Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अकूपार, म्हणजे ज्यात
अकूपार, म्हणजे ज्यात सिंहिणींचा सामना होतो तेच का? मग मला ते पुस्तक, खरे तर अनुवाद झेपला नाही. आदिवासी मुलींच्या गुजराथी बोलीचे वर्णन त्यात आहे. काठेवाडात स चा ह होतो. साम्हळ-> हामळ(ऐक), सारू-हारू(चांगले) ....हे त्या नायकाला जाणवत राह्ते.
मूळ गुजराथी वाक्याच्या मराठी अनुवादात स किंवा ह काहीच आले नव्हते. आणि पुढे वर्णन या वाक्यातला स नायकाला/निवेदकाला ह सारखा ऐकायला आला!
एका ठिकाणी एका पक्ष्याला मराठीत काय म्हणतात ते माहीत नाही असा उल्लेख होता.
मिलिंदा आणि शूम्पी, मूळ
मिलिंदा आणि शूम्पी, मूळ पुस्तक गुजराती लेखक ध्रुव भटांचं आहे आणि अनुवाद अंजनी नरवणेंनी केलेला आहे. धाग्याच्या पहिल्या पानावर शैलजाच्या पुस्तकांच्या यादीत उल्लेख आहे, दुस-या आणि तिस-या पानावर अनुक्रमे शैलजा आणि माधवीचे अभिप्रायही आहेत.
हो भरत, तेच पुस्तक. अनुवादाला
हो भरत, तेच पुस्तक. अनुवादाला तशाही मर्यादा असतातच, पण हा अनुवाद अवघड प्रकारातला आहे आणि तो ९९% जमलेला आहे असं माझं मत... तुम्ही म्हणताय तसे उच्चारांचे प्रकार शब्दस्वरुपात अनुवादात आलेले नाहीत. पण त्यामुळे वाचताना काही अडल्यासारखं वाटलं नाही. कदाचित मला गुजरातीचा गंधही नाही म्हणुनसुद्धा असेल तसं. एक मात्र आहे, शांतपणे वाचलं म्हणुन जास्त भिडलं, घाईघाईत वाचलं असतं तर नक्कीच डोक्यावरून गेलं असतं.
स्टीव्ह जॉब्झ अधिकृत चरित्र
स्टीव्ह जॉब्झ अधिकृत चरित्र (असंच नाव आहे)
हे पुस्तक वाचतेय. सुरवातीपासून पकड घेतलीये लिखाणाने.
वॉल्टर आयझॅक्सन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा विलास साळुंके यांनी अनुवाद केला आहे.
बारीकशी गोष्ट खटकली म्हणता येणार नाही पण नमूद करावीशी वाटली.
त्याने, तिने असे शब्द न वापरता त्यानी तिनी अशी रूपं वापरली आहेत.
या पूर्वी मी फक्त सोनाली कुलकर्णी(सिनीयर)च्या लिखाणात ही रूपं वाचली होती.
पण पुस्तक आवडलं. ६१४पानी पुस्तक आहे. संपवायला वेळ लागणार.
अस्वल - दुर्गा भागवत
अस्वल - दुर्गा भागवत (मिळालं!)
कोरा कॅनव्हास - प्रभाकर बरवे (शर्मिलाने सुचवलेलं)
संवाद रेषालेखकाशी - वसंत सरवटे
लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा - डॉ तारा भवाळकर
संत वाड्मयाची समाजिक फलश्रुती - गं बा सरदार
लज्जागौरी - रा चिं ढेरे
दिनकर जोषी ह्यांची अंजनी नरवणे ह्यांनी अनुवादित केलेली खालील पुस्तकं-
- रामायणातील पात्रवंदना
- महाभारतातील पितृवंदना
कोरा कॅनव्हास - प्रभाकर
कोरा कॅनव्हास - प्रभाकर बरवे
>>
हे पुस्तक वाचल्यावर माझ्या एका कलाकार मित्राची प्रतिक्रिया अशी होती: 'श्रीखंडात पोहल्यासारखे वाटते'
कोणी नविन पुस्तक महाभारत आले
कोणी नविन पुस्तक महाभारत आले ते वाचल का?
