महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेतल्या शाळेत नुकतेच जे झाले ते इथे गल्ल्या गल्ल्यात घडायला हवे आहे का? >>> अमेरीकेच्या शाळेत एका पुरूषानं ते काम केलय. बाईंनी(शिक्षिकांनी) आपापले विद्यार्थी माथेफिरुपासुन वाचवले हेपण लक्षात घ्या. असं लिहुन तुम्ही स्त्री विरूद्ध पुरूष वातावरण आणण्याचा प्रयत्न करताय. सगळ्या बायकांना प्रॉब्लेम पुरूषी मानसिकतेचा आहे हे स्पष्ट कळतय.

आपण आपले म्हणणे निदान मांडले हे समाधान मला अगदी पुरेसे असते.>>> मी भास्कर सहमत आहे. तुम्ही निदान काहीतरी केलय याबाबतीत. तुमची कळकळ जाणवतेय.

अवांतरः @ सामोपचारः
प्लीजच कितीही हसु आलं तरी ते इथे न दाखवणं शक्य होईल का तुम्हाला? इथे विषय काय चाललाय निदान त्याची संवेदनशीलता लक्षात घेतलीत तर? पटत नसल्यास 'अज्जिब्बात पटलं नाही, प्रचंड असहमत, काहीही काय' आणखी जे काही प्रतिसाद असतात ते वापराल का प्लीज?

@पारिजाता | 19 December, 2012 - 14:07
मी-भास्कर, मान्य. पण त्या वेळची शिक्षा म्हणुन आता प्रुथ्विच्या अन्तापर्यन्त बायकान्नी तोन्ड उघडू नये असा स्टॅन्ड असेल तर ..... <<

अहो असे मी कसे म्हणेन?
ज्या ३५ जणांना राष्ट्रपतींनी दया दाखवली त्यात काहीजण बलात्कारी-खूनी होते. त्यांना माफी देऊ नये म्हणून त्यावेळी पुरेसा आवाज उठवला नाही त्यामुळे स्त्री राष्ट्रपती, स्त्रीच सर्वोच्च सत्ताधारी, स्त्रीच विरोधी पक्षनेती, स्त्रीच सभापती अशी सगळी मांदियाळी तेथे असूनही जर बलात्कारी-खूनी माफीला पात्र झाला तर कशाला राहील कायद्याचा वचक? आता फाशीच्या शिक्षेची मागणी करताहात. आहे काय त्याचा उपयोग? राश्ट्रप्तींचा अधिकार त्यावर बोळाच फिरवणार ना?
अहो ज्या बलात्कारी-खूनी लोकांना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेऊन ठेवण्याचे महाकठीण काम ज्या ज्या लोकांनी केले त्यांच्या कायद्याचा वचक बसवण्याच्या सर्व प्रयत्नांचा या अधिकाराने सत्यानाश केला आहे. आणी पुन्हा आपण यंत्रणा काम करीत नाहीत म्हणून ओरडणार!
आता तरी लावून धरा. उगाच स्त्री विरुद्ध पुरुष असा रंग भरू नका. तुमची एवढी मोठी व्होट बँक असतांना, इतक्या जबरदस्त स्त्रिया महत्वांच्या पदांवर असतांना हतबल होऊन कसे चालेल. बलात्कारी व्यक्तीला झालेली फाशीची सजा राष्ट्रपतीला रद्द करता येणार नाही असा कायदा करून घ्या. नाहीतर सध्याचे सर्व कांही अरण्यरूदनच ठरेल.

मोकिमी चांगली पोस्ट. पुरुषांवर जर बलात्कार होतात तर त्यांनीही पुढे येऊन त्याबद्दल बोलायला पाहिजे, त्याशिवाय त्याबद्दल जागृती होणार नाही. जसे स्त्रियांना सांगितले जाते की या विरुद्ध आवाज उठवा, तेच तत्त्व पुरुषांनाही लागू होते. आवाज उठवा. घाबरू नका.

http://tehelka.com/video/tehelka-sting-expose-the-rapes-will-go-on/#

ह्या स्टिंग ऑपरेशन मधे रेप केस च्या बाबतीत असलेले दिल्ली आणि एन्सीआर पोलिसांचे विचार दाखवले आहेत.

