महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

. चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

मुंबईत रहात असताना अनुभवाने शिकले-
१. चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही.
२. जास्तच पुढे काही झालं तर खच्चून ओरडा.मुंबईत तरी कुणी ना कुणी मदतीला येईलच.
३. मुंबईत तरी पोलिस मदत करणारेच भेट्लेत.>>>>>>>>>>>>>>> साती, पटले.

खरेतर असे चोरटे स्पर्श वै करणारे अतिशय डरपोक असतात. दोन झणझणीत शिव्या हासडा, बिन्धास्त अंगावर धाउन जा, **** चलपेने तोंड फोडु काय? असं बोला सरळ. मग बघा कसे पाय लाउन पळतात ते.

१. चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. <<<
आठवड्यातून तीनच वेळा? नेहमीच म्हण.

माझ्या सेंट्रलच्या विद्यार्थिनी कुर्ल्याला उतरून कलिना कॅम्पसला यायच्या. त्या सांगायच्या 'क्या करे मॅम. कितना संभालेंगे. बॅकसाइड तो पब्लिक प्रॉपर्टी करके छोड दिया है. हातसे फ्रंटसाइड संभालते है बस्स. रोज मारामारी करेंगे तो कॉलेज कैसे पहुचेंगे!' Sad

शालेय मुलांना लैंगिक शिक्षण, पुरुषांचे मानसिक सबलीकरण, स्त्रियांना प्रतिकार करण्यासाठी शारिरीक शिक्शण, पोलिसांना विशेष ट्रेनींग (महिला अत्याचर संदर्भात), प्राथमिक पातळीपासून अशा गुन्ह्यांविरूध शिक्षा (जसे की छेडछाड ई. ई.), पीडीत स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे असे काही मुद्दे सुचत आहेत.

>>>>> स्त्रीयांचा सिक्थ सेन्स चांगला असतो असे म्हणतात. असं काही इन्ट्युशन झालं तर ते सिरियसली घ्यायला पाहिजे. <<<< अगदी बरोबर, पण
माफ करा माधवीजी, पण हा उरलासुरला जो काय सिक्स्थ सेन्स की काय म्हणतात तो "बधिर" व्हावा इतपत बाह्य प्रदर्शनान्चा मारा आमचीच मिडीया/सिनेमे नित्यनियमाने करीत असतात, व बाहेर हे असेच चालते अशी भावनाच वाढीस लागल्यावर त्या बिचार्‍या बधिर झालेल्या सेन्सने तरी काय करावे? किम्बहुना तो सेन्स अ‍ॅक्टिव्हेट व्हावा/करावा याचे शिक्षणही मिळणे अवघड होते, व जेव्हा मिळते, तेव्हा "वैयक्तिक स्वातंत्र्याच्या" पराकोटीच्या अहंगडातून "पशुवत धोक्यान्कडेही" दुर्लक्ष होते.

>>>> बाकी मला तरी वाटतं आपल्या सुरक्षिततेबद्दल स्त्रीया नेहेमीच जागरुक असतात. <<<<
नशिबाने जागरूक असणार्‍याच फक्त जागरुक असतात, बाकी सगळा बेसावधपणाचा आनंदच असतो, पालकान्सहित.

>>>>> आम्हाला शाळेत असताना 'नैतिक शिक्षण' म्हणुन एक तास असायचा. पण त्याबद्दल कधी कोणी (विद्यार्थी/शिक्षक) सिरियसली विचार केल्याचं मला आठवत नाही. असा विचार करण्याची खरचं गरज आहे. <<<<<
तुमचे म्हणणे बरोबर आहेच, पुन्हा माफ करा कारण "नैतिक शिक्षणातील राम" केव्हाच हद्दपार केला गेलाय, पापपुण्याची संकल्पना आमच्याच आधूनिक वैज्ञानिक विचारवन्तान्नी देवाला रिटायर करीत नाहिशी करत आणलीये. सातच्या आत घरात हे व्यक्तिस्वातन्त्र्यावरचे बन्धन वाटतय आणि दिवसाचे चौविस तास एकटीदुकटी महिलाही कुठेही वावरु शकेल अशी व्यवस्था निर्माण करण्यात आम्ही/ आमचेच शासन/ आमच्याच यन्त्रणा/ आमच्याच शिक्षणपद्धती अन आमच्याच मनोरन्जनाची साधने असलेली सर्व प्रकारची मिडीया सम्पुर्णपणे अपयशी ठरल्या आहेत.
असो.

लंपन, घरात आईवडिलांनी दुसर्‍या जेण्डरचा आदर करायचे संस्कार करणे हे ही अ‍ॅड कर.

अर्थात साधारण ९०% समाजात हे नाहीये त्यामुळे हे फारच युटोपियन होईल म्हणा..