खुप दिवसांपासुन मनात होते
खुप दिवसांपासुन मनात होते म्हणुन चेतन भगत यांचे 'One Night @ the Call Center' वाचले. त्यातील 'देवाचा कॉल' सोडून ठिक आहे. नंतर अतीउत्साहाच्या भरात या कथेवर आधारीत मुव्ही ' हॅलो' बघीतली,.... यक, किती हॉरीबल बनवलेय.
रिपोर्टिंगचे दिवस - अनिल
रिपोर्टिंगचे दिवस - अनिल अवचटः
मी आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी हे सर्वात आवडले. त्यांचे साधारण ७० च्या दशकातील लेख एकत्र करून छापलेले आहे. लेख वाचल्यावर असे वाटते की बहुतांश "होते तसेच" छापले असावेत. कारण शैली एकदम वेगळी आहे. आणि कोठेही "पॉलिटिकली करेक्ट" केलेले नाही. तेव्हा जे दिसले तसेच छापलेले आहे. "इंदिराबाईचा फेरा" हा इंदिरा गांधींच्या पुणे भेटीवर, त्याआधी व नंतर घडलेल्या गोष्टींवर लेख सर्वात जमलेला आहे. इतरही सगळे लेख आवडले. राजकीय घटनांवरचे सूक्ष्म निरीक्षण व त्यावरची मजेदार टिप्पणी वाचताना आपण पुलं तर वाचत नाहीना असे वाटते. "शिष्टमंडळ मूळ मोर्चापेक्षाही मोठे होते" सारखी वाक्ये धमाल आहेत.
१००% रेकमेण्डेशन.
मालन गाथा - इंदिरा संत -
मालन गाथा - इंदिरा संत - ह्याचा पहिला भाग आहे का कोणाकडे?
'अमलताश' वाचलं. आवडलं. एक
'अमलताश' वाचलं. आवडलं. एक साधंसुधं, सौम्य आणि निर्मळ आत्मकथन आहे हे. खुप सकारात्मक आणि समाधान देणारं.
प्रामाणिकपणे सांगायचं तर वाचायला घेताना मनात धाकधुक होती की मनातल्या संतांच्या आणि इंदिराबाईंच्या प्रतिमेला तडा जाईल की काय. ही अपेक्षा योग्य नाही याची जाणीव आहे, तरीही ती होतीच. पण संतांबद्दल आणखी जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता होती. तीच गोष्ट 'मृद्गंध'नंतरच्या इंदिराबाईंबद्दल. शिवाय मायलेकांच्या एकत्रित भावबंधाबद्दलही. फक्त दोन अपवाद वगळता लेखकांच्या बायकांच्या मनोगतांचा धसका बसलेला आहे. आपल्याला भावलेल्या त्या व्यक्तिमत्वाच्या लेखक ह्या एका कोनाची त्याच्या अख्ख्या माणूसकीशी आपण नकळत सांगड घातलेली असते, ती दर वेळेस इतर अनेक कोनांमुळे सुसंगत ठरतेच असं नाही., काही वेळा कारणं पटणारी असतात, काहीवे़ळा नसतात. यात भर पडते ती कथनाच्या पद्धतीची, सांगणा-यावर झालेले अन्याय आणि त्याच्या मनात दबा धरून बसलेल्या आकसांचीदेखिल. हे सगळं लक्षात घेऊनही दिल्या गेलेल्या दाखल्यांमुळे खुपदा त्या माणसाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलतो, प्रकाश संतांच्या बाबतीत मला हे (टाळणं माझ्या हातात असूनही) सगळं होणं मुळीच नको होतं.
