महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> जर चूकून अशा शिक्षा व अन्य बाबी अंमलात आल्याच तर ४९८अ कलमासारखा त्या बाबींचा सर्रास गैरवापर होणारच नाही याची खात्री कोण कशी देणार?

लिंबुटिंबु, हे कलम ज्या कारणासाठि निघाले त्यामधे नैसर्गिक आणि so called सांस्क्रुतिक वर्चस्वाचा किति काळ गैरफायदा घेतला गेला? आणि हे कलम असुनहि ते ज्यान्च्यासाठि आहे त्यांच्यापैकि कितिन्ना त्याचा पुढे उपयोग होतो? असो हा या थ्रेडचा विषय नाहि. पण गुन्ह्यांच्या शिक्षेचा गैरवापर याची भविष्यातलि एकूणच किति काळजि आहे तुम्हा लोकान्ना? गन दिल्या तर बायका निरपराध पुरुषान्ना मारतिल, ४९८ चा गैरवापर होतोय. मुळात हे कायदे करायचि वेळ येईपर्यन्त अन्याय होणार आणि वेळ आलि कि आता आमच्यावर अन्याय होईल म्हणुन ओरडा होणार. काय करावे?

देवा, अपघात ग्रस्त मुलीला सामर्थ्य, बळ, शक्ती दे.
ज्यांना ह्या बातमीत TRP दिसला ते सर्वात हिडीस..:रागः

राजकाशानाने लिंक दिली होती. त्यावर मी, माझे पती आणि माझे आईवडिल यांनी सही केलेली आहे. ही लिंक मेलमधून काही जणांना पाठ्वलेली आहे.

राजकाशाना | 20 December, 2012 - 08:49
पेटिशन इथे आहे. पटल्यास सही करा आणि फॉरवर्ड करा.
http://www.change.org/en-IN/petitions/president-cji-stop-rape-now

>>
या लिंकवर आताच सही करून हातभार लावला आहे.

या लिंकवर आताच सही करून हातभार लावला आहे.

हे संगायचि गरज नाहि. चुपचाप पन नरु शक्ता तुम्हि.

भावनेच्या भरात प्रत्येकाला जरी असे वाटत असले तरी या प्रकारांवर ताबडतोब होण्यासारखा एकही उपाय दुर्दैवाने आपल्याकडे आत्ता नाहीये.

यासाठी खुप पेशन्स पाहिजे (अगदी पुढल्या काही पिढ्यांपर्यंतचा), अनेक सत्प्रवृत्त लोकांनी सतत सतत समाजावर चांगल्या विचारांचे हॅमरिन्ग करत राहिले पाहिजे. नुसते आईबापांनी संस्कार करून भागणार नाही. जसे आजकाल अतिशय विकृत मालिका, भंगार सिनेमे, अश्लिल गाणी यांचे हॅमरिन्ग होत आहे ना ते कमी करून सदविचारांचे घडेच्या घडे लहानपणापासुन डोळ्यांवर, कानांवर ओतले गेले पाहिजेत. शिक्षण क्षेत्र चांगल्या मुल्यवान लोकांकडुन हिसकावून घेऊन त्याचा व्यवसाय बनवुन टाकला, टिव्ही, सिनेमे यातुन भोगवाद, चंगळवादाचे उदात्तीकरण चालू झाले. या सार्‍याची फळे आहेत ही, ती भोगलीच पाहिजेत.

शस्त्रक्रिया हा सर्वकाळ उपाय होऊ शकत नाही. रोग मुळात होऊच नये यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. डोके उडवायचे नाही तर डोके बदलवायचे आहे.

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भुता !

कठीण काम आहे...
हे वाचा: http://blogs.timesofindia.indiatimes.com/onefortheroad/entry/why-indian-...

मला एक कळत नाही, समजा ज्या मुलीवर बलात्कार झाला ती समाजाच्या दृष्टीकोनातून फार चांगल्या कॅरॅक्टरची नसेल (म्हणजे काय ते त्या समाजालाच माहीत) तर तिच्यावर बलात्कार होणे समर्थनीय कसे ठरते? हा असा खालच्या थराचा विचार कसा काय लोक करु शकतात? माबोवर आहेतच असे नमुने पण ते एक सायको म्हणून सोडुन दिले तरी समाजात अशा सायकोंची संख्या वाढतेय हे डिस्टर्बिंग आहे. त्याला कंट्रोल करायला या सायकोंकडे उपायही तालिबानी, टोकाचे. मुलींनी मोबाइल वापरायचे नाहीत, स्कर्ट घालायचे नाहीत, रात्री घराबाहेर पडायचे नाही, मित्रांबरोबर रस्त्यावर बोलायचे नाही, पबमध्ये जायचे नाही, सिनेमाला जायचे नाही. अरे यापेक्षा आपले जुन्या काळातले विचारवंत अनेकपटीनी पुढारलेले होते. असले मूर्ख उपाय कधी सुचवले नाहीत त्यांनी.