अ‍ॅक्चुअली, बापाचे महत्व सामोपचार यांना कळलेच नाहिये. नुसते स्पर्म देऊन बाप होता येते असं वाटत असेल तर खरंच तुमची कीव करावी तितकी थोडीच. अशा विचाराच्या लोकांनी स्वतःच्या (असल्या-नसल्या-होणार्‍या) मुलांना स्वत:पासून वाचवा. असे संस्कार केले तर चुकीच्या वाटेला लागायला वेळ लागणार नाही.

<< नुसते स्पर्म देऊन बाप होता येते असं वाटत असेल तर खरंच तुमची कीव करावी तितकी थोडीच. अशा विचाराच्या लोकांनी स्वतःच्या (असल्या-नसल्या-होणार्‍या) मुलांना स्वत:पासून वाचवा. असे संस्कार केले तर चुकीच्या वाटेला लागायला वेळ लागणार नाही.>>

जरा तोंड सांभाळून बोला आणि मराठी शिकून या. मी बापाचे महत्व कमी आहे असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त आईचे अधिक आहे असे म्हटलेले आहे. टोपीविक्याने आपली टोपी आपटली की लगेच माकडांनी आपापल्या टोप्या आपटल्या तसे मी आईचे महत्व समजले नाही तुम्हाला म्हटल्यावर लगेच तुम्ही सामोपचारांना बापाचे महत्व समजले नाही असे तारे तोडलेत. बाफच पेटवून भांडणच करायचं असेल तर मला तुमच्या पेक्षा जहाल भाषा वापरता येते. परंतु आई आणि बाप दोघांकडूनही असे संस्कार झालेले नसल्याने माझ्यापुरता हा पॉइंटवरचा वाद मी संपवत आहे. Happy

सुरक्षित दिल्ली :
(लोकमतवरून साभार)
महिला पत्रकाराची छेडछाड

नवी दिल्ली। दि. १८
(लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्लीत बसमध्ये झालेल्या सामुहीक बलात्काराचे वार्तांकन करणार्‍या हेडलाईन्स टुडे या वृत्तवाहीनीच्या महिला पत्रकारास वार्तांकनावेळीस छेडछाडीचा सामना करावा लागला.
रविवारी सामुहीक बलात्काराच्या घटनेनंतर रात्री दिल्लीत महिला किती सुरक्षित आहेत, याचा वेध घेणारे वार्तांकन अंजना कश्यप महिला पत्रकार रात्री साडे अकराच्या दरम्यान एम्स हॉस्पिटल येथील उड्डाणपुलापाशी करत होती. त्याचवेळी एक गाडी तिच्या अगदी बाजूला येऊन थांबली व त्यात अससेल्या तीन तरुणांनी तिची छेड काढली.
छेडखानीचा हा सर्व घटनाक्रम कॅमेर्‍यात चित्रित झाला आहे. ढळढळीत चित्रफीत आणि प्रामुख्याने ती मुले ज्या गाडीतून जात होती, त्याचा नंबर असूनही पोलिसांना या रोडरोमियोंना शोधण्यात अपयश आल्याचे दिसून आले. संबंधित चॅनलनेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चंग बांधत या तिन्ही मुलांचे घर शोधून काढले. यापैकी, गाडी चालविणार्‍या मुलाने सपशेल माफी मागत आपण केवळ कॅमेरा पाहिल्याने गाडी थांबविल्याचे सांगितले.
मात्र तो अन्य दोन मित्रांचा ठावठिकाणा सांगू शकला नाही. अन्य दोन मुले फरार झाल्याची माहिती आहे. या फरार मुलांच्या घरीही संबंधित चॅनलची टीम पोहोचली. यापैकी ज्या मुलाने छेड काढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, त्याच्या आईने तर या घटनेमुळे आपल्याला प्रचंड धक्का बसल्याचे सांगत त्याला घरात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. तर अन्य एका मुलाच्या आईने या घटनेबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

वार्तांकन करणारी पत्रकार, समोरून येणारी गाडी, थांबलेली गाडी, केलेली छेडछाड, आणि त्या तरुणांनी केलेला पोबारा हे सर्व चित्र कॅमेर्‍यात बंद झाले आहे. दिवसभर संबंधित वृत्तवाहिनीवरून या क्लिपचे प्रसारण होत होते. मात्र, तरीही दिल्ली पोलिसांनी छेडखानी करणार्‍या मुलांच्या विरोधात कारवाई केल्याचे वृत्त नाही.

@ नी हे जेंडर बायस ईतके जास्त रुजले आहे की ते "बायस" आहे असे सुद्धा लोकाना (स्त्रीयांनापण) वाटत नाही. आणि हे सार्‍या समाजात आहे त्याला जातपात, आर्थिक स्तर, शिक्षण ई. काहीच मापदंड नाहिये.

