महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>दुर्दैवाने मला त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल आणि सुरक्षित असा एकच विचार मनात येतो , जसे काश्मिर मधे चौका चौकात , झाडां मागे, जिथे शक्य असेल तिथे आर्मी-पोलिस असतात तसे देशातल्या सगळ्याच शहरात करणे.. .. पब्लिक बस, प्रायव्हेट बसेस, ट्रेन च्या प्रत्येक डब्यात सशस्त्र महिला पोलिस हवेत.. नुसतेच काठी वाले हवालदार नाही>>><<
भ्रष्टाचाराने बुजबुजलेल्या देशात अशी गोष्ट अंमलात आणने कठिणच. अश्या हुद्द्यावर स्त्रीयांची नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण वगैरे सोप्स्कार ठरवेपर्यंत ... दिल्ली दूर है....

दुसरे म्हणजे, पुरुषांवर ठराविक वेळेनंतर बंदी आणणे टोटल इम्प्ऱटीकल आहे. त्यामुळे असे उपाय कधीच अंमलात येणं शक्य नाही.

मानसिक संशोधन वगैरे चालूच राहिल त्याने सुद्धा फरक नाही. फरक पडेल तो कायद्याने आणि कायदा अंमलात आणायला जनतेने दिलेला दबाव. कायदा कडक असला की सगळे सुतासारखे वागतील. कमीत कमी प्रयत्न करतील. शिक्षा म्हणजे ताबोडतोब फाशी अशी जेव्हा ठरेल तेव्हाच बदल होइल. पण पुन्हा भ्रष्टाचारीत देशात ही गोष्ट सुद्धा शक्य नाहीच आहे.
राहता राहिला प्रश्ण का घडते? पुर्णपणे हा विकृत मानसिकतेचाच भाग आहे हे पुर्ण सत्य आहे. दांभिक लोक उगाचच स्त्रीचा वेष, संस्कार वर बोट ठेवतात. नाहितर चार वर्षाची मुलीवर वा ६० वर्षाच्या बाईवर का बलात्कार होतील?
किंवा मग पुरुषांवर तरी का बलात्कार होतात? त्यामुळे दांभिक लोकांना पटवून देण्यात काहीच हशील नाही.
रोज रोज मारामारी ,पोलिस तक्रार करत जिणं शक्यच नाही. पोटापाण्यासाठी ट्रेनचा प्रवास करणारी स्त्रीला इतका कुठला वेळ व ताकद असते. एखाद वेळेला प्रयत्न यश्स्वी होइल पण इथे प्रत्येक जण घाईत असतो... आलेल्या दिवसाशी झगडत घालवत..

देशात आव्हाने होवून सरकारकडे मागणी करून अश्या गुन्ह्याकरता ताबोडतोब फाशी झालीच पाहिजे असा कलम आला तर बरे. तोवर तरी कुठलाच ठोस उपाय दिसत नाही.

@इब्लिस | 19 December, 2012 - 20:49नवन
तुमच्या भूतपूर्व राष्ट्रपती-द्वेषाचे मूळ मला तरी समजत नाहीये <<

राष्ट्रपती जे काही करतात, ते त्यांच्या सल्लागारांवर व एकंदरच सगळ्या सिस्टीमवर अवलंबून असते, हे माहीत आहे हो. राष्ट्रपती जाहीर करतात म्हणून राष्ट्रपती म्हणतो इतकेच.वैयक्तिक काहीही नाही. पण ते वैयक्तिक आहे हे तुमचे तुणतुणे बंद करा.
नीट न वाचताच प्रतिसाद देण्याचे थांबवा. माझ्या धाग्यावरही ही समजवून सांगितले होते, आता पुन्हा सांगतो,

>>तुम्ही ४-५ असल्याच पोस्टी लिहून, तसेच तुमचाच तो थयथयाट धागा वर आणूनही इथल्या(या धाग्यावरील/मायबोलीवरील) सर्वांनीच तुम्हाला सरसकट इग्नोर केले, तरीही हे वरील सत्य तुमच्या बाळबुद्धीला अजूनही आकळल्यासारखे दिसत नाही.<<

त्याची काळजी तुम्ही करू नका.
घटने संबंधी आताची लोकांची प्रतिक्रिया योग्यच आहे पण माफ्या जाहीर झाल्या त्यावेळीही अशा घटना कमी अधिक प्रमाणात घडतच होत्या. त्यावेळीच आवरले असते तर काही परिणाम झाला असता. आताही अर्धवट प्रयत्न करू नयेत म्हणून मागच्या घटनेची मी उजळणी करतो आहे हे ज्यांना समजावून घ्यायचे आहे त्यांना समजते.

