नमस्कार...
येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.
पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.
अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.
कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.
उल्लेख / माहिती असलेली आडनावे -
पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे
पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर
पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट
पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले
पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित
पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले
पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर
पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी
पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव
पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,
पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,
पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे
पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे
पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम
पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर
पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव
पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे
पान १८ : ........ अपुर्ण...
डीक्रूझ = डिक्रूचा मुलगा ...
डीक्रूझ = डिक्रूचा मुलगा ... <<
अरे ते डी क्रूझ असं आडनाव आहे ना. डि कास्टा, डि मेलो
इत्यादी...
पळपुटेपणा = रणछोडदास.
पळपुटेपणा = रणछोडदास. <<<
बाब्या, श्रीकृष्णाने कुठल्या तरी युद्धात पळ काढून द्वारका वसवली म्हणून कृष्णाचं नाव रणछोडदास पडलं असं सांगतात द्वारकेत.
नाव पडायची कारणं सागतोय
नाव पडायची कारणं सागतोय ना......
दास हे आडनाव केरळात आणि
दास हे आडनाव केरळात आणि बंगाल्यात देखील... कसे काय बुवा!!!
बाब्या.. दिवसभर तुला हा धागा
बाब्या.. दिवसभर तुला हा धागा दिसला नव्हता??

एकदा टाकलेली पोस्ट गायब झाली
एकदा टाकलेली पोस्ट गायब झाली रे. मग दिवसभर या ना त्या कारणाने बीझी होतो.
जेस्ते, जेरे, अपामार्जने,
जेस्ते, जेरे, अपामार्जने, आफळे, इ. आडनावांची व्युत्पत्ती काय असू शकेल ?
माहेरचं आडनाव भिडे, त्याचा
माहेरचं आडनाव भिडे, त्याचा उल्लेख येउन गेलाय.
त्याची स्टोरी कुणाला माहित असेल अशी आशा नाही कारण आडनाव ऐकलं की लगेच समजलं असं होतच नाही सगळे लोक पुन्हा एकदा रिपीट करायलाच लावतात 
सासरचं कोंडप. हे भारतात एकमेवच आणि समस्त कोंडप आमचेच नातेवाइक
ठाकुर हे आडनाव पण मराठी आणि बंगाली दोन्ही असतं ना? त्याची काय कथा?
लेकीच्या शाळेत ऑड्री आणि लॉरेन अशा जुळ्या बहिणी आहेत. आडनाव ठाकुर पण कुटुंब पूर्णपणे अंतर्बाह्य ख्रिश्चन आहे. त्यांची आई म्हणाली की तिच्या नवर्याचे पूर्वज अनेक पिढ्यांपूर्वी भारतातून घियाना(घाना?) ला माय्ग्रेट झाले आणि आता त्यांचा भारताशी कोणताही संबंध नाही. मी त्यांचं आडनाव ठाकुर असं उच्चारते पण माझी लेक मात्र ठॅकर असा काहीसा उच्चार करते.
आज लै (आड)नाव, गाव, फळ, फुल,
आज लै (आड)नाव, गाव, फळ, फुल, पक्षी, प्राणी खेळलो...
आता जाउन झोपावे म्हणतो... 
ठाकूर वरून आठवले (म्हणजे
ठाकूर वरून आठवले (म्हणजे लक्षात आले), ठाकरे यांचे आडनाव कसे रूढ झाले याबद्दल नुकतेच न्युयॉर्क टाईम्सच्या एका लेखात वाचनात आले होते.
His father, Keshav Sitaram Thackeray, a journalist and activist, was said to have taken the surname because he admired the English novelist William Makepeace Thackeray.
http://www.nytimes.com/2012/11/18/world/asia/bal-k-thackeray-leader-of-r...
आडनाव घेतले नाही. केवळ
आडनाव घेतले नाही. केवळ स्पेलिंग घेतले.
ते काय नक्की माहित नाही,
ते काय नक्की माहित नाही, यांनी तर असेच म्हणले आहे की आडनाव घेतले (केवळ स्पेलिन्ग नाही)
ठाकूर, ठाकरे यासारखे ठाकर (मराठी) आणि ठाकेर (गुजराती) ही पण आडनावे आहेत
न्यूयॉर्क टाइम्स पेक्षा
न्यूयॉर्क टाइम्स पेक्षा टाइम्स ऑफ इंडिया बघा.