>>>> १. चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. <<<<
हो, अन त्याकरता केवळ रेल्वेच्या गर्दीतच जायला हवे असे नाही, भर कचेर्‍यातुनही येताजाता स्पर्श/हातवारे/शाब्दिक शेरे याद्वारे आपली "विकृती" व्यक्त करणारे असन्ख्य याच समाजात बहुसन्ख्येनेच आहेत हे सत्य नाकारता येत नाही. प्रश्न आहे तो यान्ना आवर कसा घालणार याचा.

हातवारे/इशार्‍यान्वरून आठवले, आमच्या लहानपणी हाताच्या पन्जाची बोटे नागाच्या फण्यासारखी उभी करून केवळ मधलेच बोट वाकवुन जीभेला लावून किन्वा नाकाच्या शेन्ड्याच्या कडेला बोटे घासून काही एक इशारे करण्याची "विकृत" पद्धत बरेचदा पहाण्यात आली होती, त्याकाळी वय अन शरीर दोन्ही लहान/तकलादू असल्याने असल्यान्च्या मुस्काटात भडकवता आल्या नव्हत्या. हल्लीचे इशारे काय ते माहित नाहीत. मात्र अधिक विचार करता असे लक्षात येते की आम्हिच ढोन्गी आहोत.
दुसर्‍या त्या कोणत्या http://www.maayboli.com/node/39706 इथल्या धाग्यावर गाण्यातले अमुक शब्द/ वा आशय/ वा प्रकटीकरण अश्लिलतेकडे/कामुक भावनांच्या प्रकटीकरणाकडे झुकणारे आहे असे कोणी म्हणले तर आम्हिच व्यक्तिस्वातण्त्र्याच्या अन कशल्याश्या त्या कलाकारान्च्या "अभिव्यक्तिस्वातन्त्र्याकडे" अन ते पुरले नाही तर सिनेमा/नाटके इत्यादीतील "गहन" आशय, एकन्दरीत मागलेपुढले संदर्भ पहाता तसे ते अश्लिल वगैरे वाटत नाही असले समर्थन करतो. व आक्षेप नोन्दविणार्‍यान्ना मागास/बुर्ज्वा/धार्मिक अतिरेकी वगैरे ठरवितो. ती गाणि, ती दृष्ये, ती हिंसा आम्हिच पेरली आहे. बलात्काराची दृष्येही आम्हीच पेरतोही, अन चविचविने, कधी कधी हळहळत वगैरे बघतोही. पण बाह्य समाजात या पेरलेल्याचे पुढे काय उगवेल याची ना आम्हा प्रेक्षकांस, ना ते बनविणार्‍या निर्मात्या/दिग्दर्शक/कलाकारास घेणेदेणे असत नाही. आम्हि बौद्धिक दृष्ट्या अतिप्रगत अस्तो ना तेव्हा?
पण जो विकृत आहे, विकृतीकडे वाटचाल करतो आहे तो असलीच गाणी /दृष्ये वगैरेंचा वापर त्याच्या वैयक्तिक "विकृत अभिव्यक्तिप्रकटीकरणाकडे" राजरोस करू धजतो कारण शब्दशः कायद्याच्या भाषेत अश्लिल न ठरविता आल्याने राजरोसच धन्देवाईक पैसा कमविण्यासाठीच प्रदर्शित झालेल्या या गाणी/दृष्ये वगैरेतील मागलापुढचा संदर्भ घेऊन उच्च रसिकता व्यक्त करण्याचे त्याला काहीच कारण नसते. व ते जे दाखवितात तेच तर सगळीकडे घडते/घडले तरी चालते हाच सन्देश घेऊन फिरणारी लाखोन्च्या सन्ख्येची टाळकी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातही कमी नाहीत.

उदयन, भोसकेपर्यंत कशाला, तुम्हाला कळेपर्यंत तो माणूस पसार झालेला असतो. आणि दररिज तुम्ही एकट्याच किती तमाशे करणार? उद्या लोक ' ही मुलगी तसलीच आहे' म्हणणार. बरे दिवसात दोनदा हे तमाशे करावे लागु शकतात.
बसमध्ये बाजूला बसून कुणी चाळे करायला लागलं तर भोसकण, आरडाओरडा ठिक आहे.
स्टेशनच्या गर्दीत तर असं वाटतं की शरीरावर ऑटोमॅटिक इनविजिबल जॅकेट हवं होतं हात लावणर्याला आपोआप शॉक बसेल असं. ते सूद्धा सरळ संपूर्ण पंजाबी, पिनप ओढणी घेतल्यावर. उलट ढिंगचॅक कपफ्यातल्या बायकांकडे लोक लांबून बघून कॉमेंट करतात पण वाटेला जायची हिंमत करत नाहीत.
आत्तापर्यंत व्ही टी आणि सांताक्रूज अशा दोन ठिकाणी अश्या विकृतांची वरात पोलिसस्तेशनापर्यंत नेऊन तिथे व्यवस्थित चोप देवून आणि एफ आर आय दाखल करून त्यांना कच्च्या कैदेत टाकण्याचे अनुभव माझ्याखाती जमा आहेत. मात्र वारंवार तारखाना हजर राहाणे बैगेरे बस कि बात नसल्यानेपोलिसानी त्याना केलेली मारहाण पाहूनच शिक्षा दिल्याचे समाधान करुन घेतले आहे.