बलात्कार इज नॉट अबाउट सेक्स इट इज अबाउट पॉवर हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाईचे कपडे, संस्कार, नीतीमत्ता, इज्जत, अब्रू अशाच गोष्टींवर चर्चा होत रहाणार.

शेवटी जसा समाज तसेच पोलिस त्यामुळे एकंदरीतच अवघड आहे.

काही पोस्टी खरच चांगल्या आहेत. हि विकृती मनातली आहे, ती तशीच संपवली पाहिजे.

त्यांना येरवड्याला पाठवता येणार नाही. ते तिथे ऑलरेडी आहेत.

मीरा, खरे आहे. विक्रुतीचे मुळ शोधणे हा मुख्य मुद्दा झाला आणि ते होणारच आहे. it's time wise people in India sit down, discuss, brainstorm and come to a conclusion . विक्रुत लोक तसे का वागतात याची कारणे शोधणे आणि उपाय करणे गरजेचे आहेच. माथेफिरून्पेक्षा सोसायटीत इमेज असलेले लोक गर्दित, कुणाचे लक्ष नसताना, असहाय लोकान्वर असले चाळे करतात ते जास्त dangerous आहे. आणि आपण सुरक्षित म्हणतो तिथे हे थोडे subtle असते. पण माजोरि लोकान्चा बुजबुजाट असलेल्या ठिकाणि जिथे या असल्या विक्रुताना भितीच नाहीये तिथे सर्रास चालते. पुरुष काय आणि स्त्रिया काय? धोका आहेच पण बायकान्ना तो राजरोसपणे आहे. फार फार जास्त प्रमाणात आहे. गैरसमज नको. तुम्ही मान्डलेला प्रसन्ग भयाण आहे आणि ज्यावरुन हा विषय सुरु झाला तिथे त्या सैतानान्ना वाटले असते तर एखाद्या पुरुषाचीही तीच गत झाली असती.
पण victim बाई असो कि पुरुष असल्या पाशवी गुन्ह्यात गुन्हेगार हा पुरुष किन्वा पुरुषान्चा कळपच असतो. बायका accomplice असू शकतात. पण हे अत्याचार करायची इच्छा आणि भर रस्त्यात इतक्या लोकान्समोर करायचि हिम्मत ही पुरुषातच असते. कल्पना करा असा सामुहिक अत्याचार स्त्रियांनि केला. तर या कल्पनेनीच पुरुषान्च्या मनात आनन्दाची कारन्जी फुटतिल. हे असे पुरुष बोलून दाखवतात. अगदि सज्जन पुरुष सुधा. नुसते तेच नाही तर ready to get assaulted असल्या Taglines असतात पुरुषान्साठीच्या प्रॉडक्टसच्या.
याहून वेगळी परिस्थिति असेल तर माझे अज्ञान.

ह्या सगळ्या प्रकारात एक अजून मुद्धा असा आहे तो पीडितांच्या पुनर्वसनाचा
"शेवटी आगीजवळ गेल्यावर लोणी वितळणार" मानसिकतेचा
उद्या ती मुलगी घरी येईल तेव्हा आजुबाजू चे लोक तिला नॉर्मल लाईफ जगू देतील का?

ही मी माननीय गृहमंत्र्यांना पाठवलेली इमेल. त्यांच्या पत्ता घ्या, पण मसुदा आपल्या मनाने लिहा.

----- Forwarded Message -----
From: Dinesh Shinde
To: "skshinde@sansad.nic.in"
Sent: Wednesday, 19 December 2012, 12:53
Subject: EVENT IN NEWDELHI

Respected Home Minister of India,
NEW DELHI.

RE : EVENT IN NEW DELHI

I am deeply concerned about the incident, which took place in New Delhi, in a running bus.
I pray for the well being of the student, affected by the same.

