मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वपु सांगाते वडीलांची किर्ती हे पुस्तक वाचलं.
अप्रतिम. Happy

आठवणींचा कोलाज असल्यासारखं हे पुस्तक आहे.
एरवीचे वपु लेखन न आवडणार्‍यानाही हे पुस्तकं आवडू शकेल अस वाटतय.

तोत्तोचान.
सुप्पर आहे. अनुवाद पण चांगला केलाय.

रुडयार्ड कीपलीन्ग चे जंगल बुक वाचलं.
अनुवाद वाचताना काहि काहि वाक्यरचना खटकल्या.
इन्ग्रजीतुन जशाच्या तशा उचलली आहे अस वाटतय.
जंगलच जिथे जिथे वर्णन आलं आहे तो सर्व भाग तर अप्रतिम . Happy

सुर्य हा कथा संग्रह वाचला.
श्री दा पानवलकर यांचा.

आवडलाच.
काही काही कथेत शब्दसौंदर्य अप्रतिमच. (पद्म मध्ये)

गोदीतल्या तीन कथा आहेत.
लेखक गोदीत कामाला होते काय असं वाटल.

श्याम मनोहारामचे शंभर मी वाचून झालं. सलग दोनदा वाचलं पुस्तक. सविस्तर लिहिण्यासारखे बरंच काही आहे, या विकेंडला लिहून काढेन.

नेशनल बुक ट्रस्टच्या कृपेने दोन अप्रतिम पुस्तके मिळाली आहेत. एक श्रीलंकन कथांचा संग्रह आहे (तमिळ, सिम्हली आणि इंग्रजी) दुसरे भीष्म सहानी यांनी लिहिलेले बलराज साहनी बद्दलचे पुस्तक. दोन्ही पुस्तके ग्रेट आहेत.

भीष्म सहानी यांनी लिहिलेले बलराज साहनी बद्दलचे पुस्तक खरोखरच भार्री आहे.

नॅशनल बूक ट्रस्टची बरीच पुस्तके चांगली असतात ती पटकन् मिळत नाहीत हीच एक वाईट्ट गोष्ट आहे.

झकासराव....

मला आनंद झाला की तुम्ही पानवलकरांचा "सूर्य" हा कथासंग्रह वाचला. फार आगळे कथालेखक.... 'सत्यकथा' परंपरेतील...सर्वच कथांत सूर्याचे जितके तेज तितकीच दाहकता अनुभवायला मिळते.

ते एक्साईज खात्यात अधिकारी होतेच, शिवाय त्यांची कस्टममध्येही काही काळ नोकरी झाल्याने या दोन खात्याशी निगडित असलेल्या अनेक घटना त्याना माहीत होत्या....त्यांच्या कित्येक कथांतून ते प्रकट झाले आहे. तसेच सांगली संस्थानाशीही ते संबंधीत असल्याने तेथील वातावरणाला सुसंगत अशा कथातून त्यांची लेखणी चमकली आहेच.

वैयक्तिकरित्या मला श्री.दा.पानवलकर भावले ते "जांभूळ" आणि "कमाई" या दोन कथातून....अगदी माणके आहेत या दोन कथा म्हणजे.

गेल्या आठवड्यात फोर्सिथचं ताजं पुस्तक 'द किल लिस्ट' वाचलं.
ओल्ड वाईन इन अ न्यू बॉटल.. गोष्ट सांगताना थोडं जॅकल, थोडं ओडेसा फाईल, थोडं डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह, थोडंसं निगोशिएटर असं डोकावत राहतं. पण त्यातल्या कुठल्याही पुस्तकातलं 'ब्रिलियन्ट डिटेक्टिव्हवर्क' नाही.
फोर्सिथच्या पुस्तकांच्या ३ खासियती असतात.
१. आंतरराष्ट्रीय राजकारणाचं अतिशय वास्तववादी सखोल चित्रण, त्यातले आगामी ट्रेन्ड्स ओळखायची कुवत आणि फॅक्ट्स आणि फिक्शनचं बेमालूम मिश्रण. त्यामुळे काही वेळा त्याच्याकडून भविष्यातल्या राजकीय घडामोडीही 'प्रेडिक्ट' झाल्यात. विशेषतः कोल्ड वॉरच्या काळात..
२. गोष्ट उलगडत जाताना 'ऑन ग्राउन्ड' डिटेक्टिव्ह वर्क होतं ते अतिशय तपशीलात आणि जबरदस्त असतं (उदा: जॅकल किंवा फोर्थ प्रोटोकॉल)
३. शेवट काहीतरी अचानक आत्तापर्यंत माहित नसलेला पैलू डोळ्यासमोर येतो - बरेचदा ट्विस्ट इन द एन्ड असतो.