मला सांगा यासंबंधी ---- म्हणजे अजामीनपात्र गुन्हा ठरवणे, गुन्हेगारांना अधिकाधिक शिक्षा वगैरे --- सर्वोच्च न्यायालयाला आणि राष्ट्रपतींना कोण कोण पत्र लिहीणार आहे?

मी मागेच पाठवले होते. हे लोक साधी पोच देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. कदाचित पत्रांचा पाऊस पडल्यास शक्य व्हावे प्रभाव पडणे.

संस्कार करण्यात आईचे महत्व अधिक कारण बाप घरी असायल हवा ना? Wink
आईला घरी बसवून डोक्यावर जबाबदारी दिली की बाहेर ढोल पिटायला मोकळे. हे म्हणजे 'देवी' बनवून मग बुडवायचे तसे वाटले. Wink

माझ्या अनुभवाप्रमाणे दिल्ली , मद्रास हि गचाळ शहरे आहेत. पुणे, मुंबई हि मला वाटलेली सुरक्षित शहरे आहेत त्यातल्या त्यात.( शहरांवर अवलंबून काही नसतं म्हणा, राक्षस काय कोठेही रहातात्/भेटतात).

लंपन तुमचे अगदी बरोबर आहे.
शिवाय स्त्री ही एक वस्तु असुन तिचा सर्रास व्यापार करणार्‍या टोळ्या युरोपियन देशांमधे किती मोठ्या प्रमाणावर आहेत हे मी नुकतेच वाचले आहे. Sad
एक वस्तु म्हणुन स्त्रीया सहज, एकदा नव्हे तर अनेकदा, विकल्या खरेदी केल्या जातात आणि त्याऊपरही त्यांना विकत घेणार्‍याचे पैसे कसे त्यांना देहव्यापार करुन फेडावे लागतात हे वाचुन फार वेदना होतात.
असो. विषयांतर झाले असल्यास सॉरी.

त्याऊपरही त्यांना विकत घेणार्‍याचे पैसे कसे त्यांना देहव्यापार करुन फेडावे लागतात हे वाचुन फार वेदना होतात. <<<
धर्मवीर भारतींचं ’बोलो माधवी!’ आठवलं.

साती भारी आहेस की तू..
आणि आईचे महत्व मोठे वगैरे फडतुस युक्तिवाद हि भारतीय संस्क्रुती आत्तापर्यन्त करतच आलीय.
वैनी तुमचा सैपाक आमच्या ह्यांना खुप आवडतो म्हणून सगळं काम वैनींच्या गळ्यात घालणारी बाई आणि आईचे महत्व संस्कारात मोठे म्हणणारे लोक दोन्ही सारखेच धुर्त. का हो का जास्त बाईचे महत्व? पुरुषाला का सूट? आणि बाईला विचारलं का तुम्ही की बाई तुला आम्ही ही जास्तीची जबाबदारी देतो आहोत, आणि तुला सुट, कॉम्पेन्सेशन काही मिळणार नाहीये. तर चालणारे का तुला? उगीच कायच्या काय चिकटवायचं..
बायकांना देवी म्हणून मखरात बसवणारी, त्यागमुर्ती म्हणून सगळी जबाबदारी बायकांच्या पदराला बांधणारी, सोज्वळ, पवित्र म्हणून संस्क्रुती रक्षणाचा मक्ता बाईकडे देणारी
आणि बाईची जागा पायताणाशीच, तुमची अक्कल चुलीपुढेच, आम्हाला शहाणपणा शिकवू नका, पदर/ ओढणी सांभाळा इ. वाक्ये बोलणारी महान संस्क्रुती आणि त्यातच लडबडणारे महान जीव.

अरे विषय काय आणि तुम्ही चर्चा काय कारताय????....मुलींनी स्वत:ला सुरक्षीत कसे ठेवायचे .....ह्यावर उपाय सांगा ना..

मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे....

