Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी डॉ. आनंद यादव यांचे झोंबी
मी डॉ. आनंद यादव यांचे झोंबी वाचले मागच्या महिन्यात . हा डॉ. आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग आहे.
९ वी किंवा १० वी मध्ये त्यावरती एक चाप्टर होता, तेव्हापासून वाचायचे होते हे पुस्तक.....
आणि आता एवढ्या दिवसांनी ( ७-८ वर्षांनी
) ते पुस्तक हातात पडले अन झपाटल्या सारखे ते वाचून काढलं...आणि आत्मचरित्राचे सगळे भाग मागवून टाकले..
१. झोंबी
२.नांगरणी
३.घरभिंती
४.काचवेल
आता घरभिंती वाचतेय ........ते झाल्यावर काचवेल......
आनंद यादवांची शैली मला
आनंद यादवांची शैली मला आवडली.. तसं आधी त्यांचे गोतावळा वाचलेच होते ..
त्यांनी त्यांच्या लहानपणीचे म्हणा किवा कॉलेज मधले प्रसंग एवढ्या details मध्ये लिहिले आहेत ना,
मला त्यांच्या मेमरीच कौतुक वाटत...आणि आत्मचरित्र कुठेही बोरिंग झाल नाही हे विशेष...त्यांच्या लेखनातून अजून तरी मला कुठेही आत्म प्रौढी दिसली नाही..
एकूणच आवडल मला पुस्तक...:-)
हसरे दुख बद्दल
हसरे दुख बद्दल अनुमोदन....
चार्ली चाप्लिन ग्रेट होता याबाबत दुमत नाहीच...पण त्याचे लार्जर दॅन लाईफ असणे फार ओढून ताणून असल्यासारखे वाटले या पुस्तकात....
चार्ली आणि त्याच्या भावातील संवाद पण अनेकदा कृत्रिम वाटतात
माझं नुकतच "नर्मदे हर..
माझं नुकतच "नर्मदे हर.. हर..." वाचून झालं. सुरेख पुस्तक आहे. इथे मायबोलीवरच त्याबद्दल वाचल होतं आणि तेव्हापासून ते वाचायच्या पुस्तकांच्या यादीत टाकून ठेवलं होतं.
पुस्तकात पानोपानी चमत्कृतीपूर्ण अद्भूतरम्य किस्से आहेत पण पुस्तक आवडायचं ते कारण नव्हे.
लेखक (जगन्नाथ कुंटे) ही एक अजब वल्ली आहेत. परिक्रमा करणे किती कठिण आहे हे निरनिराळे लेख/पुस्तके वाचून माहिती झाले होते. तरिही एकदा दोनदा नाही तर ४ वेळा ही परिक्रमा पायी करण्यासाठी निव्वळ धाडस अंगी असून उपयोग नाही. हातात पैसा नाही, भुकेला जेवण मिळण्याची शाश्वती नाही, शरिरात ताकद नाही, अंगावर पुरेसे कपडे पण नाहीत, अशा अवस्थेत आनंदाने परिक्रमा पूर्ण करण्यासाठी एक अटळ, अढळ श्रद्धा असणं सर्वात जरूरीचं असावं. वाचताना एखादवेळी मनात आलच माझ्या की किती बरं झालं असतं जर आपली पण एखाद्या गोष्टीवर अशी श्रद्धा असती तर!>>> +१
जगन्नाथ कुंटेचे 'नर्मदे हर
जगन्नाथ कुंटेचे 'नर्मदे हर हर' मलापण भावलं. त्यांचे 'साधनामस्त' आणि 'नित्य निरंजन' ही दोन्ही पुस्तके मला आवडली. 'कालिंदी' आणि 'धुनी' ही दोन पुस्तके मात्र मला तितकीशी आवडली नाहीत.
अच्युत गोडबोलेंचे मुसाफिर
अच्युत गोडबोलेंचे मुसाफिर वाचले एकदम पीळ आहे. भारा भ रती लिहीले आहे.
विजय तेंडुलकरांचे राम प्रहर. कॉलम्स चा संग्रह आहे. १९९२ मधला. आता वाचायला किती वेगळे वाट्ते.
अच्युत गोडबोलेंचे मुसाफिर
अच्युत गोडबोलेंचे मुसाफिर वाचले एकदम पीळ आहे>>
मी पण वाचले मुसाफिर , आवडल.:)
>>>>अच्युत गोडबोलेंचे मुसाफिर
>>>>अच्युत गोडबोलेंचे मुसाफिर वाचले एकदम पीळ आहे>+१
मी पण वाचले मुसाफिर , आवडल.
तुम्हाला पुस्तक आवडलं की नाही?? कारण अमांना ते बहुतेक आवडलं नाहिये!!!