नव्या पुस्तकात यातल्या शेवटच्या दोन गोष्टी नाहीतच म्हणलं तरी चालेल. अगदीच सरधोपटपणे गोष्ट पुढे जाते. एकदा आवर्जून वाचण्यासारखं आहे पण तेवढंच. पोलिटिकल थ्रिलरपेक्षा अ‍ॅक्शन थ्रिलर आहे.

त्यातली सेन्ट्रल थीम - इंटरनेटच्या सहाय्याने सामान्य नागरिकांना जिहादी करणारा अनामिक 'प्रीचर' - आणि अल-शबाबचा त्यातला वाटा हे पुस्तक वाचताना मला थोडं अतिरंजितच वाटलं होतं. कोल्ड वॉर संपल्यावर फोर्सिथचा हुकमी एक्का संपला आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याला आधीसारखे नेमके सनसनाटी आणि तेवढेच रिलेव्हन्ट विषय मिळत नाहीत असं माझं आधीचं असलेलं मत पक्कंच झालं.

फक्त पुस्तक संपवल्याच्या दुसर्‍याच दिवशी केनियातला अतिरेकी हल्ला सुरू झाला, इंटरनेटवरील गेल्या एकदोन महिन्यात पाश्चिमात्त्य देशातल्या नागरिकांना रीक्रूट करण्यासाठी वेगाने अपलोड होणार्‍या/झालेल्या अतिशय प्रभावी प्रचारकी व्हिडिओजबद्दल, भाषणांबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचल्या आणि परत एकदा फोर्सिथचं 'द्रष्टेपण' अजूनही टिकून आहे हे मला मान्य करावंच लागलं

भैरप्पांचं वंशवृक्ष वाचलं. फार आवडलं. 'श्रीनिवास श्रोत्रीं'नी भारावून सोडलंय. ह्या व्यक्तीरेखेला गुरू करून घ्यावं, इतकी मी प्रेमात पडले तिच्या. काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर वंशवृक्ष नभोनाट्य स्वरुपात ऐकली होती, पण काही काही भाग हुकले, शिवाय कादंबरीतले सगळे तपशील त्यात येऊ शकत नसल्याने तितका प्रभाव पडला नव्हता. मुख्य भुमिकेत अमृता सुभाष होती, ती मला तितकी आवडत नाही, हेही कारण असावे. एकंदरीत पुन्हा मुद्दाम वाचली ते बरं झालं. भैरप्पा अफाट!!

कुणी मला पूर्णचंद्र तेजस्वींच्या कादंबर्‍यांचे अनुवाद देऊ शकेल का? माझ्या लायब्ररीत ते उपलब्ध नाहीत आणि माझ्या एकटीसाठी ते विकत घेतील ही शक्यता नाही. शेवटचा उपाय थेट उमा कुलकर्णींकडेच जाऊन भेटून विचारणे हा ठरवलेला आहे. इथे कुणी अन्य कुठून मिळतील सुचवले तर बरं होईल. फक्त वाचायला हवेत.

सई....

उमा कुलकर्णी यानी मराठीत अनुवादित केलेली पूर्णचंद्र तेजस्वी यांची 'कार्व्हालो' ही एक कादंबरी मला माहीत आहे, जी मी फक्त हाताळली आहे....१०० रुपये किंमत असूनही त्यावेळी घेऊ शकलो नाही. त्याला कारण म्हणजे मला तेजस्वी यांची 'तबारेन कथा' ज्या संग्रहात आहे ते हवे होते. तबारेन कथा हा चित्रपट मी पाहिला होता [चारु हसन याना अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते त्या भूमिकेसाठी]]].....सबब कार्व्हालोकडे दुर्लक्ष झाले.

मेहताचे प्रकाशन आहे. त्यांच्या साईटवर ऑनलाईन उपलब्ध आहे. कदाचित यादीत आणखीनही काही अनुवादित पुस्तके मिळू शकतील.