बाकी मला इग्नोर केले जाते वगैरेची चिंता आपण करू नये. तुमच्याप्रमाणे माझ्या लिहिण्याचा त्यांनी विपर्यास करून प्रतिसाद दिला नाही याबद्दल मी अशा सर्वांचा आभारी आहे. एकही प्रतिसाद आला नाही तरीही मी लिहिणारच. त्याचे कारणही मी याच धाग्यावर दिले आहे पण तुम्ही वाचतच नसल्याने माझी भुमिका तुम्हाला कळणार नाही आणी कळली तरी तुमचा अहं गंड आड येईल. तेव्हा तुमचे इग्नोर्-व्रत चालू राहू द्या. असो.

>>इथल्या जनतेला काय वाटते ते वर लिहिलेले आहेच. इथे पोष्टी पाडणे थांबवा<<
.असले स्वयंघोषित प्रतिनिधी इथे थोडे नाहीत. पैशाला पासरी आहेत हे ध्यानी घ्यावे.

@झंपी
.....सरकारकडे मागणी करून अश्या गुन्ह्याकरता ताबोडतोब फाशी झालीच पाहिजे असा कलम आला तर बरे....<<

थोडी भर टाका. त्या शिक्षेला कोणीही माफी देऊ शकणार नाही अशीही तरतूद करून घ्या.
नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन.

आपल्या न्यायव्यवस्थेला झेलाव्या लागणा-या ताणामुळे शिक्षा होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे वचक नसल्यामुळेही गुन्हे करू पाहणा-यांना काहीच वाटत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. बलात्काराच्या घटनेसाठी आपल्याकडे पुरेसे कायदे आहेत ज्याची अंमलबजावणी चोख होणं हे समस्येचं काही प्रमाणातलं उत्तर आहे. त्यासाठी नव्या कायद्याची काहीच गरज नाही. अर्थात अशा घटना घडल्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या जनतेकडून अशा माग्ण्या केल्या जाणं हे ही नवीन नाही.

मात्र कायदा जितका कडक आणि जितकी शिक्षा तितकंच शिक्षा होण्याचं प्रमाण कमी होत जातं हे मागे महिला आयोगाच्याच एका माजी अध्यक्षांनी (मोहिनी गिरी) म्हटल्याचं आठवतंय. याला कारण कठोर कायद्याचा दुरूपयोग तर होत नाही ना याचा न्यायाधिशांकडून विचार केला जाणं. जनक्षोभ, पब्लिक क्राय याचा न्यायाधिशांवर परिणाम होत नाही, होणं अपेक्षितही नाही. न्यायालयासमोर जे येतं त्या आधारे निकाल दिला जातो. म्हणूनच न्यायालयासमोर काय मांडलं गेलं याची माहिती घेणंही गरजेचं असतं. बरेचदा कडक कायदे असणा-या गुन्हांच्या संदर्भात ते गुन्हे नोंदवून न घेण्याकडेच पोलिसांचा कल असतो. एकतर अशा कायद्यांखाली नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांच्या तपासात न्यायालकाडून नोंदवले जाणारे ताशेरे, अपुरे मनुष्यबळ, कामाचा ताण आणि वार्षिक गुप्त अहवाल व त्याचा बढतीवर होणारा परिणाम हे घटक लक्षात घेतले जातात. वर्तमानपत्रे किंवा न्यूज चॅनेल्सच्या माहितीच्या आधारे न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढणे ही हल्ली एक फॅशन झाली आहे.

राजीखुषीचा मामला असताना नंतर बलात्काराचे आरोप होणं हे ही अशक्य नाही. प्रत्येक वेळी तक्रार करणारी स्त्री बलात्कारपीडीत असते असं नाही. काही घटनांमधे स्त्री फसवली गेलेली असते आणि शेवटचा उपाय म्हणून बलात्काराची तक्रार दिलेली असू शकते. अर्थात या अशा घटना अपवाद असतात. पण अपवादांचे दाखले खटल्यात दिले जाणे हे अटळ आहे. अशा अपवादांना नियम समजले जाऊ नये ही अपेक्षा आहे. या बाफचा तो विषयही नाही. कुठल्याही प्रकारे बलात्काराचं समर्थन करणे हा हेतू इथे नाही. तसा अर्थ काढल गेल्यास ते दुर्दैवी असेल. फक्त कायद्याचा विषय आल्याने लिहावंसं वाटलं. कायद्याचे जाणकार आपली मतं मांडतील अशी अपेक्षा आहे.

खूनाच्या घटनांमधे काही वर्षापूर्वीपर्यंत फाशीच्या किंवा जन्मठेपेच्या शिक्षांचे प्रमाण समाधानकारक असतानाही खूनाच्या घटनांत वाढच होत गेली. एखाद्याचा जीव घेणे किंवा स्त्री वर बलात्कार होणे हे दोन्ही गुन्हे सारखेच गंभीर आहेत. म्हणूनच शंका विचाराविशी वाटते कि शिक्षा होण्याचं प्रमाण जरी समाधानकारक झालं तरी या अशा घटना घडणं बंद होईल का? फक्त कायदा करून प्रश्न सुटेल कि अन्य काही मुलभूत, दूरगामी , किचकट आणि वेळखाऊ उपायांची गरज आहे असं वाटतं ?

