किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्र.चि.६२
ओळखायला खूप सोप्पा.. आपल्या पंढरीवरून नक्कीच बघितलेला! Happy

अचूक उत्तर सह्याद्रीमित्र!
प्र. चि. मध्ये दिसताहेत 'नाफ्ता' हा अत्यंत देखणा सुळका, कलाडचा कोंबडा (सुळका) अन् कलाडगड! पाचनई मधून पहाटे काढलेला फोटो.. पौर्णिमेचा चंद्र दिसतोय.
DiscoverSahyadri_Fort.jpg

नगरची भटकंती नाहीच.

प्रचि ६४
जिल्हा : सातारा

किल्ला: अजिंक्यतारा
उत्तर: सह्याद्रीमित्र

हेम - गल्ली चुकली काय रे... > चलताय... ट्रेक मधे वाट चुकायची सवय आहे त्याला Wink

जल्ला बाकीच्यांना ट्राय करू दे की > +१
बाकीचे कुठे गायबले आहेत?

सही जबाब मित्रा... सज्जनगड कडे जाताना मागे वळुन पाहिलं की अजिंक्यतारा असा अनोखा भासतो.

प्रचि ६५ :
जिल्हा : रत्नागिरी

किल्ला: सुवर्णदुर्ग आणि किनार्‍यावर फत्तेगड, कनकदुर्ग आणि हर्णे बंदर
उत्तर: सह्याद्रीमित्र

प्रचि ६५ :
जिल्हा : रत्नागिरी
सुवर्णदुर्ग आणी कनकदुर्ग...हर्णे बंदर

प्रचि ६६
उत्तर::

सुंदर फोटो!!!
मंगळगड (उर्फ कांगोरी) वरील माची अन् कांगोरी नाथ मंदिर

प्रचि ६७ : बरोब्बर सह्याद्रीमित्र!! Happy

प्रचि ६८: गडाचं एखादं वैशिष्ट्यपूर्ण अंग दिसलं तर ओळखता येईल. आत्ताचा फोटो पुण्यातल्या तळजाई टेकडीचा वाटतो Proud

Pages