अशोक पाटील

नॅशनल बूक ट्रस्टची बरीच पुस्तके चांगली असतात ती पटकन् मिळत नाहीत हीच एक वाईट्ट गोष्ट आहे>> रत्नागिरीत पुस्तक-प्रदर्शन चालू होतं, तिथे मी नेमकी इकडे निघायच्या आदल्या दिवशी गेले, तर ही सगळी चांगली पुस्तके जमिनीवर ठेवून दिली होती, माझ्याकडे अजून थोडा वेळ असता तर निट निवडून अजून थोडी पुस्तके आणता आली असती. आता राहून राहून वाईट वाटतं.

वरदा, द किल लिस्ट वाचायला घेईन आता पुढच्या आठवड्यात.

वरदा, 'द किल' ची माहिती आवडली. वाचायला हवेच. फोर्सिथ चा पॅटर्न समजण्याएवढा वाचलेला नाही तो पण आता वाचताना आठवेल.

फारेण्ड, फोर्सिथची निगोशिएटर पर्यंतची सगळीच पुस्तकं चांगली आहेत, पुढची मला तितकीशी आवडत नाहीत. डे ऑफ द जॅकल हे जरी त्याचं सर्वात गाजलेलं पुस्तक असलं तरी मला 'फोर्थ प्रोटोकॉल' जास्त आवडलं आहे. तू ते जरूर वाच (वाचलं नसल्यास). ते खरंखुरं 'पोलिटिकल थ्रिलर' आहे.

नक्कीच वाचेन फोर्थ प्रोटोकॉल. वाचले नाही अजून. निगोशिएटर म्हणजे त्याच नावाचा पिक्चर होता तो त्या पुस्तकावरच होता का? पोलिस हॉस्टेज निगोशिएटर स्वतःच लोकांना ओलिस धरतो आणि मग त्यातून होणारे नाट्य?

नाही नाही, निगोशिएटर मधे अमेरिकन प्रेसिडेन्टच्या मुलाला किडनॅप करतात. संभाव्य तेलटंचाई आणि त्यातून उद्भवणारे विविध गटांचे हितसंबंध वगैरे असं आहे...

फोर्थ प्रोटोकॉल वर सिनेमाही आहे (मायकेल केन आणि पीअर्स ब्रॉस्नन) पण तो पुस्तक वाचायच्या आधी चुकूनही बघू नकोस. त्याचा अ‍ॅक्शनपट केलाय पूर्ण!

महान क्रांतिकारक आणि कृषितज्ञ्य डॉ. खानखोजे यांच्यावरील वीणा गवाणकर यांचे 'नाही चिरा...' वाचले. ठोकळेबाज चरित्र न होउ देता गवाणकरांनी कथेच्या अंगाने त्यांचे जीवन खुलवले आहे. खूप छान. नुसते ईन्फर्मेटेव्ह नाही. प्रेरणादायी देखिल.

सध्या भैरप्पांचं 'मंद्र' वाचतेय. उमा वि. कुलकर्णींनी अनुवाद केलेलं हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाउसनं प्रकाशित केलं आहे.

पुस्तकात एका गायकाचा गानप्रवास आणि त्याच्या जीवनातल्या स्त्रिया यांचं वर्णन आहे. पण त्या अनुषंगाने अनेक रागांची जातकुळी, भाव, त्यातल्या चीजा, शास्त्रीय संगिताच्या बैठकांमागचा विचार, शास्त्रीय संगितातील सौंदर्यस्थळं, कलाकाराचं भावविश्व, कलाकारांची विचारपद्धती, भारावलेपण, झपाटलेपण.... असे अनेक पैलू यात येत आहेत.

कधी कधी कथानक त्याच त्याच वर्णनाची आवर्तन घेत जातं आणि जरा कंटाळवाणं होतं. पण तरीही एक वेगळी पार्श्वभूमी वापरून प्रत्येक पात्र ताकदीनं उभं केलंय यात शंकाच नाही. प्रत्ययकारी वर्णन असल्यानं गोष्ट डोळ्यापुढे घडत आहे असं वाटत राहतं.

रमा. - खानखोजेंच्या चरित्राची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. परवाच एकांशी बोलताना मी त्याचा उल्लेख केला पण काही केल्या नाव आठवत नव्हतं. परत एकदा वाचायला हवंय..

काल काही अभ्यासाच्या मटेरियलचं उत्खनन करताना त्यात गेलेली (आणि म्हणून इतके दिवस सापडत नसणारी) दोन पुस्तकं सापडली - आनंद पाटील यांचा 'साहित्यः काही देशी काही विदेशी' नामक लेखसंग्रह आणि म के ढवळीकर यांचं 'महाराष्ट्राची कुळकथा'

सध्याचा कामाचा ताव संपला की दोन्ही पुस्तकं वाचून इथे लिहिन. आनंद पाटील तसेही माझे आवडते समीक्षक आहेत.

