महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा साध्या मध्यमवर्गिय मराठमोळ्या माणसाचा प्रतिकार नसतो करायचा. विक्रुत विचारान्च्या माणसाचा प्रतिकार सोपा नसतो. तुमचा प्रामाणिक उद्देश समजतोय पण तसे करणे फार तोकडे आणि प्रायमरि आहे.
वरदा म्हणतेय ते अनुभव आले ना कि कसला प्रतिकार. शक्य तोवर तिथुन निघावे हाच शहाणपणा ठरतो.
सामोपचार आता हसा पुन्हा. वेळ झालि.

यहांपे सब सज्जन और देवीओने जंग छेड दी है मगर मेरा सवाल नंदीनी हौर नीधप इन देवीओको है
क्या आप खुद पत्रकार होते हुये इन समस्या का सामना कैसा किया है
क्या आप यहां आके सिर्फ लेक्चर देना ही पसंद करेगी या हौर कुछ करेगी
जवाब चाहिये हमे

<<आधी आपण तुम्ही लिहिलेले निवेदन इथे टाका. मग बघू? कसे???
>>>> याला म्हणतात फिल्मी प्रतिसाद. स्वतः काहीही करायचे नाही आणि पोस्टमन बनण्याची ऑफर देताय्त Rofl

<<नन्दिनि, दक्षिणा, नीधप, वरदा जाउ दे ना. या माणसाला फक्त मजाच बघायची दिस्तेय. दुर्लक्ष करा. सेव एनर्जी टु हँडल द वेपन्स.>>

वेपन्स?
Rofl Rofl Rofl Rofl Rofl

पारिजाता मी कधी हसायचे ते तुम्ही सान्गायची आवशयकता नाही. रच्याकने, तुमच्या गँगचे प्रतिसादच स्वतःचेच हसू करुन घेणारे असतात.

पारिजाता, हेच तर मी पहिल्या पोस्ट पासून म्हणतोय. समाज म्हणून आपण कमी पडतोय.
आपणच कुणाच्या मदतीला जात नाही. एक समाज म्हणून जर आपण एक झालो, तर असे विकृत लोक संख्येने कमीच असतील, हे तरी पटतेय ना ? आपणच बघ्याची भुमिका घेतली तर कसे व्हायचे ?

शेवटी प्रत्येक माणसाच्या मागे एक पोलिस तर नाही ना राहू शकणार ?

नुसता प्रतिकार करून काहीही फायदा नाही. एका ठिकाणी कराल पण दर वेळी हे शक्यच नाहीये. <<<
हेच तर मगाचपासून म्हणतीये.

मगर मेरा सवाल नंदीनी हौर नीधप इन देवीओको है
क्या आप खुद पत्रकार होते हुये इन समस्या का सामना कैसा किया है <<<<
कोणत्या गाढवाने तुम्हाला मी पत्रकार आहे असं सांगितलंय?

वाटलंच होतं... आपण पुन्हा ते निवेदन तयार करा. राष्ट्रपतींपर्यंत पोचवण्याची जबाबदारी माझी... टाका इथे ते निवेदन. आपण ज्या नावाने निवेदन पाठवले होते त्याबद्दल इथे लिहा. पोस्टाने पाठवले होते का कुरीअरने? पोस्टाने पाठवले असेल तर उत्तम... मग मी ते ट्रेस करू शकेन. कुरीअरने पाठवले असेल तर तुमच्याकडे त्याची पोचपावती (नसेलच ना?) <<<<< यावर आपले उत्तर आले नाही... वाट बघतेय...

एकदा पाठवले होते. पुन्हा पाठवणार नाही. Happy

तुम्हीच पाठवा. पत्रकार ना तुम्ही? बघू कधी पाठवताय ते Wink Proud

देवीचा कोप झालेला दिसतो. Lol तो पत्रकाराचा उल्लेख नन्दीनीसाठी होता. तु फक्त लेक्चर देते का हा प्रश्न तुझ्यासाठी आहे <<<<<<<<<<<<<कोणत्या गाढवाने तुम्हाला मी पत्रकार आहे असं सांगितलंय?