त्या दृष्टीने वादासाठी वाद असणा-या पोष्टी पाहून वाईट वाटले. स्त्रियांनीच का संस्कार करावे ? संस्कार करणे हा उपाय असेल तर त्यात तू तू मै मै करण्यामागे काय लॉजिक आहे ? ज्याची फळे चांगली मिळणार आहेत अशी खात्री आहे त्याचे बी मीच का लावावे अशी भूमिका अनाकलनीय आहे. आईकडून पूर्वी असे संस्कार होत नव्हते का हा प्रश्न समाजात काय घडतं याची माहीती नसणारा आहे. सूनेला जाळून मारण्याच्या संदर्भात मुलाला भरीस घालणारी व्यक्ती कोण असते असं वाटतं ? लग्नसमारंभात वरमाई म्हणून मुलीकडच्यांना कमीपणाची वागणूक देनारी व्यक्ती कोण असते असं वाटतं ? एक ना दोन अनेक उदाहरण वेळेअभावी देता येत नाहीत. काही तालेवार घराण्यात तर मुलाकडून होणा-या चुकांना पाठीशी घालणा-या आणि अमूक एक घराण्यातल्या बाप्यांनी नाही करायचं तर कुणी असं विचारणा-या व्यक्ती या महिलाच असतात याची कल्पना आहे का ?

ड्रेसकोड या धाग्यावर मुलावर आईकडून संस्कार व्हावेत अशी अपेक्षा मी लिहीली आहे. त्याच वेळी तिची निर्णयक्षमता आणि स्वातंत्र्य याचाही उल्लेख केला आहे. आईकडून होणा-या संस्कारांवर मुलाची जडणघडण ठरते. बापाकडून असे संस्कार होण्यासाठी आधी या टप्प्यातून जाऊयात ना ! पहिल्या चेंडूपासून सिक्सर बसायला लागले तर मग काय बघायलाच नको, नाही का ?

या बाफवर शेवटची पोष्ट न राहवून लिहाविशी वाटली.

अन्य काही संकेतस्थळे, ऑर्कुट या ठिकाणी अन्य काही राज्यांत घडलेल्या दंगलींच्या वेळी महिलांवर झालेल्या पाशवी अत्याचाराचे समर्थन धार्मिक उन्मादाखाली अगदी महिलांकडूनही केले गेले होते जे धक्कादायक होते. ते आणि आपण अशा या युद्धात सारे काही क्षम्य ठरले गेले. त्या अत्याचारांची वर्णनं अंगावर शहारा आणणारी आहेत पण हे पशू आपल्या बाजूने "लढताहेत" अशा भावनेने त्यांच्याबद्दल आपुलकी वाटणे हे विवेक सुटल्याचं ते लक्षण होतं. त्याच वेळी शत्रूला संपवले तरी या पशूंची भूक खवळल्यानंतर त्यांचे नेक्स्ट टार्गेट कोण असेल याचा कुणी विचार केला होता का? एखाद्या गर्भवतीवर झालेल्या गँग रेपचं समर्थन कसं काय होऊ शकतं? ज्यांनी अशा घटनांबद्दल आनंदोत्सव केला त्यांचाही निषेध तत्काळ व्हायला हवा. त्या वेळी अर्थातच असा निषेध नोंदवणारे सर्व देशद्रोही ठरले होते. डबल स्टँडर्ड असणा-या आपल्या समाजात एखाद्या समस्येचा सरळ मार्गाने विचार करणे किती अवघड आहे याचीही जाणीव असणे गरजेचं आहे.

२१ डिसेंबरला जगाचा अंत ?... खरतर हा माणुसकीचा अंत आहे....त्या नराधमाना द्याल तितकी शिक्षा कमी आहे....माणुसकीची जागा या असूरी विकृतीनी घेतली आहे.

एवढी महागाई वाढवलीये , रोजगार नाही, पायाभूत सुविधा धुडकावल्या आहेत तरी ही तुम्ही जगत आहात, हसत आहात...आता तुमच घरच उध्वस्त करतो, बघू कसे जगता ते........"यथा राजा तथा प्रजा" त्यामुळे सगळीकडेच आनंदी आनंद.