मंद्र हे नुकतेच वाचून संपवल.

मोहनलाल या शास्त्रीय संगीत गाण्यार्या गायकाच जीवन भैराप्पानी रेखाटल आहे . असामान्य गायकी लाभलेला हां माणुस त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया त्याचा जीवनाकडे पाहायचा दृष्टीकोन यावर आधारलेल आहे
शास्त्रीय संगीत हां या पुस्तकाचा गाभा असल्याने अर्थातच वेगवेगळे राग त्यांची माहिती हां उल्ल्लेख अपरिहार्य आहे
तो वाचताना कंटाळा तितका येत नाही
पण काही वेळेला मात्र भैराप्पाच्या शैलीचा अतिरेक होतो
मात्र दुसर्याच क्षणी कथा वेगळ वळ्ण घेऊन ऊत्सुकता कायम ठेवते
या निमित्ताने शास्त्रीय संगीतातल्या विविध पद्धती गायकांचे नखरे त्यांचे अंह संगीत क्षेत्रातॆल स्पर्धा मिळ्न्यार्या बिदाग्या तेथील राजकारण घराण्याचे वाद मोहनलालच रंगेल आयुष्य गुरु या शब्दाचा त्याने घेतलेला फ़ायदा दिल्ल्ली दरबार तसेच ऊथ्ळ पत्रकारिता अशा अनेकविध पैलूंच दर्शन घडत

पेशेंस असल्यास एकदा वाचायला हरकत नाही

प्रतिमा जोशींचा जहन्नम या कथा संग्रह कधीपासून वाचायचा म्हणून राखून ठेवलेला होता
मटात पत्रकार म्हणून काम करण्यार्या जोशींच्या या पुस्तकाबद्दल ऊत्सुकता होती
ठ्ष्ट नाटकाच्या निमित्ताने त्यांना बघता आणि ऐकताही आल

जहन्नम हां कथा संग्रह जोशीन्ना वेश्याच्या वस्तीत सामाजिक काम करताना आलेल्या अनुभवाच एक कोलाज आहे अस म्हटल्यास वावग ठरणार नाही
सुरुवातीच्या दोन कथा ठीक आहेत
तिसर्या कथेपासुन मात्र त्यांची शैली व् अनुभव अस्वस्थ करून सोडतात
यात पहिला येतो तो वेश्या वस्तीताला एक लहान मुलगा
रात्रीचा वेळ हां धन्द्याचा टाइम असल्याने त्याला खोलीबाहेर काधण्यात येत
तेव्हा त्यांच आणि इतर मुलांच सहजीवन कस असत हे त्यांनी समर्थपणे दाखवले आहे
शिक्षण ; योग्य संस्कार ह्याअभावी ही मूल कशी फ़रफ़तट जातात
हां अनुभव अवस्थ करतो

कोठेवाली मालाकीन पार्वती आणि पोलिस अधिकारी भोसले यांच्या तरल नात्याची गोष्ट वेगळी आहे
आजवर पोलीसान्कडून फ़क्त छळाची अनुभूती घेतलेल्या पार्वतीला ही सुखाची झुळुक आवडते
मात्र या भोसलेची बदली होताच जे ओएसिस आपण बघितल होत ते खरच होत की आप्लाल्याला माणुस म्हणून जगण्याचा हक्क नाहीच हां पार्वतीला पडलेला प्रश्न आपल्याही सतावत राहतो

लहान पनीच वेश्या बनवल्या गेलेल्या यलाम्माचा जगायाचा असेल तर आपणही आक्का बनला पाहिजे हां विचार बलावतो
त्यानुसार ती वागातही असते
आपल्या कोठ्याच्या मुलींना दमदाटी करण ; नवीन मुलींना गळाला लावण ही काम ती करत असतेच
या कामात असतानाच पारुचा अनुभव हादरे देणारा असतो

या व्यवसायातल स्वंयसेवी संस्थाच संशयास्पद काम
त्यांना परदेशातल मिळ्नार फंडिंग
त्यातले गैर व्यवहार
राजकारण्या ची भूमिका त्यांनीच केलेल शोषण
हे सर्व प्रतिमा जोशींनी समर्थ पणे मांडले आहे

कथा संपतात तेव्हा डोक भणभण्याचा ; असाहायातेच ाअनुभव पदरी पडतो

आशू मी ते व नंतरची दोन पुस्तके वाचली आहेत. जरूर वाच. लिस्बेथ सालांद्रही व्यक्तिरेखा येइपरेन्त जरा स्लो वाट्ते कारण नेहमीची अमेरिकन पार्श्व भूमी नाही पन जबरदस्त आहेत. शैली, कथा, रहस्ये सर्वच मस्त.
स्टीग लार्सेन पुस्तके प्रकाशित होण्या आधीच वारले. साधारन माझ्याच वयाचे म्हणून थोड्या क णवेने मी ते पुस्तक घेतले होते पन वाचल्यावर लेखकाचा आत्मा खासा जिवंत आहे हे अगदी कळते.