असले मूर्ख उपाय कधी सुचवले नाहीत त्यांनी.

कोन साय्को ? तेंनि सान्ग्तिल त्याचे उलट करा. बोल कशाला लावता कुनाला ?

@किडा | 20 December, 2012 - 13:12नवीन
या लिंकवर आताच सही करून हातभार लावला आहे.

हे संगायचि गरज नाहि. चुपचाप पन नरु शक्ता तुम्हि
>>
ही पोस्ट किडयांसाठी आणि इग्नोर्-व्रतस्थ यांच्यासाठी नव्हती.

अजून सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या नाहीत. इसकाळवर पूर्वी वाचलेली एक प्रतिक्रिया आठवली

अशाच एका बलात्काराच्या बातमीनंतर आपले कोणी एक सन्माननीय राजकारणी म्हणाले होते की सुरक्षेचा उपाय म्हणून स्त्रीयांनी संध्याकाळी सात नंतर बाहेर पडू नये. एक प्रतिक्रिया होती की "त्यापेक्षा सात नंतर पुरषांना बाहेर पडायची बंदी घालावी म्हणजे स्त्रीया सुरक्षीत रहातील."

फेसबुकवर माझ्या मित्राने घेतलेली शपथ ज्यास मी सुध्दा साथ दिलेला आहे
>>As a man, I promise that from this day, every time I step out, I shall personally ensure the safety of all women within my eyesight. I shall be vigilant, quick and will personally intervene if I see any untoward incident happening with any woman on the streets. I invite all my FB brothers to take this oath with me. We owe to that poor girl, who suffered because some men did not bother to help. Let's act NOW>>>>
मला तरी भावली ही कळकळ अन घेतलेला पुढाकार

जोपर्यंत लोकांची मानसिकता सुधारत नाही पर्यंत काही नाही ...
बहुतेक site वर मुलींना जवाबदार धरल आहे..shameless .......

दिनेश दा
ती लिंक दिल्यास तुम्हाला अ‍ॅक्सेस असेल की नाही माहित नाही ,पण तरीही
आणि त्याला मुद्दाम अ‍ॅज अ मॅन का म्हणावे लागले हे माझ्या मते ज्या लज्जास्पद थराला पुरुष वागत असतात्-कुठेही- अगदी वर्ल्ड बँक अध्यक्षापासून ते इटलीच्या पंतप्रधानांपर्यंत -त्यामुळे म्हटले असेल
ती लिंक
http://www.facebook.com/#!/shantanu.dhar.9

छोटी तुमच्या भावना समजु शकतो.
पण त्या ममता बाई जरा चमको टाईप आहेत. तोंडाच्या वाफा दवडतात झाले.
वास्तविक राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष सरकारला तोंडावर पाडु शकते या प्रकरणी पण मग पुढची टर्म सुखाची नाय मिळणार म्हणुन जे होणे शक्य नाही त्याबद्द्ल आग्रह चालुय.

भयानक आहे.(वरची लिंक वाचून).

भारतात भ्रष्टाचाराची किड खूपच खोलवर आहे.(त्यामुळेच ही अशी लोकं गुन्हे करून सुटुन पुन्हा नेते बनू शकतात).
मानसिकते बरोबर हि किड निघणे जरूरी आहे. ती कशी व कधी निघेल हाच प्रश्ण आहे.

त्या ह****ना नंपूसक बनवून सोडवून देण्यात काहीच अर्थ नाही. नंपूसक करून, हात पाय तोडून जेलमध्ये सडावे लागेल तेव्हा कळेल. बाहेर सोडले तर आणखी घाण करतील...
(पण शेवटी बोलाचा भात व बोलाची कढी असते ह्या राजकारण्यांची...)

पिडीत मुलीची स्थिती नाजूकच आहे. नराधमांनी तिची आतडीच बाहेर काढली असल्याने प्रकृती नाजूक आहे ऑपरेशन करून सुद्धा.

IMPORTANT MESSAGE FOR ALL THE GIRLS OUT THERE

If u get stuck anywhere in India, don't rely on auto/bus/taxi,
instead dial 44222222 or 44333222
which is the no. of cabs with female drivers
that have been started for the safety of women..

