मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला चेस अज्जिबात आवडत नाही. माझा आवडता फोर्सिथ. निगोशिएटर च्या आधीचा फक्त.
कॉलिन फोर्ब्सचं स्टोन लेपर्ड पण आवडलेलं.
बाकी बहुतेक थ्रिलर रायटर्स सोसो...

तेच गायक फडके का ? >>>

प्रस्तावना, दोन शब्द, मनोगत हे स्किप करून वाचण्याच्या सवयीमुळे आता सांगता येत नाही. शेवटी लेखकाबद्दलची जी माहिती होती त्यात त्यांनी आजारपणाशी झुंजत कसा अनुवाद केला ते दिलं होतं Sad

चेस आवडत नाही? का? का? का? Proud
चेस शक्यतो 'हूडनईट' लिहित नाही, ते आपल्याला पहिल्याच पानात माहिती असते. मोहापायी, क्षणीक चुकीने गुन्ह्यात ओढला गेलेला सामान्य माणूस त्यातून कशी सुटका करुन घेतो असा एकंदरीत ढाचा असतो.

मी एकही चेस वाचला नाहीये...एकतर त्यावर अनेकदा बायांची उत्तेजक चित्रे असल्याने तो टिपीकल रेल्वे प्रवासात वाचणेबल लिहीत असावा असा भ्रम होता...
आता इथे सगळ्यांनी एवढे कौतुक केल्यामुळे वाचावे असे वाटू लागले आहे

आगाऊ, तू दिलेल्या कारणामुळेच आवडत नाही Proud
एकदा बेसिक थीम कळली की परतपरत विविध गोष्टींतून तेच ते वाचायचा मला कंटाळा येतो. थ्रिलर्सच्या बाबतीत.

आशु
जेम्स हॅडली म्हणजे तिकडचे बाबूराव अर्नाळकर समज. Wink रहस्य, गूढ असं काही नसतं. सीआयडी सारख्या घटना घडत राहतात. वेळ जात नसेल तर चेसला पर्याय नाही, कारण कुठेही पेपरबॅक मिळते. ( इंग्लीश वाचायची सवय लागावी म्हणून चेस वाचले होते Happy )

नुसत्या स्पीड्साठी thriller वाचायचे असेल तर Matthew Reilly वाचा नि एखादी गोष्ट किती रहस्यमय करता येते हे वाचायचे असेल तर Patrick Lee ची vault series वाचा. बहुतेक त्यातल्या कुठल्या तरी पुस्तकाला nebula award पण मिळाले आहे.

आशूचँप- वरदा+१.
आवर्जून वाचण्यासारखा 'चेस' मला तरी वाटला नाही. तसाच हॅरॉल्ड रॉबिन्स.

बायांची उत्तेजक चित्रे >>> तो केवळ हनीट्रॅप आहे, लिखाण एकदम सोज्वळ. आता त्याच्या नव्या पब्लिशर्सनी चुकीचा मेसेज जाउ नये म्हणून कव्हर्स बदलली बहुतेक.

आता त्याच्या नव्या पब्लिशर्सनी चुकीचा मेसेज जाउ नये म्हणून कव्हर्स बदलली बहुतेक.<<< बहुतेक.

फोर्सिथ मला पण आवडतो, पण चेस वाचायला घेतला की शेवटपर्यंत सलग वाचला जातो माझ्याकडून. तसा सलग वाचला जाणारा अजून एक माझा आवडता लेखक सिडने शेल्डन पण त्याची पुस्तकं दुसर्‍यांदा वाचावीशी वाटत नाहीत. (काढा आता माझं प्याकेज. :फिदी:)

नंदिनी Proud

आपल्याला तर कॉलेजमधे असताना आर्थर हेली आवडला होता ब्वा! त्याचं सर्वात आवडलेलं पुस्तक - द इव्हिनिंग न्यूज. मस्त जाडजूड ठोकळा पुस्तक आहे.
बातम्यांची अनेक चॅनल्स, त्यांच्यातली चढाओढ, लाईव्ह बातम्या देण्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं, ते काय काय करतात - हे सगळं जेव्हा आपल्याला ऐकूनही माहिती नव्हतं तेव्हा हे पुस्तक वाचलेलं असल्यामुळे त्यातल्या या न्यूज चॅनलांच्या कार्यपध्दतीच्या वर्णनामुळे फारच प्रभावित व्हायला झालेलं होतं.

दुसरं आवडलेलं - डिटेक्टिव्ह!

जे हॅ चे मलाही नाही आवडला कधी.