आडनावात काय आहे ? जालरंगच्या
आडनावात काय आहे ?
जालरंगच्या पहिल्याच अंकात जयबालाताई परूळेकर ह्यांनी लिहिलेला हा लेख आठवला.
वर ' बागवे' या आडनांवाचा
वर ' बागवे' या आडनांवाचा उल्लेख आला आहे. याच नांवाचे माझे एक मित्र होते व कांहीं कामानिमित्त मी त्यांच्याबरोबर स्व. यशवंतराव चव्हाणाना भेटायला गेलो होतों. माझ्या मित्रानी त्यांचं नांव सांगतांच यशवंतरावानीं चमकून विचारलं ' मसूर्याचे का ?'. 'मसूरं'' हें सिंधुदूर्गातील एक तसं लहानसं गांव. मग इतकं चमकून एवढ्या मोठ्या माणसानं असं विचारण्याचं कारण ? माझ्या मित्रानी सांगितलं कीं प. महाराष्ट्रातील मराठे कोकणातील ज्या मराठ्यांशी लग्न-नातेसंबंध सहजपणे जोडतात, त्या मोजक्या घराण्यांपैकीं एक ' मसूर्याचे बागवे' आहेत. त्यामुळे , एक तर 'बागवे' हे प. महाराष्ट्रातून कोकणात उतरले असावेत किंवा प. महाराष्ट्रातील निदान कांही मराठ्यांचीं घराणीं तरी 'बागव्यां'च व आपलं मूळस्थान राजस्थानच आहे असं मानत असावीत. [ अर्थात, हा एक तर्क; याला संशोधनाचा आधार नाही ].
आडनांवांच्या व्युत्पत्तिविषयीं एक किस्सा - 'मोबेदजीना' नांवाच्या एका पारशी मित्राला त्याच्या नांवाचा अर्थ विचारला तेंव्हा त्यानं दिलेली माहिती अशी: मोबेद नांवाच्या त्यांच्या एका पूर्वजाना सर्वजण आदरार्थी ' मोबेदजी' असं संबोधत. मग त्यांच्या घरच्या मुलाना ' मोबेदजीना डिकरा/ डिकरी [ मुलगा/मुलगी ]' म्हणायची पद्धत पडली व मग 'मोबेदजीना' हें आडनांवच होऊन राहिलं ! व्यवसाय, किताब, गांव इत्यादीवरून आलेल्या आडनांवांपेक्षां अशी व्यक्तीनिष्ठ व्युत्पत्ति असणार्या आडनांवांचं मूळ शोधणं कठीणच.
हा धागा मात्र खूपच 'मूलगामी' होईलसं वाटतंय !
मस्त धागा. वाचायला मजा येतेय.
मस्त धागा. वाचायला मजा येतेय. वाचतेय.
आमच्या ओळखीतल्या एका ब्राह्मण कुटुंबाचं आडनाव थोरात होतं. आणि यामागे एक आख्यायिका ते सांगायचे. आधी त्यांचं मूळ आडनाव काही वेगळंच होतं पण त्यांच्या कोणी पूर्वजानं शिवाजी महाराजांच्या काळात बराच पराक्रम गाजवला तेव्हा महाराजांनी त्यांना 'थोर आहात' असं म्हटलं आणि त्यानंतर त्यांचं आडनाव थोरात झालं.
अरेच्या येथे तर सगळ्यांच्या
अरेच्या येथे तर सगळ्यांच्या नव्याने ओळखी होत आहेत!!
आडनाव व गावांच्या संदर्भावरून दोघे-तिघे जण ओळखीचेही वाटत आहेत.
माझी शंका - आमच्या इकडे "कांबळे" आडनावाचे तुळजाभवानीचे वैष्णवब्राह्मण पुजारी आहेत. कांबळे हे आडनाव कसे पडले यासंदर्भातील कोणाला माहिती आहे का?