अमिताबच्चन Proud

अरे इथे कुणालाच पत्र पाठवायला नकोय. सगळे माझ्या पत्राची वाट बघत आहेत. शिवाजी जन्मालायावा तो शेजारी, स्वतः मात्र काहीही करायला नको Rofl

तुम्ही पत्र पाठवलंत याला पुरावा काय आहे?
तो दाखवा आणि मग इतर लोक काहीही करत नाही वगैरे गमजा करत बसा.
अन्यथा तुम्ही थापा मारताय.

पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?

असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

नुकतेच कुठेतरी वाचले होते की माजी राष्ट्रपतीनी एका लहान मुलीवर अत्याचार करुन खुन करणार्‍या एका माणसाची फाशी कॉम्युट करुन जन्मठेपेची शिक्षा दिली होती.
भारतात अजुनही अशी मानसिकता आहे की... काय होइल जास्तीत जास्त या गुन्ह्यात? ७ वर्षे? आणि ते सुद्धा पिडीत स्त्रीचे कोर्टात धिंडवडे काढल्यानंतर..आणि त्यानंतरही कोर्टात खटला प्रलंबित करणे, अपील्स इ.इ होइलच.

अटॅक इज द बेस्ट डिफेन्स.. गप्प राहु नका. प्रतिकार करा.
ज्याना सामाजिक जागृती वगैरे आणुन या नराधमांचे हृदय परिवर्तन वगैरे करत बसायचे किंवा कायदे बळकट करायचे आहेत..(म्हणजे काय??) त्याना करु देत..

थोडासा टोकाचा उपाय आहे पण म्हणतात तसे..
Desperate times need desperate measures..

आहो मी खरेच पत्र पाठवले आहे. आणि तुमच्या सोयीसाठी तुम्ही समजा की नाही पाठवलं. तर तुमच्यात ते पाठवण्याची इच्छा आणि दम दोन्ही नाही हे सिद्ध केलेच आहेत तुम्ही Wink

नंदिनी तुमच्यासारख्या एका नेक पत्रकाराकडून अशी अपेक्षा नव्हती. भारतीय लोकशाहीचा एक स्तंभ असे बोलायला लागल्यावर आम्ही स्तंभीत झालो आहोत.
********
दिल्लीला झालेला प्रकार खचीतच अमानूष आहे. गुन्हेगारांना अत्यंत कडक शिक्षा झालीच पाहीजे याच मताचे आम्ही आहोत.

छोटी......मूळ विषयाला कुणी भरकटवले होते ते पहाल का? Happy
जाउद्यात.....मूळ विषयाकडे वळावे आता Happy

तर तुमच्यात ते पाठवण्याची इच्छा आणि दम दोन्ही नाही हे सिद्ध केलेच आहेत तुम्ही <<<
हे कोणी आणि कसे ठरवले? वैयक्तिकरित्या माझ्यात इच्छा वा दम आहे की नाही हे ठरवण्याचा तुमचा काय संबंध? कोण तुम्ही?
तुमच्यात तुमच्या खरोखरीच्या नावाने यायची हिंमत नाहीये हो. काय बोलताय दम बिम..

Desperate times need desperate measures.. अनुमोदन

तुम्हीच पाठवा. पत्रकार ना तुम्ही? बघू कधी पाठवताय ते >> ही ऑर्डर सोडणारे तुम्ही कोण ओ सामोपचार?
हा सामोपचार आनि अमितबच्चन एकच माणूस आहे. फाल्तूगिरी Angry

दक्षिणा मग गन्स घेऊन कायदा हातात घेणार्‍या पोष्टी दिसल्या नाहीत का. देऊ का ह्या पोस्टी पोलीसात?