सिडने शेल्डनच्या सगळ्या वाचल्या नाहीत पण ज्या ज्या वाचल्या त्या आवडल्या...हे परदेशी लेखक थोडक्यात लिहीतच नाहीत का...कुठलीही कादंबरी घ्या ३५०-४०० पाने तरी घेतातच...
शेल्डनची ब्लडलाईन सगळ्यात जास्त आवडली, त्यापाठोपाठ रेंज ऑफ एन्जल्स, स्ट्रेजंर इन द मिरर, अदर साईड ऑफ मिडनाईट
अर्थात या सगळ्या पुस्तकांचे अनुवाद वाचले...अजून मूळ लिखाण वाचायचा योग यायचा आहे.
आयर्विंग वॉलेसच्या सेकंड लेडीमध्ये काहीतरी गरमागरम वर्णने आहेत असे कॉलेजजीवनात कुणाकडून ऐकले त्यामुळे वाचायची उत्सुकता होती. अर्थात ज्यावेळी वाचली त्यावेळी त्या वर्णनांपेक्षा बाकीचा प्लॉटच जास्त भावला. त्याच्या बाकी कादंबर्यांमध्ये पत्रकारितेबद्दल असल्यामुळे आवर्जून वाचलेली अलमायटी...अगदीच साफ निराशा...किती प्रेडक्टीबल असावी एखादी कादंबरी याचे यथार्थ उदाहरण...
पिजन प्रोजेक्ट निम्मा वाचून सोडून दिला...

सिडने शेल्डनचे 'मास्टर ऑफ द गेम' वाचत आहे. ते पुस्तक अनुवादित आहे आणि त्याची पाने भरपुर म्हणजे ६००/७०० पानी आहे. विजय देवधरांनी अनुवाद केला आहे.

इथे खूप जण अनुवाद वाचत/वाचले आहेत असं लिहिताहेत. मूळ पुस्तकं सहजी उपलब्ध आहेत, ती वाचायचा प्रयत्न तुम्ही लोक का करत नाही? मूळ भाषेची खुमारी वेगळीच असते, विशेषतः थ्रिलर्स आणि रहस्यकथांची!

वरदा अगदी अनुमोदन...पण बहुतांशी जण इथले मराठी वाचक आहेत आणि मराठी वाचनालये जशी सगळीकडे आहेत त्यामानाने इंग्रजी नाहीयेत...मला माझ्या वडीलांनी पदोपदी सांगितले की अनुवादीत वाचण्यापेक्षा मूळ भाषेत वाच..पण एकतर माझे इंग्रजी इतके चांगले नव्हते आणि अडल्या शब्दांसाठी डिक्शनरी काढावी लागली तर वाचनाचा सगळा फ्लोच जातो..मला वाटते कि इथे काही जणांची हीच परिस्थिती असावी...(कुठलाही गैरसमज करून घेऊ नये..)
पण नंतर नंतर जेव्हा इंग्रजी थोडेफार सुधारले, शब्दसंग्रह वाढला त्यावेळी मात्र वडीलांच्या बोलण्याची प्रचिती आली. खरोखर मूळ भाषेत पुस्तक वाचण्यात जी गंमत आहे ती अनुवादीत मध्ये अजिबात नाही.
जिम कॉर्बेट, केनेथ अँडरसन, मायकेल क्रायटेन यांची पुस्तके आधी मराठीत आणि नंतर इंग्रजीतून वाचली त्यावेळी हे जाणवले.
किंबहुना कित्येकदा सुमार अनुवादकामुळे मूळ लेखकाबद्दलच नावड निर्माण होण्याची शक्यता असते.

सिडने शेल्डन, आयर्विंग वॉलेस, आर्थर हॅली, केन फॉलेट वगैरे thrillers author च्या पुढे कोणी thrillers वाचलीच नाहित का ? देशात पुढच्या लेखकांच्या पिढ्याची पुस्तके सहजासहजी मिळत नाहित का ? एक कुतूहल म्हणून विचारतोय.

आशुचँप, मीही या वाचनटप्प्यांमधून गेलेय म्हणूनच तर वरती प्रश्न विचारला... शाळा-कॉलेजच्या वयात हे सगळे टप्पे सगळ्याच मराठी माध्यमातून शिकलेल्या वाचकांच्या वाट्याला येतात. पण नंतर तरी मूळ भाषेतूनच पुस्तकं वाचावीत असं मला वाटतं. त्याने खरंतर सगळ्यात झपाट्याने भाषा सुधारायला मदत होते.. पहिल्या फारतर एकदोन पुस्तकांबरोबर डिक्शनरीची मदत लागेल, नंतर निश्चितच लागणार नाही.