दिल्लीची ही घटना फारच लाजिरवाणी आहे ..आश्या नराधमांना फाशी नाही त्यांचे अवयव कापुन त्यांना जीवंत ठेवावे..म्हणजे परत असे घाणेरडे कृत्य कराण्याची कोणाची हिंम्म्त होणार नाही Angry

'कोणावरही विश्वास ठेवु नका' असं तर होऊ शकत नाही ना.
सगळीकडे सदासर्वकाळ संशयाने बघायचे?
की आता असा प्रसंग आला तर तेव्हा आणि त्यापुढे काय करायचे असा विचार करायला हवा?

@ सामोपचारः चला लवकर कळली तुम्हाला विसंगती! (म्हणुन हसताहात स्वतःलाच असं समजुन.) साती, परिजाता पोस्ट पोचली म्हणायची.

विसंगती Lol
मी पारिजाता (आणि आता तुम्हालाही) हसतोय. माझ्या सोप्या बाळबोध मराठी मधे लिहीलेल्या पोष्टी तुम्हाला समजल्या नाहीत आणी तेच तेच बडवत बसला आहात म्हणून. Rofl

बसमधे ट्रेनमधे ज्या गोष्टी दिवसातून दोनवेळा घडतात त्यावर प्रत्येक वेळेला प्रत्येकीने रिटॅलियेट करायचे झाले तर बायकांनी शिक्षणं, नोकर्‍या काही करायलाच नकोत.

हे म्हणजे आमची महान संस्कृती बाईला मखरातली देवी किंवा चप्पल यातली एकच भूमिका द्यायला सांगते. माणूसबिणूस, अधलंमधलं नस्से त्यामुळे आम्ही बदलणार नाही. तुम्ही तुमची एनर्जी आणि वेळ खर्च करत रहा प्रतिकार करण्यात नाहीतर घरी बसा... असं झालं...

.आश्या नराधमांना फाशी नाही त्यांचे अवयव कापुन त्यांना जीवंत ठेवावे..म्हणजे परत असे घाणेरडे कृत्य कराण्याची कोणाची हिंम्म्त होणार नाही >>>>>>>>>>>.स्मितू, अगदी बरोबर बोललीस. जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारची बातमी वाचते तेव्हा हेच माझ्या मनात येते. पण काय उपयोग? हेच नराधम कदाचित 'पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता.' म्हणून सुटतीलही. Angry

वरील विषयानुसार आपण सर्व चर्चा करीत आहोत.
पण राजकिय धेंड्यांना याची जाणिव होणार नाही .
काही राज्याचे मंत्री अशा घटना किरकोळ समजतात.
मग शेवटी प्रश्न उरतो की जनतेने निदान स्वत:ला कसे सुरक्षीत ठेवता येईल याचा विचार केला पाहीजे
काही दिवसात तो बलत्कारी सुटेल, कोणत्या तरी राजकिय पक्षात घुसेल. आणि निवडुनही येईल.
कित्येक खात्यातील लाचखोर वॄत्तीमुळे अशा समस्या मिटत नसुन वाढत आहे.

माझा तरी नाईलाज आहे.

सामोपचार, तुमचं म्हणणं तुम्हाला नीट पोहोचवता आलं नाही असं शक्यच नाही! काही बायकाच ते नीट समजुन घेवु शकल्या नाहीत! तुमचं बरोबरे. हसत रहा.

जर आज पासुन महिलांन अश्या प्रकारावर रिअ‍ॅक्ट होण्यास सुरुवात केली .......तरच किमान वर्षभरात अश्या प्रवृत्तीला चाप बसेल............
.
.रिअ‍ॅक्ट व्हा...... नुसते चर्चा करुन काहीही उपयोग नाही...भले दिवसाला १० वेळा व्हावे लागेल... पण याच १० वेळा केलेल्या कृत्याने एख्याद्या दिवशी तुम्ही खरच सुरक्षीत होउ शकाल....
.
.
"क्रांतीवीर" मधे नाना पाटेकर चा एक संवाद होता "तुम्हाला मदत किती वेळ मिळेल एक वेळ दोन वेळ दरवेळेस नाही मिळु शकत...जे काही करायचे आहे ते तुम्हालाच करायचे आहे...तुम्ही सबल झालात तरच काही सुधारणा मिळेल तुम्हाला.."
.
.
आपल्याबरोबर घडणारे प्रसंग सांगण्यापेक्षा त्या वेळी तुम्ही कसे प्रतिउत्तर दिले......हे सांगा इथे......