काय कराव ज्याने हे सगळ थांबेल ....बराच विचार केला....न्यायव्यवस्था, कायदा, सुरक्षा, शासन, मूल्यशिक्षण, लैगिकशिक्षण या सगळ्यात आवश्यक ते बदल करून काही फरक पडेल का जेणे करून ही विकृती कायमची ठेचली जाईल.....आणि मुळात ते शक्य आहे का ....की बोलाची कढी आणि बोलाचाच भात.
- आम्ही गांधीजींची तीन माकडं झालोय ...विनयभंग,छेड-छाड,अन्याय हे सगळ होताना बघतोय,ऐकतोय.... पण डोळे, कान आणि तोंड बंद.
- बर आमची न्यायदेवता पण आंधळी, ज्याचा खिसा वाजेल तिकडेच पारडं झुकणार.
- कानून के हाथ लंबे होते है !! हे असे लंबे हाथ रोज सत्तेच्या आणि पैश्याच्या पाया पडतात.
- मूल्य शिक्षण हा आम्हाला ९वी -१०वी ला विषय होता, रोज १५ मिनिटे. राहिलेला गृहपाठ करायची उत्तम संधी आणि बाईना दिवसाचा कॅटलॉग पूर्ण करण्याची.

हे जनतेलाच शक्य आहे...we are our best Friends .....मग मुक्या माकडाची जागा वाघ घेईल तिथे फक्त एकच डरकाळी पुरेशी ठरेल, बहिऱ्या माकडाची जागा श्वान आणि आंधळ्याची जागा गरूड घेईल....न्यायदेवतेला दृष्टी प्राप्त होईल....पाया पडणारे लंबे हाथ गुन्हेगाराचा गळा पकडतील.

जेव्हा पासून वाचलय की त्या नराधमांनी केवळ बलात्कार केला नाही तर रॉड्ने शरीरात आतपर्यंत जखमा केल्यात. शरीराचे आतले सगळे भाग फाडुन टाकलेत. पाशवीपणाची हद्द झाली. डोळ्यातले पाणी थांबत नाहीये. डोक्टर्स म्हणताय जगली वाचली तरी ती नॉर्मल आयुष्य कधीच जगु शकणार नाही.

ज्या भारताला इथे बसुन रोज आठवते, ज्या भारताच्या सुंदर आठवणी , छान छान गोश्टी माझा लेकरांना सांगते, भारत हाच आपला देश आहे आणि तो कसा महान आहे याचे गोडवे गात राहते... तिथे हे असे व्हावे...
एक स्त्री म्हणुन , एका मुलीची आई म्हणुन मी खरंच घाबरलीये. मुलींना भृणहत्या करुन मारुन टाका नाहीतर जन्माला आल्याच तर त्यंचे जगणे मुश्किल होईल याची तरतुद करा. वा रे भारत देशा !

सुरक्षित पणाचे उपाय? काय सुचवणार... मारुन टाकायला हवं तिथल्या तिथ- रस्त्यावर या अशा नराधमांना. त्याच रॉडने , त्याच पद्धतीने फाडायला हवे त्यांचे आतले आतडे....

हे फेसबुकवरुन. नेमकं काय आणि कसं झालं ते. वाचतानाही अंग शहारलं आणि डोळ्यांत पाणी आलं. त्या मुलीची काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पनाच करता येत नाहीय.

‎:'( MUST MUST READ :'(

The bus driver ram singh went out with
his 6 friends ( 2 rkp sabzee wale + all bihari )
the girl and the guy was
called by the driver and were given proper tickets
( the bus was a school bus
with black curtains .. Not permitted for transport use )
the girl was 23 a very
good student and wanted to reach dwarka mor.
After they got in , the
guys hit a rod on
the guys's head and threw him out ,
then raped the girl one by one which was
moving continuously in the
posh areas of delhi and ncr.
After raping her badly , one of them inserted
a very long rod in her vagina which almost
killed her and threw
her out and ran away.
She was lying in
the middle of the rod
hurt and nude..
Not even single
person helped her or covered her for an hour.
When police came in no one
helped them pick her up. They were just
not interested at all.
The girl's vagina + small and large intestine is
totally damaged and she
cannot live a married or normal life.
Doctor said " main bayan nahi kar sakta
ki ussne kya kya zheela hai ...
Bolte hue
muzhe dard hota hai ".
She has gone in
coma 5 times from 16th dec. She is
unconscious , critical and is not stop
crying. The ribs are damaged as well.
That's the whole story
And that's what delhi people are. And her only
fault was that she
took a wrong bus..

You have sisters , mothers , daughters
and soo many females at home.
Please don't sit and relax
Its not that small deal ... Its bout
your families safety..

योडी, हेच काल वाचलं तेव्हापासून उद्वेगाने मन भरुन आलय. काय दोष त्या स्त्रीचा? ती स्त्री आहे हाच ...
खरंच डोळ्यातले पाणी थांबत नाहीये... अरे माणसं आहेत की जनावरे आपल्या आजुबाजुला?
कुठेतरी (कदाचित इब्लिसने लिहिलेले) वाचले होते की जनावरातल्या मादीने नकार दिला तर तो नर तिथुन निघुन जातो... आणि ही मानवजातीतली जनावरं बघा...