डॉ. सुप्रिया दीक्षितांनी नेमकी ही जाणीव लख्ख ठेऊन लिहिलं आहे, किंबहुना मुळात त्यांच्याच मनातले संत इतके लख्ख आणि उजळ आहेत की असा काही सायास त्यांना करावाच लागलेला नाही. फार सहजपणे आणि प्रवाहीपणे त्या घडलं ते सांगत गेल्या आहेत. संतांसोबतचं सहजीवन, स्वतःवरचा विश्वास आणी कर्तबगारी, स्नेहीपरिवार आणि कौटुंबिक भावविश्व, मुलांचं कौतुक; या सर्वांबद्दल कोणताही आविर्भाव न ठेवता त्या आपल्याशी बोलतात. आयुष्यात कटू प्रसंग कमी आले असं नाही, पण त्या प्रसंगांना पानाच्या डाव्या बाजूइतकंच महत्व आहे. माणसं माणसांसारखीच वागतात, पण त्यांची वैगुण्ये अधोरेखित केली गेलेली नाहीत.
वाचून झाल्यानंतर मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली. अनेक कारणांनी कित्येक वर्षे दडपल्या गेलेल्या आणि पुनश्च त्याच तीव्रतेने प्रकटलेल्या संतांच्या अभिव्यक्तीला त्यांच्या सशक्त सहकार्यामुळे, ऋजूतेमुळे आणि संतांवरच्या निर्व्याज प्रेमामुळे प्रवाहीपण आलं असं मला वाटतं.
पुन्हा वाचणार आहे आणि मला जे जे वाटलं ते त्यांनाही आवर्जून कळवणार आहे.
छान लिहिलं आहेस सई.
छान लिहिलं आहेस सई.
सई अमलताशच्या निमित्ताने मस्त
सई अमलताशच्या निमित्ताने मस्त लिहिलंय...
शैलजा, 'अकुपार' साठी धन्यवाद. कालच वाचून संपवली, सलग वाचायला वेळ मिळाला नाही तरी आवडली. परत एकदा सलग वाचणार आहे म्हणतो. का कोणास ठावूक पण मला अकूपार वाचताना गोनिदां आठवले, विशेषतः वाघरू / माचीवरला बुधा वगैरे. भारतातल्या ग्रामीण भागातल्या माणसांमधे अगदी अलीकडेपर्यंत सर्वच सजीवांप्रत, निसर्गाप्रत किंवा संपूर्ण समष्टीसंदर्भात अंगाअंगात भिनलेली सहिष्णू वृत्ती आणि सहजीवनाचा सहज स्वीकार हा समान धागा असावा.
सई...."अमलताश" लिखाणाबद्दल
सई...."अमलताश" लिखाणाबद्दल तुला जितके धन्यवाद दिले पाहिजेत तितके ते कमीच आहेत. मी ज्यावेळी वाचून हे पुस्तक खाली ठेवले त्याचवेळी नेमके हेच विचार मनी रुंजू घालू लागले की, "...एक साधंसुधं, सौम्य आणि निर्मळ आत्मकथन आहे हे...." जीवितधाग्यांची एकत्र गुंफण किती सहजरित्या जमून गेली याचे सुंदर शाब्दिक रुप म्हणजे सुप्रिया दीक्षितांचे 'अमलताश'.
मराठी भाषेचे अतिशय देखणे लोभसवाणे आणि आपुलकीचे दर्शन हवे असेल तर प्रत्येक वाचकाने हे पुस्तक आपल्या संग्रही असावे असे मानले पाहिजे.
तुझ्या प्रतिसादातील "...मला जे जे वाटलं ते त्यांनाही आवर्जून कळवणार आहे...." ही भावना तुला पुस्तक मनी किती भिडले आहे याचेच द्योतक आहे.
हर्पेन, कळवल्याबद्दल धन्यवाद.
हर्पेन, कळवल्याबद्दल धन्यवाद.
मला तत्वमसि आणि अकुपार दोन्ही पुस्तके आवडली आहेत. मुळातूनच गुजराथीमध्ये वाचता यायला हवी होती असे वाटून गेले होते. 
वाघरु माझेही अतिशय लाडके पुस्तक आहे,
>>, निसर्गाप्रत किंवा संपूर्ण समष्टीसंदर्भात अंगाअंगात भिनलेली सहिष्णू वृत्ती आणि सहजीवनाचा सहज स्वीकार >> +१
तुम्हा सर्वांना धन्यवाद.