SHARE IT GUYS AND SPREAD THIS MESSAGE TO AS
MANY WOMEN AS YOU CAN....
.
(फेसबुक सभार)

anywhere in India, <<<
??? खरेच?
म्हणजे उदाहरणार्थ पार सिंधुदुर्गातल्या कोपर्‍यातल्या खेड्यात सुद्धा?

या टॅक्सी सर्व्हिसचे नाव काय? त्यांच्याबद्दल, त्यांच्या नेटवर्कबद्दल माहिती मिळू शकेल का?

which is the no. of cabs with female drivers
------ कशाचीच खात्री देता येत नाही. संकट केवळ ड्रायव्हर/ कर्मचारी यांच्या रुपातच येणार आहे असे नाही. ते प्रवाशांचे रुप बनुन पण समोर येऊ शकते. चार टाळके एकत्र येऊन महिला ड्रायव्हरची फसवणुक व्हायची शक्यता पण आहे...

महिलांनी सतर्क/ सावध रहाणे, टाळके ठिकाणावर असणार्‍या पुरुषांनी साथ देणे, वेळ पडल्यास हटकणे आणि मुख्य म्हणजे सतत समाज प्रबोधन (महेश यांनी सुरवातीला हे सुचवले आहे) होत राहिल हे बघणे हाच यावर दुरगामी पण किचकट उपाय आहे.

??? खरेच?
म्हणजे उदाहरणार्थ पार सिंधुदुर्गातल्या कोपर्‍यातल्या खेड्यात सुद्धा? >>>>>>>>>>>> हो...तिथे जाउन फोन करुन बघा...नक्कीच मिळेल.

असे दावे करणारे बहुतेकदा फोल दावे करतात. भारतात कुठेही हा दावा शंभर टक्के निरर्थक आहे हे कुणीही सांगू शकेल.
मुंबईत प्रियदर्शिनी म्हणून कॆब सर्व्हिस आहे. ती सगळीकडे असेलच याची खात्री नाही.

छोटीने दिलेल्या लिंकमधे मोठ्या व छोट्या शहरांच्याच केवळ लिंक्स आहेत आणि सुरक्षितता ही अगदी लांबच्या खेड्य़ापाड्यात जाऊन काम करणार्‍यांचीही गरज आहे.

?

असले काहीच शेंडाबुडखा नसलेले फॉरवर्डस किंवा माहितीचे पुंजके खात्री केल्याशिवाय कुठे देऊ नयेत हे सांगायचंय.
त्या वरच्या फेसबुकवरून साभार मधे टॅक्सी कॅबच्या कंपनीचे नाव नाही. भारतात कुठेही यासारखा हास्यास्पद दावा ते करतायत. शंका घ्यायला प्रचंड वाव आहे.
त्या नंबर्सना फोन केल्यावर कशावरून काही चुकीचेच ओढवून घेणे होणार नाही?

>> सुरक्षितता ही अगदी लांबच्या खेड्य़ापाड्यात जाऊन काम करणार्‍यांचीही गरज आहे.
होय आणि म्हणूनच सपोर्ट ग्रुप्स हे आपण आपल्यासाठिच केले पाहिजेत. सरकार नावाचि सन्स्था, माणूस, देवता, एलियन येऊन काहितरि करणार आहे असल्या अपेक्षा फोल आहेत. लोकशाहि सोपि नाही. नुसता बोटावर काळा डाग असला कि सम्पत नाही. जबाबदारि येउन पडते नागरिक म्हणून. आपले सरकार घटनेनी नेमुन दिलेलि कामेच करु शकत नहि धड. इतक्या वर्षात पाणि पोचले नहि सगळ्या लोकान्पर्यन्त. कुणी बोलले तर त्यान्ना मानसिक असंतुलन म्हणुन मोकळे होतात हे राजकारणी. हे आपण आपल्यासाठिच केले पाहिजे.

म्हणजे आता मोठ्या शहरामध्ये हे service चालू झाली आहे, तिला चांगला प्रतिसाद दिला तर ते लोक अजून छोट्या शहरात ती service चालू करतील.