मी पण नुकतंच 'जहन्नम' हे पुस्तक वाचून संपवलं. प्रतिमा जोशींची लिहिण्याची शैली एकदम 'कडक!!' आहे.

शिवाय शेवटी जयंत पवारांचं मनोगतही फार छान आहे. (त्यामानानं प्रस्तावनाच जरा मुळमुळीत आहे.)

जाई.,

जहन्नम हां कथा संग्रह जोशीन्ना वेश्या व्यवसायात आलेल्या अनुभवाच एक कोलाज आहे

>>> बोल्ड शब्दांनी काही गैरसमज होऊ शकतात. एक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्यांना वेश्याव्यवसायाचं जे दर्शन घडलं, त्यातून अवरतरलेल्या या कथा आहेत.

भैरप्पांचं पर्व वाचल्यावर जी मजा आली होती ती सगळी मंद्र ने घालवली. पानंच्या पानं पुढे काही घडतच नाही. वर्णनं सुरेख आहेत पण मूळ गाभाच कमी असल्याने फार रटाळ होतं. पर्व नंतर मंद्र ला हात लावू नये.

शिल्पकार-चित्रकार कोष.
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेनी (साप्ताहिक विवेक) हा प्रकाशित केला आहे.
संपादन सुहास बहुळकर, दीपक घारे, वसंत सरवटे.
मूल्य रुपये-१२००/-
पाने तब्बल साडेसातशे.

शर्मिला, या माहितीबद्दल अनेकानेक आभार.
हे वाचनातून जवळपास निसटलेच होते...
मिळवण्याचा प्रयत्न राहीलच.
बहुळकर, घारे आणि सरवटे यांनी अशी माहिती संकलित करून मोठ्ठे काम केले आहे.
आशा आहे की त्यात प्रमुख कलाकृतींचीही माहिती असेल.

आशूला +२!! अतिशय बोअर झालं मला 'मंद्र'. 'पर्व' नंतर मी त्यांची तीन पुस्तकं वाचली. मंद्र, काठ आणि अजून एक (बहुधा 'आवरण'). कोणतीच विशेष आवडली नाहीत.

जहन्नम - प्रतिमा जोशी अगदी टीन एजपासून वेश्यांच्या पुनर्वसनाच्या कामात समर्पित आहेत. तेथे ऐकल्या पाहिलेल्या दाहक अनुभवांवर हा कथासंग्रह आहे. आज म.टा . च्या पान ९ वर (मुंबई आवृत्ती)आलेल्या बातमीत बाई चंद्रगड येथे पहिल्या स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलल्या ते वृत्त आहे.

माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेले 'त्या एका दिवशी' (आतापर्यंत 'एके दिवशी' असाच प्रयोग वाचला होता. पहिल्यांदाच 'एका दिवशी' असे वाचायला मिळाले.) वाचले. या प्रत्येकी ४०-५० पानांच्या दोन दीर्घकथा/लघुकादंबर्‍या आहेत.
'त्या एका दिवशी ही टीनेजर मुलाच्या निवेदनातून उलगडणारी कथा'. पौगंडावस्थेतील मुलांच्या नजरेतून लिहिले गेलेले लेखन माझ्या वाचनात फारसे आलेले नाही.
'मला क्रियापद भेटले तेव्हा'. एका मुलीला 'मरणे' या शब्दाचा कळत गेलेला अर्थ.
माधुरी पुरंदरेंनी मुलांसाठी लिहिलेली पुस्तके मोठ्यांनी वाचण्यासारखी असतात, तसेच हे पुस्तक आहे.
प्रकाशक : उर्जा प्रकाशन पुणे

मामी, सोडून द्या. ते वाचले नाही म्हणून खंत वाटण्यासारखे काही नाही त्यात.
पूर्ण वाचून पस्तावलेला Happy

Pages