राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती जाई आहे तिचा बाप. मोठा चित्रकार का कोणतरी आहे. पण विक्षिप्त आहे म्हणे. त्याची बायको मुलीला जन्म देताना गेली म्हणून तिला आश्रमात ठेवलंय असं काहीतरी आहे. त्याच्या ड्रायव्हरने राधामाऊलीला सांगितलं. मी उडत उडत ऐकलं.

अरे देवा... शी: कैच्याकैच चालु आहे मालिका. शनिवारी बहुतेक मी उडत उडत बघितल (मी जमिनीवरच होते, पण बाहेर जाण्याच्या घाईत होते म्हणुन मालिकेवरच लक्ष उडाल होत) सीमा आणि सौरभ कुठेतरी जात/येत असताना त्यांना मानस आणि राधा दिसतात हातात हात घेउन वगैरे लग्गेच सीमाची बोंबाबोंब सुरु होते. या मालिकेच्या लेखकाने सीमा सोडुन कुणाला डायलॉग्ज दिलेच नाहीयेत का? फक्त ती बोलत रादर बोंबलत असते आणि सगळे नुसते ठोंब्यासारखे ऐकत असतात.....

शनिवारी बहुतेक मी उडत उडत बघितल.. मी जमिनीवरच होते, पण बाहेर जाण्याच्या घाईत होते म्हणुन मालिकेवरच लक्ष उडाल होत Lol

मुग्धा.. काही मराठी संकेतस्थळांवर प्रतिक्रियांना रेटिंग द्यायची सोय आहे.. तशी सोय माबोवर असती तर..
तुझ्या आणि स्वप्नाच्या कमेंट्स अतीविनोदी रेटिंगमध्ये सगळ्यात वर असत्या Happy

राधा, मानस यांना काँस्टिपेशन चा त्रास आहे का?चेहरे तसेच अस्तात कारण..>>>> हो ना आणि एक म्हणे गायनॅक आणि दुसरा तर मानसोपचारतज्ञ पण साध काँस्टिपेशनवर औषध माहित नाही.... आमच्याकडे शेंबड पोरग पण सांगेल कायमचूर्ण, त्रिफळाचूर्ण, वैद्य पाटणकर काढा वगैरे चूर्णांची आणि काढ्यांची नाव......

शनिवारी बहुतेक मी उडत उडत बघितल (मी जमिनीवरच होते, पण बाहेर जाण्याच्या घाईत होते म्हणुन मालिकेवरच लक्ष उडाल होत..:हाहा:

चैत्राली, पियु अग इतकी काय आवडली कमेंट तुम्हाला दोघींना. मी कंसात लिहिलेल (मी जमिनीवरच होते, पण बाहेर जाण्याच्या घाईत होते म्हणुन मालिकेवरच लक्ष उडाल होत..) मुद्दाम लिहिल कारण नुसत "शनिवारी बहुतेक मी उडत उडत बघितल" एवढच लिहिल असत ना तर १०० प्रतिक्रिया येत राहिल्या असत्या.

काल ती गार्गीची आई कणीक मळताना पाहून 'कणीक तिंबणे' हा वाक्प्रचार कुठून आला असावा ते कळलं. Happy आता काय मार्कंड राणी दीक्षीतच्या पदरात पोर टाकून लापता झाला आहे का? बहुतेक प्रत्येक खंडात एकेक धर्माधिकारी पेरायची योजना असेल. आशिया खंडाची वेळ शेवटी येईल.

आता काय मार्कंड राणी दीक्षीतच्या पदरात पोर टाकून लापता झाला आहे का? बहुतेक प्रत्येक खंडात एकेक धर्माधिकारी पेरायची योजना असेल. आशिया खंडाची वेळ शेवटी येईल.>>>> हो पण तोपर्यंत सीमावैनी जिवंत पाहिजेत आणि जिवंत असल्या तरी मध्यंतरी उद्भवलेला मेनोपॉज तोपर्यंत येउन जुना झालेला असेल मग आशिया खंडात ज्यु. मार्कंड कसा जन्माला येणार???

हायला झालं इतकंच?
अरे ती सीमा वहिनी त्या सौर्‍याबरोबर रिहर्सल ला गेलेली तेव्हा कशी भारावून आलेली ते पाहिलं नाही का? एक क्षणभर मला ती माबोवरचा एखादा गोड गिट्ट लेख पाठ करून आलिये का काय असंच वाटलं. Proud

सोनाली ती बाई कुणाच्या बँडात काय सामिल होतेय? तिच्यात लिडरशीप क्वालिटीज ठासून भरलेल्या (??) असल्या कारणाने ती स्वतःचा ब्यान्ड काढिल.