<<<<<<<<<<<<<<तरीही आता बाजारात एकटीने जायचे असल्यास संध्याकाळची वेळ टाळायचाच प्रयत्न करेन मी. आणि मग वाटतं किती दिवस असं भीत रहायचं? ही परिस्थिती नेहेमीसाठी अशीच रहाणार का? घरापासून दुर नोकरी करयची नाही...का? तर दिल्ली मध्ये संध्याकाळी उशिरा ऑफिसातून येणंही सेफ नाहीये. दिल्लीमध्ये सुरक्षित पब्लिक ट्रांसपोर्ट नाहीये. रात्री उशिरा सिनेमा बघायला जायचं नाही /जेवायला जायचं नाही ..का? तर ही दिल्ली आहे.>>>>>>>>>> इट इज व्हेरी डिसग्रेसफुल दॅट दिल्ली इज कॅपिटल ऑफ अवर कंट्री Sad

संस्कृती, धर्म, राष्ट्र, आधुनिकता / मागासलेपणा, सभ्यता इत्यादींच्या पलीकडे जाऊन जगात बलात्कार / शारीरिक बळजबरीच्या गुन्ह्यांची आकडेवारी हेच दर्शविते की या सर्वांचा व या गुन्ह्यांचा तसा पाहिला तर काही संबंध नाही. कारण हे घटक असोत अथवा नसोत, हे गुन्हे होतच राहतात. अगदी अतिप्रगत देशातील अति-आधुनिक शहरातील अतिसुरक्षित समजल्या जाणार्‍या भागात किंवा मागास समजल्या जाणार्‍या, अप्रगत समजल्या जाणार्‍या भागात.

थोडक्यात काय??

जगाच्या पाठीवर स्त्री कोठेही सुरक्षित नाही.
तिला माणूस म्हणून जगण्याची मान्यताच नाही.

समाज त्यासाठी बदलायला हवा हे गेली अनेक शतके घोकले जाणारे वाक्य आता कुचकामी वाटते.

सामोपचार पोलिसात पोष्टी देण्याच्या गोष्टी करताय मान्य, त्या आगोदर तुम्ही तुमची खरी ओळख करून द्याल का प्लिज?

मनस्मि,
एका स्त्रीने जिला दिवसभरात दोनवेळा तरी किमान गर्दीचा सामना करावा लागतो तिने नक्की किती वेळा प्रतिकार करावा?
दिवसातून किती वेळा उलटे वळून थोबाडित देणे- मग वाद - पोलिस स्टेशनची फेरी इत्यादी गोष्टी कराव्यात?
किमान दोन वेळा दिवसातून हे केलं पाहिजे ना. रोज ऑफिसला किमान एक दीड तास उशीर, लेटमार्क आणि घरी जातानाही तेवढाच उशीर त्यामुळे घरच्यांची नाराजी, स्वैपाकाला उशीर, आजारी मुलाकडे दुर्लक्ष हे सगळं.........
आणि यामुळे कायमची मनःशांती ढळणे.....
प्रतिकार करा हे म्हणायला सोप्पं आहे.

पत्र खरेच पाठवले आहे. आणि त्यासाठि इथल्या लोकान्ना ते सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही. कारण इथे फक्त आणि फक्त पोस्टीबहाद्दर. अरे मी बोललो तरी.... बाकी इथल्या पोस्टीबहाद्दर महिला त्याची तयारीही दाखवत नाही आहेत.

आणि पोलीसात द्यायची गोष्ट फक्त त्यान्ना एकाच प्रकारच्या पोस्टी दिसतात ते दाखवण्यासाठी होती. पण सेव्ह करुन ठेवतो आहे. भविष्यातील संदर्भासाठी Happy Wink

द्या पोस्टी जिकडे द्यायच्या तिकडे. मी काही चुकीचं लिहिलंच नाहीये.
मात्र स्वत:च्या पोस्टी एडिट न करता अस्संच्या अस्सं द्या.
पोलिस तिथूनच तुम्हाला येरवड्याला पाठवतील नक्की

पत्र खरेच पाठवले आहे. आणि त्यासाठि इथल्या लोकान्ना ते सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही. >> हो ना? मग सेम टू सेम, तुम्ही सांगताय तोच मार्ग आम्ही अवलंबावा असं कुठल्या ब्रह्मदेवाने सांगितलंय?