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ... असे आजी बोलले तर हसायचे मी... आज तेच आठवुन रडतेय. स्त्री असण्याचे याहुन भयानक दु:ख पूर्वी कधीच झाले नव्हते.

बैल छाप जर्दा <<< मारुन टाकायला हवं तिथल्या तिथ- रस्त्यावर >>> +१

कोण करेल हे ?>>> या प्रश्नाचे उत्तर आज या क्षणी कुणाजवळच नाही Sad माझ्याजवळ तर नक्कीच नाही

आपल्या द ग्रेट महाराष्ट्रात खैरलांजीतही असेच झाले होते. त्यांनी रॉड ठोकलेले पाहिली आपण खिळे ठोकलेले पाहिले.कोण आलं तेव्हा रस्त्यावर आणि कुणी केला कँडल लाईट मार्च. प्रश्न त्यांच्या बिहारी, अनएंप्लॉईड इ. असण्याचा नाहीच आहे.
प्रश्न आहे भारतीयांच्या मानसिकतेचा.
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे घराघरातून आणि शाळाशाळांतून मूल्यशिक्षण दिले पाहिजे.
तरच काही बदल होऊ शकेल.

कदाचित प्रत्येक देशच या आणि अश्या मानसिकतेतून एक काळ जात असेल. अमेरिकेतही एकेकाळी बलात्कार फार वाढले होते. ज्या ज्या वेळी राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक अस्थिरतेतून समाज जातो त्यात्या वेळी स्त्रीया या सर्वात दुर्बल घटकावर शारीरिक अत्याचार होतातच.
म्हणूनच मूल्यशिक्षणाबरोबरच देशाला इन टोटो राजकीय सामाजिक आणि आर्थिक स्थैर्याची गरज आहे.

या संदर्भात नमिता भंडारे यांनी ऑनलाइन पेटिशन केले आहे. आतापर्यंत ३५०००+ सह्या झाल्या आहेत. पेटिशन राष्ट्रपती आणि चीफ जस्टीस यांना उद्देशून आहे. पंतप्रधान का नाहीत याबद्दल नमिता यांचे उत्तर होते की राजकारण्यांवरचा विश्वास उडाला आहे आणि या बाबतीत राष्ट्रपती/चीफ जस्टिस काही करू शकतील अशी आशा आहे.

पेटिशन इथे आहे. पटल्यास सही करा आणि फॉरवर्ड करा.

http://www.change.org/en-IN/petitions/president-cji-stop-rape-now

यानंतर पुढचे पाउल काय असावे याबद्दल काही सुचवण्या असल्यास त्याही कळवाव्यात, नमिता यांना त्या पाठवण्यात येतील.

राजकाशाना, पेटिशन साईन केलंय.

मला आत्ता या क्षणी फक्त त्या मुलीला जवळ घ्यावंसं वाटतंय.

रोहन, मला अजूनही आहे अभिमान भारतीय असण्याचा. ही पाशवी वृत्ती जगाच्या पाठीवर कुठेही दिसू शकते. फक्त ही वृत्ती बाळगणार्‍यांनी स्वतःला माणूस म्हणवून घेऊ नये.

. अरे माणसं आहेत की जनावरे आपल्या आजुबाजुला?
कुठेतरी (कदाचित इब्लिसने लिहिलेले) वाचले होते की जनावरातल्या मादीने नकार दिला तर तो नर तिथुन निघुन जातो... आणि ही मानवजातीतली जनावरं बघा..>> हि जनावरे तरी कशी होतिल, असे काम माणसेच करु शकतिल, त्यांना जनावरे म्हणुन मग कदाचित त्या जनावरांचा सुद्धा इन्स्ल्ट होइल.
योडि आता वाचले एवढ्या डिटेल मधे Sad , खरच भारतात सुद्धा सौदी सारखा कायदा हवा रेपिस्ट साठि.
अजुन एक, जया बच्चन चा संसदेमधला व्हिडिओ पाहिला, पाहिले कि जया एकटि प्रोटेस्ट करत होति तिचे विचार मांडायला, लिडर जयाला वेळ द्यायला तयार नव्हते, आश्चर्याची बाब म्हणजे बाकि कोणिहि महिलांनि / पुरुषांनि तिला साथ दिलि नाहि, अशा विषयांसाठि पॉलिटिक्स सोडुन काम केले तर कदाचिक काहितरि उपाय निघु शकतो.
हे बघा अजुन एक-
http://www.youtube.com/watch?v=GtVhbGOZkm0

अश्विनी... मान्य आहे पण जरा अवांतर प्रश्न विचारतो... आता आपण स्वतः निर्माण केलेले असे काय आहे आपल्याकडे ज्याचा आपल्याला अभिमान असायला हवाय? उत्तर इथे दिले नाहीस तरी चालेल... Happy

कोणाकोणाला अजुनही भारतीय असण्याचा अभिमान आहे??? <<<
अभिमान नाही आणि लाजही नाही. ती एक वस्तुस्थिती आहे ज्यात माझे कर्तुत्व काहीच नाही.