ती बाई कुणाच्या बँडात काय सामिल होतेय? तिच्यात लिडरशीप क्वालिटीज ठासून भरलेल्या (??) असल्या कारणाने ती स्वतःचा ब्यान्ड काढिल.>>हो हो...नाहीतर हळूच त्यांच्यात सामील होऊन नंतर तिथेही दादागिरी करेल....जसे धर्माधिकार्‍यांच्या घरात घुसून मग तिथे सत्ता गाजवायला लगली तसे.

व्हिक्टर डिकॉस्टा......केदार जेव्हा राघव होण्याचे नाटक करायचा तेव्हा तो दादांना 'तू डिकॉस्टा आहे' असे म्हणायचा.

अरे हा मानस माठ आहे का? Angry शिव्या येतायत तोंडात माझ्या.
दिग्दर्शन केलंय मालिकेला की चेष्टा? Uhoh तो डिकोस्टा असं वागतोय कमाल आहे.
वास्तवात असं कुणी वागतं का का कधी? Uhoh
सिरियल चं नाव लपवालपवी ठेवा आता.
गार्गी प्रेग्नंट लपवा
मार्कंडचा घटस्फोट लपवा
त्याचं आजारपण लपवा
राधाची प्रेग्नन्सी लपवा
आता ही सिरियलच लपवा कुठेतरी पटकन.

दक्षिणा....ही सीरियलच लपवा....:) ..+ (infinity*infinity) येवढं अनुमोदन....प्रचंड गंडलेली सीरियल....

.ही सीरियलच लपवा....स्मित ..+ (infinity*infinity) येवढं अनुमोदन....प्रचंड गंडलेली सीरियल....>>>>>>>>> +++++११११११..... प्रचंड अनुमोदन

मार्कंड आजारी आहे, हे रंजूला, सौरभला सांगण्यात काय हरकत होती??? कम्माल आहे यश पण..>>>> अनुमोदन. स्वतःची जहागीरी उतु चालल्यासारखा निघाला मार्कंडला बर करायला. घरी सांगितल असत तर किमान या कारणाने का होईना सीमाचा थयथयाट बंद होउन सगळ्यांनी एकत्र येउन काम केली असती. एका छताखाली राहुन आणि एकमेकांविरुद्ध कारस्थानं करुन एकत्र कुटुंबपद्धतीच्या नावाने कोरडे गळे काढायचे. त्यापेक्षा वेगळं राहिलेल बरं.

वीरेन च्या सिरीयली कडुन दुसर्‍या अपेक्षा कश्या काय ठेवता तुम्ही? >>>+११११११११११११
ती भाग्यलक्ष्मी सिरीयल पण अशीच होती ( साबांच्या कृपेने बघायला लागली होती)...

एक मार्कडच राहिला होता धर्माधिकारींच्या घरात हॉस्पिटलात जायचा. तोही अ‍ॅडमीट झाला. हा पहिला धर्माधिकारी जो आत गेला आणि दोन पायांवर बाहेर आला नाही. मला तर यश मार्कंडला 'ब्रेन हॅमरेजचा अ‍ॅटॅ़क' आला असं म्हणाला तेव्हा सॉलिड हसायला आलं. हार्ट अ‍ॅटॅक येतो, 'ब्रेन हॅमरेजचा अ‍ॅटॅ़क' नाही येत. ग्रेज अ‍ॅनटमी मधल्या डॉक्टर शेफर्डने हे ऐकलं तर त्यालाही 'ब्रेन हॅमरेजचा अ‍ॅटॅ़क' येईल.

घ्या आता घारुअण्णाना चक्कर आली आहे. आता हे जातील हॉस्पीटलात. सारखं ये-जा करण्यापेक्षा हे लोक हॉस्पीटलातच का रहात नाहीत?

ही सिरियलच लपवा कुठेतरी पटकन.>>> Rofl

सारखं ये-जा करण्यापेक्षा हे लोक हॉस्पीटलातच का रहात नाहीत?>> Rofl Rofl

राधाक्काने घरातच हॉस्पिटल काढाव Happy
ब्रेन हॅमरेजचा अ‍ॅटॅ़क << मला कोणी तरी हॅमर घेऊन त्याच्या ब्रैन ला अटॅक करायला आलय अस डोळ्यासमोर आल Happy सीमाच असावी ती Lol

kal chya bhagat Markand Dada expiree jhalela dhakvlay>>>>> हो आणि प्रथेप्रमाणे ही गोष्ट सौरभ आणि यशने घरच्यांपासुन लपवली आहे.....

Pages