I am sure your office will do everything in this matter to do justice. But as an ordinary citizen
of India, I sincerely feel that as a society we have failed in providing a safe and secured place
for our citizens to live and enjoy life in a free atmosphere. We have also failed to educate our
citizens, about the values we have inherited and feel proud of.

Many of my colleagues from India have narrated their experiences of such incidents and the
sense of insecurity they always live with. This issue is not only about Delhi, but also about many cities and towns in our country.

I humbly request you to guide us, as to what can be done, collectively by all of us, to prevent
such incidents in future.

With regards,
C.A. Dinesh Shinde

अभिनंदन दिनेशदा................... हे तुम्ही अतिशय योग्य केले...
.

क्या आप खुद पत्रकार होते हुये इन समस्या का सामना कैसा किया है <<<<
कोणत्या गाढवाने तुम्हाला मी पत्रकार आहे असं सांगितलंय?
>>

अहो झाला असेल त्यांचा गैरसमज. इतके चिडायला काय झाले? मानसिक संतुलन राखाल अशी अपेक्षा करावी का? दुसर्‍या बाजूकडूनही अशा भाषेला सुरुवात झाली तर मूळ विषयाचे काय?
संयम ठेवा.

@पारिजाता | 19 December, 2012 - 15:57
विक्रुतीचे मुळ शोधणे हा मुख्य मुद्दा झाला आणि ते होणारच आहे. it's time wise people in India sit down, discuss, brainstorm and come to a conclusion . विक्रुत लोक तसे का वागतात याची कारणे शोधणे आणि उपाय करणे गरजेचे आहेच. <<

सगळ्याच मानसिक विकृतींबद्दलचे संशोधन जगभर चालू आहे. त्यातून मार्ग जेव्हा निघेल तेव्हां निघेल.
आज आहे या परिस्थितीत अशा घटनांना लवकरात लवकर आळा कसा बसेल त्याचा विचार व्हायला हवा आहे. नुसता विचार नाही तर तातडीची अम्मलबजावणी व्हायला हवी आहे

या सर्व गोष्टींसाठी नव्हे जगातील सर्वच प्रोब्लेम्ससाठी एकच उपाय आहे तो म्हणजे प्रत्येकाने स्वतःची मानसिकता बदलणे. सतत स्व-अध्याय करत राहणे. पुन्हा एकदा संतांची मांदियाळी या भूमंडळी अवतरण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

दिनेशदा स्तुत्य प्रयास. मीही लिहेन.

पण इमेल आणि पत्र यांत मी पत्राला तेही पोस्टकार्ड वर लिहिलेल्या की ज्यातला मजकूर ज्याच्या हाती पडेल त्याला ( पोस्टमन, हँडलिंग स्टाफ इ. ) वाचता येउ शकेल, प्राधान्य देइन. मला कल्पना आहे की तुम्ही भारताच्या बाहेर असता त्यामुळे इमेल लिहिणच शक्य आहे. पण देशांत राहणार्‍या लोकांनी लिहायचच असेल तर पोस्टकर्ड पाठवावं इमेल पेक्षा ( इमेल डिलीट करणं पोस्ट्कार्डाची विल्हेवाट लावण्यापेक्षा सोप्पं असं मला वाटतं ).

( इमेल डिलीट करणं पोस्ट्कार्डाची विल्हेवाट लावण्यापेक्षा सोप्पं असं मला वाटतं ).>>>>>>>> हे कसं ???

म्हण्जे कोणीतरी बसून ( पीए वगैरे ) इमेलं डिलिट करणं जास्त सोपं पडत असावं, पण आलेल्या लक्षावधी पोस्टकार्डांची विल्हेवाट... कचर्‍याच्या पेटीत टाकतानाही बरेच लोक पाहू शकतात ...

हे म्हण्जे 'तुका म्हणे त्यातल्यात्यात' आहे... फुल्लप्रूफ वगैरे नाही

त्यांच्या इमेल्स सुद्धा त्यांचे चिटणीसच वाचत असतील. कुठुनही आपले मत त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशी कारण.
शिवाय हा गुन्हा आणि घटना आजची नाही. याबाबत त्यांचे कार्यालय नेमके काय करतेय / करणार आहे, हे तर कळेल.