अत्यंत घृणास्पद घटना आहे हि.
सातीने / शृतीने उद्वेगाने जरी लिहिले असले तरी ते सत्यच आहे. शस्त्र बाळगणे वगैरे ठिक असले तरी एकंदर समाजानेच थोडी जागरुकता दाखवली पाहिजे.
गेल्या लोकसत्तामधे महिला सुधारगृहातील ज्या घटनेबद्दल वृत्तांत होता, त्यात असे लिहिले होते कि जेव्हा
ती स्त्री या चक्रात सापडली, त्यावेळी का नाही समाज पुढे आला ?
बरोबर आहे. एखादी स्त्री जेव्हा तिच्या मनाविरुद्ध या व्यवसायात ओढली जाते ( वाईट वाटतेय हा शब्द लिहायला, पण विकली जाते हा शब्दच जास्त बरोबर आहे. ) त्यावेळी तिने आरडाओरडा केला, तर तिच्या मदतीला कोण जाईल का ?
आजा मुंबईत काय, दिल्लीत काय या क्षेत्रातील दलालांचे मोठे जाळे आहे. नेपाळमधली मुलगी, मुंबईत आणताना वाटेत कुठेही, कोणीही हटकत नाही ?

वरच्या घटनेला अनेक जण त्या स्त्रीलाच जबाबदार धरतील ( रात्री सिनेमाला गेलीच का ?, खाजगी बसमधे चढलीच का ? ) पण तेवढाच समाजही जबाबदार आहेच.
ती तर आज जखमी अवस्थेत रुग्णालयात आहे. बरी झाल्यावरदेखील तिच्या मनाची जखम भरेल का ? समाज तिला हे विसरू देईल का ?

आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे हे खरेच आहे, पण त्यापेक्षा असा गुन्हा करण्यासाठी कुणी धजावणारच नाही, अशी योजना हवी आहे.

दिल्ली, हरयाना मधल्या अगदी सुशिक्षित तरुणांचा, सर्वसाधारणपणे मुलींकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे,
त्याची अनेकांना कल्पना असेलच. त्याची करावी तितकी निंदा थोडीच आहे.

पण राजकिय धेंड्यांना याची जाणिव होणार नाही .
काही राज्याचे मंत्री अशा घटना किरकोळ समजतात.
मग शेवटी प्रश्न उरतो की जनतेने निदान स्वत:ला कसे सुरक्षीत ठेवता येईल याचा विचार केला पाहीजे
काही दिवसात तो बलत्कारी सुटेल, कोणत्या तरी राजकिय पक्षात घुसेल. आणि निवडुनही येईल.
कित्येक खात्यातील लाचखोर वॄत्तीमुळे अशा समस्या मिटत नसुन वाढत आ >>>>>>>>>>>>>>>
.
.दरवेळेला सरकार कडे बोट दाखवुन स्वतः षंढपणे बसण्यापेक्षा..स्वतः कृती करा काही......

काही बायकाच ते नीट समजुन घेवु शकल्या नाहीत! <<<<
अर्थातच श्रुती... या महान ढोंगी संस्कृतीत पुरूष कधी चुकीचा असू शकतो का? सगळी चूक आणि सगळी जबाबदारी बायकांचीच असते अगं.

>> अरे विषय काय आणि तुम्ही चर्चा काय कारताय????....मुलींनी स्वत:ला सुरक्षीत कसे ठेवायचे .....ह्यावर उपाय सांगा ना..
स्मितु असल्या चर्चा हा समाजाला अक्कल शिकवायचा एक उपाय आहे. हे सिक आणि विक्रुत आहे हे कळायला हवे ना. सेफ्टीपिना आहेतच की. पण जाग्रुती आणि उत्क्रान्ती हे सुधारणेतले महत्वाचे माईलस्टोन्स आहेत.
As they say "If a man is hungry, teach him to catch the fish instead of offering him a fish. "
नाहीतर मग लोक वाटेल ते बोलून स्वतःच खो खो हसतात आणि वर ह्या ह्या ह्या मी आपलं सहज बाळबोध बोलत होतो त्याचे काय एवढे वगैरे बोलतात.
आणि उपाय आहेत त्याचा नाही ना उपयोग होत एवढा जोपर्यन्त मेंटॅलिटी बदलणार नाही तोपर्यन्त. रोज कसे युद्ध करणार? नीधपने लिहिलेय ना त्या मुलींबद्दल.
श्रुती, +१. पोस्ट पोचल्या आणि लागल्यात पण योग्य जागी असे दिसतेय.

वरच्या घटनेला अनेक जण त्या स्त्रीलाच जबाबदार धरतील ( रात्री सिनेमाला गेलीच का ?, खाजगी बसमधे चढलीच का ? ) पण तेवढाच समाजही जबाबदार आहेच.
ती तर आज जखमी अवस्थेत रुग्णालयात आहे. बरी झाल्यावरदेखील तिच्या मनाची जखम भरेल का ? समाज तिला हे विसरू देईल का ?>>>>>>>>>>दिनेशदा अनुमोदन.