>> विषय पॅनिकच्या काळात बेसलेस इन्फो प्रसारित करण्याचा आहे स्मित
अं.. हे पटले. होक्स न्युजचा सुकाळ असतो पॅनिक च्या काळात. पण ,
>> म्हणजे आता मोठ्या शहरामध्ये हे service चालू झाली आहे, तिला चांगला प्रतिसाद दिला तर ते लोक अजून छोट्या शहरात ती service चालू करतील.
हेही पटले. Uhoh

निधप वर उदयन यांनी दिलेले नंबर्स हे
ORIX Auto Infrastructure Services Limited या कॅब सेवा देणारया कंपनीचे आहेत
हि पहा त्यांची वेबसाईट
http://www.orixindia.com/radiotaxi_booking.aspx

त्यांच्या वेबसाइटनुसार ते मुख्यतः दिल्ली व कलकत्ता या दोन ठिकाणी सेवा पुरवतात असे दिसते. तसेच त्यांच्या बुकिंग कॉलममध्ये FOR SHE - DELHI CAB / FOR SHE - MUMBAI CAB
असे दोन ऑप्शन दिसत आहे. ते कदाचित त्यांच्या खास स्त्रियांसाठी देण्यात येणारया सेवेसाठी दाखवत असतील. परंतु त्यांची सेवा संपुर्ण भारतभर कोणत्याही खेडोपाडीही आहे असे तरी वाटत नाही आहे.

ह्म्म्म धन्स.
पण दिल्ली व कलकत्ता म्हणजे 'एनीव्हेअर इन इंडीया' नाही आणि मी राहते/ फिरते तो भारत दिल्ली वा कलकत्ता दोन्हीत येत नाही तेव्हा माझा पास. Happy

मुंबईत स्त्रियांनी चालवलेली प्रियदर्शिनी टॅक्सी सर्व्हिस आहे. मी पेपरमधे वाचले होते. तेव्हापासून मला गरज पडलेली नसल्याने मी कधी जास्त खोलात गेले नाही.
त्यांच्याबद्दल कुणाला कल्पना आहे का? अनुभव, नंबर्स इत्यादी?

@बदल हळुहळु होतात....@>>>>>>>> +१०००००००००००००००००००००००००

मला तर अता महिला कॅब ड्रायव्हर्स च्या सुरक्षेची पण काळजी वाटतेय !
असे कोणी टोणगे टॅक्सीत बसले तर ती किती सुरक्षित असेल ?

भारतात पण हे असेलच ना. अशा टॅक्सी साधारणपणे रेडीओने ( भारतात निदान फोनने तरी असाव्यात ) एका केंद्राशी सतत संपर्क साधून असतात. प्रत्येक टॅक्सी सध्या कुठे आहे आणि कुठे जात आहे, याची माहिती केंद्राकडे असते. दुर्दैवाने प्रवाश्यांची माहिती संकलित केली जात नाही.

त्या विद्यार्थिनीची प्रकृती आता कशी आहे ? मला आज पेपरमधे बातमी दिसली नाही. तिचा सोबती कसा आहे ? त्याच्याबद्दलही कुठे काही वाचले नाही.
त्या दोघांनीही लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मनोमन प्रार्थना करतोय.

दिनेशदा प्रकृती कलच्या पेक्षा बरी आहे, डॉ आशावादी आहेत.

http://timesofindia.indiatimes.com/india/Gang-raped-girls-will-to-live-l...

घटनेचे गांभिर्य लक्षात घेत, तज्ञ डॉक्टरांचे पथक तिच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी नेमले आहे. हे पथक आरोग्य मंत्रालयाला रोजचा अहवाल सादर करणार आहे असे वाचनात आले.
http://post.jagran.com/delhi-gang-rape-committee-formed-to-monitor-girls...

या सर्व उद्रेकाचा उपयोग सरकारवर दबाव आणुन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता होणार असेल तर ठीक आहे अन्यथा हे म्हणजे नुसते मोर्चे काढा, नारेबाजी करा आणि चॅनेल्सवाले येऊन त्यांचा टीआरपी वाढवणार, तसेच सोशल मेडिया (फेसबुक, इ.) मधे खुप काही लिहिले की स्वतःचा टीआरपी वाढणार.
आजकालच्या तरूण टेक्नोसॅव्ही पिढीला हे मार्ग जरी सोपे वाटत असले तरी फक्त अशा मार्गांनी जाऊन क्रांती होऊ शकत नाही. हे सर्व करणार्‍या जनतेने रोजच्या आयुष्यात साध्या सोप्या गोष्टी अवलंबल्या तर फार मोठा बदल होऊ शकेल. उदा. आपल्या आजुबाजुला जर काही दुर्घटना घडत असेल तर ती रोखण्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करणे, कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला उत्तेजन न देणे, इ.