मला नेमके शब्द आठवत नाहीत, पण अशी एक कविता होती.

कौन कहता है के आसमान में सुराख नही हो सकता
एक पत्थर तो तबियत से उछालो यारों|..

दिनेश तो शेर असा आहे,
कौन कहता है के आसमान में सुराख नही हो सकता
एक पत्थर तो तबियत से उछालो यारों|

"एक पत्थर तो तबियत से उछालो....." अशी रचना आहे ती.

दिनेश.... पत्र आवडले. सरकारी पातळीवर कमीतकमी भाषा वापरून आपली व्यथा सांगितली तर त्याची निश्चित्त नोंद घेतली जाते. तुमचे पत्र संयत भाषेचा एक चांगला नमुना आहे.

गृहखाते जरूर त्याची दखल घेईल यात शंका नाही.

आभार अशोक आणि सर्वच.,

त्या गुन्हेगारांनी गुन्हा जरी कबूल केला असला, तरी आरोपपत्र / सुनावणी / पुराव्यांची छाननी होणारच.
पण तेही ठिकच आहे. न्याय देताना भावनेच्या आहारी जाता येणार नाही. पण यातून आपण काय बोध घेणार आहोत. पुढे काय काळजी घेणार आहोत. ते महत्वाचे.

ह्या बलात्कार करणार्‍या लोकांच्या शिक्शेसाठि स्मितू, मामी,नीधप, प्रमोद यांना पुर्ण अनुमोदन! वास्तवात खरोखर होईल कि नाहि शक्यता कमी आहे पण दहशत नक्कि बसेल!
आता थोड्या दिवसापुर्विचीच घटना, पंजाब मधे तर पोलिसाला मारले तो स्वःतःच्या मुलिला प्रोटेक्ट करत होता म्हणुन, बरेच लोक उभे राहुन बघत होते पण कोणि पुढे आले नाहि मदत करायला. जास्त दहशत जे वाईट क्रुत्य करतात त्यांची आहे.त्यांना माहिति आहे कोणि लोक काहि करणार नाहित म्हणुन. २-३ दिवसापुर्वि कुठल्यातरी मराठि चॅनेल वर एक प्रोग्रम होता कि महिला किति सुरक्शित आहेत ह्यावर, ३ वर्षापासुन ६५ वर्षापर्यंतच्या बायकांवर अत्याचार झाले आहेत, महाराष्ट्रात सुद्धा, यातील बर्‍याच बातम्या बाहेर येत नाहित म्हणुन प्रंमाण कमी वाटते. तसे पाहिले तर दिल्ली भारताची राजधानी म्हणुन कदाचित तिथल्या बातम्या जास्त येत असतिल पण महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात सुद्धा हे प्रमाण कमी नसेल.

दिनेशदा चांगली मेल, काही उत्तर आले तर जरुर शेअर करा!

मोहनकिमीरा अनुमोदन! चांगली पोस्ट

event कसला?
Incident, Mishap असं पाहिजे ना? किती मट्ठ माणुस आहे हा..! Sad

@मोकिमी: बालाजी नगर, (पुणे) भागात असे बरेच खाजगी वसतिग्रुहे आहेत ज्या छळ छावण्या म्हणून बदनाम आहेत.
तुम्ही मांडलेला मुद्दा योग्य आहे. विक्रूती ही माणसात अगोदर (जन्मापासुन) पासुनच असते कि, ती नंतर विकसीत होते?
ह्यावर काही शोध झाला आहे का?

दिनेशदा चांगली मेल, काही उत्तर आले तर जरुर शेअर करा!
<<<

प्रत्येकानेच आपापल्या ऑफिशियल मेल आयडीवरून हाच मजकुर थोडा बदलून मेल केली तर बरे होईल.
(Many of my colleagues from India have narrated their experiences of such incidents and the sense of insecurity they always live with. : हे वाक्य गाळावे. त्या ऐवजी, Law abiding ordinary citizens like me are troubled with growing sense of insecurity regarding safety of our families. हे अथवा तत्सम वाक्य घालावे.)