एकदा युएसहुन आलेला दीर
एकदा युएसहुन आलेला दीर तिथल्या कॉलेज मधल्या मित्राचं पार्सल घेवुन सहकारनगरला गेला. तो ज्या बिल्डिंगमधे गेला तिथलं एक नाव वाचुन तो जबरदस्त हसत घरी आला. मला सांगितल्यावर मी त्याला घाणेरडा, खोटारडा, बंडलबाज म्हटलं. मी त्याला म्हटलं कि तुझ्या फिल्दी माइंडमधुन तयार झालेलं हे नाव आहे. खुप आर्ग्युमेंट्स झाली. मी त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. तो ही वैतागला. आम्ही ऑल द वे औंधहुन सहकारनगरला गेलो आणि मी दारावरची नेमप्लेट वाचुन कोसळले. आडनाव होतं - Doubledhungane. (मला दुसर्यांचं आडनाव असुन मराठीमधे लिहायला फार ऑकवर्ड होते आहे तर ते कुटुंब ते नाव का बरं लावत असेल. बदलायला काय हरकत आहे.)
आता या नावांच्या धाग्यामुळे ते परत एकदा आठवले म्हणुन सहज फेबुवर सर्च केलं कि असं अजुन कोणी आहे का? तर खरंच आहे. जा. शोधा म्हणजे पटेल.
पंढरपूरचे बडवे यांचे
पंढरपूरचे बडवे यांचे नावाबद्दल असे म्हणतात की, दर्शनाला आलेल्या लोकांना पुजारी धोतराचा सोगा पिळून त्याचे फटके (हलकेसे) मारत पुढे चला असे म्हणत, म्हणजे भक्तांना बडवित असत, म्हणुन बडवे.
पण तिथेच रूक्मिणीचे पुजारी "उत्पात" , हे नाव कसे आले ते माहिती नाही.
(प्रसिद्ध लावणीवाले ज्ञानोबा उर्फ माउली उत्पात)
@रोहन, खरच एक उपयुक्त धागा
@रोहन,
खरच एक उपयुक्त धागा आहे. प्रत्येकास आपले आडनाव त्याची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत झाली तर नक्कीच आवडेल.यानिमित्ताने माझी सर्वच वाचक / मायबोलीकर यांना एक आग्रहाची विनंती आहे कि आपण आपल्या आडनावा बद्दल जाणून घ्याच, पण त्याच बरोबर आपल्या कुलाची जास्तीत जास्त माहिती संकलित करून पुढच्या पिढीसाठी एक संदर्भ ग्रंथ तयार करा. अनेक चांगल्या संकेत स्थळांची मदत वंश वृक्ष तयार करण्यास होईल.आपण अनेक कारणांनी भेटून नेहमीच सण,समारंभ साजरे करीत असतोच, तसे नातेवाईक स्नेहसंमेलन किमान दर पाच किंवा कमीत कमी दहा वर्षांनी घेवून सर्व माहिती अद्ययावत करा.या माहितीच्या संकलनातून तयार होणारी माहिती खूपच उपयुक्त ठरेल.
आता आमच्या आडनावा बाबत. 'किंकर' - म्हणजे देवांचे सेवक असा शब्दशः अर्थ.तसा उलेख संत तुकाराम यांच्या काही अभंगात,तसेच व्यंकटेश स्तोत्रात आढळतो. मूळ घराणे विजापूर जिल्ह्यातील बदामी देवीच्या परिसरातील. त्या ठिकाणी 'किंकरे'- नावाचे एक खेडेगाव आहे असे ऐकले आहे. अजून प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही. मूळ गाव तासगाव -जिल्हा सांगली असे सांगितले जाते. अर्थात 'किंकर' या आडनावाचा आढळ तासगाव,कोल्हापूर ,कराड,फलटण, पुणे अमरावती येथे दिसून येतो.त्याखेरीज हेच आडनाव उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथे आणि अमेरिकेत दिसून येते. मात्र त्याचा सहसंबंध दिसून येत नाही.वंश वृक्ष आधारे मागे मागे गेल्यास प्रथमचे आडनाव यादवनाईक- बागलकोटकर असे दिसते. पण त्याचा व आताच्या आडनावाचा सहसंबंध दुर्दैवाने ज्ञात नाही. कोणी जाणकार सांगू शकल्यास नक्कीच आनंद वाटेल.
