माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"
खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.
मनावर मळभ आणणार्या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"
http://vishesh.maayboli.com/node/1120
चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.
नक्कीच
नक्कीच
https://cen.acs.org/synthesis
https://cen.acs.org/synthesis/biocatalysis/2026-talented-12-soumitra-ath...
2026 talented १२ मधील एक भारतीय
भारताचे पहिले प्रायव्हेट
भारताचे पहिले प्रायव्हेट रॉकेट स्कायरूट विक्रम, SHAR labs श्रीहरीकोटा वरून सक्सेसफुली लॉंच झाले.
कंट्रोल रुमचं ॲवरेज वय २८ आहे.
SHAR, पोर्ट ब्लेअर, बोगोर (इंडोनेशिया) आणि ऑस्ट्रेलियामधली लॅब यांनी या रॉकेटची प्रोग्रेस लाईव्ह ट्रॅक केली.
स्कोप आणि सोलॅरीस नामक दोन उपग्रह अंतरीक्षात प्रस्थापित करून या मिशनने भारताच्या अंतरीक्ष प्रवासातील एक नवा इतिहास घडवला.
मीराबाई चानू आणि सुवर्ण पदक
मीराबाई चानू आणि सुवर्ण पदक

राष्ट्रकुल स्पर्धेत तिचे हे सलग तिसरे सुवर्ण पदक...
कौतुकास्पद कामगिरी...
Pages