पुर्वी पोलिसांचे खबरी लोकांशी चांगले संधान असायचे आणि मोठे जाळे असायचे, ते खुप मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाले आहे गेल्या अनेक वर्षांत (एका पोलिस अधिकार्‍याने मुलाखतीत हे सांगितले होते).
एकतर असे जाळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर कार्यरत केले गेले पाहिजे. तसेच पोलिस यंत्रणेला एक समांतर यंत्रणा उभी केली गेली पाहिजे, उदा. युवक युवतींचे गट करून त्यांना विशिष्ट आयडेंटिफिकेशन देऊन गस्त घालणे, आपापल्या विभागावर करडी नजर ठेवणे, आणि जर काही घडले तर गुन्हेगार व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देणे, अपघातग्रस्त व्यक्तीला सर्व प्रकारची मदत करणे, इ. कामांचे अधिकार दिले जावेत. आणि या बदल्यात त्यांना काही मोबदला मिळावा. काही विशेष सवलती मिळाव्यात (उदा. प्रवासात सवलती, कमी दरात सिनेमाची तिकिटे, इ.) आणि हे काम काही ठराविक मर्यादित काळापुरते असावे. नंतर पुढची तरूण पिढी त्यामधे येऊ शकेल, असा फ्लो असावा. हे जर झाले तर अनेक गोष्टींना जरब बसु शकेल. आणि तरूण पिढी भलत्या सलत्या मार्गाला जाणार नाही.

मी ४४४४४** असा काहितरी नंबर असलेल्या टॅक्सी सर्विसेस वापरल्या पण मला तर नेहमी पुरुष ड्रायवर भेटले.
(मला नंबर लक्षात नाही पण बहुतेक मेरू आणि एका कंपनीची टॅक्सी वापरलेली... ४४२२* असाच काहितरी नंबर होता).
एकजात बिहारी टॅक्सी ड्रायवर होते. एकदा कॅन्सल केली का उशीर झाला तर तो ड्रायवर भडकला होता.. मला मग त्या टॅक्सी कंपनीला फोन करून सांगावे लागले की हि गाडी पाठवू नका(मी कामानिम्मित्त) मुंबईत गेले होते. तिथे , तेव्हा टॅक्सीने हॉटेल ते ऑफीस करायचे. आता बहुतेक असे करु शकत नाही असे वाटते. जेव्हा मनात भिती नसते तेव्हा ठिक असते. कामाच्या ठिकाणाहून मी रात्री १ ला सुद्धा पुण्याला निघालेय एकटीच टॅक्सीने... ड्रायवर गप्पा मारत होता. पण आता विचार केला की भिती वाटते की टॅक्सी रस्त्यात बंद पडली असती तर...

आभार. उदय.
महेश हे तर आहेच. ४० वर्षांपुर्वी ज्यावेळी आमच्या भागात ( मालाड पूर्व) रामनराघव खून करत होता, त्यावेळी लोकांनी उस्फुर्तपणे रात्रीची गस्ती पथके तयार केली होती. रात्रभर हातात कोयते / कांबी वगैरे घेऊन लोक गटागटाने पहारा देत असत.
त्याकाळी नेपाळी गुरखे पण असत. रात्री तासातासाने ते "होश्शियार " अशी आरोळी देत देत, काठी आपटत रस्त्यावरुन फेरी मारत असत.

छेडछाड करणार्‍यांचे काही ठराविक नाके असतात. तिथे जर जमावबंदी लागू केली, तरी हे शक्य आहे.

या समस्येला अनेक कंगोरे आहेत. लोकसंख्यावाढ, बेकारी हे पण घटक आहेतच. १०/१२ तास मान मोडून काम करावे लागले, तर अशी छेडछाड करायला कुठली ताकद राहणार आहे ?

पोलिसांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात कायमच अपुरी राहणार आहे. नागरिकांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे, आता.

---

मेरु कंपनीच्या कार्यालयात मी काही वर्षांपूर्वी गेलो होतो. त्यांचे जाळे मोठे असले तरी प्रवाश्यांच्या सुरक्षिततेबाबत / चालकांच्या वर्तुणकीबाबत ते कितपत खबरदारी घेतात, याची मला शंका आहे. त्या काळात
त्यांची पद्धत अशी होती. गाडीची मालकी कंपनीची / देखभाल आणि कॉल सेंटरचा सपोर्ट कंपनीचा. चालकाने
बाकी सगळे बघायचे आणि कंपनीला रोजचे ५०० रुपये द्यायचे. म्हणजे वैयक्तीक स्वरुपावर जो टॅक्सीचा धंदा चालतो, तसेच.

Pages