पण भारतीय संस्कृती म्हणून जे ढोंग जिथे तिथे माथी मारले जाते ते लाजिरवाणे नक्कीच आहे.

पण भारतीय संस्कृती म्हणून जे ढोंग जिथे तिथे माथी मारले जाते ते लाजिरवाणे नक्कीच आहे. >>> +१

सुसंस्कृतपणा कुठल्या एका देशाची मक्तेदारी नाही.

आता आपण स्वतः निर्माण केलेले असे काय आहे आपल्याकडे ज्याचा आपल्याला अभिमान असायला हवाय? >>> आपण काहीच निर्माण केले नाहिये हे नक्की. पण मातृभुमी म्हणून आपल्या देशात अजून जे काही चांगलं उरलंय (दुर्दैवाने चांगल्या गोष्टींची गणती आता कमी कमी होऊ लागली आहे), किंवा होऊन गेलंय त्याचा मला अभिमान आहे. मी जर हा देश माझा मानते तर त्यातल्या वाईट गोष्टींबद्दल मला लाज वाटली पाहिजे तशी चांगल्या गोष्टींबद्दल अभिमानही वाटला पाहिजे. हे माझं वै.म. Happy

विसरभोळा तुमची पोस्ट आवडली. पटली.

भारतीय असण्याचा अभिमान - आहे तर ! पण तो टिकेल याची मात्र आता ग्यारंटी नाही Sad

सुसंस्कृतपणा कुठल्या एका देशाची मक्तेदारी नाही. <<
मी इतर कुठल्याही देशाचे गोडवे गात नाहीये.
पण मी ज्या संस्कृतीत रहाते ती दांभिक, ढोंगी आहे असे माझे मत आहे तर आहे. मी फुकटची कौतुके करणार नाही.

अगं मी तेच तर म्हटलंय. भारतिय संस्कृती या शब्दावरुन मी तेच तर म्हटलंय की आम्ही भारतिय म्हणून आमची संस्कृतीच श्रेष्ठ असं मी म्हणणार नाही Happy मी उलट म्हणतेय की सुसंस्कृतपणा हा व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असतो, देशावर नाही.

याच देशात तुकाराम ओंबळे आणि बाकिच्यांसारखे खरोखरचे शूरवीर त्यांचा काहीही स्वार्थ नसताना आपल्यासाठी प्राण देताना आपण पाहिले म्हणून या देशाचा मला अभिमानही आहे.

या दिल्ली प्रकरणात चीड आली नाही असा माणूसच नसेल.

@राजकाशाना | 20 December, 2012 - 08:49नवीन
या संदर्भात नमिता भंडारे यांनी ........................की राजकारण्यांवरचा विश्वास उडाला आहे आणि या बाबतीत राष्ट्रपती/चीफ जस्टिस काही करू शकतील अशी आशा आहे.
>>
अहो चिफ जस्टीसांनी बलात्कारी-खुन्यांना फाशी सुनावली तरी राष्ट्रपती त्यावर त्यांच्या अधिकारात या नराधमांना जीवदान देतात/ देऊ शकतात याची आपल्याला कल्पना आहे का? भाबडा आशावाद असू नये यासाठी ही बाब नजरेस आणीत आहे. कोणाबद्दलही वैयक्तिक आकस नाही हे नमूद करतो.

आता कॅन्डल मार्च निघतील, ठिकठिकाणी आंदोलनं, निदर्शनं होतील पण गुन्हेगारांनी शिक्षा काय होणार? ७-८ वर्षांत सगळे पुन्हा बाहेर येऊन धुमाकुळ घालायला मोकळे. अशांना फाशी नाही द्यायची. रोज थोडं थोडं मारायचं. असं होऊन इतरांना जरब बसली तरी पुष्कळ झालं.

ह्या नराधमांना (ज्यांनी बलात्कार केला) त्याच पद्ध्तीने जखमी करून प्रायवेट पार्ट कापून रस्त्यावर दगड मारून ठेचून काढले पाहिजे.
आता नुसता ड्रामा करणार की आम्ही केस लढवतोय.
(पोस्ट संपादित करतेय, मला चुकीची माहिती मिळाली एकीकडून. माफी असावी, कुठलाही हेतू नसून चुकून लिहिले).

चिड?? योडीने इथे पोस्ट केलेला मेसेज मी कालच वाचला तेव्हापासुन वाटतेय की तिच्या आईबाबांनी सगळे किडुकमिडुक विकुन पैसे गोळा करावेत, मोठे गुंड गाठावेत आणि त्याच्याकरवी त्या पाचही जणांना लोखंडी रॉड घेऊन अगदी तसेच करावे. हे केल्यावरही त्यांच्या मनाचा दाह शमणार नाहीच पण त्या पाच जणांना मोकळेपणे फिरताना पाहुन जे वाटेल तेवढे तरी नक्की कमी होईल.