दोघींना वेगळ्या कारणासाठी पीळ
दोघींना वेगळ्या कारणासाठी पीळ बसला असेल
दोघींना वेगळ्या कारणासाठी पीळ
दोघींना वेगळ्या कारणासाठी पीळ बसला असेल >>>>
मिलिंदा
मिलिंदा
>>दोघींना वेगळ्या कारणासाठी
>>दोघींना वेगळ्या कारणासाठी पीळ बसला असेल
पीळ बसने याचा अर्थच न
पीळ बसने याचा अर्थच न कळण्याने थोड misunderstanding झाल.त्याबद्दल sorry
पण मला आवडल ते पुस्तक, त्यांनी त्यांच्या चुका प्रांजळ पणे कबूल केल्या तर आहेतच .आणि कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न, आदिवासी लोकांसाठी केलेले कार्य वगेरे चांगल explain केलंय...
रमाबाई रानडे,व्यक्तित्व आणि
रमाबाई रानडे,व्यक्तित्व आणि कर्तृत्व ....विलास खोलेंचे पुस्तक वाचले.खरच त्या काळातली ही माणसं उत्तुंग होती.
वेगळ्या कारणासाठी पीळ >>>
वेगळ्या कारणासाठी पीळ >>>
हिचकॉकच्या रहस्यदालनात – भाग
हिचकॉकच्या रहस्यदालनात – भाग १ वाचतोय. हिचकॉकने लिहिलेल्या रहस्यकथा.
पेशवे ईतिहास मला आवडत
पेशवे ईतिहास मला आवडत नाही...पण पानीपत वाचुन रडले.....इतकं वाईट वाटलं.....
पेशवे इतिहास मला आवडत नाही.
पेशवे इतिहास मला आवडत नाही. >>>
का ते?
माहित नाही गं...पण नाही
माहित नाही गं...पण नाही आवडत...
दूरदर्शनवर एक कार्यक्रम होता
दूरदर्शनवर एक कार्यक्रम होता मागे मी त्याचा एक भाग youtube वर पहिला होता. शांत शेळके आणि सरोजिनी नाबर यांचा. रानजाई हे नाव होता का त्या कार्याक्रमचे? त्या कार्यक्रमाचे कुठे पुस्तक/CD उपलब्ध आहे का? कुणाला माहिती असल्यास कृपया सांगा.
हो. शांता शेळके आणि सरोजनी
हो. शांता शेळके आणि सरोजनी बाबरच्या त्या कार्यक्रमाचं नाव "रानजाई" होतं. छान होता कार्यक्रम. सीडी आहे की नाही माहित नाही. (त्या कार्यक्रमाचे शिर्षकगीत पण खूप छान होते.
अकूपार वाचले. हातातून ठेववत
अकूपार वाचले. हातातून ठेववत नव्हते इतके आवडले. सुदैवाने दिवाळीच्या सुट्टीमुळे सलग आणि निवांतपणे वाचता आले. संपता संपता नको संपायला अशी हुरहुर खुप दिवसांनंतर या पुस्तकाने लावली. इतके सुंदर पुस्तक इथे नोंदवल्याबद्दल शैलजाला धन्यवाद.
सई, तुला पुस्तक आवडले हे
सई, तुला पुस्तक आवडले हे वाचून मस्त वाटले!
शर्मिलालासुद्धा आवडले होते..
आपल्याला आवडलेले पुस्तक अजूनही कोणाला आवडले हे समजले की मस्त वाटते अगदी!
अगदी शैलजा, तो आनंद खुप छान
अगदी शैलजा, तो आनंद खुप छान असतो. आता मी तत्वमसीबद्दलही उत्सुक आहे. अकूपार पुन्हा वाचणार आहे लवकरच, कारण यावेळेला ती पात्रे, तो परिसर, त्या घटना ओळखीच्या असल्यामुळे वाचताना आणखी आनंद मिळेल. त्या सर्वांतली एकतानता मला अतिशय भावली. साधं-सोपं, अगदी सरळ तरी अद्भुत असं आहे ते सगळं... आणि हे साधंसोपं सरळच समजायला सगळ्यात अवघड असतं बहुतेकदा.
साधंसोपं सरळच समजायला सगळ्यात
साधंसोपं सरळच समजायला सगळ्यात अवघड असतं बहुतेकदा.>>.अरे तुम्ही मस्तच लिहून गेलात.
सई +१
सई +१
अकूपार कोणाचं आहे ? भैरप्पा
अकूपार कोणाचं आहे ? भैरप्पा यांचं का ?
ध्रुव भट (Dhruv - इथे
ध्रुव भट (Dhruv - इथे लिहिते कारण मला समजत नाहीये की देवनागरीमध्ये व्यवस्थित नाव दिसतय का ते. ) ह्यांचं. अनुवादित आहे मराठी मध्ये. मूळ पुस्तक गुजराती.
इथे अकूपार बद्दल वेगळा धागा
इथे अकूपार बद्दल वेगळा धागा आहे का?
कशावर आहे पुस्तक?आधीच्या पानांवर चर्चा झाली असल्यास कोणाला पान नंबर माहित आहे का?
३० ऑगस्ट चं शैलजाचं मूळ पोस्ट
३० ऑगस्ट चं शैलजाचं मूळ पोस्ट आहे, पान १३ वर. तेवढाच उल्लेख सापडला.
Pages