@mansmi18 | 19 December, 2012 - 15:12

नुकतेच कुठेतरी वाचले होते की माजी राष्ट्रपतीनी एका लहान मुलीवर अत्याचार करुन खुन करणार्‍या एका माणसाची फाशी कॉम्युट करुन जन्मठेपेची शिक्षा दिली होती. <<

एकच नव्हे तर अशा चार प्रकरणे होती. ज्यांनी दुसर्‍याचे जीवन हिरावून घेतले अशा एकूण ३५ एक सत्पुरुषांना माजी राष्ट्रपतींनी दया दाखवून पुण्यप्राप्ती केली. तरी इथल्या जनतेला काही वाटले नाही.
परदु:ख शीतल!

भास्कर, तुमचे तुणतुणे अद्याप सुरूच आहे हे पाहून अंमळ गम्मत वाटली.

कुणा अमक्याच्या मयतीला जाऊन आमची म्हातारी मेली तेव्हा तुम्ही का रडला नाहीत.. असे म्हणून वेगळेच भोकाड पसरण्याचा तुमचा कार्यक्रम आवरता घेतलात तर बरे होईल असे सुचवू इच्छितो.

तिथेही समजवून सांगितले होते, आता पुन्हा सांगतो,

राष्ट्रपती जे काही करतात, ते त्यांच्या सल्लागारांवर व एकंदरच सगळ्या सिस्टीमवर अवलंबून असते, ते पद फक्त शिक्याचे धनी आहे. व्यक्तिगत स्वार्थ/चॉईस तिथे असेल, वा उपयोगी ठरेल असे वाटत नाही. अन्यथा मोडीत काढलेल्या राजकारण्यांना राज्यपाल व तत्सम पदांवर 'किकिंग अपस्टेअर्स' अशी बढती दिली जात नसावी.

(संपादनः राष्ट्रपतींनी फाशी माफ केली म्हणजे त्या माणसास रस्त्यावर सोडून दिले असे नव्हे, त्याला जन्मठेप दिली जाते. जी आजकाल आजीवन झाली आहे म्हणे-हे ऐकीव- :/संपादन)

तुम्ही ४-५ असल्याच पोस्टी लिहून, तसेच तुमचाच तो थयथयाट धागा वर आणूनही इथल्या(या धाग्यावरील/मायबोलीवरील) सर्वांनीच तुम्हाला सरसकट इग्नोर केले, तरीही हे वरील सत्य तुमच्या बाळबुद्धीला अजूनही आकळल्यासारखे दिसत नाही.

इथल्या जनतेला काय वाटते ते वर लिहिलेले आहेच. तुमच्या भूतपूर्व राष्ट्रपती-द्वेषाचे मूळ मला तरी समजत नाहीये. थोडे गूगल केले तर त्यांचा पत्ता, ईमेल इ. सापडेलच. प्रतिभाताईंच्या घरी/घरासमोर जाऊन हे अरण्यरूदन करा. इथे पोष्टी पाडणे थांबवा, ही नम्र विनंती करतो. इथल्या कुणी काय केले, हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे, तुम्ही म्हणता तेच करायला कुणीच बांधील नाही, हे समजून घ्यायचा थोडा प्रयत्न केलात तर बरे.

कळावे,
लोभ नाहीच, तो तसाच ठेवा हे.वि.

- सर्वच बलात्कार्‍यांबद्दल अतीव तिटकारा असलेला )इब्लिस(

दिल्लीमधे लोकांनी मोर्चे काढले, गृहमंत्री भेटावेत म्हणुन धरणे धरले, नारेबाजी, मेणबत्ती मोर्चा, इ. इ. केले.
पण हाच उत्साह जेव्हा अशी एखादी घटना घडत असते तेव्हा का नाही दाखवत लोक ? Sad
जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडत असेल तेव्हा का नाही आजुबाजुचे लोक ती घटना रोखण्यासाठी प्रयत्न करत ? Sad
या नंतरच्या मोर्चे आणि नारेबाजी मुळे काय होणार आहे ?