तुम्हा सर्वांना धन्यवाद. हर्पेन, खुप सुरेख टिप्पणी, बुधा आणि वाघरू माझीही आवडती. शैलजा, तत्वमसि आणायला अजूनही मुहुर्त लागतोयच!
नुकतंच 'नेमसेक' वाचलं. कधी एकदा संपतंय असं वाटण्याइतकं कंटाळवाणं झालं. अगदी शेवटचा काही भाग वगळता गोगोलच्या भयानक न्यूनगंडाचा आणि त्यातून आपसूक बनलेल्या नकारात्मक विचारसरणीचा नंतर नंतर वीट आला. नावाची लढाई तर मध्येच कुठेतरी अगदीच जाता जाता संपून गेली. एवढा मोठा प्रपंच लिहिलाय पण तो निरर्थक खटाटोप वाटला.
इथे कुठे त्यावर चर्चा झाली असेल तर ती वाचायला हवी. पुस्तक वाचल्यानंतरच चित्रपट बघायचा असं ठरवलं होतं. उगीचच. कदाचित चित्रपट आवडेल असं वाटतंय. निदान कलाकारांमुळे तरी.
Saee आता वाचेन अमलताश. किती
Saee आता वाचेन अमलताश. किती सुंदर लिहिलेय तुम्ही.
मी वाघरू आणि माबु खूप आधी
मी वाघरू आणि माबु खूप आधी वाचलीत, आता आठवण आल्यावर परत वाचावी म्हणून शोधतोय तर सापडत नाहीयेत ती पुस्तके

गोनीदांचे पवनाकाठचा धोंडी मिळाले मग तेच काढले वाचून...पण ताकावर तहान भागलीच नाही...आता परत नीट शोधाशोध आलीच
सई खूप आवडला परिचय.अजून वाचलं
सई खूप आवडला परिचय.अजून वाचलं नाहीय अमलताश,आता वाचेनच. तू म्हणतेस तसा धसका मीही घेतला होता ..
सई, अमलताशबद्दल अगदी अगदी.
सई, अमलताशबद्दल अगदी अगदी. मस्ट रीड कॅटेगरीमधे आहे ते पुस्तक.
वास्तव नावाचं झेंगट हे एक पुस्तक मध्यंतरी वाचलं. लेखक सुमित खाडिलकर. एकदम सॉलिड पुस्तक. एका मेकॅनिकल एंजीनीअरिंगला शिकणार्या मुलाने एका राष्ट्रीय स्तरावरच्या कार बनवायच्या स्पर्धेत सलग दोन वर्षें भाग घेतला, त्या अनुभवांची ही कथा. कुठेही अतिशयोक्ती न करता, अगदी प्रामाणिकपणे लिहिलेलं पुस्तक असल्याने मलातरी फार आवडलं. लेखक मेकॅनिकलचा विद्यार्थी असल्याने बरीचशी वर्णनं टेक्निकल स्वरूपाची आहेत, तरी वाचायला फारसं कठीण वाटत नाही.सध्याच्या कॉलेज लाईफचं अगदी यथार्थ चित्रण यामधे आहे. कुणालाही कुठे ग्लोरिफिकेशन न करता अगदी रीअल कॅरेक्टर्स् उतरवली आहेत. कॉलेजलाईफवरचं पुस्तक असलं तरी या पुस्तकाला हिरॉइनच नाहीये. एकही प्रेमकथा नसलेलं आणि तरीही आजच्या कॉलेजमधल्या मुलांचं बर्यापैकी चित्रण करणारं हे पुस्तक आहे. भाषादेखील आजच्या मुलांच्या तोंडी शोभेल असलीच आहे, उगाच साहित्यिकपणाचा आव नाही आणि उगाचच "नाक्यावरच्या पोरांची भाषा" वापरायचा सोस नाही.
परागने या पुस्तकाबद्दल मायबोलीवर कुठेतरी लिहिलंय. त्याच्या पाखुंमधे सापडलं नाही, अन्यथा इथेच लिंक दिली असती. हे पुस्तक सुचवल्याबद्दल पराग आणि श्रद्धाचे आभार.
