी १९८०च्या दशकातले सांगतो आहे जेव्हा लोकाना पुस्तकाशिवाय पर्याय नव्ह्ता...
Pages