बलात्कारात कामवासना पूर्ण करणे यापेक्षाही कोणावर तरी बळजबरी करता येणे, त्या व्यक्तीला रिडिक्युल करणे, आपली मर्यादारेषा ओलांडून जबरदस्तीने दुसर्‍याच्या मर्यादारेषेत जाऊन तिचा प्रतिकार मोडत आपला हक्क प्रस्थापित करणे अशी जंगली मानसिकता दिसते. शिवाय बलात्कारात जो अ‍ॅक्शन घेतो त्याला स्वत्:च्या अ‍ॅक्शनचे परिणाम सहन करावे लागत नाहीत. गर्भधारणा झाली तरी ती स्त्रीला होणार, समाज बोटही स्त्रीकडे दाखवणार.

मुळात आपल्यापेक्षा दुर्बल घटकावर वर्चस्व गाजवण्याची ही वृत्ती आहे. बलात्कारात ती पुरुषांकडून व्यक्त होते पण इतरवेळीही सगळ्यांकडून व्यक्त होत असते. सूनेचा मानभंग करणारी सासू, बायकोचा चारचौघात अपमान करणारा नवरा, हाताखालच्या लोकांवर डाफरणारा बॉस, नवर्‍याचा राग मुलांवर त्यांना फटके मारून काढणारी आई हे सगळे कमीअधिक प्रमाणात मानसिक बलात्कार करतच असतात. ज्या ठिकाणाहून प्रतिकार होणार नाही याची खात्री असते अशाच व्यक्तींवर हे घाव घातले जातात

एकच पोस्ट वाचली या बाफवर. अतिशय सुंदर पोस्ट आहे मामी. मला आज सकाळी प्रवासात या घटनेबद्दल कळाल. चर्चेत दिल्ली वगैरे टॉपिक झालेच. एक गंगोपाध्याय म्हणून गृहस्थ आहेत त्यांनी बलात्कार करणा-याची मानसिकता या विषयाकडे आमचं लक्ष वेधून घेतलं. त्यांचं म्हणणं कि बरेचदा असं होतं कि व्हिक्टीमला पाहून बलात्कार होतो असं न घडता बलात्कार करणारा पुरूष स्त्रीसुखाच्या कल्पनेने झपाटलेला असतो आणि समोर येणारी स्त्री ही व्हिक्टीम ठरते. असो.

वर मुलींनी लिहिलय कि स्त्रियांना गन कंट्रोल वगैरे द्या, भावना समजु शकते पण तो सुध्दा यावर आळा घालणारा खात्रीशीर उपाय वाटत नाही.
जे लोक मुलीवर गँग रेप करतात ते तिच्या कडून शक्स्त्र हिसकवून तिच्याच शस्त्राने तिलाच कशावरून मारणार नाहीत ?
या शिवाय रेप सारखे विकृत गुन्हे लहान मुलीं पासून कुठल्याही वयातल्या स्त्री वर होतात, म्हणून आपण ४-५ वर्षाचय चिमुरड्या मुलींना पण शस्त्रधारी बनवणार का?
जसे स्त्रियांना सल्ले दिले जातायेत कि अमुक इतक्या वेळे नंतर बाहेर शकय्तो जाउ नका, हा उपाय खरं तर पुरुषांवर केला पाहिजे .. जे अत्याचार करतायेत त्यांना घरी बसवायचं कि निर्दोष स्त्रियांना ?
पुरुषांनाच ठराविक वेळे नंतर बाहेर पडायला कायद्याने सक्त मनाई करायला हवी.. सगळेच पुरुष जरी वाइट नसले तरी ! (अर्थात हे पण टोटली नॉन प्रॅक्टिकल च आहे )

दुर्दैवाने मला त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल आणि सुरक्षित असा एकच विचार मनात येतो , जसे काश्मिर मधे चौका चौकात , झाडां मागे, जिथे शक्य असेल तिथे आर्मी-पोलिस असतात तसे देशातल्या सगळ्याच शहरात करणे.. .. पब्लिक बस, प्रायव्हेट बसेस, ट्रेन च्या प्रत्येक डब्यात सशस्त्र महिला पोलिस हवेत.. नुसतेच काठी वाले हवालदार नाहीत.
संपूर्ण देशाला अंडर टेररिस्ट अ‍ॅटॅक असल्या सारखे अ‍ॅलर्ट ट्रिट करायला हवे या परिस्थिते एमधे :(.