<< हो ना? मग सेम टू सेम, तुम्ही सांगताय तोच मार्ग आम्ही अवलंबावा असं कुठल्या ब्रह्मदेवाने सांगितलंय?>>

म्हणून काय कायदा हातात घ्यायचा गन्स घेऊन?

बापरे!!!

काय चर्चा चालु आहे....

काही काही विचार भयानक आहेत. काही काही सूचना प्रॅक्टिकल नाहीत.

मुळात बलात्कार करण्याची जी मनोवृत्ती आहे तीच मुळी विकृत आहे. मग तो बलात्कार बाईवर असो वा पुरुषा वर . मुलांवर म्हणजे पुरुषांवर ही बलात्कार होतात. मी बघीतला आहे असा पुरुष. त्या मुळे इकडे आपण बाई वा पुरुष ही चर्चा करण्या पेक्षा " पिडित" असे म्हणुयात....

वीस वर्षां पुर्वी मी आर्टिकलशीप मधे असताना माझ्या अगदी जवळच्या मित्राला हा अनुभव आला होता. आम्ही तेंव्हा अगदी २० वर्षांचे होतो. ऑडिटला गेलो असताना, त्याला हा अनुभव आला. आम्ही दोन मुली आणि तो असे ओडिटला बाहेर गावी गेलो होतो. तिकडेच क्लायेंटच्या अकाउंट्स च्या मुलां बरोबर माझा मित्र रात्री जेवायला गेला होता. तिकडेच त्याला "त्या" प्रसंगाशी सामना करावा लागला. त्या नंतरचं त्याचं ते उध्वस्थ होणं मी अनुभवलं आहे. भयानक... भयानक... त्या प्रसंगात मी आणि माझी दुसरी कलीग आम्ही त्याला खुप आधार द्यायचा प्रयत्न केला. त्या ऑफिसच्या मॅनेंजमेंट कडे तक्रार, मग पोलीस, मग त्याचे आई वडिल, अगदी हॉरीबल....

मुलांवर / पुरुषांवर ही बलात्कार होतात, हे मला पहिल्यांदाच समजलं..... खुप कठीण काळ....मी अगदी सुरक्षित वातावरनातुन आल्या मुळे, हे असं काही असतं तेच माहित नव्हत.... आमच्या घरच्यांनी "तो" बरोबर आहे म्हणुन आम्हा मुलींना "त्याच्या" बरोबर पाठवलं होतं. इकडे "तोच" सुरक्षित नव्हता......

हा बाफ वाचुनही मी म्हणुनच इथे यायचं टाळलं होतं......पण इथली चर्चा अगदीच एकांगी होते आहे असे वाटले म्हणुन यायचा मोह झाला.

आज कोणीही सुरक्षित नाही... विचारा हॉस्टेल्स मधुन काय चालतं.... किती विकृत चाळे चालतात... त्यातुनच मग उद्याचे विकृत नागरिक तयार होतात.... किती ऑफिसेस मधुन असं चालत ? ....

बाई वर झालेल्या अन्यायावर निदान तिला सहानुभुती असते, पण हाच अत्याचार जेंव्हा एक पुरुष दुसर्‍या पुरुषा वर करतो तेंव्हा त्या पिडिताला तर गुन्ह्याला वाचा फोडण्याची ही सोय नसते. कारण जग त्यालाच " बायल्या, हिजडा" अशी दुषणं देणार असते.