का नाही रिटॅलियेट करायचं? अशा रिटॅलियेट करण्याच्या घटना वारंवार होऊ लागल्या की त्यांना प्रसिद्धीही मिळेलच. मिळालेली आहेच. मग धाक बसायला याचा उपयोग होतोच.

पण काय उपयोग? हेच नराधम कदाचित 'पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता.' म्हणून सुटतीलही.
<<
सुटलेच आहेत ऑलरेडी अनेक !
चर्चेत असलेल्या 'सोनाली मुखर्जी' केस मधे अ‍ॅसिड फेकणारे किरकोळ शिक्षा भोगून आज अरामात संसाराला लागलेत.. हल्लेखोरां पैकी एक तर १८ च्या खाली म्हणून रिमांड होम मधे जाउन इतर दोघांच्याही आधी घरी परतला !!
सोनालीची अवस्था अजुनही भयानक आहे.. एके काळची शूर एन.सी.सी स्टुडन्ट-नेमबाजी एक्स्पर्ट !
दोष काय तर ३ गुंडांना विरोध केला.

उदयन,
गल्लाभरू सिनेमातले डायलॉग्ज तिथेच राहूदेत.
>>> जर आज पासुन महिलांन अश्या प्रकारावर रिअ‍ॅक्ट होण्यास सुरुवात केली .......तरच किमान वर्षभरात अश्या प्रवृत्तीला चाप बसेल... <<<
वर्षोनुवर्षे बायका रिअ‍ॅक्ट होतायत. काय झाले?
गर्दीत उलटे वळून कानफाड फोडणे, बोंब मारणे पासून सगळे केलेले आहे. मदतीला कधी लोक येतात कधी नाही. बसेसमधे तर जाऊद्या हो गर्दी आहे, सोडून द्या म्हणत गलिच्छ कमेंटस करणारे पन्नाशीचे बाप्ये ठायीठायी असतात.
यातून काय होते? आपला सगळा दिवस वाया जातो, कामावर परिणाम होतो. बास्स्स एवढेच होते.
जो घाणेरडेपणा करतो त्याला काहीही फरक पडत नाही.

हो ना. पुरुष जाता येता धक्का मारणार. बायकान्नो, तुम्ही मारा पोलिस स्टेशनला आणि कोर्टात खेटे. आम्ही बदलणार नाही. आम्हाला यात पण मजाच येते. एकूण काय तर आमची पाच मिनिटांची मजा आणी तुम्हाला नऊ महिने सजा.

अरे बाबांनो रिटॅलिएट करायचं हे अगदी बरोबर आहे पण असं करणार्‍या मुलिंना 'तीच तशी आहे/ तिचं कॅरेक्टर वाईट आहे/तिच्याच का मागे लागतात' असं लेबल लागलं तर ते तिला आयुष्यभर नाही का पुरणार?

संताप संताप होतोय. आधीच बातमी वाचून आणि आता इथली वक्तव्य वाचून.
नी, साती, नताशा, नंदिनी आणि इतर .....तुम्ही घागरीच्या घागरी पाणी ओतताय पण घडे पालथे आहेत.

असल्या लोकांना फाशीची शिक्षा दिली तरी एकदाच मरतील. ज्या मुलीनं हा बलात्कार सहन केलाय ती जिवंतपणी प्रत्येकक्षणी मरत राहिल. मग गुन्हेगाराला इतक्या सहजासहजी का मरू द्यायचं. त्याचं लिंग कापा, हात कापा आणि भर चौकात पिंजर्‍यात उभं करा. येता जाता लोकांनी दगडं मारून, काठ्या भोसकून अन्नपाण्यावाचून मरू द्या त्याला. इतक्या जरबेची शिक्षा झाली तरच काही परिणाम होईल आणि भविष्यातल्या निदान काही घटनातरी टाळल्या जातील.

कधी कधी वाटतं मेंदुवर इतकं संशोधन होतंय त्यात पुरुषांच्या डोक्यातलं हे असंल किडकं केंद्र काढून टाकण्याबद्दल संशोधन व्हायला हवं. पुढे मागे ही सोय होईलही. लवकरात लवकर व्हावी.

बलात्कार करून खून करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेतून माफी देण्याच्या राष्ट्रपतींच्या अधिकाराविरुद्ध मी माबोवर सातत्याने लिहीत आलो आहे. त्यावर आलेले बहुतेक प्रतिसाद लोक बलत्काराच्या घटनांबद्दल किति असंवेदनशील आहेत हेच दर्शवितात. माझ्या लेखाला प्रतिसाद म्हणून माबोवरील एका सज्जनाने प्रशासकांकडे जांभईची स्मायली उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती एवढे नमूद केले तरी पुरेसे आहे.
आता मारे फाशीची तरतूद हवीचा धोशा चालू आहे. अरे ज्या बलत्कारी-खुन्यांना अनेकांच्या दीर्घ प्रयत्नांनंतर फाशीची शिक्षा झाली होती त्यांना माफी देतांना मोठे पुण्य मिळवलेत ना तुम्ही?
आता इथे ओक्साबोक्षी गळे काढणारे तेव्हां कोठे गेले होते?
आता तरतूद केली तरी त्यांना ती राष्ट्रपती माफ करू शकणार असतील तर उपयोग काय त्याचा?