या देशातल्याच काय जगातल्याही कुठल्या व्यवस्थेवर माझा विश्वास राहिलेला नाहीय आता. माझ्या मुलीला चोविस तास घरात बसवुन ठेऊ शकत नाही याचे वाईट वाटतेय. ती घराबाहेर पडली की परत येईतो जीव था-यावर नसतो.. Sad Angry

.

>>माझ्या मुलीला चोविस तास घरात बसवुन ठेऊ शकत नाही याचे वाईट वाटतेय. ती घराबाहेर पडली की परत येईतो जीव था-यावर नसतो.>><<
+१ मी सतत फोन करत बसते...

फक्त एकदा... एकदाच इथला कायदा त्या लोकांना भरचौकात हाल हाल करुन जिवंत ठेवण्यापुरता बदलला जावा. बाकिच्यांना दहशत बसली तर चांगलं होईल. पण कठीण आहे ते! माणसातल्या माणुसकीला त्याच्यातलाच विकृत काम नावाचा पशू मारुन टाकतो त्यामुळे दहशत बसणार नाहीच.

या देशातल्याच काय जगातल्याही कुठल्या व्यवस्थेवर माझा विश्वास राहिलेला नाहीय आता. माझ्या मुलीला चोविस तास घरात बसवुन ठेऊ शकत नाही याचे वाईट वाटतेय. ती घराबाहेर पडली की परत येईतो जीव था-यावर नसतो..>>>>>> साधना खरय ग. एका मुलीची आई म्हणुन हे सगळं वाचुन जीव थर्‍यावर नाहीये माझा पण. डीस्ट्ब झाल्यासारख वाटतय

एका ब्लॉगवर लिहिलं होतं I am proud to be an Indian is a statement as strong as I am proud about earth being made of 75% water. काय contribution आहे आपलं?
योडि ते लिहिलेले वाचुन आतडी, ह्रुदय, मन, मेन्दु सगळं उलटंपालटं झालं. Sad
काल इथे लिहुन झाल्यावरही डोक्यातुन ते विचार जात नव्हते. पहिला भर ओसरल्यावर आता वाटतं एखाद्या समाजात गुन्हेगार निर्माण होणं याला किती गोष्टी कारणीभूत असतील? पहिले तर तो समाजच पूर्णपणे बांधिल आहे. त्या गुन्हेगाराचे गार्जियन्स (जे कुणी घरचे असतिल ते), शाळा, एकूण त्याची वाढीची वर्षं जिथं गेलि असतील तिथलं वातावरण, आणि लोक. मग त्या लोकान्ना जे कुणी घडवलं असेल ते. उत्तर मिळत नाही पण गुन्हेगार हा एकटा गुन्हेगार नसतो हे नक्कि. अति सहिष्णुता, स्वतःला आणि आप्ल्या बाब्यान्ना पाठिशी घालण्याची वृत्ति, 'त्यात काय झालं?' टाईप अ‍ॅटिट्युड सगळेच रिस्कि आहे. मला त्या मोठा होऊन गुन्हेगार होणार्‍या माणसाचि गोष्ट आठवलि जो शेवटचि इच्छा म्हणून आईचा कान चावतो कि तू माझा कान योग्य वेळी पकडला असतास तर ही वेळ आलि नसति. आईच का आपण सगळेच एक चांगला safe समाज बनवण्यास असमर्थ आहोत. अपयशि आहोत. ती मुलगी रस्त्यावर तशिच पडून होति हे वाचुन भरुन आले. आपली काय लायकि कि समाज म्हणून आपण सरकारला दोष द्यावेत आणि मोर्चे काढावेत. ते तर झालेच पण समाज म्हणुन आपण जास्त जागरुक झाल्याशिवाय कितिहि मोठा पोलिस फोर्स आणी कितिही कठोर शिक्षा पुरेशा नाहित. शिक्षा गुन्हा झाल्यावर देता येइल पण गुन्हे टाळण्यासाठि सजग समाज हि पहिलि स्टेप आहे.

.

गुन्हेगाराला शिक्षा व्हावी व पुढच्या संभाव्य गुन्हेगारांना जबरदस्त वचक बसावा अशी न्यायव्यवस्था पहिजे व न्यायाची अंमलबजावणी ही काटेकोर असली पाहिजे. भिती हे एकमेव भावना, लोकांना अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त करु शकेल.
ह्या बाफ वर भारतीय संस्कृती व भारताला ह्या अनुषंगाने इतके तिरस्काराने का बोलले जात आहे ते कळत नाही. प्रश्न व्यवस्थेचा आहे व त्याच्या भ्रष्ट असल्यामुळे निर्माण झालेल्या अगतिकतेचा आहे. भारतीय संस्कृती वा भारतीय घटना बलत्काराचे समर्थन करत नाहीत हे सर्व जाणतातच.