भारतीताई, घेतला होता म्हणताय
भारतीताई, घेतला होता म्हणताय तर आता धसका संपला का? कशामुळे?
हर्पेन, मलाही ती वाचून अनेक वर्षे झाली, नक्की शोधा आणि तुमची वाचून झाल्यावर मलाही द्या.
नंदीनी ही ती लिंक अडमाकडे
नंदीनी ही ती लिंक अडमाकडे सापडली
http://www.maayboli.com/node/28287
फारएण्ड, अवचटांच्या
फारएण्ड, अवचटांच्या पुस्तकाबद्दल धन्यवाद. छंदांविषयी आणि कार्यरत सोडलं तर इतर बहुतेक सगळी अंगावर आली आहेत, त्यात धार्मिकचा नंबर सगळ्यात पहिला! झोप तर उडतेच पण आपण असे कसे निवांत झोपू शकतो म्हणुन गिल्ट घेरतो ते निराळंच...
नंदिनी, चांगला परिचय दिलायस. हर्पेन, लिंकबद्दल थँक्स. अॅडमचा दीर्घ लेखही वाचला.
दोन्ही वाचायला हवीत.
सई, संपला नाही, तुझ्या या
सई, संपला नाही, तुझ्या या परिचयामुळे आशा निर्माण झाली आहे म्हणून भूतकाळ वापरला
सध्या मी 'स्मृतीपुजा'-
सध्या मी 'स्मृतीपुजा'- प्रभावती भावे (पु.भा.भावे यांच्या पत्नी) यांचे आत्मकथन वाचतेय. ह्याच्याआधी मी 'इनसाईड द गास(gas) चेम्बर' हे एका ज्यू व्यक्तीने लिहिलेल्या आत्मकथनाचा मराठी अनुवाद वाचला, खूप सुन्न करणारे पुस्तक आहे.
अनिल अवचट माझे आवडते लेखक आहेत.
आता 'वास्तव नावाचे झेंगट' वाचेन. नंदिनी आणि हर्पेन धन्यवाद.
अन्जू झेंगट अवचटांचे नाहीये
अन्जू झेंगट अवचटांचे नाहीये गं
सई आणि अन्जू.... "वास्तव
सई आणि अन्जू....
"वास्तव नावाचं झेंगट" लेखक सुमित खाडिलकर यानी लिहिलेल्या पुस्तकाचे एक छान रसग्रहण इथेच मायबोलीवर प्रसिद्ध झाले होते. त्याची लिंक
http://www.maayboli.com/node/28287
~ अन्जू.... तू सासवडला येणार असलीस तर हे आणि "अमलताश" दोन्ही पुस्तके तुला मिळू शकतील.... [मीच देतो भाचीसाठी]
अमलताश मलाही आवडलं, पण
अमलताश मलाही आवडलं, पण निराळ्या कारणांसाठी. सई, तू सुरेख लिहिलं आहेस
सुमित खाडिलकरने अजून एक दीर्घकथा लिहिली होती. तीही छान होती. त्याच्या वडिलांचं प्रकाशन आहे, ज्याच्या दिवाळी अंकात आली होती ती छापून (नाव विसरले आहे) वास्तव.. पेक्षा मला ती कथा जास्त आवडली होती.
saee हो ग. 'वास्तव नावाचे
saee हो ग. 'वास्तव नावाचे झेंगट' अवचटांचे नाही ते माहितेय मला, चुकून ते दोन्ही एका ओळीत लिहिले. आता एडीट करते.
मामा एवढे कुठले नशीब सासवडला यायचं. धन्यवाद मामा, मी घेईन इकडे. डोंबिवलीला बऱ्याचदा पुस्तक-प्रदर्शन असते.
"माझंही एक स्वप्न होतं' ( I
"माझंही एक स्वप्न होतं' ( I too had a dream...Vergese Kurien as told by Gauree Salavee)हे सुजाता देशमुख यांनी अनुवाद केलेले श्री.व्हर्गीस कुरियन यांचे आत्मचरित्र वाचतेय.खूप स्पष्ट,निर्भीड वाटतेय.
Pages