<<<अरे बाबांनो रिटॅलिएट करायचं हे अगदी बरोबर आहे पण असं करणार्‍या मुलिंना 'तीच तशी आहे/ तिचं कॅरेक्टर वाईट आहे/तिच्याच का मागे लागतात' असं लेबल लागलं तर ते तिला आयुष्यभर नाही का पुरणार?>>>

मान्य. मुलीची छेडछाड झाली तर तिच्या चारित्र्यावर दोषारोपण करणे यासारखे दुसरे मूर्खपणाचे काम नोहे. याबाबत संपूर्ण सहमती.

जो घाणेरडेपणा करतो त्याला काहीही फरक पडत नाही. >>>>>> मग इथे चर्चा करुन काय फरक पडणार आहे का ???????????????????????
.
.
तुम्ही जर असाच विचार करायला लागलात तर कोणत्याही पुरुषाला बाईची जरब बसणार नाही...
,

आणि नुसत्या पोकळ चर्चा करुन देखील फायदा नाही

मुक्तेश्वर कुळकर्णींशी सहमत !

अहो काही सन्माननीय अफवाद वगळता कोणत्या कालखण्डात स्त्रिया निर्धोक पणे जगु शकल्यात ?
स्त्रियाना नेहमीच उपभोग्य वस्तु म्हनुन वागवलं गेलय जगभर ( उगाचच आपल्या संस्कृती वर शिंतोडे उडवणार्‍यान्ना , बुरख्या आडची स्त्री सुरक्षित असते असे तर सुचवायचे नाही ना ? अन पलिकडे युरोपात बलात्काराच्या घटना बहुतांशवेळा रीपोर्टच होत नाहीत म्हणे )
पुरुषाच्या आधाराने स्त्रीया सुरक्षित राहातील असे म्हणणे ही हास्यास्पदच आहे हो ...अहो एवडे कर्तृत्ववान ५ नवरे असुनही बिच्चार्‍या द्रौपदीची विटंबना कोठे टळली ...:(

सोडुन द्या ....लोक चार दिवस चर्चा करतील ...इथे मायबोलीवर धुरळा उडेल....कदाचित त्या ४ नराधमाना फाशीही होईल पण त्याला कोण भितो ....लगेच पुढच्या काही काही दिवसात परत अशीच काही घटना घ्डेल......

हे असेच चालत राहणार ...कितीही विकास झाला तरीही ...आफ्टर ऑल ह्युमन बीईंग्स आर अ‍ॅनिमल्स ओन्ली Sad

.दरवेळेला सरकार कडे बोट दाखवुन स्वतः षंढपणे बसण्यापेक्षा..स्वतः कृती करा काही......>> मी काय करु शकतो , एवढी मला जाणिव आहे. मागच्याच वर्षी रेल्वेतुन प्रवास करतानाची गोष्ट , एक मुलगी बाजुला खाली बसली होती मी वरच्या बाकावर होतो, एक मोठ्या मुलाने एक लहान मुलाच्या हातात मोबाईल दिला होता, तो लहान मुलगा त्या मुलीचे विडीओ शुट करीत होता , मी सरळ त्या मुलीच्या बाजुला बसलेल्या मुलाला विचारले ये आपकी बहन है क्या,? तो म्हणाला क्यो? मी म्हणालो ये बच्चा आपके बहण के विडीओ शुट कर रहा है. तेवढ्या तो मोठा मुलगा पळाला त्याच्या हातचा मोबाईल घेऊन मार त्याला बसला त्याची आई माझ्याच अंगावर आली . तो मोठा मुलगा त्याचा भाऊ होता आईपुन्हा मोबाईल घेऊन आली तर म्हणे पहा बर मोबाईल मधे कोठे आहेत फोटो. तो पर्यंत त्याने डिलीट केले होते.

बलात्कार करणार्‍याला परत कधीही संमतीपूर्णसुद्धा संबंध ठेवता येऊ नये हीच शिक्षा योग्य आहे.

अरूणा शानभाग केसमधला सोहनलाल ७ वर्षाची शिक्षा भोगून सुटला मोकाट. त्याच्या बेशरम कुटुंबियांनीही त्याला घरात घेतलं आणि आता मजेत जगतोय. अरूणा शानभाग कोमात पडून आहे अजून.

Pages