किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि २२:

हा किल्ला काही वर्षापुर्वीच प्रकाशात आलाय. आख्खा फोटो दिलाय त्यामुळे लगेच ओळखा.. Wink

आता नावही दे. << तेच तर आठवत नाहिये, जासलोड गड का काहिसे ???
हा किल्ला रायगडाच्या संरक्षण करणार्‍या किल्ल्यांच्या रांगेतला असे सचिन जोशी यांनी सांगितले होते. या किल्ल्याच्या शोधाची सुरवातही त्यांनी अशीच केली होती. गुगल अर्थ च्या मदतीने रायगडा भोवती आधी असलेले किल्ली मांडले तेव्हा या किल्ल्याच्या दिशेला हा भाग मोकळा दिसला, आणि शोधाची दिशा नक्की केली

प्रचि २३ : जिल्हा पुणे

किल्ला : राजमाचीचा बालेकिल्ला मनरंजंन
उत्तर : सारीका

किल्ले आणि जी.पी. एस. तंत्रज्ञानाचा वापर या बद्दल च्या एका व्याख्यानात त्यांनी या किल्ल्या बद्दल सांगीतले होते. जी.पी. एस. च्या सहाय्याने अनेक किल्ल्यांचे मॅपिंग त्यानी केले आहे

रोहन, अगदी बरोबर Happy

मोहनगड हा किल्ला सर्वात आधी पाळंदे सरांनी शोधला आहे, फक्त नावाबाबत संभ्रम असल्याने त्यांनी केवळ दुर्ग असा उल्लेख त्यांच्या डोंगरवेडा या पुस्तकात आढळतो. स्थानिक लोक त्यास जानाईचा डोंगर म्हणतात.

स_सा, सारीका, रोहन -
माझ्या माहीती प्रमाणे जासलोडगड किंवा मोहनगड पुणे जिल्ह्यात आहे आणी वरच्या प्रची २२ चा किल्ला हा पन्हळगड (पन्हाळगड नव्हे) आहे..
जासलोडगड हा बांदलांच्या अख्त्यारीत होता आणी तो पुण्याच्या मुळशी भागात आहे.. ह्या किल्ल्यावर जायचे म्हणजे एकतर लोणावळा-घनगड मार्गे जावे लागते किंवा ताम्हीणी - निवे मार्गे यावे लागते कारण हा किल्ला मुळाशी धरणाच्या एकदम आत आहे..

पन्हळगड रायगड जिल्ह्यात येतो आणी रायगड किल्ल्याचा परीसरात असलेल्या किल्ल्यांमध्ये मोडतो. हा दुर्लक्षीत किल्ला सचीन जोशींच्या शोधामुळे प्रकाशात आला. ह्या किल्ल्यावर जायचे म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावर माणगावच्या पुढे लोणेरे म्हणून गाव आहे तिथून आत जाणार्‍या रस्त्याने अंदाजे ८ कि.मी. वर असणार्‍या पन्हळघर गावात यायचे (ह्या गावाला स्थानीक गावकरी पलनघर म्हणतात :)). गावात असलेल्या मशीदी/महारवाड्याच्या पाठीमागची वाट सरळ किल्ल्यावर जाते.. किल्ल्यावर काहीही अवशेष नाही. नाही म्हणायला किल्ल्याची खूण म्हणून वरती थोडी तटबंदी आणी पाण्याच्या टाक्या आहेत..

पन्हळघर गाव शिवकालीन असला पाहीजे कारण ह्या गावावर रायगडावरच्या घरांना पावसात लागणारे झाप (गवताच्या पेंढ्या) पुरवण्याची जबाबदारी होती. पन्हळ्गडाच्या किल्लेदारावर ह्या कामावर देखरेख करायची जबाबदारी असण्याची शक्यता आहे.. पन्हळघर आणी आजूबाजूला खूप मोठा गवताळ भाग आहे आणी हे बघता रायगडावरच्या सर्व घरांना येथून गवत पुरवठा करता येऊ शकत असावा..

अवांतर - पन्हळघर गावातून एक वाट सरळ रायगडावर जाते आणी गावापाठीमागच्या डोंगरधारेवरून सरळ रायगड खोर्‍यात उतरते (महाड - पाचाड - रायगड रस्त्यावरील मेढा गावात). ह्या रस्त्याने आम्ही दोन वेळा लोणेरे ते रायगड असे चालत गेलो आहे :). लोणेरे ते रायगड चालत जायला ८ तास लागतात.

मनोज... उपयुक्त माहिती Happy

(महाड - पाचाड - रायगड रस्त्यावरील मेढा गावात). > आम्ही माणगाव वरुन गाडीने गेलो होतो... तो हाच मार्ग असावा.

प्रचि २३ >लोहगड, शिवनेरी नाही... ट्रेकर्सचा लाडका किल्ला आहे. क्लू देणं म्हणजे किल्ल्याच नाव सांगण्यासारख आहे.

सारीका, दादाश्री, रोमा.... पुरंदर पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे.

(महाड - पाचाड - रायगड रस्त्यावरील मेढा गावात). > आम्ही माणगाव वरुन गाडीने गेलो होतो... तो हाच मार्ग असावा. >>> इंद्रा तो हा मार्ग नसावा कारण पन्हळघर गावाच्या पुढे गाडी जात नाही. पुढे सर्व डोंगरातला ट्रेक आहे..

तुम्ही माणगाववरून रायगडला गेला असाल तर तुम्ही, एक मार्ग माणगाव गावातून जोर गाव आणी पुढे चनाट खोर्‍यातून डायरेक्ट पाचाडला जातो, ह्या मार्गे गेला असु शकाल.. तुम्हाला वाटेत कोंझर गाव लागले होते का? कारण ह्या मार्गावर कोंझर लागत नाही. महाड-पाचाड रस्त्यावर कोंझर लागते.
पुर्वी हा चनाट खोर्‍यातला मार्ग खूप वापरात होता आणी रोहा, नागोठणे, चौल बंदरातून रायगड मार्गे देशावर जायला ह्या रस्त्याचा वापर करायचे.. ह्याच वाटेवर एक पुरातन मंदीर, दगडावरचे कोरलेल्या आकृत्या आणी बरेच बघायला मिळते.. रायगडावर जायला सध्याच्या प्रचलीत महाड-पाचाड रस्त्याशिवाय एकदातरी ह्याही रस्त्याने जायला हवेच..

मनोज पाच वर्षांपुर्वी गेलो होतो. त्यामुळे गावांची नावं लक्षात नाहीत. बैलगाडी रस्ता होता. वाटेत एके ठिकाणी रस्ता नदीच्या पात्रातून जात होता... पावसाळ्यात हा रस्ता बंदच असणार.

रायगडावर जायला सध्याच्या प्रचलीत महाड-पाचाड रस्त्याशिवाय एकदातरी ह्याही रस्त्याने जायला हवेच.. > कधी जायचे?

संदिप जिवधन नाही. मनोज तुझा काय अंदाज प्रचि २३ बद्दल?

मनोज पाच वर्षांपुर्वी गेलो होतो. त्यामुळे गावांची नावं लक्षात नाहीत. बैलगाडी रस्ता होता. वाटेत एके ठिकाणी रस्ता नदीच्या पात्रातून जात होता>>> येस्स.. इंद्रा ह्याच रस्त्याबद्द्ल मी बोलत होतो..
प्रची २३ ओळखीचा वाटतोय पण लक्षात येत नाहीये..

Pages