अवाक करणार्‍या घटना.. काहीही बोलावंसं वाटत नसताना फक्त शिवाजीराजांची आठवण येतेय. कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच त्यांनी एका बलात्कार्‍याचे दोन्ही हात,दोन्ही पाय तोडून फक्त डोके आणि धड जिवंतपणीच -तेही लोकांना बघण्याजोग्या ठिकाणी -ठेवायला फर्मावले होते..!

नमस्कार,
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः


लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः

मुम्बई:
दिल्ली:

बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

नमस्कार,
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/

मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi

वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

चर्चा वाचली. हे माझे २ पैसे:

नगरपालिका/राज्य्/केंद्र सरकारला सेक्स ऑफेंडर्सचा डेटाबेस मेंटेन करायला भाग पाडा. अगदी बलात्कार ते इव्ह टिझींग करणार्‍या गुन्हेगारांची नोंद या डेटाबेस मध्ये ठेवा. हा गुन्हेगार ज्या-ज्या नविन परिसरात शिक्षण/नोकरी/धंदा यासाठी जाईल, त्या-त्या ठिकाणी त्याला त्याचा नविन पत्ता इ. कळवण्यास बंधनकारक करा. हा डेटाबेस, सरकारच्या वेबसाइटवर सतत अपटुडेट ठेवा.

याचे दोन फायदे होतीलः १. लोकांना या गुन्हेगारांची माहिती मिळाल्याने ते सतर्क राहतील.
२. गुन्हेगारांना जनाची नाहि तर मनाची तरी लाज वाटत राहिल आणि ते पुढील गुन्हे करणार नाहित.

जसे स्त्रियांना सल्ले दिले जातायेत कि अमुक इतक्या वेळे नंतर बाहेर शकय्तो जाउ नका, हा उपाय खरं तर पुरुषांवर केला पाहिजे .. जे अत्याचार करतायेत त्यांना घरी बसवायचं कि निर्दोष स्त्रियांना ?
पुरुषांनाच ठराविक वेळे नंतर बाहेर पडायला कायद्याने सक्त मनाई करायला हवी.. सगळेच पुरुष जरी वाइट नसले तरी ! (अर्थात हे पण टोटली नॉन प्रॅक्टिकल च आहे )

>>>>> दीपांजली, है शाब्बास! आउट ऑफ बॉक्स थिंकिंग.

पण अगदी नॉन प्रॅक्टिकल नाहीये. मनात आणलं तर नक्कीच करता येईल. अशावेळी बाहेर पडणार्‍या पुरुषांकरता पासेस द्यावेत आणि त्यात या पुरुषाकडून गुन्हा झाला तर त्याकरता अजून पाच पुरुषांना जबाबदार ठरवले जाईल अशा आशयाच्या मजकुरावर त्या पाच पुरुषांच्या सह्या घ्याव्यात. मायनॉरिटीत गेले की पुरुष आपोआप सरळ वागतील.

मोकीमी, खूप चांगली पोस्ट.

त्यांचं म्हणणं कि बरेचदा असं होतं कि व्हिक्टीमला पाहून बलात्कार होतो असं न घडता बलात्कार करणारा पुरूष स्त्रीसुखाच्या कल्पनेने झपाटलेला असतो आणि समोर येणारी स्त्री ही व्हिक्टीम ठरते.

>>>>>>>>>> हे वाक्य अतिशय महत्त्वाचं. स्त्रियांच्या कपड्यांवरून त्यांना ताशेरे मारणार्‍यांना हे वाक्य वाचून काही ज्ञानप्राप्ती झाली असेल अशी आशा करावी का?