असामी, मिळतात की! पण इतकी व्हिजिबिलिटी नसते. डॅन ब्राऊन, ग्रिशम वगैरे जास्तकरून दिसतात. बाकीची कुणी आवर्जून विचारली तर. पण हे मी पुण्यामुंबईचं लिहिते आहे. बाकीच्या शहरांत इंग्लिश पुस्तकं किती मिळतात खरंच माहित नाही
शिवाय इथल्या वृत्तपत्रांतही ताज्या पल्प फिक्शन्सची परीक्षणं वगैरे मराठीतून येतच नाहीत म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.... डॅन ब्राऊन इ. अपवाद (असावा!)

देशात पुढच्या लेखकांच्या पिढ्याची पुस्तके सहजासहजी मिळत नाहित का ? एक कुतूहल म्हणून विचारतोय.

>>>देशात सहजासहजी पुस्तकंच मिळत नाहीत. Happy पुण्यामुंबईचं सोडून द्या. आमच्या रत्नागिरीला अक्षरधारा वगैरेचं प्रदर्शन आलं तर पुस्तकं नवीन मिळतात.

पण इतकी व्हिजिबिलिटी नसते. डॅन ब्राऊन, ग्रिशम वगैरे जास्तकरून दिसतात. बाकीची कुणी आवर्जून विचारली तर. + १००

फुटपाथपासून एअरपोर्टपर्यंत हेच चित्र...आता त्यात इंडियन लेखकांची मोठी भर असते...चेतन भगत, अमिश त्रिपाठी आदी मंडळी दाटीवाटीने असतात..त्यात वेगळा लेखक दिसूनच येत नाही

पण इतकी व्हिजिबिलिटी नसते. डॅन ब्राऊन, ग्रिशम वगैरे जास्तकरून दिसतात. >> कठीण आहे राव, सध्या वरच्या लेखकांना इथे कमी प्रमाणात वाचले जाते. बरेच नवीन लेखक आले आहेत नि thrillers चे स्वरुप पण बदलते आहे. उदाहरणार्थ, CIA/FBI based novel वगैरे असेल तर सध्या villain म्हणून मुस्लीम देशातले असतात जे आधी रशियाचे काम असे. १२-डिसेंबर-२०१२ च्या आधी त्या विषयावरची बरीच thrillers आली. amazon, barnes and noble वर वगैरे बघत जाऊन नविन लेखक try करून बघाच.

शिवाय इथल्या वृत्तपत्रांतही ताज्या पल्प फिक्शन्सची परीक्षणं वगैरे मराठीतून येतच नाहीत म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही >> आधी तरी कुठे असत ग Happy हे सगळे कोणी तरी दिल्यामूळे वाचले जात असे.

हो, आधी काय, कधीच नसत तशी परीक्षणं हे मान्यच!! माझी सुरुवातीची थ्रिलर्सची आवड मोठ्या भावाने आणि वडिलांनी जोपासली. नंतर मात्र विविध लायब्ररीजमधून माझी मी शोधत गेले - सगळ्याच प्रकारची पुस्तकं... मग मला आवडलेलं आणि भावाने, वडिलांनी न वाचलेलं पुस्तक (क्वचितच व्हायचं असं) त्यांना सांगायचे..

या सगळ्यात फार सिंहाचा वाटा आहे तो पुण्यातल्या फिनिक्स ग्रंथालयाचा आणि त्याचे चालक/मालक श्री. पोंडा यांचा! काही पुस्तकं, काही लेखक डोक्यावर बसून वाचून घेतले. जाणीवपूर्वक लक्ष ठेवून कुठली पुस्तकं वाचते आहे, आणखी कुठली वाचायला आवडतील ते शोधणं हे आवर्जून केलं. त्यांच्या लायब्ररीतील प्रत्येक पुस्तक त्यांनी स्वतः वाचलेलं असायचंच. त्यामुळे अनेको वेगवेगळे पुस्तकप्रकार ते मुद्दाम लक्षात आणून द्यायचे. एखादं नवीन चांगलं पुस्तक बाजारात आलं/ त्याचं परीक्षण वाचून त्यांना सांगितलं की अगदी एखाद्या वाचकासाठीसुद्धा विकत घ्यायचे.
शिवाय पुस्तकं हाताळायची कशी याबद्दल अगदी कडक शिस्त होती त्यांची, तीही शिकले....

खूप दिवस पुरेल अशी भव्य दिव्य कादंबरी मराठीत आली असल्यास कळवा प्लीज.>>> किरण्यके, तुंबाडचे खोत (जुनी चालत असल्यास. नवीनच हवी असेल तर माहीत नाही).

Pages