>>>> शिक्षा म्हणजे ताबोडतोब फाशी अशी जेव्हा ठरेल तेव्हाच बदल होइल. <<<<<
एकुणात माझ्या मनात पुढील विचार/प्रश्न उद्भवतात.
असा बदल करण्यापेक्षा, "गुन्हेगारी" वृत्ती अगदी बालवयापासूनच निर्माण होणार नाही हे बघता येणार नाही का?
भावनेच्या भरात फाशीच्या शिक्षेचे वा गन वगैरे घेऊन फिरण्याचे समर्थन / पाठिम्बा देणे वगैरे सहज सोपे आहे, मात्र त्याचे परावर्तित/दुसर्‍याबाजुचे दु:ष्परिणामही विचारात घेतले आहेत का?
माननीय राष्ट्रपतींचा "माफिचा" अधिकार असूच नये का?
जर चूकून अशा शिक्षा व अन्य बाबी अंमलात आल्याच तर ४९८अ कलमासारखा त्या बाबींचा सर्रास गैरवापर होणारच नाही याची खात्री कोण कशी देणार?
अन हे वरवरचे "गुन्हेगाराला शिक्षा करून जरब" बसविण्याचे उपाय करण्यापेक्षा, मूळात गुन्हेगारच तयार होणार नाहीत अशी शिक्षण व जीवन पद्धती व्यक्तिच्या बालवयापासून आपण राबवूच शकत नाही का?
आमच्या वेळेस आम्हाला पाजलेले बाळकडू जसे की चोरी करू नये, खोटे बोलू नये, दुसर्‍याचे काही हिसकावू नये, हिंसा करू नये वगैरे शिक्षण आता देतच नाहीत का? की दिले तरी त्याही पेक्षा जास्त काही प्रभावि या समाजमानसावर परिणाम करते आहे?
मान्य आहे की "सारे भारतीय माझे बान्धव आहेत" असे धारण केलेली प्रतिज्ञा असो वा राष्ट्रगीत असो वा रामायणातील सीतेचे हरण करणारा रावण असो, प्रतिज्ञा/राष्ट्रगीताची सक्ती नको वा रावण थोरच होता अन शिक्षणातून रामच हटवाच कारण ते "धार्मिक" आहे असल्या वल्गना देखिल याच समाजाने केल्यात, अंमलात आणल्यात म्हणताना बाकी सर्व ठिकाणि सिनेमे/नाटके/कथा/कादम्बर्‍या व सर्व दृष्य माध्यमे याद्वारे तसेच शाळाकॉलेजमधे जे पेरतोय तेच उगवतय या सत्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल?
असो.
माझी मति गुन्ग झाली आहे.
केवळ बलात्कारितालाच नव्हे तर परस्त्रीकडे विकृत नजरेने बघुन तसे वागणार्‍या प्रत्येक "नराला" शिक्षा व्हायलाच हवी.

४९८अ कलमासारखा त्या बाबींचा सर्रास गैरवापर होणारच नाही याची खात्री कोण कशी देणार?>> या कलमाचा सर्रास गैरवापर होतो, याचे काय पुरावे तुमच्याकडे आहेत?

भावनेच्या भरात प्रत्येकाला जरी असे वाटत असले तरी या प्रकारांवर ताबडतोब होण्यासारखा एकही उपाय दुर्दैवाने आपल्याकडे आत्ता नाहीये.

यासाठी खुप पेशन्स पाहिजे (अगदी पुढल्या काही पिढ्यांपर्यंतचा), अनेक सत्प्रवृत्त लोकांनी सतत सतत समाजावर चांगल्या विचारांचे हॅमरिन्ग करत राहिले पाहिजे. नुसते आईबापांनी संस्कार करून भागणार नाही. जसे आजकाल अतिशय विकृत मालिका, भंगार सिनेमे, अश्लिल गाणी यांचे हॅमरिन्ग होत आहे ना ते कमी करून सदविचारांचे घडेच्या घडे लहानपणापासुन डोळ्यांवर, कानांवर ओतले गेले पाहिजेत. शिक्षण क्षेत्र चांगल्या मुल्यवान लोकांकडुन हिसकावून घेऊन त्याचा व्यवसाय बनवुन टाकला, टिव्ही, सिनेमे यातुन भोगवाद, चंगळवादाचे उदात्तीकरण चालू झाले. या सार्‍याची फळे आहेत ही, ती भोगलीच पाहिजेत.

शस्त्रक्रिया हा सर्वकाळ उपाय होऊ शकत नाही. रोग मुळात होऊच नये यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. डोके उडवायचे नाही तर डोके बदलवायचे आहे.

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भुता !

Pages