जसे स्त्रियांना सल्ले दिले जातायेत कि अमुक इतक्या वेळे नंतर बाहेर शकय्तो जाउ नका, हा उपाय खरं तर पुरुषांवर केला पाहिजे .. जे अत्याचार करतायेत त्यांना घरी बसवायचं कि निर्दोष स्त्रियांना ?
पुरुषांनाच ठराविक वेळे नंतर बाहेर पडायला कायद्याने सक्त मनाई करायला हवी.. सगळेच पुरुष जरी वाइट नसले तरी ! (अर्थात हे पण टोटली नॉन प्रॅक्टिकल च आहे ) >>>>>>>>>>>>>

या चर्चेतले सगळे मुद्दे आज पर्यंत कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या बाफवर/ चर्चेमधे येउन गेले आहेत ( मी वाचलेल्या). पण हा मुद्दा सोडुन...... हे करणे अशक्यच आहे म्हणा आपल्याच काय कोणत्याही देशात. तरी पण out of box thinking....... आवडला मुद्दा आणि अगदी मनापासुन पटला सुद्धा......

लैंगिकतेच्या कल्पना पाश्चात्त्य राष्ट्रांएवढ्या खुल्या नसल्याने तसेच समाजात मोठ्या प्रमाणावर या गोष्टींबद्दल दडपण्यामुळे असंख्य लोक अशा विचित्र मानसिकतेचे होत असतील का ?
काहींना अनेक कारणामुळे अनेक काळ "सो कॉल्ड सुख" मिळत नाही त्यामुळे असे होत असेल का ?
आयुष्यात अनेक गोष्टींशी सामना करत असताना त्या सार्‍याचे फ्रस्ट्रेशन अशा स्वरूपात निघत असेल का ?
या अशा बाबींचा विचार होण्याची देखील आवश्यकता आहे, तरच उपायांबाबत पण निट विचार करता येईल.

मला तरी सतत सतत समुपदेशन आणि त्याचे अतोनात हॅमरिन्ग हा एकच उपाय दिसतो आहे.
पुर्वी ऋषी, मुनी, संत, इ. लोकांनी सततचे सामाजिक काउन्सेलिन्ग केल्यामुळेच आज खोटे बोलू नये, चोरी करू नये, इ. सारख्या बेसिक गोष्टी अगदी आपल्या सबकॉन्शस मधे जाऊ शकल्या (मी सेन्सिबल आणि संस्कारी लोकांबद्दल बोलत आहे)
सर्व प्रसार माध्यमे वापरून असे समुपदेशन केले गेले पाहिजे.

नगरपालिका/राज्य्/केंद्र सरकारला सेक्स ऑफेंडर्सचा डेटाबेस मेंटेन करायला भाग पाडा. अगदी बलात्कार ते इव्ह टिझींग करणार्‍या गुन्हेगारांची नोंद या डेटाबेस मध्ये ठेवा. हा गुन्हेगार ज्या-ज्या नविन परिसरात शिक्षण/नोकरी/धंदा यासाठी जाईल, त्या-त्या ठिकाणी त्याला त्याचा नविन पत्ता इ. कळवण्यास बंधनकारक करा. हा डेटाबेस, सरकारच्या वेबसाइटवर सतत अपटुडेट ठेवा.>>>+१०००

रस्त्यावरुन चालणारी प्रत्येक बाई, मुलगी मग ती अंगभर कपडे घातलेली असो किंवा कमी कपड्यातली असो, आपल्याला अव्हलेबल आहे किंवा आपल्याकरताच पाठवलेली आहे आणि आपल्याला तिच्याबरोबर काहीही करायची मुभा आहे टाईपच्या सडक्या मनोवृत्तीच्या पुरुषांना जोवर जबर शिक्षा ( आपापली कल्पनाशक्ती लढवा.) होत नाही तोवर असे प्रकार घडतच रहाणार.
डिजे, तू ठराविक वेळेनंतर पुरुष संचारावर बंदी जे म्हणतेस ते प्रॅक्टिकल नाहीच पण अनफेअर आहे.

Pages