किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा क्ल्यू...या किल्ल्याच्या किल्ल्याच्या परिसरात शिवाजी महाराजांची एक प्रसिद्ध लढाई झाली होती

आता शेवटचे ३ चान्स....नाहीतर उत्तर सांगण्यात येईल..

किल्ल्याच्या परिसरात शिवाजी महाराजांची एक प्रसिद्ध लढाई झाली होती > उंबर खिंडीतली कार्तालब खानासोबत झालेली लढाई असेल तर हा अनघाई असायला हवा. कारण मृगगड वर आधीच फुली मारलेली आहे.

जाऊदे मीच सांगून टाकतो...

हा मिरगड आहे.मुंबई गोवा हायवे वर नागोठण्याच्या अलीकडे जे निगडे नावाचं गाव आहे त्याच्या जवळ हा किल्ला आहे .दुसरा रस्ता म्हणजे खोपोली पेण रस्त्यावर सापोली पासून आत व्याघ्रेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे.एक फ़ेमस धबधबा आहे तिकडे.त्याच्या जवळच्या पाचगणी गावापासून मिरगडला जाता येतं.

या किल्ल्याच्या जवळच्या मि-या डोंगराच्या परिसरात शिवाजी महाराजांनी नामदारखानाचा पराभव केला होता.

काही पुस्तकात तसेच रायगड गॅझेटीयर मध्ये याचा सोनगिरी म्हणून उल्लेख केला असून तो पूर्ण चुकीचा आहे.कारण सोनगिरी नावाचा रायगड जिल्ह्यात एकच किल्ला असून तो खंडाळा / कर्जत जवळच्या पळसदरी गावाजवळ आहे.त्यामुळे ह्याला मिरगड हेच नाव आहे.

आसावा?

प्रचि १९
सातारा - पंढरपूर मार्गावर सातार्‍यापासून १०६ किमी. वर असलेला एक दुर्लक्षित भुईकोट.

DSCN1224.JPG

प्रचि ६० जिल्हा: रत्नागिरी

उत्तर : सह्याद्रीमित्र

प्रचि १९
सातारा - पंढरपूर मार्गावर सातार्‍यापासून १०६ किमी. वर असलेला एक दुर्लक्षित भुईकोट.
<<
<<

विजय मला वाटते तो "पिलीवचा किल्ला(गढी)" आहे.

प्रचि १८
आटे काटे नॉटेठोम्म्म्म्म्म!!
भूपतगड Happy
.. आणि इंद्राचा एक्कदम प्रचि क्र. ६० कसा आला क्र.१९ नंतर..????

हेम.. प्रचि क्र. ५७ सह्याद्रीमित्र ने टाकला आहे १६व्या पानावर..

भूपतगड >>> ह्ह्म्म्म.. जव्हार बाजूचा एकही किल्ला झालेला नाही.

Pages