माझ्या ओळखीचा एकजण सांगत होता
माझ्या ओळखीचा एकजण सांगत होता की त्याला एकदा फोन आला आणि पलिकडचा माणुस म्हणाला,
हेलो मी गटागट बोलतोय. तर हा म्हणाला मग हळू हळू बोला. तर पलिकडला चिडून म्हणाला अहो गटागट माझे आडनाव आहे.
राऊत हा शब्द तुकाराम गाथेत
राऊत हा शब्द तुकाराम गाथेत घोडेस्वार ह्या अर्थाने आलेला दिसतोय.
कदाचित राऊत आडनाव असे आले असावे. मला खात्री नाही.
रोहन.., >> साळवी आणि सुर्वे
रोहन..,
>> साळवी आणि सुर्वे ह्या कोकणी आडनावांवर लिहा कोणीतरी...
साळवे, साळवी हे शालिवाहनाचे वंशज आहेत. तसंच कदम हे कदंबांचे, चुरी हे कलत्सुरी यांचे वंशज आहेत. ही सर्व माहीती ऐकीव आहे.
आ.न.,
-गा.पै.
फडणीसांबद्दल सांगायला कोणीच
फडणीसांबद्दल सांगायला कोणीच आलं नाहीये का अजून?
शोनाहो फडणीस
फडणीस हि पदवी आहे, सूर्यवंशी
फडणीस हि पदवी आहे, सूर्यवंशी मराठा म्हणून सुर्वे झाले म्हणतात, छोट्या घोडदलाचे नेतृत्व करणारा म्हणजे राउत.
फडणीस,सबनीस,हसबनीस,चिटनीस,सुरनीस,तबीब,किल्लेदार,जुमलेदार,मामलेदार हि आडनावे पण पदव्यातून आली.
'देसाई' हे आडनाव गोव्यात खास
'देसाई' हे आडनाव गोव्यात खास पद्ये ब्राह्मणांच.. इतर जातीत लोक लिहिताना 'देसाई' लिहितात पण उच्चार मात्र 'देसाय'..
दिक्षित हे आडनाव मी कोकणस्थ,
दिक्षित हे आडनाव मी कोकणस्थ, देशस्थ, आणि पांचाळांमध्ये पाहिले आहे.
जोशी हे आडनाव पण खूप जणांच्यात ऐकले आहे.
गोखले ह्या बद्दल (गाईंचे रक्षण करणारे म्हणजे त्यांच्या कडे खूप गाई असायच्या) असे ऐकले आहे.
एका ओळखीच्या मुलीचे सासरचे आडनाव घमेंडे आहे हे मी पहिल्यांदाच ऐकले.तिनेही पहिल्यांदाच ऐकले होते.
गोरे आडनाव कोकणस्थ ब्राह्मण आणि नावाडी लोकांच्यात बघितले आहे.
मने माझा मात्र विश्वास आहे
मने माझा मात्र विश्वास आहे तुझ्यावर. कोल्हापूरला आमच्या घराशेजारी एक मुलगी पेईंगगेस्ट म्हणून रहात होती.. तिच्या गावातली २ आडनावं तिने अशी सांगितली होती ज्यावर तुम्ही कुणिच आयुष्यात विश्वास ठेवणार नाही. एक होतं 'dhungalpivale' माझाही तुझ्यासारखाच प्रकार त्यामुळे देवनागरीत लिहिणं टाळलं आहे. आणि दुसरं आडनाव होतं 'परकरवरकर'
वाट्टेल ते.
असो आता 'जेवूघाले' आणि 'हातिवलेकर' (आम्ही हातओलेकर म्हणायचो) या दोन आडनावांची पण उत्पत्ती सांगा.
माझ्या मावसबहिणीसाठी कुत्रे
माझ्या मावसबहिणीसाठी कुत्रे आड्नावाचे स्थळ आले होते. पपांचे एक मित्र ढोरे होते . दुसरे एक गुरे. एकदा ते एकत्र आले - गुरे ढोरे
सासर्यांच्या ऑफिसमधे एक
सासर्यांच्या ऑफिसमधे एक का॑रकून होता, त्याचं आडनाव फुलपगारे
Pages