ही समस्या फक्त बाई ची नाही.... एकंदर समाजाची आहे... विकृतीकडे झपाट्याने जाणार्‍या एका सुसंकृत म्हणवणार्‍या समाजाची शोकांतिका आहे. आजही माझा मित्र ४० शीत येवुनही लग्न न करता एका वेगळ्यात देशात दुर्लक्षित जीवन जगतो आहे. आपल्या ओळखीच्या लोकांच्या हुन दूर होवुन स्वतःला लपवु पहातोय...

जशी आपण "पोलियो " ची मोहिम चालवतो, तशी हा " मनाचा पोलियो" निर्मुलन करायची मोहिम चालवली पहिजे.

मुळात एखाद्या समाजाची अशी मनसिकता का होते, त्या कडे पाहिलं पाहिजे. शाळा शाळात अभ्यास वर्ग घेवुन मुळात "संभोग" ह्या क्रिये बद्दल माहिती देवुन त्या पासुन होणारे परिणाम, विकृती अशा अनेक गोष्टीं बद्दल माहिती दिली पाहिजे. "सेक्स एज्युकेशन" युध्द पातळीवर हातात घेवुन मुळात हेल्दी काय आहे त्या बद्दल समाजाला सजक केलं पाहिजे. वेळ लागेल पण सजग प्रयत्नांनी नक्कीच परिणाम होईल...

कडक शासन करुन विकृती मोडुन काढल्या पाहिजेत. शक्य तितकं सुरक्षित आपण सगळ्यांनीच राहिलं पाहिजे... मग ते मुलगा असो वा मुलगी.

एक लक्षात ठेवुयात आपण एका विकृतीशी लढतोय. हे युध्ध बाई विरुध्द पुरुष नाहिये... त्याची व्याप्ती मोठी आहे.

चला मुलिन्नो तुम्हाला प्रॅक्टिस हवि आहे का टवाळखोरांचा सामना करण्याची? मग सामोपचार देतायत नेट प्रॅक्टिस.
ओ सामोपचार, तुम्हाला नाहि ना आवश्यकता तर आम्हाला पण नाहीये. तुमच्या त्या पत्रांच्या खोट्या गमजा आणि सल्ले ठेवा तुमच्याकडेच किन्वा तुमच्या घरातल्या बायकान्ना द्या. आम्हि बघु काय करायचे ते.
स्वतःचे फेल गेलेले उपाय दुसर्याला सुचवताय. तुम्हाला काय करयचेय कोण पत्रकार आणि कोण काय? सगळ्या भारतात दिल्लितले लोक पत्रकारिता करत असतात. दिल्लि ही राजधानी आहे. काय होतेय त्याने? जिथुन ते आजतक वाले शयनिन्ग मारत असतात ना तिथेच झालेय हे सगळे.
>> तर तुमच्यात ते पाठवण्याची इच्छा आणि दम दोन्ही नाही हे सिद्ध केलेच आहेत तुम्ही
ही काय जबरदस्ती?
आणि गॅन्ग म्हणजे काय? मी यातल्या एकाही बाईला ओळखत नाही पर्स्नलि. विचार जुळले की गॅन्ग काय?
तुमचे स्वतःचे बोलणे वागणे सगळे अगदी इवटिजिन्गला पाठिम्बा देणार्‍या गॅन्गसारखे आहे.
काय नक्कि दुखणं तरी काय आहे तुमचं? बायका बोलतायत हे? की त्या बाइला छळलेल्या पुरुषांविरुद्ध आवाज उठतोय हे?
एकदा स्पष्ट करा नाहितर तुमच्या त्या पत्रासारखे घाला बम्बात तुमचे बुरसटलेले विचार.

अरे विषयाच गांभिर्य नाहि का ? कुठे विषय चालला आहे ? अरे मुलींनो नका लक्ष देउ डु आय ड्या कडे ...
सामोचार्‍या इथे द्वंद्व युध चालु नाहि रे बाबा ..

Pages